माझ ब्राम्हण असण

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
5 Oct 2014 - 5:23 pm

सर्व प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो . ब्राम्हण म्हणून जन्माला आल्याचा मला काही अभिमान वैगेरे वाटत नाही आणि लाज तर मुळीच वाटत नाही . पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . यात कुठलेही सरसकट करण नाहीये . कुठल्या एका वाक्याने किंवा शब्दांनी तसा गैरसमज झाल्यास ती माझ्या लिखाणाची मर्यादा :

जेंव्हा तुमच बालपण मुंबई - पुण्याबाहेर आणि सांस्कृतिक - शैक्षणिक राजधानी वैगेरे वैगेरे च्या बाहेर जात तेंव्हा 'जात ' आणि इतर रखरखीत 'वास्तव ' फार लहान वयात कळायला लागतात . जात वैगेरे कस कळायला लागल ? तर लहान असताना आम्ही भाड्याच्या घरात राहायचो . घरमालकीण बाई एकदम धार्मिक - सोवळ्यातल्या वैगेरे वैगेरे . मैदानापासून माझ घर जवळ असल्याने खेळण झाल्यावर माझे मित्र पाणी प्यायला माझ्याकडे यायचे . आमच्या घर मालकीण बाई त्यांच्यावर फार बारीक नजर ठेवून असत . त्या प्रत्येक मित्राला direct आडनाव विचारीत (नाव नाही ) . मित्रांनी आडनाव सांगितलं कि त्यांच्या चेहऱ्यावर काही विशिष्ट भाव येत किंवा येत नसत . मग मला बाजूला घेत त्या मला सांगत ," अरे कुणासोबत हि राहतोस का रे ? आपल्या ब्राम्हण पोराना काय धाड भरली आहे का ?" त्यांनी बहुदा माझ्या आईकडे पण माझी तक्रार केली होती पण आईने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि नंतर आम्ही ते घरच बदलल . नंतर सर्व ब्राम्हण मुलांप्रमाणे मी पण शाखेत वैगेरे जायचो . तिथे शाखेवरचे गुरुजी गांधीजी बद्दल कधी टिंगल पूर्वक तर कधी विखारी पणे बोलायचे . तिथे फारसे ब्राह्मणेत्तर मुल नसायची .

नंतर बर्यापैकी हुशार विद्यार्थी असताना पण मी अकरावीला कला शाखा निवडली . एवढ्या मोठ्या वर्गात दोघेच ब्राम्हण . मी आणि अजून एक मुलगी . एव्हाना कुलकर्णी , देशपांडे , आणि आडनावाच्या शेवटी 'कर ' लागणाऱ्या लोकांसोबतच राहिलो होतो . डाके , अंभोरे , नलदे हि आडनाव पण जगात अस्तित्वात आहेत असा शोध मला लागला . बहुजन समाजाशी कॉलेज च्या निम्मिताने आलेला हा पहिला संपर्क . एकदा इतिहासाच्या देशमुख सरांनी पंढरपूर आणि तिथले बडवे यांच्यावर वर्गात काही जहाल विनोदी comments केल्या आणि अख्खा वर्ग जोरजोरात खिदळयला लागला . माझ्या मागच्या पोराने 'च्यायला हि बामन अशीच ' अशी हसता हसता दिलेली प्रतिक्रिया मला पण ऐकू आली . आपली जात बाकीच्या समाजात फार काही लोकप्रिय नाही अशी खुण गाठ मी मनाशी बांधली .

बारावी नंतर पुण्यात एका धार्मिक (का सांस्कृतिक ?) संघटनेचा प्रभाव असणार्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला . तिथल्या वसतिगृहातच राहत होतो . तिथे बारापगड जातीची मुल राहत . होस्टेल च्या शेवटच्या वर्षाला असणार्या मुलांपैकी एकाला 'Best Hostelite ' चा पुरस्कार दिला जाई . या पुरस्कारासाठी काही कारणाने ब्राम्हण मुल च (काही मोजके अपवाद वगळता ) पात्र ठरत . इतर जातीची मुल त्यामुळे वसतिगृह व्यवस्थापनावर खार खाउन असत . एकदा याच मोठ्या धार्मिक -सांस्कृतिक संघटनेचा एक कार्यक्रम कॉलेज मध्ये होता . त्या कार्यक्रमात एका ख्रिश्चन विद्यार्थ्याने टिळा लावून घेण्यास नकार दिला तेंव्हा होस्टेल मधल्या चित्पावन पोरांनी त्याला (त्याच्या पाठीमागे ) खूप शिव्या दिल्या होत्या . हि चित्पावन पोर माझ्यासारख्या घाटावरून आलेल्या ला पण खिजगणतीत
धरत नसत . त्यामुळे चित्पावन लोक म्हणजे आपल्यापेक्षा भारी हा तेंव्हा पासून आलेला गंड डोक्यातून अजून पण पूर्ण पणे गेलेला नाही . एकदा मी आणि माझा बहुजन समाजातला मित्र एका पेठेत रणरणत्या उन्हात अशाच एका महान धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पत्रिका वाटत असताना आलेला अनुभव तर उच्च श्रेणीतला होता . आम्ही लेले , नेने , देशपांडे यांचे दरवाजे पत्रिका देण्यासाठी वाजवायचो . मग माझा बहुजन साथीदार आपल नाव सांगून आम्ही कुठून व कशासाठी आलो आहोत हे सांगून पत्रिका द्यायचा . मे च उन होत पण कोणी आम्हाला उपचार म्हणून पाणी पण नाही विचारलं . वैतागून माझा मित्र मला म्हणाला , 'आता तू दरवाजा वाजव आणि माहिती दे .' पुढच्या ठिकाणी मी हा सोपस्कार केला . दरवाजा वाजवला आणि नाव सांगितलं . आणि अहो आश्चर्यम . पुढच्या अनेक घरी आम्हाला पाणी आणि काही ठिकाणी तर लिंबू शरबत पण घेण्याचा आग्रह झाला ." नावात आणि त्यातल्या त्यात आडनावात बराच काही असत रे ." खिन्न पणे हसून त्या मित्राने शालजोडीतला दिला . आडनावा वरून आपल्या समाज व्यवस्थेत किती मनांवर चरे उमटले असतील याची अजून गिणती व्हायची आहे .

एक अनुभव तर खासच . एकदा मी ट्रेन ने औरंगाबाद ला जात होतो . तर एका आजोबाना मी त्यांची अडचण ओळखून सामान वैगेरे चढवायला मदत केली . बाजूला जागा पण मिळवून दिली . मग आम्ही बर्यापैकी गप्पा पण मारल्या .त्यांनी स्वतहा बद्दल सांगितलं . त्यांनी काय करतोस असे विचारले . त्यावेळेस मी काहीच करत नसल्याने तोंडात येईल ते उत्तर देत असे . मी त्याना काही तरी द्यायचे म्हणून उत्तर दिल ,"मी मिलिंद कॉलेज मध्ये शिकतो ." आजोबांचा नूर एकदम पालटला . आजोबा एकदम बोलायचे थांबलेच . ट्रेन औरंगाबादला पोहोंचल्यावर ''बराय . बाझारात भेट होईल च कधीतरी ." म्हणून आजोबांनी कलटि मारली . दलित असणे म्हणजे काय असू शकते याची बारीकशी चुणूक मला त्या दिवशी मिळाली .

हा घाबरून राहणारा , समाजाच्या इतर घटकांपासून गंड ग्रस्त असणारा , पटकन सरसकट करण करणारा ब्राम्हण समाज बघणे वेदनादायक आहे . त्याना कायम एक शत्रू लागतो . कधी तो बहुजन समाज असतो , कधी मुस्लिम तर कधी यु पी चा भैय्या . इथे ब्राम्हण समाज म्हणजे आय टी मध्ये नौकरी करणारा आणि देशाबाहेर राहणारा समाज असे अजून एक generalization नाही केले तर अजूनच चांगल . ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? कारण अल्पसंख्य समाजाला (त्यांची आक्रमण , सक्तीची धर्मांतर ) हा अधिकार देशाच्या अनेक समस्याना जबाबदार धरताना त्यांनी कधीच नाकारला आहे .

मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे .

जाता जाता - हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का ? हा खवचट पणा नाही तर genuine प्रश्न आहे . कुठल्या जाणकाराच किंवा एखाद्या बहुजन समाजतल्या आय डी च यावरच Social Analysis वाचायला मला आवडेल .

खूप शिव्या खायला लागणार आहेत पण हरकत नाही . पण चांगली चर्चा घडण्यासाठी हि दिलेली किंमत असे समजू .

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Oct 2014 - 5:27 pm | माम्लेदारचा पन्खा

बर्याच शक्ती जागृत होणार आता....

अ आ....इकडे या !

जेपी's picture

5 Oct 2014 - 5:35 pm | जेपी

पंखासाब पॉपकॉर्न आनलेत . पयल्या रांगेत बसुन आरामात खाऊ.
बाकी धागाकर्त्याचे आणभव आमाला का येत नाय.

उगा काहितरीच's picture

5 Oct 2014 - 5:40 pm | उगा काहितरीच

पॉपकॉर्न खाणारी स्माइली कशी काढायची हो ?

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Oct 2014 - 5:42 pm | माम्लेदारचा पन्खा

ह्ये लई झ्याक क्येलंत बगा..

हितं आखाडा व्हनार हाये...पयल्या रांगेतनं मज्जा अस्ती !

जेपी's picture

5 Oct 2014 - 5:54 pm | जेपी

पंखा साब शमत आहे.
उद्या बकरी ईद आहे.त्यामुळे धागा ओस पडु नये याची काळजी घेऊ.नंतर आहेच खंग्री चर्चा.

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Oct 2014 - 5:59 pm | माम्लेदारचा पन्खा

गेले ३-४ दिवस जरा ओकंबोकं वाटतंय...

_मनश्री_'s picture

5 Oct 2014 - 6:23 pm | _मनश्री_

popcorn

सर्वसाक्षी's picture

5 Oct 2014 - 6:41 pm | सर्वसाक्षी

ब्राम्हण नव्हे, ब्राह्मण.

जाता जाता: वरील प्रतिसादकांची सदस्यनावे
माम्लेदारचा पन्खा
जेपी
उगा काहितरीच
यावरुन आपण जात कशी काय ओळखता? कुणी मुक्तविहारी कुणा साक्षीला कट्ट्याला बोलावतो यात त्यांची जात कशी काय दिसते?
मुळात तुम्हाला समोरच्याची जात शोधाविशी का वाटते?

पिंपातला उंदीर's picture

5 Oct 2014 - 7:43 pm | पिंपातला उंदीर

मी अस कधी म्हंटलं ? मी मला माहित नसलेल्या मुद्द्यावर प्रश्न विचारले . पुन्हा quote करतो

हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का ? हा खवचट पणा नाही तर genuine प्रश्न आहे .

"इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का?"

तुम्ही आत्ता पर्यंत किती कट्टे केलेत?

स्वत: अनुभवा आणि मग विचार करा.जमल्यास ह्या महिन्याच्या १८ ता. ते २९ ता. पर्यंत ३ कट्टे होणार आहेत.डोंबोली, ठाणे आणि पुणे. त्यापैकी कुठल्याही एका कट्ट्याला हजेरीपुरते तरी या आणि मग बघा.

मी किंवा माझ्या बरोबरच्या कुठल्याही मिपाकराने कधीच आणि कधीही कुठल्याही कट्ट्यावर आलेल्या माणसाला जात विचारली नाही.वैयक्तिक माझ्या पुरते बोलायचे तर, मी फक्त २च जाती मानतो.

बाह्मण किंवा अब्राह्मण.

ब्राह्मण ====> जो सतत ज्ञान मिळवायच्या मागे असतो तो

आणि

अब्राह्मण =====> जो आहे त्या ज्ञानात समाधानी असतो किंवा मिळालेल्या ज्ञानाचा सदुपयोग करत नाही, तो.

मला नाही वाटत की मिपावर कुणी अब्राह्मण असतील म्हणून.

जन्माने मिळालेल्या जातीला आणि नावाला किंवा आडनावाला मी हिंग लावून विचारत नाही.

ज्ञानव's picture

6 Oct 2014 - 11:36 am | ज्ञानव

ब्राम्हण्याची व्याख्या आवडली

जन्माने मिळालेल्या जातीला आणि नावाला किंवा आडनावाला मी हिंग लावून विचारत नाही. मी पण विचारत नाही.
पण धागाकर्त्याच्या म्हणण्यात हि अर्थ आहेच मुवी शेवटी प्रत्येकाचे अनुभव आणि वेदनाच असे काही लिहिण्यास उद्युक्त करत असतात?

१) "ब्राम्हणांनी पेशवाई घालवली" हे वाक्य किंवा हा पराक्रम आणि सगळे नॉन-वेज ब्राम्हणांनी महाग करून ठेवले हे ऐकताना होणारी वेदना बरयाच वेळा हमरीतुमरीवर गेली आहे.

२) सरकारी नोकरीत ब्राम्हण सहकार्याने आधीच्या कर्मचार्याचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणल्या नंतर जातीविषयक कायद्याचा बडगा उगारलेला पाहून येणारी हतबलता वेदना आजही त्रास देते आहे.

३) dipartmental परीक्षांमध्ये ब्राम्हणांना डावलून इतरेजनांना पास करून सिनिओरीटी घालवलेली पहिली तर वाईट वाटत आले आहे.

आणि ब्राम्हणेतर सर्व एरवी भांडले तरी त्यांच्यातल्याच एकावर अन्याय झाला (कुणाकडूनही)तर ते एक होताना कोर्टात जाताना पाहिलेत पण ब्राम्हण कधीही एक होत नाहीत ते आप्ल्यातल्याच ज्याच्यावर अन्याय झालाय तो कसा मूर्ख आहे आणि मी किती शहाणा आहे त्याची फुशारकी मारतो हे हि उद्विग्न करते.

ब्राम्हण्याची व्याख्या आवडली पण ती वैयक्तिक जो पर्यंत समोरचा फणा काढत नाही तोपर्यंत.

माझे मित्र, क्लायंटस कलीग्स वेग वेगळ्या जातीतले आहेत पण मी त्यांची जात कधी लक्षात घेतली नाही तरी कधी विषय निघाला की ते मला "भटा" म्हणंत आले आहेत पण मी जातीविषयक कुठल्याही कायद्याची मदत घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मला ते हसण्यावारीच न्यावे लागते पण मी कुणाला कुठलेही जातीविषयक संबोधन वापरू शकतच नाही स्वभावानेही आणि कायद्यानेही.

पण मग एखादा ब्राह्मण जर वरील प्रमाणे आपले मत मांडत असेल तर त्याला माझे नक्की अनुमोदन, पाठींबा आहेच आहे.

टवाळ कार्टा's picture

6 Oct 2014 - 12:47 pm | टवाळ कार्टा

हायला मला डोम्बोलीच्या आणि पुण्याच्या कट्ट्याचा पत्ताच नाहिये...

पुण्याच्या कट्ट्याचा पत्ताच नाहिये...

आम्हाला पुण्याच्या कट्ट्याची माहीती हवीये.. कुठे मिळेल. ?

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Oct 2014 - 5:46 pm | माम्लेदारचा पन्खा

ह्या तर्हेने इथे सगळेच ब्राह्मण आहेत...

+२००

पैसा's picture

5 Oct 2014 - 6:46 pm | पैसा

ज्याचे त्याचे अनुभव आणि विचार. प्रत्येकालाच असे अनुभव असतील असे नव्हे. किंवा तुम्ही जी भीती/गंड याबद्दल बोलताय ते व्यक्तिगत पातळीवर असण्याची शक्यता जास्त वाटते आहे.

लै दंगा करायची इच्छा हाय पण मन मारतो.
:-(

पक पक पक's picture

5 Oct 2014 - 7:28 pm | पक पक पक

च्यामायला..... :)

उदयन's picture

5 Oct 2014 - 7:29 pm | उदयन

ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? कारण अल्पसंख्य समाजाला (त्यांची आक्रमण , सक्तीची धर्मांतर ) हा अधिकार देशाच्या अनेक समस्याना जबाबदार धरताना त्यांनी कधीच नाकारला आहे .

असे लिहायला हिंमत लागते. आपले अभिनंदन

पक पक पक's picture

5 Oct 2014 - 7:55 pm | पक पक पक

Funny Creature Chewing

माझे पॉपकॉर्न संपत आलेत...

जेपी's picture

5 Oct 2014 - 8:00 pm | जेपी

टेंन्शन इल्ले.
फुकटात मक्याच्या लाह्या मिळतील.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Oct 2014 - 8:02 pm | कैलासवासी सोन्याबापु

मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे

हा माझ्यालेखी आपल्या लिखाणातला षट्कार आहे!!!!. मी शुद्ध इंग्रजीत विचारत असतो " व्हाय स्टीरियोटाईप ??" माझी तर केसच निराळी आजा अन त्याचे दोन भाऊ हिंसप्रसे चे सशस्त्र क्रांतिकारी होते, साक्षात चंद्रशेखर आझाद उर्फ पंडीतजी ह्यांनी क्रांतिदिक्षा दिलेले, मला माझा प्रत्येक ब्राह्मण मित्र काहीतरी वेगळ्या नजरेने पाहतो, अन बहुजन समाज "हा बामन" ह्या इंप्रेशन मधे असतो, आयडेंटीटी क्रायसिस होतो राव कधी कधी!!!

श्रीरंग_जोशी's picture

5 Oct 2014 - 8:06 pm | श्रीरंग_जोशी

एका आव्हानात्मक विषयावर मोकळेपणाने व संयतपणे लिहिल्याबद्दल अभिनंदन.

माझ्या सुदैवाने मला लहानपणापासून सर्व जातिधर्माच्या लोकांबरोबर राहायला मिळालं. वर्तमानपत्रं व मासिकांमधील बातम्यांमध्ये व वैचारिक लेखनांमध्ये जात्यंधपणाच्या बातम्या व उल्लेखांची प्रत्यक्षातली उदाहरणे मला स्वतःला फारच क्वचित दिसली.

स्नातकोत्तर शिक्षणासाठी बारामतीला राहत असताना राज्याच्या इतर भागांतून आलेल्या काही सवंगड्यांच्या आचरणातून तीव्र जातीयात प्रथमच दिसली.

इसकाळमध्ये अमेरिकेतील महाराष्ट्र / मराठी मंडळांच्या बातम्या प्रकाशित झाल्या की त्यावरच्या अनेक प्रतिसादकांचा रोख असतो की सदर सांस्कृतिक चळवळीवर ब्राह्मणांनी एकाधिकार निर्माण केला आहे.

प्रत्यक्षात याविरुद्धची उदाहरणे नक्कीच पाहिली आहेत. मी स्वतः अनेक वर्षांपासून या चळवळींमधला स्वयंसेवक आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर मंडळे चालत असल्याने जे अक्षरशः मजुरासारखे परिश्रम करतात ते चळवळीचा चेहरा बनतात. जे मंडळांच्या कार्यक्रमांना प्रेक्षक म्हणून येतात व परत जातात त्यांना कदाचित दूर ठेवले गेल्याची भावना होत असावी.

बाकी आपल्याला पटो वा न पटो आपल्या समाजातली जातीयता हे कटू वास्तव आहे.

भाते's picture

5 Oct 2014 - 8:36 pm | भाते

ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर!!!

काय फायदे मिळाले ब्राह्मण असल्याचे? मीसुध्दा ब्राह्मण आहे.

च्यायला, दहावीनंतर त्या कुठल्यातरी 'अबक' जातीला ३८% मिळाले असताना महाविद्यालयात प्रवेश मिळतो आणि ५८% मिळालेल्याला केवळ (इतर/ब्राह्मण) जातीमुळे त्याच महाविद्यालयात प्रवेश नाकारला जातो! काय वय असतं दहावीला? जेमतेम १५-१६ वर्ष! तेव्हापासुन हा भेदभाव लक्षात आल्यावर पुढे त्याच्याकडुन काय अपेक्षा करणार?
७८% मिळालेल्याला ती जागा नाकारली गेली तर? काय करायची आहे ब्राह्मण जात! त्यापेक्षा 'अबक' जात लावली तर ३८% मिळवुनसुध्दा मिळतो ना त्याच महाविद्यालयात प्रवेश! मग कशाला करायचा वर्षभर अभ्यास रक्त अटवुन?
अर्थात तो ३८% वाला अकरावीला चार विषयात नापास होतो. पण गेली/घालवली ना त्या ५८%/७८% मिळवलेल्याची जागा!
दहावीला असताना मी हे अनुभवले आहे.

उदयन's picture

5 Oct 2014 - 9:06 pm | उदयन

७८% मिळालेल्याला ती जागा नाकारली गेली तर? काय करायची आहे ब्राह्मण जात! त्यापेक्षा 'अबक' जात लावली तर ३८% मिळवुनसुध्दा मिळतो ना त्याच महाविद्यालयात प्रवेश! मग कशाला करायचा वर्षभर अभ्यास रक्त अटवुन?
-----------------

तुमचे म्हणने रास्त आहे. पण हे केवळ गेले ३०-४० वर्षापासुनच सुरु झाले. तरी तुम्हाला इतका राग. मग विचार करा वर्षानुवर्षे मार्क देणे तर दुर राहिले ज्यांना शिक्षणापासुन देखील वंचित ठेवलेले अशांचे विचार काय असतील ?
१५-१६ तर लांबची गोष्ट आहे अजुन ही बर्याच ठिकाणी ५-६ वर्षाच्या मुलांना देखील दुय्यम स्वरुपाची वागणुक मिळते

सस्नेह's picture

5 Oct 2014 - 10:14 pm | सस्नेह

रास्त प्रतिसाद
आईने दुबळ्या पिलाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे

ज्ञानव's picture

6 Oct 2014 - 11:46 am | ज्ञानव

पण हा वंचितपणा ब्राम्हणांनी दिला का ? पूर्वीच्या सर्व अत्याचारांचे खापर फक्त ब्राह्मणांवर फोडणे कितपत योग्य आहे. राजकारण हे कायम क्षत्रियांच्या हातात होते त्यांनी का प्रयत्न केले नाहीत सर्वांना योग्य शिक्षण मिळवून देण्याचे ? भातेसाहेब म्हणतात तोच प्रश्न मला पडतो नक्की आम्ही काय फायदे ओरपले?!!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Oct 2014 - 3:33 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत.. मांगाची पोर देणारा - नेणार नाही इतकी जातीयता पाळणारा समाज आणि खापर फोडायला फकस्त बामनं. झालं.

सुहास..'s picture

6 Oct 2014 - 5:35 pm | सुहास..

डिसक्लेमर : प्रतिसादात जाती-पातीचा उल्लेख केवळ रेफरन्स करिता

होय सहानभुतीच !! सर्वच समाजासाठी ...
धागा व्यापक असला तरी त्याबाबत अज्ञभिन्न असलेला गट मात्र त्यातील व्यापकता समजण्याकरता पूर्वग्रहाने येणार हे जरी ग्रहीत धरत असलो तरी, तुम्ही म्हणता तितकी अधोगती ( झाली तर काही अंशी का असेना प्रगतीच म्हणेन मी ) झालेली नाही. समाजात कोणीएके काळी असलेली कट्टरता मात्र काही अंशी कमी झाली असे ही याला जोडुन मी म्हणेन. अर्थात तुम्हाला...आय मीन लेखाला विवेकी बुध्दीने आणि समान नजरेने बघणारे कमी आहेत. ( हल्ली काय आहे ना ..लोक गीता देखील त्यात स्वःताचा अर्थ घालुन वाचतात..खरा अर्थ जो आहे तो त्या कृष्णदेवालाच ठाउक ! )

ही उदाहरणे आहेत , समाज दुभंगल्याची, माझ्याकडे उदाहरणे आहेत जिथे मी एकवटल्याचे पाहिले आहे, बेटी चा नसेल जास्त प्रमाणात व्यवहार पण रोटीचा व्यवहार आहे. माझ्या ओळखीच्या एका कडक वैष्णव ब्राम्हणाने, घरात कडाडुन विरोध असुन एका अनाथ मुली शी लग्न केल्याचे उदाहरण आहे ( या अनाथालयात फक्त वेश्यांच्याच मुली असतात ). आज कित्येक वर्षे सुखाचा संसार करतोय, असे दलीत-मुस्लीम-ब्राम्हण-मराठा एकत्र पार्टीला पाहिलेत ..माझा सांगतो अनुभव , पेग क्रमांक तीन, तो मराठा, त्याच्यासमोर बसलेला ब्राम्हण आहे , दलीत एका बाजुला , तिघांना एका प्लेटमध्ये 'प्लेन चीज ' खाताना पाहिलय, वाद चालु आहे " शहाण्णव कुळी म्हणजे काय आहे माहीत आहे का ? " समोरुन आवाज " परशुरामाने काय २१ की ५२ वेळा नि:क्षत्रीय केलीय " याच पार्टीत चौथा देशस्थ म्हणतो " ओ, चित्पावन, गप्प बसा आता " आणि सरते शेवटी सगळे मिळुन दाल-खिचडी खातात, बनविणाना मुस्लीम आहे की नाही याचा विचार न करता ? काय म्हणाल याला ? सावरकर जेवत नव्हते दलीतांच्या पंगतीत? मी स्वःता कितीतरी दलीत भक्त पाहिलेत सावरकरांचे !

आहेत काही ! पब्लीक जरा भयताड झालय ! सुरुवात मी मिपावरच्या एका उदाहरणाने देतो, एरवी वाचन-मात्र असलेला आयडी असे काही धागे दिसले की लगेच " काडीमात्र" होतात, ब्राम्हण्य आणी त्याच श्रेष्ठत्व टिकविण्याची त्या आयडी ची मरमर ( आधी कुत्तरओढ असा शब्द लिहीला होता ) पाहिली की अक्षरशः किळस येते , याचा अर्थ सोनवणींच्या ब्लॉग ची वा चेपुवर ते काय " संभाजी ब्रिगेड - भटांचा कर्दनकाळ " ची येत नाही असे काही नाही , मला त्याहुनी जास्त येते !! कोणीतरी वाघमारे म्हणुन आहेत ..ब्लॉक करुन टाकले मी शेवटी चेपुवर ...हे असे अनेक किस्से आहे ..जात लागते ती एकदा का निवड्णुका जाहीर झाल्या की ( काय च्या मारी ! पण मी आशावादी आहे, एक ना एक दिवस हे ही चित्र बदलेल )

थोडेसे आरक्षणाविषयी ..
मी ब्राम्हण वर्गाचा राग समजु शकतो ..पण काही करु शकत नाही, खर तर ! सध्या कोणीच काही करु शकत नाही (अगदी समान नागरी कायदा ही ) आरक्षणाला लागुन एक कलम आहे , की दरवर्षी आरक्षितांच 'समाजातील' प्रमाण आणि शैक्षणिक पातळीवरच, सरकारी नौकर्‍यांमधल प्रमाण, सम ( सारखं ) झाल की मग ते लगेच रद्द होवु शकते. जातीनिहाय जणगणना होते ती यामुळेच !! आणि आरक्षणाच्या मुदतीची डेट पुढे ढकलावी ते ही याच मुळे !! फायदे-तोटे ही आहेत, आहे थोडी प्रगती आहे ! पण काय करणार समाज इतका जात-पात मानतो की विचारु नका, :( आधी राजस्थान राज्य सरकार ला गुज्जर समाज आरक्षित करता आला, आता कॉन्ग्रेस ने मराठा ला दिलं, हे मराठा समाजाच झाल असे की , त्या आधी मराठा- कुणबी समाज आरक्षित होता, आता हे कुणबी म्हणजेच ९६ कुळी म्हणणारे काही आणि ९६ कुळी च कुणबी म्हणनारे काही, त्यांचा टक्का बघीतला गेला आणि राज्य सरकार ने देवुन टाकल आरक्षण !! ) फायदा होईल की नाही माहीत नाही ( आपल्या राज्य सरकारकडे साध्या पोलीस भरत्या करायला वेळ नाही, उगा राजकारण तिज्यायला ! ) ब्राम्हण समाजाच हे असं होत, सामाजिक दृष्ट्या समाज दुर्बल दिसत नाही ( एकही किस्सा आठवेना मला ज्यामध्ये दलीत मुलीने ब्राम्ह्ण वा उच्चजातीतील मुलाशी प्रेम केले म्हणुन दलीतांनी ब्राम्हण/उच्चवर्णीयाची हत्या केली ती) , आर्थिक दृष्ट्या बघावं तर ( तुम्हाला इथलेच किती-तरी लोक्स परदेशात सेटल झालेले दाखवेल मी ) असेल एखादा दुसरं गंविनी लिहिल्याप्रमाण, मुळात लक्षात घेतला जातो ते टक्का ! अश्या कित्येक बाबी आरक्षणची डेट वाढविताना लक्षात घेण्यात येतात, वाजपेंयी नी एकदा असा अहवाल मागविला होता, वर्ष आठवत नाही , पण त्यांनी तो पाहिल्यावर ते थक्कच झाले होते , केवळ ४० % आरक्षितापर्यंत च आरक्षणाचे फायदे पोचले होते, त्यांना तो गुंडाळुन ठेवावा लागला आणि उलट ते प्रकरण हाताशी धरुन मायावती खाजगी क्षेत्रातही आरक्षण द्या ही मागणी पुढे ढकलली होती. आणि मला वाटते मागाहुन कॉन्ग्रेस कडुन प्रमोशन मध्येही आरक्षण मंजुर करून घेतले होते ! पण आता याचा अर्थ असा नाही की दलीत समाज आरक्षणाच्या विरुध्द नाही , एक खुप मोठा गट आहे, विषेशतः प्रकाश आबेंडकराना मानणारा, त्याच म्हणणे असे आहे की जात ही टीसी मधुनच काढुन टाका, मग ती कोणती का असेना, आणि क्लॅरिटी आणा ! सर्वच क्षेत्रात, मग ती शैक्षणिक असो वा सरकारी नौकर्‍या, पारदर्शकता आणा !! लायकी ही सिध्द होईल , पण यामुळे राजकारण्यांना एक सर्वात मोठा तोटा होवु शकतो ...असे केले सर्व समाज एकवटेल , मग यांना जाती-पातीची आणि मुळे मते कशी मिळतील ( आठवा , बापटअण्णांना तिकीट न मिळाल्याने आणि कुठला ब्राम्ह्ण उमेदवार नसल्याने " पुणे ब्राम्हण सभेने मतदानावर टाकलेला बहिष्कार, खर सांगा असे वांझोटे धंदे केल्यावर कसा एकवटणार समाज ) मी तर काही लोकांना तो एकवटु नये म्हणुन ही शर्थीचे प्रयत्न करताना पाहिले आहे ! ब्राम्हण मित्राच्या, नितीन आगेच्या ब्रुटल मर्डर विषयीच्या, निषेधात्मक पोस्ट वर, " अंथरुण पाहुन पाय पसरावे " अशी मराठा समाजाचे आडनाव असलेल्या ची कमेंट आल्यावर काय समजायचे मातंग समाजाच्या लोकांनी... इथल्या काही कमेंट वाचल्यावर तर मीही त्याविषयी लिहायचचं बंद केले . .. आहेत अश्या बर्‍याच थेरॉटिकल गोष्टी , ज्याचा मागमुस ही नसतो लोकांना .

प्रॅक्टीकली होते असे की , ब्राम्हण ब्राम्हण संस्काराच्या चौकटीत जगतो , दलीत दलीत मध्ये , मुस्लीम मुस्लीम चौकटी मध्ये, मराठा मराठा मध्ये त्यामूळे माझ्या जातीतील मुल्ये श्रेष्ठ्च असे बिंबविले जाते मग मी श्रेष्ठ म्हटल आपोआप दुसरा कनिष्ठ होतो !! हे मनामध्ये हळु-हळु वाढत जाते ......खुप कमी लोक असतात जी ही चौकट मोडतात आणि तेच वर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच उत्तर आहे .

धन्यवाद !

जेपी's picture

7 Oct 2014 - 10:08 am | जेपी

आख्या प्रतिसादाला +१११११११११११११११११११११११११११११

मृत्युन्जय's picture

7 Oct 2014 - 12:02 pm | मृत्युन्जय

+ १

फक्त एका बाबतीत थोडासा विरोध आहे सुहास. लग्न आणि त्यातुन झालेल्या हत्यांबद्दल. उच्चवर्णीयांनी निम्न वर्णीय कुटुंबातील मुलांची आणि मुलींची (उच्चवर्णीय मुलांना अथवा मुलींना फूस लावली म्हणून) हत्या केल्याची कैक उदाहरणे मिळतील. तु म्हणतोस त्याप्रमाणे उलटे झाल्याचे दिसत नाही. उच्चवर्णीयांनी केलेल्या या हत्यांमध्ये ब्राह्मणांनी केलेल्या हत्या किती आढळतात आणि त्यातही महारष्ट्रीय ब्राह्मणांनी केलेल्या किती आढळतात? त्यामानाने इतर जातींनी केलेल्या आधिक आढळतील.

खैरलांजी प्रकरण कशाचे द्योतक म्हणता येइल? तिथे उच्चवर्णीयांनी निम्नवर्णीयांची हत्या केली (लग्न संबंधात नाही). उच्चवर्णीय म्ह्णजे कुणबी. निम्नवर्णीय होते महार. लातुर मध्ये बरोबर उलटी घटना देखील दिसुन येते. महाराष्ट्रात बघितले तर जातीपातीवरौन उच्चवर्णीयांनी केलेल्या हत्यांमध्ये ब्राह्मणांनी केलेल्या हत्या फारच कमी प्रमाणात आढळतील. इतर जातींनी केलेल्या निम्नवर्णीयांच्या हत्या अधिक सापडतील.

ब्राह्मणांनी केलेल्या निम्नवर्णीयांच्या हत्येचे प्रमाण उत्तर प्रदेशात अधिक आढळेल.

हे सर्व सांगण्याचे कारण इतर कुठल्या जातीवर ठपका ठेवायचे नसुन फक्त हे सांगण्याचे आहे की महाराष्ट्रातीय ब्राह्मणवर्ग उर्वरीत भारतातल्या ब्राह्मणांपेक्षा बराच सुधारित आहे. त्यामुळेच अस्पृश्य निवारणाची चळवल सुरुही महाराष्ट्रात झाली आणि वाढलीही इथेच. महाराष्ट्रीयन समाजातच कर्वे, आगरकर, सावरकर आणि रानडे यांसारखे जातीभेदाविरुद्ध आवाज उठवणारे समाजधुरीण निर्माण होउ शकले.

दुसरी दुर्दैवी गोष्ट अशी की अस्पृश्यता जणु ब्राह्मणांनी निर्माण केली आणी जातिभेद त्यांच्यामुळेच वाढला असे चित्र निर्माण केले जाते, तसे असेल तर मग आज खैरलांजीसारख्या घटना का होतात? इतर जातीतले लोक इतकी अस्पृश्यता आणि जातिभेद का पाळतात?

थोडेसे आरक्षणाबद्दल. आरक्षण सुरु होउन ६० वर्षे उलटली. जेव्हा सुरु झाले तेव्हा मागस वर्ग निश्चित केला नव्हता का? केलाच होता ना? मग ६० वर्षात त्या मागास वर्गात कुणबी, गुज्जर, मराठा अशी भर कशी काय पडली? हे उलटे आरक्षण नक्की कशाचे द्योतक आहे? ब्राह्मण सोडुन सगळे आरक्षित का? मराठा समाजाला आरक्षणाची गरज नक्की का भासते? तो समाज पहिल्यापासुन सधन, शिक्षित आणि राज्यकर्ता नाही का? मग त्यांना आरक्षण का? आरक्षण हे गरज म्हणुन न वापरले जाता एक राजकीय साधन म्हणुन वापरले जाते हे खेदजनक आहे. आरक्षण वाटल्यास अजुन १०० वर्षे ठेवा पण त्यांच्यासाठी ज्यांना याची गरज आहे. आरक्षित समाजातील सनदी अधिकार्‍यांची मुले अजुनही आरक्षणाचा उपभोग का घेतात (फक्त सनदी अधिकारी असेच नाही तर मध्यमवर्गीय किंवा खाउन पिउन सुखी असलेले कनिष्ठ मध्यमवर्गीयांचेही उदाहरण घे). त्यांना अजुन किती काळ आरक्षण? ते लोक अजुनही उद्धारित नाही झालेले का? निम्नवर्णीय पण अजुनही आर्थिअक्दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना अजुनही आरक्षणाचा लाभ दिला तर एकवेळ समजु शकतो पण शिक्षित आणि सधन लोकांना का? एक नाही अनेक उदाहरणे देतो. माझ्या डोळ्यासमोर घडलेली. सधन बांधकामव्यावसिकाचा मुलगा, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एका बड्या अधिकार्‍याची मुलगी, एका सधन महाविद्यालयीन प्राध्यापकाची मुलगी असे अजुनही अनेक लोक पाहण्यात आले ज्यांनी महाविद्यालयातच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आणि एमबीए च्या अभ्यासक्रमासाठीही आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांना खरेच आरक्षणाची गरज होती का आणि आरक्षण त्यांचा अधिकार होता का? समजा काही शतके उच्चवर्णीयांनी निम्नवर्णीयांचे शोषण केले. मग आता कालचक्र उलटे फिरवायचे का? आणि ब्राह्मणांचे शोषण करायचे का? की जितकी शतके शोषण झाले तितकी शतके आरक्षण चालु ठेवायचे? आणि किती शतके मागे जायचे? आणि ठरवा एकदाचे की शोषण नक्की कोणाचे झाले. राज्यकर्त्या मराठा समाजाचे? सधन कुणबी आणी धनगर समाजाचे?

असो. चर्चा करु तितकी कमीच आहे. उत्तरे कुणाकडेच नाहित. उगाच चिखलफेक करण्यात काही हशील नाही.

अवांतरः प्रतिसाद जरी तुझ्या प्रतिसादाला उप प्रतिसाद म्हणून असेल तरी हा प्रतिसाद तुझा प्रतिसाद मान्य नाही म्हणुन दिलेला नाही तर त्या अनुषंगाने लिहावेसे वाटले म्हणुन दिलेला आहे. तुझा प्रतिसाद पटलेला आहेच.

सधन बांधकामव्यावसिकाचा मुलगा, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एका बड्या अधिकार्‍याची मुलगी, एका सधन महाविद्यालयीन प्राध्यापकाची मुलगी असे अजुनही अनेक लोक पाहण्यात आले ज्यांनी महाविद्यालयातच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आणि एमबीए च्या अभ्यासक्रमासाठीही आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांना खरेच आरक्षणाची गरज होती का आणि आरक्षण त्यांचा अधिकार होता का?

फक्त एवढ्या एका मुद्द्याबद्दल बोलायचे झाले तर आरक्षण घेणे ही बर्‍याचदा सवलत लाटणे ह्या उद्देशाने नसून तसे ते घ्यावे लागते कारण खुल्या वर्गातून प्रवेश/नोकरी स्वीकारली तर पुढे आरक्षण म्हणा किंवा शिष्यवृत्ती म्हणा, अशा कुठल्याच बाबींचा लाभ होत नाही. ह्याची दुसरी बाजू अशी की पुरेसे मार्क असूनही जर खुल्या वर्गातून प्रवेश घेतला तरीही त्या वर्गातील एक सीट अडवल्याचाही दोष लागतो. त्यामुळे आरक्षण घेतले तर सवर्ण सहाध्यायांच्या नजरेतील 'सरकारी ब्राह्मण' अशी तुच्छता सोसणे आणि नाही घेतले तर आमची एक सीट अडवली म्हणून राग ओढवून घेणे अशा दुहेरी कात्रीत लोक सापडतात हो!

मी माझ्यापुरतं जात-धर्म-वंश वगैरे संपवून टाकलं आहे, म्हणून समोरचा मला त्याच्या चष्म्यातून पाहणं थांबवत नाही ही खरी मेख आहे.

जाऊ द्यात! या विषयावर अजून बोलायची इच्छा नाही.

सह्यमित्र's picture

7 Oct 2014 - 3:03 pm | सह्यमित्र

हे तितकेसे पटत नाहि. बऱ्याचदा असे बघण्यात आले आहे कि आर्थिक दृष्ट्या अतिशय सधन असणार्यांच्या मुलाना पुरेसे मार्क नसताना केवळ आरक्षणा च्या लाभा मुळे प्रवेश मिळतो काही वेळेला फी मध्ये सवलत देखील आणि आर्थिक दृष्ट्या निम्न पण केवळ उच्चवर्णीय असल्या मुळे प्रवेश मिळत नाहि. अशीच उदाहरणे पाहण्यात जास्त आलि आहेत.

देवयानी खोब्रागडे यांचे वडील उच्च स्तरीय(प्रमुख सचिव) आय ए एस अधिकारी होते ना मग त्यांनी आपल्या वैद्यकीय प्रवेशासाठी आणी नंतरच्या विदेश सेवेसाठी त्यांनी आरक्षण वापरलेच. (शिवाय त्यांचा मुंबईत एक फ्लैट असताना आदर्श मध्ये त्यांना दुसरा फ्लैट मंजूर झाला आणी हे त्यांच्या वडिलांना "माहित" नव्हते).
अशा उच्च स्तरीय अधिकार्याच्या अपत्यांना आरक्षण दिल्यामुळे त्याच कोट्यातील कोणा खरोखरीच गरज असलेल्या मागास वर्गीयावर अन्यायच होतो. वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क सर्वाना एक लाख आहे तर मागास वर्गीयांना १० हजार आहे. ज्यांचे वडील अत्युच्च दर्जाचे शासकीय अधिकारी आहेत त्यांना हि फी ची सवलत म्हणजे अपात्री दान आहे.
आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. ( हा एक मोठा वादग्रस्त राजकीय निर्णय आहे आणि कोणीही नेता हा निखारा आपल्या अस्तनीत ठेवणार नाही हेही मला माहीत आहे ).

उच्च स्तरीय अधिकार्याच्या अपत्यांना आरक्षण दिल्यामुळे त्याच कोट्यातील कोणा खरोखरीच गरज असलेल्या मागास वर्गीयावर अन्यायच होतो.

+१

आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. >>>

यावर मौनीबाबाचं सरकार विचार करत होते , अहवाल धुळ खात पडुन आहे असे सध्यातरी एकुन आहे !! कोणीतरी या विषयावर ' जनहित याचिका ' टाकायला हवी , माझा अभ्यास चालु आहे यावर ..खात्रीने सांगतो हा विषय खरोखरच चिंताजनक आहे !! नक्कीच कधी ना कधी हा विषय घेईल मी ...किमान याचिका दाखल करण्याबाबत तरी

असो , बाकी सर्वांनी माझ्या प्रतिसादावर जी चर्चा आरंभली आहे त्यांचे धन्यवाद , आवडते ही आहे ...!! मी सविस्तर लिहेन वेळ मिळेल तसा ..

अजया's picture

7 Oct 2014 - 7:13 pm | अजया

हा अनुभव मी पण घेतलाय.नावाने मागासवर्गीय, सरकारी पदस्थांची अत्यंत कमी गुण मिळवुन आलेली धनाढ्य मुलं!! मात्र चार वर्ष पास होता होता नाकात दम आलेली!!

चिगो's picture

8 Oct 2014 - 4:34 pm | चिगो

आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल.

ह्याच मुद्द्यावरुन सुमारे दोन वर्षांपुर्वी लिहीलेल्या लेखाची ही झैरात..

प्रभाकर पेठकर's picture

7 Oct 2014 - 1:08 pm | प्रभाकर पेठकर

सहमत.

आरक्षण वाटल्यास अजुन १०० वर्षे ठेवा पण त्यांच्यासाठी ज्यांना याची गरज आहे.

माझे तर म्हणणे आहे कांही टक्के आरक्षण ठेवण्या ऐवजी १०० टक्के आरक्षित महाविद्यालये सुरु करा.

आधी आरक्षणाचा फायदा घेऊन जे उच्च शिक्षित झाले आहेत त्यांनी ह्या महाविद्यालयातून आपल्या बांधवांना ज्ञानदान करावं. तिथे कोणाही उच्चवर्णियांना प्रवेश नसावा. शिपाई ते मुख्याध्यापक सर्व फक्त मागास वर्गातूनच पुढे आलेले असावेत. सर्व मागास विद्यार्थ्यांना अशा महाविद्यालयातून प्रवेश मिळावा. बाकी सर्व महाविद्यालयामधून इतरांना (ओपन वर्ग) प्रवेश द्यावा. मागास विद्यार्थ्यांनाही अशा (ओपन) वर्गात प्रवेश हवा असेल तर गुणवत्तेवर देण्यात यावा. तिथे कुठलेही आरक्षण नसावे.

इरसाल's picture

7 Oct 2014 - 3:00 pm | इरसाल

आधी आरक्षणाचा फायदा घेऊन जे उच्च शिक्षित झाले आहेत त्यांनी ह्या महाविद्यालयातून आपल्या बांधवांना ज्ञानदान करावं.

काका तुमचा डाव कळला हं मला, अस सांगा ना की तिथे अ‍ॅडमिशन घेणार्‍या मुलांना, तुम्हाला शिकुच द्यायचे नाही. ;)

प्रभाकर पेठकर's picture

7 Oct 2014 - 3:51 pm | प्रभाकर पेठकर

अस सांगा ना की तिथे अ‍ॅडमिशन घेणार्‍या मुलांना, तुम्हाला शिकुच द्यायचे नाही.

का बरं? असं का वाटलं? मागास वर्गात आपल्या बांधवांना शिकवू शकतील असे ज्ञानी नाहीत की स्वतः शिकल्यावर ते समदु:खी बांधवांचा कैवार घेऊ इच्छित नाहीत?

डॉ. आंबेडकरांपासून डॉ. नरेन्द्र जाधवांपर्यंत अनेक ज्ञानी पुरुष मागास वर्गात होऊन गेलेत आणि अजूनही आहेत. आपल्या ज्ञाती बांधवांना शिकवू शकतील असे कांही प्रोफेसर मिळू शकणार नाहीत?

अशा व्यवस्थेत मागासांना शिक्षणही मिळेल आणि राजकार॑ण्यांना गलिच्छ राजकारण करायची संधी मिळणार नाही शिवाय पुढारलेले आणि मागास अशी दरीही उरणार नाही.

राजाभाउ's picture

7 Oct 2014 - 1:39 pm | राजाभाउ

+१
अतिशय सुंदर प्रतिसाद. मला जवळपास असेच वाटते पण एतके व्यवस्थीत मांडता आले नसते. धन्यवाद सुहास

पैसा's picture

7 Oct 2014 - 8:27 pm | पैसा

प्रतिसाद आवडला, तसाच मृत्युंजयाचाही.

श्रीगुरुजी's picture

5 Oct 2014 - 9:05 pm | श्रीगुरुजी

तुम्हाला जे अनुभव आले तसले अनुभव मला कधीही आलेले नाहीत. उलट ब्राह्मण हा विषय जास्त करून टिंगलीचा, उपहासाचा व मत्सराचा असल्याचे अनुभव आहेत.

>>> ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ?

खरं तर ब्राह्मण असण्याचे फायदे कमी व तोटे जास्त आहेत. आता तर मराठा व मुस्लिम राखीव जागांमुळे तोटे अजूनच वाढले आहेत. ब्राह्मण असण्याचे नक्की कोणते फायदे ब्राह्मण ओरपतात ते सांगता का जरा? म्हणजे लग्नकार्यात, सत्यनारायणाची पूजा वगैरे कार्यात भटजींना जी दक्षिणा मिळते तो फायदा तुम्हाला अपेक्षित आहे का?

लिहित रहा...!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2014 - 9:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्राम्हण असल्याचे फायदे असण्यापेक्षा तोटे जास्त आहेत हे खरं. पण एक गोष्ट सर्व जाती जमातीमधल्या लोकांनी लक्षात घ्यावी ही कळकळीची विनंती. आरक्षण झगडायची ताकद कमी करेल. आयतं किंवा कमी कष्टात मिळालेली गोष्ट फार का़ळं टिकत नाही. मे बी आज नाही, पण साधारण १००-२०० वर्षांनी जेव्हा सर्व आरक्षित लोकं आरक्षण टेकन फॉर ग्रँटेड घेतील त्यादिवशी स्वतःचा नाश ओढवुन घेतील. प्रॅक्टीकल जगामधे, कामामधे ब्राम्हण असो वा दुसरा कोणी, जर का कामाचा नसेल तर टिकु शकणार नाही. त्यामुळे झगडायचं विसरु नका, कष्टाला पर्याय नाही.

सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट ह्या नियमात कोणीही तुम्हाला आरक्षण देणार नाहीये.

उगा काहितरीच's picture

5 Oct 2014 - 10:03 pm | उगा काहितरीच

वा ...प्रतीसाद आवडला.

सस्नेह's picture

5 Oct 2014 - 10:18 pm | सस्नेह

हा कन्सेप्ट पशुपातळीवर योग्य आहे. विचारी मानव काही वेगळा नव्हे का ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2014 - 10:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हा नियम जगातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीला लागु होतो. जी गोष्ट वापरात राहात नाही ती कालौघात नष्ट होते हा इतिहास आहे आणि राहील.

सस्नेह's picture

5 Oct 2014 - 10:36 pm | सस्नेह

एका समाजाला वारंवार वापरण्याची संधी मिळाली..म्हणून वृद्धी
दुसर्याला अनेक पिढ्या ती नाकारली गेली .., ~हास !

काळा पहाड's picture

5 Oct 2014 - 10:40 pm | काळा पहाड

नक्की कसला र्‍हास?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2014 - 10:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एका समाजाला वारंवार वापरण्याची संधी मिळाली..म्हणून वृद्धी
दुसर्याला अनेक पिढ्या ती नाकारली गेली .., ~हास !

अगदी बरोबर. पण त्याबरोबर ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की संधी नाकारणारे हा समाजाचा एक भाग होते आणि संपुर्ण समाज नव्हे. त्यामुळे सर्व समाजाचा द्वेश करणे योग्य नाही. मा़झ्याच ब्राम्हण समाजाच्या काही लोकांनी नाकारलेल्या लोकांना संधी उपलब्ध करुन देण्यामधे सिंहाचा वाटा उचलला ही गोष्ट सोयिस्करपणे विस्मरणात जाऊ नये म्हणुन हा लेखनप्रपंच.

सस्नेह's picture

5 Oct 2014 - 10:57 pm | सस्नेह

..एका डोळ्याने दुसर्या डोळ्याचा द्वेष करणे जितके योग्य आहे तितकेच एका समाजाने दुसर्याचा !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2014 - 10:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक्झॅक्टली. पण सगळ्यांकडे हे समजुन घ्यायची कुवत नसते.

हरकाम्या's picture

5 Oct 2014 - 11:20 pm | हरकाम्या

कष्टाला पर्याय नाही हे म्हणणे चुकिचे आहे.

बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय।
जो मन खोजा अपना, मुझ-सा बुरा न कोय।। - कबीर

आजच कबीर वाचत होतो, त्यात हा मला आवडलेला दोहा मी नोट करून ठेवला होता.
काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जसा की आपला जन्म!

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Oct 2014 - 10:45 pm | माम्लेदारचा पन्खा

जात वगैरे सगळं नंतरचं.... साईबाबांनी त्यांच्या हयातीत हेच शिकवलं प ण लोक त्यांच्याच मुळाच्या मागे लागले...

पालथ्या घड्यावर पाणी !!

मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे .

हे फारच धाडसी वक्तव्य आहे. व पु काळे आणि देशपांडे ही नावेसुद्धा माहिती नसलेले कित्येक ब्राह्मण मला माहित आहेत. मला स्वतःला व पु काळे अजिबात आवडत नाहीत, पु ल काही ठिकाणी आवडतात. तसेच यातल्या इतर विधानांच्याबाबत माझं उत्तर नकारार्थीच असेल मात्र माझी जात कोणती हे असं तुमच्यासारख्या कोणीतरी लिहिल्यावरच लक्षात येतं. एरवी नाही.

ब्राह्मण समाजातसुद्धा अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा अजूनही किती प्रमाणात आहे हे माहिती करून घ्यायचं असेल तर ह.मो. मराठ्यांचं 'बालकांड' वाचा. उपरा किंवा बलुतं इतकाच दाहक आणि अस्वस्थ करणारा अनुभव मिळेल. तुमचं आतापर्यंतचं एकूण लिखाण प्रचंड प्रमाणात सरसकट म्हणावं असं असतं, किंवा मला माहिती आहे तेवढंच जग अशी तुमची भूमिका बरेचदा दिसते. हा लेखही त्याला अपवाद नाही.

या लेखावर "वा वा काय छान लिहिलंय" असं मला म्हणून बाजूला रहाता आलं असतंच किंवा संपूर्ण दुर्लक्षही करता आलं असतं, पण तुम्ही लिहिली आहे तेवढी एकच बाजू या गोष्टीला नाही हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद. याव्यतिरिक्त चर्चेला विनाकारण आरक्षण वगैरे वळणं लागणार असं दिसतंय. ते एक असोच. या संदर्भात मार्मिक गोडसे यांचा मिपावर हल्लीच आलेला लेख आठवला. असो. तेवढी मॅच्युरिटी सगळ्यांकडून अपेक्षित नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2014 - 10:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१११

सहमत आहेच पण हा विषय इतक्या जास्तवेळा चघळला जाऊनही तू प्रतिसादास टंकाळा केला नाहीस म्हणून धन्यवाद. मला भयंकर टंकाळा आलाय. ज्यांना यापलिकडे पाहणं जमतं ते या चर्चेत फारसे नसतात.

दशानन's picture

5 Oct 2014 - 11:11 pm | दशानन

+१

मृत्युन्जय's picture

5 Oct 2014 - 11:26 pm | मृत्युन्जय

+१

पैसा ताईशी १००% सहमत. ह मो मराठे ह्यांचे बालकांण्ड हे वाचताना खरच रडु येत.ब्राम्हण आहे म्हणुन त्याना कष्ट करावे लागत नाही अस मुळिच नाही. जेव्हा माणुस कष्ट करुन मोठा होतो समाजात नाव करतो त्याचा अभिमान खरच बाळगला पाहीजे मग तो कुठ्ल्याही जातीचाही का असेना. मी ब्राम्हण आहे पण अस असताना मला ही खंत व दु:ख नक्कीच आहे की माझ्या आधीच्या पिढी़कडुन दलित समाजावर अन्याय झाला आहे पण मी त्याना दलित न समजता माझ्यासारखीच माणुस म्हणुन समजतो व हे ही सांगतो की आज त्या समाजातले माझे मित्र फार खुप मोठया स्थानी आहेत. आणि मला त्याचा खुप अभिमान आहे. माणसाला संधी दिली की तो कोणीहि का असेना तो त्याच्या प्रयत्नानि त्या संधीचे सोन करतो हे मात्र खर.

vikramaditya's picture

6 Oct 2014 - 4:23 pm | vikramaditya

चांगले लिहिलेत. पुर्वी अमानुष अत्याचार करण्यात आले ह्यात काही शंका नाही. तसेच

माणसाला संधी दिली की तो कोणीहि का असेना तो त्याच्या प्रयत्नानि त्या संधीचे सोन करतो हे मात्र खर.

हे वाक्य पटले.

पुण्याचे वटवाघूळ's picture

6 Oct 2014 - 1:49 pm | पुण्याचे वटवाघूळ

एकूण लिखाण प्रचंड प्रमाणात सरसकट म्हणावं असं असतं, किंवा मला माहिती आहे तेवढंच जग अशी तुमची भूमिका बरेचदा दिसते. हा लेखही त्याला अपवाद नाही.

अगदी +१००.

एकूणच काय की कोणत्याही माणसाचे जात-धर्म इत्यादी चष्म्यांमधून न बघता एक माणूस म्हणून मूल्यमापन व्हावे असे म्हणणारे लोकच त्याच चष्म्यांचा वापर करून ब्राह्मणांविरूध्द काहीतरी लिहितात ते बघून त्या दुटप्पीपणाचा भयंकर संताप येतो.या चष्म्यांचा वापर करून इतर जातींविषयी काही लिहिले की तो माणूस मोठा पुराणमतवादी पण ब्राह्मणांविषयी काही लिहिले की तो माणूस मात्र मोठा आधुनिक विचारांचा, पुरोगामी इत्यादी ठरतो.

लेख आणि त्यातून होणारे सरसकटीकरण अजिबात आवडले नाही.विशेषतः कट्ट्यांवर एकाच जातीच्या लोकांचे वर्चस्व का असते यावर "तुम्ही आतापर्यंत किती कट्टे अटेंड केले आहेत" या प्रश्नावरील मौनच बरेच काही सांगून जाते.म्हणजे हे महाशय एकाही कट्ट्याला जाणार नाहीत आणि तरीही छातीठोक दावा करणार की कट्ट्यावर एका जातीच्या लोकांचे वर्चस्व असते!! याला उंटावरून शेळ्या हाकणे म्हणतात. बाकी काही नाही.

प्रदीप's picture

6 Oct 2014 - 8:34 pm | प्रदीप

अत्यंत चपखल आहे, अतिशय आवडला. बालकांडचा* ह्या संदर्भातील उल्लेख सोडून, १०० % सहमत.

* 'बालकांड' वाचल्यावर, मराठ्यांच्या वडिलांनी, स्वतःच्या विक्षीप्त स्वभावामुळे, स्वत:वर व स्वतःच्या कुटुंबावर दु:खे नाहक ओढवून घेतली, असे माझे मत झाले. म्हणून तेव्हढ्यापुरती सहमती नाही.

पैसा's picture

6 Oct 2014 - 10:55 pm | पैसा

बालकांड च्या बाबतीत तुम्ही लिहिलंय ते १००% पटलं. ह.मो.मराठ्यांच्या वडिलांच्या विक्षिप्तपणामुळे त्यांना फार दु:खे सहन करावी लागली. मात्र ते कारण असलं तरी परिणाम जो झाला, (त्यांच्या आईच्या बाबतीत आजार असताना भूत लागलंय म्हणणे) तशा प्रकारचं दारिद्र्य आणि भुताखेतांनी झपाटलेले म्हणणे इ. अंधश्रद्धा मी लहान असताना सगळ्या जातींमधे, ब्राह्मणांमधेही पाहिल्या आहेत. त्यामुळे हे उदाहरण सहज आठवले ते इथे दिले. मात्र आठवायला बसलं तर श्री.ना.पेंडसे, दळवी आणि इतर कितीतरी लेखकांच्या लिखाणातून अशी उदाहरणे सहज देता येतील. या संदर्भात 'किरवंत' चीही आठवण झाली.

सस्नेह's picture

5 Oct 2014 - 11:15 pm | सस्नेह

लेख छान आहे असे काही म्हणवत नाही.
वैयक्तिक पातळीवर आलेले काही अनुभव तटस्थपणे मान्डण्यात लेखक यशस्वी झाला आहे एवढेच म्हणते.
शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकेल असे वाटत नाही

भिंगरी's picture

5 Oct 2014 - 11:25 pm | भिंगरी

मार्मिक गोडसे यांचा'आडनावाच्या आडून'या लेखातही अशाच प्रकारची माहिती दिसते.

खटपट्या's picture

6 Oct 2014 - 12:36 am | खटपट्या

मला माहित नाही कि हे अवांतर आहे कि नाही.

आंतरजालावर शोध घेत असताना मला http://www.thebrahminsamaj.com/index.php या संकेतस्थळावर खालील विडिओ सापडला.

http://www.youtube.com/watch?v=P7Xgc4ljHKM

या विडिओवर काही ब्राह्मण जातीत जन्माला आलेले लोक झाडू मारणे किंवा साफसफाई करणे असली कामे नाईलाजास्तव करीत आहेत असे दिसते. आणि एकंदर सूर असा दिसला कि आम्ही ब्राह्मण असून आम्हाला अशी हलक्या दर्जाची कामे करावी लागत आहेत.
झाडू मारणे, शौचालय साफ करणे ही ब्राह्मणाची कामे नाहीत, या मानसिकतेतून अजून कोणी बाहेर यायला तयार नाही. शारीरिक श्रमांची कामे करणे म्हणजे कमीपणा, असल्या मानसिकतेतून आपण बाहेर येणारच नाही आहोत का. जन्माने ब्राह्मण असलो म्हणजे आपण कोणीतरी उच्च आहोत आणि आपल्याला फक्त खुर्चीत बसायची कामे मिळणार, यातून बाहेर कधी पडणार.
परदेशी सर्रास सर्व ब्राह्मण मुले उपहारगृहात कामे करतात. मग भारतातच काय होते?

मुक्त विहारि's picture

6 Oct 2014 - 1:11 am | मुक्त विहारि

"जन्माने ब्राह्मण असलो म्हणजे आपण कोणीतरी उच्च आहोत आणि आपल्याला फक्त खुर्चीत बसायची कामे मिळणार, यातून बाहेर कधी पडणार?"

आमच्याच घरातील काही उदाहरणे.

१. एका भावाला शिकण्याची आवड न्हवती.तो रिक्षा चालवायचा.
२. दुसर्‍या भावाला पण शिकण्याची आवड न्हवती.तो टायपिंग शिकला आणि नौकरीला लागला.
३. तिसर्‍या भावाला व्यवहार ज्ञान भरपूर.तो आय.टी.आय. झाला.आज स्वतःचा व्यवसाय करतो.
४. चौथ्या भावाला व्यवहार ज्ञान प्रचंड. तो ११वी नापास. शिक्षणाचे सगळे कागद दहावीच्या मार्क-लिस्ट सकट बंबात टाकले.एका बिल्डरकडे १०रु.रोजावर सळ्या तोडायला लागला.थोडे वर्षांनी वायरिंगची कामे घ्यायला लागला. नंतर बरेच धंदे सुरू केले.आज वयाच्या ४७व्या वर्षी सगळे धंदे बंद करून मस्त मजेत जगत आहे.
५. पाचव्या भावाचे पुणे शहरात स्वतःचे गॅरेज आहे.
६. माझ्या एका मित्राचे वडील टाटा कं.त मोठ्या हुद्द्यावर होते.मुलगा जेमतेम बी.कॉम. झाला.पण आवड म्हणून गाड्या दुरुस्त करतो आणि आता त्यातच जम बसवून आहे.
७.ह्या भावाने स्वतःचे पैसे शेयर मध्ये गुंतवून रोज स्वतःपुरते कमावतो.

ह्यातला एक टायपिंग करणारा सोडला तर इतर सगळे रस्त्यावरच धंदा करतात.

असो... अजूनही खूप उदाहरणे देता येतील.

खटपट्या's picture

6 Oct 2014 - 4:35 am | खटपट्या

सर, बरोबर आहे तुमचे म्हणणे, माझ्याही माहितीत बरेच जण आहेत. माझे विधान सरसकट नव्हते.
पण विडिओ दुव्यावर ज्या प्रतिक्रिया होत्या त्या बहुतांशी माझ्या म्हणण्याला दुजोरा देणाऱ्या आहेत.
माझे निरीक्षण असे आहे कि महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज उत्तर भारतातील ब्राह्मण समाजापेक्षा खूपच पुरोगामी आहे.

कोणाला कसला अभिमान असला तर तो स्वतःबद्दल असावा या मताची होउन राहिले आहे मी आता. त्यामुळे उगा उठुन कुणी स्वतःच्या अनुभवाबद्दल लिहीत असेल तर त्यात माझा अनुभव मिसळुन बे दुनी चार करण सोडुन दिलयं.
जाती वरुन हीनवणे , मग ती उच्च असो वा हीन हे जितके इनह्युमन तितकेच जातीवरुन वागणुक देणे सुद्धा वाईटच. त्याही पलिकडे जाउन जेंव्हा एक स्त्री म्हणुन कनिष्ठ वागवल जात तेंव्हा तर जातसुद्धा गळुन पडते. एकून माणसांचे मुखवटे गळुन पडायला ना जातीच कारण पुरतं ना धर्माचं, नाही लिंग!

वेल्लाभट's picture

6 Oct 2014 - 10:25 am | वेल्लाभट

धाग्यातील विचार, पुढच्या प्रतिसादांतील अनुभव इत्यादी सर्व गोष्टी वास्तवाला धरूनच आहेत. मग वैयक्तिक पातळीवर असतील किंवा व्यापक पातळीवर. त्याबाबत भाष्य न करता एक प्रांजळ मत मांडू इच्छितो. आरक्षणाबाबत आणि त्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत.

एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जो सतत ज्ञानार्जनास उत्सुक असतो तो ब्राह्मण. ही व्याख्या धरून पुढे म्हणावसं वाटतं, अशा ब्राह्मणाला त्याच्या ज्ञानाचा अभिमान असतो आणि तीच त्याची ताकद असते. आता, सर्वसाधारण अर्थाने किंवा जातीने जे अब्राह्मण असतात ते मूर्ख असतात का? मुळीच नाही. मग; आरक्षणाचा उपयोग करून शिक्षणसंस्थात प्रवेश मिळवणं त्यांना मोठेपणाचं का वाटतं? त्याची गरज त्यांना का लागते?
'आरक्षण' या गोष्टीकडे मी कुबड्यांसारखं बघेन. मला नीटपणे चालता येत असताना कुबड्या घेऊन चालण्याची आणि स्वतःला अपंग म्हणवून घेण्याची इच्छा मला होणार नाही. पण तसं समाजात होताना दिसत नाही. 'मला रिझर्वेशन आहे मित्रा! ओबीसी! ' हे अभिमानाने सांगणारे मित्र बघितलेले आहेत मी. त्यांनाही हा विचार सांगून बघितला, पण मिळतोय फायदा तर का न घ्या? ही त्यांची त्यावरची प्रतिक्रीया असायची. तेंव्हा जोवर हा विचार समाजमनातून नष्ट होत नाही (कठीण आहे ते) तोपर्यंत ७८-३८ चा फॉर्म्युला अबाधित आहे.

आदूबाळ's picture

6 Oct 2014 - 11:35 am | आदूबाळ

७८-३८ चा फॉर्म्युला

हे काय असतं?

असंका's picture

6 Oct 2014 - 11:44 am | असंका

ते अ‍ॅडमिशनच्या क्रायटेरीयाबद्दल असावं...आरक्षित जागांचं कट ऑफ ३८ आणि खुल्याचं ७८ असं असेल...

वेल्लाभट's picture

6 Oct 2014 - 12:34 pm | वेल्लाभट

अहो, वरती 'भाते' यांचा प्रतिसाद वाचा, म्हणजे कळेल ! :)

आदूबाळ's picture

6 Oct 2014 - 12:41 pm | आदूबाळ

ओह ओके. मला वाटलं काही सरकारमान्य formula आहे की काय. :)

बाळ सप्रे's picture

6 Oct 2014 - 11:09 am | बाळ सप्रे

लेख आवडला !!
जन्माने जात असु नये हे तात्विक दृष्ट्या सर्व जण मान्य करतात.. पण व्यवहारात जात ही जन्मानेच ठरते हे सत्य आहे.

काळाप्रमाणे लोकांचे व्यवसाय कामधंदे बदलले पण जाती त्याप्रमाणे बदलल्या नाहीत..

लेख आवडला असे म्हणून आपण लेखकाला शालजोडीतले देत आहात का? कारण ह्या वाक्यानं सरसकट सगळ्या लेखाचं कौतुक होत आहे. सरसकटीकरण हे तर लेखकाला मुळीच आवडत नाही.

लेखातल्या या वाक्याबद्दल आपले काय मत आहे? तेही आपल्याला आवडले का?

"हा घाबरून राहणारा , समाजाच्या इतर घटकांपासून गंड ग्रस्त असणारा , पटकन सरसकट करण करणारा ब्राम्हण समाज बघणे वेदनादायक आहे . त्याना कायम एक शत्रू लागतो . कधी तो बहुजन समाज असतो , कधी मुस्लिम तर कधी यु पी चा भैय्या"

ब्राह्मण समाजाला बहुजन समाज हा आपला शत्रु म्हणून लागतो? मुस्लिम लोक शत्रु म्हणून लागतात? युपीचे भय्ये शत्रु म्हणून लागतात? ही कसली गरज म्हणायची ब्राह्मणांची?

उत्तर देण्याचे बंधन नाही. मी हा प्रश्न पुन्हा लेखकालापण विचारणारच आहे.

प्रभाकर पेठकर's picture

6 Oct 2014 - 12:20 pm | प्रभाकर पेठकर

खरं पाहता मी कांहीच प्रतिसाद ह्या धाग्यावर देणार नव्हतो.

मुळात, एकदा पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . असा डिस्क्लेमर सुरुवातीलाच टाकला की आपला कल्पनाविलास आपल्याला हव्या त्या दिशेने नेता येतो. कुठल्याही काल्पनिक गोष्टी 'मला आलेला अनुभव' ह्या नांवाखाली लिहून समाजातील कांही जाती वर्गाला भडकवायचं, वादविवाद घडवून आणायचे आणि मिटक्या मारत मजा बघत राहायची, ह्या विकृत उद्देशाव्यतिरिक्त ह्या धाग्यात मला तरी कांही दिसत नाही.

ज्यांना भांडायचे असेल त्यांनी भांडावे, पण सूज्ञांनी विचारपूर्वक दूर राहावे असे मी आवाहन करेन.

विक्रान्त कुलकर्णी's picture

6 Oct 2014 - 12:40 pm | विक्रान्त कुलकर्णी

पूर्णपणे सहमत आहे. एकद्याच्या वैयक्तिक अनुभवावर काय बोलणार ?? कुठेतरी काड्या लावायच्या आणि आग लागल्यावर गंमत पहात उभे रहायचे..

प्रकाश घाटपांडे's picture

6 Oct 2014 - 2:55 pm | प्रकाश घाटपांडे

तुमची इच्छा असो किंवा नसो. ज्या जातीत तुम्ही जन्माला आलात ती जात तुम्हाला चिकटते.

तुमचे वैतक्तिक अनुभव म्हणून ठीकाय पण बर्‍याचदा चर्वितचर्वण झालेला विषय असल्याने आता प्रतिसाद द्यायचा उबग आलाय. तुमचा लेख आणि प्रतिसाद वाचले हेही नसे थोडके!!

मिपाच्या कट्ट्यांबद्दल म्हणाल तर प्रश्न विचारण्यापेक्षा एकदा येऊन बघा तुमचं तुम्हालाच उत्तर मिळेल.

॥इति लेखनसीमा॥

प्यारे१'s picture

6 Oct 2014 - 3:23 pm | प्यारे१

+१

असेच म्हणतो.
वेशीवरचा प्यारे

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Oct 2014 - 3:24 pm | llपुण्याचे पेशवेll

अलेलेले अशं झालं कां? बरं बरं.

विटेकर's picture

6 Oct 2014 - 3:59 pm | विटेकर

हीन दर्जाच्या लोकप्रियतेसाठी लिहिलेला लेख !
माझे बालपण ठार खेड्यात गेले. माझे आई- वडील शिक्षक होते त्याच शाळेत ,तरीही आमचे जाधव मास्तर सानुनासिक स्वरात " काका" म्हणून आम्हाला हाक मारायचे ! माझे वय तेव्हा फक्त ८ वर्षे होते. अश्या शालेतून मी चौथीची शिष्यवृत्ती मिळवल्यावर हा द्वेष आणखीनच वाढला ! शेवटी जंग जंग पछाडून वडिलांनी बदली करुन घेतली तालुकयाच्या गावाला !. (तालुक्याचा सभापती ९६ कुळी , तो कशाला बामणाचे काम करेल? पण एका मुसलमान शिक्षणाधिकार्‍याला दया आली.)तिथेही द्वेष होताच पण तुलनेने कमी .. त्याच गावांत मी कॉलेजला गेल्यावर मराठ्यांच्या पोरांना , " ए कुळवाड्या " म्हनून हाक मारुन बदला घेतल्याचे समाधान मिळवायचो ! आजही त्या खेड्यातील ब्राह्मण द्वेष तसाच आहे !!! गेल्या १० वर्षात तर तिथे आता नावाला देखील ब्राह्मण राहिला नाही.
मग संघाच्या संपर्कात आलो, राजाभाऊ भोसले होते प्रचारक , त्यांनी समाजावून सांगितले आणि अंतर्बाह्य शुद्ध झालो. पुढे तर औरन्गाबादला असताना स्वरुपवर्धिनीचे काम करायला लागलो , बुद्धवंदना शिकलो. मनात कसलेही किल्मिष राहीले नाही.
ब्राहमण असल्याचा मला काहीही फायदा झाला नाही, उलट बाल-मनावर अत्यन्त वाईट आघात झाले. माझे आई- वडील नीर-क्षीर विवेक करणारे होते, मला संघाचा परिस स्पर्श झाला म्ह्णून माझे किल्मिष जळून गेले. असे किती भाग्यवंत असतील?
उदगीरकरांचा धागा निव्वळ राळ उडविण्यासाठी काढला आहे. ज्या बहुजन समाजाच्या नावाने ते गळा काढताहेत , त्यासाठी परिश्रम करणारे बहुतांशी उच्च समाजातील होते ,हे ते सोयिस्करपणे विसरत आहेत. पु. लं नी दलित साहित्याचे स्वागत आणि कौतुक दोन्ही केले.. असो अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण लक्षात कोण घेतो ?
खरे तर प्रतिसाद देणारच नव्हतो .. पण अगदीच राहवले नाही . म्हातारी मेल्याचे दु:ख नाही , काळ सोकावतो आहे.

ज्या बहुजन समाजाच्या नावाने ते गळा काढताहेत , त्यासाठी परिश्रम करणारे बहुतांशी उच्च समाजातील होते ,हे ते सोयिस्करपणे विसरत आहेत.

तो बहुजन समाजही किती लक्षात ठेऊन आहे? ब्राम्हणांनी माझा उद्धार (चांगल्या अर्थाने) केला / ब्राम्हणांची सांगत होती म्हणून माझ्यात अमुलाग्र बदल झाला हे कितीजण मान्य करतील ?
दुर्दैव हेच आहे की ब्राम्हणाने काढलेला धागा त्यावर ब्राम्हणांनी दिलेले प्रतिसाद आणि ब्राम्हणेतरानी दिलेले प्रतिसाद किंवा "मला आहे अभिमान दलित असण्याचा " किंवा "आहे मी मराठा मग...?" असा एखादा धागा ब्राम्ह्णेतराने काढावा त्याला येणारे प्रतिसाद तपासावेत मगच कळेल काहीतरी.

एक ब्राम्हण दुसर्या ब्राम्हणाच्या बाजूने उभा रहात नाही पण बाकी सगळ्या जातीतले लोक आपल्या जातीतल्या माणसामागे उभे राहतातच हा अनुभव आहे.

एस's picture

6 Oct 2014 - 4:51 pm | एस

अशा विषयांवर उघडपणे काही लिहिण्याबोलण्याची सोय राहिलेली नाही. मग ते एका समाजातले असो वा दुसर्‍या. वेळ मिळाल्यास व्यनि/खवद्वारे चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

समीरसूर's picture

6 Oct 2014 - 5:19 pm | समीरसूर

ब्राह्मणांनी कुठले फायदे ओरपले ते कळले नाही. अजूनही दरिद्री ब्राह्मण खूप आहेत. ब्राह्मणांची शेती कुळकायद्यात गेली. आरक्षण नसल्याने ब्राह्मणांना शासकीय नोकर्‍यांची आणि शिक्षणाची शक्यता जवळ-जवळ संपुष्टात आलेली आहे. ब्राह्मण शेकडो एकर जमिनीचे मालक, जमीनदार, साखर कारखान्यांचे मालक, भव्य कॉलेजेसचे मालक, सहकारी सूत गिरण्यांचे प्रवर्तक वगैरे कधीच नव्हते. ते आधीपासूनच शिक्षणाच्या बळावर जगत आलेले आहेत. कधी काळी (६०-७० वर्षांपूर्वी) ब्राह्मणांनी पाळलेल्या अस्पृश्यतेपेक्षा कितीतरी पट जास्त अस्पृश्यता आणि पराकोटीचा आकस पाळणार्‍या जाती आजही महाराष्ट्रात आहेत. ब्राह्मण कुणालाही मदत करतांना जात विचारून कधीच मदत करत नाहीत. माझ्या बाबांनी गेल्या ४५ वर्षात कित्येक गरीब आणि ब्राह्मण (उच्चवर्णीय) नसणार्‍या गरीब मुलांना मोफत शिकवले आहे. त्यांनी कुणालाही मदत करतांना कधीच जात विचारात घेतलेली नाही. आणि अशी कित्येक उदाहरणे मला माहित आहेत.

आपल्या स्वातंत्र्य लढ्यात (आणि इतर क्षेत्रातदेखील) कित्येक ब्राह्मणांनी कुठल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता आयुष्याचे प्रामाणिक समर्पण केले आहे. राजगुरु, सेनापती बापट, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, यांनी आयुष्य देशासाठी वेचले. साने गुरुजी, गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, टिळक, दादा धर्माधिकारी, र. धो. कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे, बाबा आमटे अशा कित्येक थोर ब्राह्मणांनी समाजसुधारणेसाठी आयुष्य खर्ची घातले. ही यादी अजून बरीच मोठी होऊ शकेल. या लोकांनी फक्त ब्राह्मण लोकांचेच भले व्हावे म्हणून आयुष्य वेचले असेल असे वाटत नाही. संत ज्ञानेश्वरांनी जे अलौकिक साहित्य निर्माण केले त्यात कुठेही जातीपातीचा किंवा इतर जातींचा द्वेष करावा असे लिहिलेले नाही. काळाच्या पुढचे इतके सुंदर पद्धतीने लिहिणारे हे संत ब्राह्मणच होते. संत एकनाथांनी कधी जात-पात पाळली नाही. आजच्या युगातदेखील माधव गाडगीळांसारखे निस्वार्थ आणि निस्पृह व्यक्तिमत्व निसर्ग वाचावा म्हणून जीवाचे रान करत आहे. अंधश्रद्धेचे निर्मुलन व्हावे म्हणून झटणारे दाभोलकर असोत किंवा तर्कशुद्ध जगण्याची शिकवण देणारे डॉ. श्रीराम लागू असोत, ब्राह्मणांनी प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि जीव तोडून काम केलेले आहे.

आजची परिस्थिती ब्राह्मणांसाठी उलट भयावह आहे. कुठलेच संरक्षण नाही. अकारण पसरविलेल्या गेलेल्या ब्राह्मणद्वेषाने आजचा ब्राह्मण हवालदिल झालेला आहे. जीव मुठीत धरून जगतो आहे.

मी स्वत: कधीच जातपात मानली नाही आणि माझ्या आई-बाबांनी तसे मला कधीच चुकूनही शिकवले नाही. असा भेद करावा असे इतक्या वर्षात माझ्या मनालादेखील कधी शिवले नाही. आणि मी नेहमी तसेच वागत आलो. माझ्यासोबतचे कित्येक ब्राह्मण अगदी असेच वागतात हे मी अनुभवले आहे. माझ्या कित्येक चुलत-मावस बहिणींनी केलेले आंतरजातीय विवाह माझ्या नातेवाईकांनी आनंदाने स्वीकारले आहेत आणि त्या गेली कित्येक वर्षे सुखाने जगत आहेत. त्यावरून कधी हाणामारी, कापाकापी, सूडनाट्य वगैरे कधीच घडले नाही. माझ्या कमीत कमी ५ चुलत-आते-मावस भावांनी आंतरजातीय विवाह केले आहेत आणि ते देखील यशस्वी झालेले आहेत.

मी ब्राह्मण असल्याचा मला अभिमान वगैरे नाही पण त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी, विचार, संस्कार वाट्याला आले त्यांचा अभिमान नक्कीच आहे. प्रत्येक जातीमध्ये, धर्मामध्ये, माणसामध्ये गुण-दोष असतातच. म्हणून ती जातच वाईट ठरत नाही. ब्राह्मणांविषयीचा हा अनाठायी द्वेष जेव्हा संपेल तो खरा सुदिन!

मृत्युन्जय's picture

6 Oct 2014 - 5:42 pm | मृत्युन्जय

व्वा. सुंदर प्रतिसाद.

ज्ञानव's picture

6 Oct 2014 - 6:12 pm | ज्ञानव

दरिद्री + ब्राम्हण हीच मुळात द्विरुक्ती आहे.

बाकी माझा एक मित्र नेहमी त्याच्या मोठ्या भावाबद्दल सांगतो "तसा आमचा णाणा म्हणजे ब्राम्हनच"