अ‍ॅन्ड्रॉइड फोन साठी चांगले छान अ‍ॅप्स कुठे डाउनलोड करता येतील

गुल-फिशानी's picture
गुल-फिशानी in काथ्याकूट
16 Oct 2014 - 10:39 pm
गाभा: 

मित्रांनो
बरेच दिवसांची हौस पुर्ण झाली आहे. मी एक सॅमसंग चा मोबाइल खरेदी केलेला आहे. मला चांगली अ‍ॅप्स कुठे डाउनलोड म्हणजे नेटवर कुठे चांगली अ‍ॅप्स डाउनलोड करावयास मिळतील याच्या लिंका कृपया द्याव्यात. आणि अ‍ॅप चा वापर कशासाठी आहे त्याची ही माहीती दिली तर बरे होइल.
खास करुन संगीता विषयी चे अ‍ॅप्स असल्यास वा इतर कुठलेही अ‍ॅप्स जे इंटरेस्टींग आहेत
त्यांच्या कृपया लिंका द्याव्या
धन्यवाद अगोदरच मानतो

प्रतिक्रिया

विकास's picture

16 Oct 2014 - 11:11 pm | विकास

या विषयावरील आधीची चर्चा देखील अवश्य पहा कारण त्यात अनेक अ‍ॅप्स कळतील.

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Oct 2014 - 11:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या फोनवरचे "Play Store" नावाचे अ‍ॅप वापरा.

तुमचा (आणि इतरांचा :-) ) वेळ वाचावा म्हणून या आधीच्या एका धाग्याचा हा दुवा

तसे गूगल प्ले वर शोधलंत तर हिंदी आणि मराठी गाण्यांचे अ‍ॅप्स भरपूर मिळतील.

काळा पहाड's picture

16 Oct 2014 - 11:24 pm | काळा पहाड

गूगल प्ले स्टोर मधून खालील अ‍ॅप्लीकेशन्स फुकट मिळतील.
व्हाट्स अ‍ॅप - संदेश पाठविण्यासाठी
ट्विटर - ट्विट पाठवण्यासाठी
टपाटॉक - फोरम्स बघण्यासाटी
मिसळपाव
लिंक्ड इन - कार्यालयीन सोशल नेटवर्किंगसाठी
फेसबुक - खाजगी सोशल नेटवर्किंगसाठी
न्युजहंट - बातम्यांसाठी
सगळे पेपरवाले - सकाळ, टाईम्स ऑफ ईंडिया इत्यादी
फ्लिपबोर्ड - तुम्हालाच हव्या असणार्‍या बातम्यांसाठी
ई-कॉमर्स साईट्स - फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझोन, स्नॅपडील इत्यादी
डब्ल्यू पी एस ऑफीस - मायक्रोसॉफ्ट च्या वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट स्लाईड उघडण्यासाठी
अ‍ॅडोब रीडर - पीडीएफ फाईल वाचण्यासाठी
ब्राउजर्स - ऑपेरा मिनी, क्रोम
ई-रीडर - पुस्तके वाचण्यासाठी. मी अल्डीको वापरतो.
फोटोशॉप सोफ्टवेअर - मी aviary आणि VSCO cam वापरतो.
screenwakeup - तुमच्या मोबाईल ला proximity sensor असेल तर फक्त हात्वार्‍याने मोबाईल लॉक व अनलॉक करण्यासाठी. तुमच्या मोबाईल चं पॉवर बटन दाबत बसायची गरज नाही.
यु ट्युब - व्हिडीयो बघण्यासाठी
जी मेल
गूगल मॅप्स
गूगल प्ले म्युझिक
फायनान्स साठी - मनी कंट्रोल, बीएसई एनएसई स्टॉक वॉच

१) फ्लेस्की (Flesky) : उत्तम, रंगीबेरंगी व ठळक अक्षराचे कीबोर्डसाठी.
२) क्लिनमास्टर (Clean master) : टेंपररी फाइल्स, कुकीस काढुन टाकते, तसेच Ram Clean करते व त्यामुळे तुमच्या
मोबाइलचा वेग वाढ्तो तसेच ते एक उत्तम Antivirus सुद्धा आहे.

इरसाल's picture

17 Oct 2014 - 9:55 am | इरसाल

हे एवढं सगळ तुमच्या मोबाईल मधे डाउनलोड केलं की पुन्हा नवा धागा काढा माझा मोबाईल इतका हळु का चालतो
आणी मधे मधे कॉल चालु असताना सुद्धा का लटकतो(हँग हँग )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Oct 2014 - 10:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या ऑलटाईम फेव्हरेट धागा... http://www.misalpav.com/node/23241
या तिकडे...

-दिलीप बिरुटे

जिन्क्स's picture

17 Oct 2014 - 12:25 pm | जिन्क्स

मी शेवटचा :) ...

सुधीर जी's picture

19 Oct 2014 - 5:55 pm | सुधीर जी

facebook
twitter
हे app पन चांगले आहेत

टवाळ कार्टा's picture

19 Oct 2014 - 5:58 pm | टवाळ कार्टा

=))

शशिकांत ओक's picture

21 Oct 2014 - 9:06 pm | शशिकांत ओक

काही ऐप्स -
1. India Android Market य़ात काय नाही ते विचारा. भारतीयांना सामान्यपणे हवी ती माहिती देणारी सर्व ऐप्स भरलेली आहेत.... वापरून पाहा...
2. Swift keyboard मराठी, हिन्दी व इंग्रजीत पटापट टाईप करायला व पुढील शब्द सुचवणारे हे एप एकदम मस्त... मात्र ते Inscript key board वर चालते.
3. WPS - Free Mobile Office App - KingSoft चिनी कंपनीने Word, Power Point and Excell हा ऑफिस सूट MS Office 2014 च्या तोडीचा आहे. शिवाय फुकट... वापरला की कळते त्याची विविधता...
4. Automatic Call Recorder आलेला कॉल रेकॉर्ड होतो. 20 कॉल साठवले की नको ते पुसून हवे ते साठवण्याची फुकट सोय असलेले एप मला बऱ्याचदा नाडीविषयावर अंनिस टाईप लोक काही वेळा नंतर "मी असे असे म्हणालोच नाही" अशी मखलाशी करतात तेंव्हा त्यांना वठणीवर आणायाला बरे पडलेले हे एप...