सर्व प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो . ब्राम्हण म्हणून जन्माला आल्याचा मला काही अभिमान वैगेरे वाटत नाही आणि लाज तर मुळीच वाटत नाही . पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . यात कुठलेही सरसकट करण नाहीये . कुठल्या एका वाक्याने किंवा शब्दांनी तसा गैरसमज झाल्यास ती माझ्या लिखाणाची मर्यादा :
जेंव्हा तुमच बालपण मुंबई - पुण्याबाहेर आणि सांस्कृतिक - शैक्षणिक राजधानी वैगेरे वैगेरे च्या बाहेर जात तेंव्हा 'जात ' आणि इतर रखरखीत 'वास्तव ' फार लहान वयात कळायला लागतात . जात वैगेरे कस कळायला लागल ? तर लहान असताना आम्ही भाड्याच्या घरात राहायचो . घरमालकीण बाई एकदम धार्मिक - सोवळ्यातल्या वैगेरे वैगेरे . मैदानापासून माझ घर जवळ असल्याने खेळण झाल्यावर माझे मित्र पाणी प्यायला माझ्याकडे यायचे . आमच्या घर मालकीण बाई त्यांच्यावर फार बारीक नजर ठेवून असत . त्या प्रत्येक मित्राला direct आडनाव विचारीत (नाव नाही ) . मित्रांनी आडनाव सांगितलं कि त्यांच्या चेहऱ्यावर काही विशिष्ट भाव येत किंवा येत नसत . मग मला बाजूला घेत त्या मला सांगत ," अरे कुणासोबत हि राहतोस का रे ? आपल्या ब्राम्हण पोराना काय धाड भरली आहे का ?" त्यांनी बहुदा माझ्या आईकडे पण माझी तक्रार केली होती पण आईने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि नंतर आम्ही ते घरच बदलल . नंतर सर्व ब्राम्हण मुलांप्रमाणे मी पण शाखेत वैगेरे जायचो . तिथे शाखेवरचे गुरुजी गांधीजी बद्दल कधी टिंगल पूर्वक तर कधी विखारी पणे बोलायचे . तिथे फारसे ब्राह्मणेत्तर मुल नसायची .
नंतर बर्यापैकी हुशार विद्यार्थी असताना पण मी अकरावीला कला शाखा निवडली . एवढ्या मोठ्या वर्गात दोघेच ब्राम्हण . मी आणि अजून एक मुलगी . एव्हाना कुलकर्णी , देशपांडे , आणि आडनावाच्या शेवटी 'कर ' लागणाऱ्या लोकांसोबतच राहिलो होतो . डाके , अंभोरे , नलदे हि आडनाव पण जगात अस्तित्वात आहेत असा शोध मला लागला . बहुजन समाजाशी कॉलेज च्या निम्मिताने आलेला हा पहिला संपर्क . एकदा इतिहासाच्या देशमुख सरांनी पंढरपूर आणि तिथले बडवे यांच्यावर वर्गात काही जहाल विनोदी comments केल्या आणि अख्खा वर्ग जोरजोरात खिदळयला लागला . माझ्या मागच्या पोराने 'च्यायला हि बामन अशीच ' अशी हसता हसता दिलेली प्रतिक्रिया मला पण ऐकू आली . आपली जात बाकीच्या समाजात फार काही लोकप्रिय नाही अशी खुण गाठ मी मनाशी बांधली .
बारावी नंतर पुण्यात एका धार्मिक (का सांस्कृतिक ?) संघटनेचा प्रभाव असणार्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला . तिथल्या वसतिगृहातच राहत होतो . तिथे बारापगड जातीची मुल राहत . होस्टेल च्या शेवटच्या वर्षाला असणार्या मुलांपैकी एकाला 'Best Hostelite ' चा पुरस्कार दिला जाई . या पुरस्कारासाठी काही कारणाने ब्राम्हण मुल च (काही मोजके अपवाद वगळता ) पात्र ठरत . इतर जातीची मुल त्यामुळे वसतिगृह व्यवस्थापनावर खार खाउन असत . एकदा याच मोठ्या धार्मिक -सांस्कृतिक संघटनेचा एक कार्यक्रम कॉलेज मध्ये होता . त्या कार्यक्रमात एका ख्रिश्चन विद्यार्थ्याने टिळा लावून घेण्यास नकार दिला तेंव्हा होस्टेल मधल्या चित्पावन पोरांनी त्याला (त्याच्या पाठीमागे ) खूप शिव्या दिल्या होत्या . हि चित्पावन पोर माझ्यासारख्या घाटावरून आलेल्या ला पण खिजगणतीत
धरत नसत . त्यामुळे चित्पावन लोक म्हणजे आपल्यापेक्षा भारी हा तेंव्हा पासून आलेला गंड डोक्यातून अजून पण पूर्ण पणे गेलेला नाही . एकदा मी आणि माझा बहुजन समाजातला मित्र एका पेठेत रणरणत्या उन्हात अशाच एका महान धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पत्रिका वाटत असताना आलेला अनुभव तर उच्च श्रेणीतला होता . आम्ही लेले , नेने , देशपांडे यांचे दरवाजे पत्रिका देण्यासाठी वाजवायचो . मग माझा बहुजन साथीदार आपल नाव सांगून आम्ही कुठून व कशासाठी आलो आहोत हे सांगून पत्रिका द्यायचा . मे च उन होत पण कोणी आम्हाला उपचार म्हणून पाणी पण नाही विचारलं . वैतागून माझा मित्र मला म्हणाला , 'आता तू दरवाजा वाजव आणि माहिती दे .' पुढच्या ठिकाणी मी हा सोपस्कार केला . दरवाजा वाजवला आणि नाव सांगितलं . आणि अहो आश्चर्यम . पुढच्या अनेक घरी आम्हाला पाणी आणि काही ठिकाणी तर लिंबू शरबत पण घेण्याचा आग्रह झाला ." नावात आणि त्यातल्या त्यात आडनावात बराच काही असत रे ." खिन्न पणे हसून त्या मित्राने शालजोडीतला दिला . आडनावा वरून आपल्या समाज व्यवस्थेत किती मनांवर चरे उमटले असतील याची अजून गिणती व्हायची आहे .
एक अनुभव तर खासच . एकदा मी ट्रेन ने औरंगाबाद ला जात होतो . तर एका आजोबाना मी त्यांची अडचण ओळखून सामान वैगेरे चढवायला मदत केली . बाजूला जागा पण मिळवून दिली . मग आम्ही बर्यापैकी गप्पा पण मारल्या .त्यांनी स्वतहा बद्दल सांगितलं . त्यांनी काय करतोस असे विचारले . त्यावेळेस मी काहीच करत नसल्याने तोंडात येईल ते उत्तर देत असे . मी त्याना काही तरी द्यायचे म्हणून उत्तर दिल ,"मी मिलिंद कॉलेज मध्ये शिकतो ." आजोबांचा नूर एकदम पालटला . आजोबा एकदम बोलायचे थांबलेच . ट्रेन औरंगाबादला पोहोंचल्यावर ''बराय . बाझारात भेट होईल च कधीतरी ." म्हणून आजोबांनी कलटि मारली . दलित असणे म्हणजे काय असू शकते याची बारीकशी चुणूक मला त्या दिवशी मिळाली .
हा घाबरून राहणारा , समाजाच्या इतर घटकांपासून गंड ग्रस्त असणारा , पटकन सरसकट करण करणारा ब्राम्हण समाज बघणे वेदनादायक आहे . त्याना कायम एक शत्रू लागतो . कधी तो बहुजन समाज असतो , कधी मुस्लिम तर कधी यु पी चा भैय्या . इथे ब्राम्हण समाज म्हणजे आय टी मध्ये नौकरी करणारा आणि देशाबाहेर राहणारा समाज असे अजून एक generalization नाही केले तर अजूनच चांगल . ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? कारण अल्पसंख्य समाजाला (त्यांची आक्रमण , सक्तीची धर्मांतर ) हा अधिकार देशाच्या अनेक समस्याना जबाबदार धरताना त्यांनी कधीच नाकारला आहे .
मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे .
जाता जाता - हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का ? हा खवचट पणा नाही तर genuine प्रश्न आहे . कुठल्या जाणकाराच किंवा एखाद्या बहुजन समाजतल्या आय डी च यावरच Social Analysis वाचायला मला आवडेल .
खूप शिव्या खायला लागणार आहेत पण हरकत नाही . पण चांगली चर्चा घडण्यासाठी हि दिलेली किंमत असे समजू .
प्रतिक्रिया
6 Oct 2014 - 6:32 pm | प्रसाद१९७१
फुलेंच्या शाळे साठी आपला वाडा देणारा ब्राह्मणच होता, त्याने खूप त्रास सहन केला. पण आता कोणी नाव घेते का त्याचे?
पुण्याच्या MIT college ला अनेक एकर जमीन घैसास नावाच्या ब्राह्मणानी दिली, आता MIT च्या नावाखाली कोण लुटालुट करतय?
7 Oct 2014 - 10:53 am | समीरसूर
उदार मनाने चांगल्या कार्यासाठी सढळ हाताने संपत्ती देणारे ब्राह्मण अगणित आहेत. आणि ते ही कुठल्याही फायद्याच्या आणि प्रसिद्धीच्या अपेक्षेशिवाय! कुठेही नाव नाही, मान, सन्मान नाही अशी समाजोपयोगी कामे ब्राह्मणांनी अनेक केली आहेत.
महाराष्ट्रात भ्रष्टाचार, लबाडी, फसवणूक करून १०-२५-३०-४० कोटींची अमाप संपत्ती कमवणारे किती ब्राह्मण असतील? किती ब्राह्मणांची संपत्ती वर्षागणिक कोट्यवधी रुपयांनी वाढलेली आहे? किती संपन्न ब्राह्मण समाजात गुंडगिरी करून दहशत माजवतात? कुठला लेले, कुळकर्णी, बापट त्याच्या भागात भ्रष्टाचारी-कम-गुंड-कम-राजकारणी-कम-पुढारी म्हणून कुख्यात आहे? कुठल्या ब्राह्मणाने बेकायदेशीर बांधकाम करून करोडोंची माया गोळा केलेली आहे? कुठल्या ब्राह्मणाने साखर कारखान्याची मालकी कारखाना बुडवण्यात वापरली आहे? कुठल्या ब्राह्मणाने एखाद्या सहकारी बँकेचे दिवाळे काढून स्वतःच्या करोडोंच्या कमाईची दिवाळी साजरी केलेली आहे?
या प्रश्नांची उत्तरे जर प्रामाणिकपणे शोधली तर मला वाटते ब्राह्मणांविषयीचा असुयेपोटी जन्माला घातलेला आणि पोसलेला अकारण आणि तद्दन निरर्थक द्वेष कमी होईल. पण नेमकं तेच कुणालाच करायचं नाहीये. कारण मग गलिच्छ, जातीजातींमध्ये विष पेरणारं राजकारण कसं खेळता येणार? या विषामुळे तयार होणार्या सामजिक अस्वस्थतेच्या धगीवर स्वतःच्या स्वार्थाची पोळी कशी भाजून घेणार? सामजिक सलोखा वगैरे राजकारण्यांच्या निव्वळ गप्पा असतात. खरंच सामाजिक सलोखा अस्तित्वात आला तर कित्येक गुंठामंत्री, बाहुबली, 'ध'रणी, आणि 'जाणत्या' राजकारण्यांची राजकारणाची भ्रष्ट आणि गलिच्छ दुकाने बंद होतील. आणि ते कुणालाच होऊ द्यायचं नाहीये. :-)
7 Oct 2014 - 1:29 pm | प्रभाकर पेठकर
ब्राह्मण ही समाजात दबावगट नसलेली दुबळी जात आहे. त्यामुळे आपले वैफल्य (सूडापोटी उद्भवलेले) काढण्यासाठी त्यांचा वापर इतर अब्राह्मण वर्गाकडून केला जातो. त्यांना उत्तरे देत बसून त्यांचे वैफल्य कुरळवाण्यात कांहीच हशील नाही.
6 Oct 2014 - 8:45 pm | रेवती
माझ्या बाबांनी गेल्या ४५ वर्षात कित्येक गरीब आणि ब्राह्मण (उच्चवर्णीय) नसणार्या गरीब मुलांना मोफत शिकवले आहे.
प्रतिसाद आवडला व ठळक वाक्याशी सहमत! कित्येक मुलांच्या शिक्षणावर जो खर्च झालाय तो सख्ख्या मुलांच्या शैक्षणिक खर्चापेक्क्षा जास्त झाला असेल. नुसते तेवढेच नाही तर मोफत शिकवण्या, कित्येक शस्त्रक्रियांना मदत, आणि देणग्या, लग्नाला रोख मदत. त्यातील किती लोकांची आभाराची दोन ओळींची चिठ्ठी आली हेही बघण्याजोगे आहे. जातीबद्दल तर नकोच बोलायला. अजूनही बाबांचे तेच चालू आहे? माझी चिडचिड होते ती यामुळे. मदत घेताना ती कोणत्या जातीतून आली हे बघता का? पण हे बोललेले बाबांना चालत नाही. आपण करत रहायचे, फलाची अपेक्षा न करता वगैरे….... …. जौदे! डोक्याला नस्ता त्रास! त्यावेळी माझे डॉक्टर काका असले तर विचारायला नको. त्यांनी वयाच्या साठ वरषांनंतर फक्त मोफत डोक्टरी केली. कुठं काही बोलायचं नाही यामुळे आम्ही सगळी चुलत भावंडे एक होऊन चिडतो ते दोघेही शांत असतात. मग आणखी चिडचिड!
7 Oct 2014 - 9:39 am | समीरसूर
माझ्या बाबांनीदेखील अशाच पद्धतीने कित्येक विद्यार्थ्यांना मोफत शिकवले, त्यांच्या पुस्तक-वह्यांचा खर्च केला. इतर कित्येकांना अडीअडचणीत मदत केली. कुणी आठवण ठेवून मान द्यावा यासाठी त्यांनी कधीच हे सारे केले नाही. शक्य तेवढी मदत करत राहणे हेच आपले काम आहे असं ते म्हणतात. अजूनही कुणालाही मदत करण्यासाठी ते तयार असतात. यात जात-पात, धर्म, वर्ण हा प्रश्नच कधी येत नाही, आला नाही. आणि यायलाच नको! माणूस हा माणूस आहे. माणूस जेव्हा कोट्यधीशापासून तर रस्त्यावरच्या अतिगरीब माणसापर्यंत सगळ्यांना त्या व्यक्तींच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मान राखत आपल्या चांगुलपणाने आपलेसे करून घेतो तेव्हा माणसातले माणूसपण खर्या अर्थाने तेजाळते.
7 Oct 2014 - 10:27 am | नाखु
असं लिहू नका तुम्ही "कधी काळी (६०-७० वर्षांपूर्वी) ब्राह्मणांनी पाळलेल्या अस्पृश्यतेपेक्षा कितीतरी पट जास्त अस्पृश्यता आणि पराकोटीचा आकस पाळणार्या जाती आजही महाराष्ट्रात आहेत"
कारण मग हे "मूखंड" विदा मागतील आणि या सगळ्याला हाच ब्राह्मसमाज कसा जबाब्दार आहे असा (स्वघोषीत) जावई शोध ही लावतील.
आणि या "ब्राह्मणांविषयीचा हा अनाठायी द्वेष जेव्हा संपेल तो खरा सुदिन! " साठी सलाम!
6 Oct 2014 - 6:32 pm | चौकटराजा
मिपावर बामणांची संख्या भरपूर आहे. आता ब्राह्मणेतरांचे मिपावर प्रमाण कमी का ? याचा धागा काढा !
6 Oct 2014 - 6:43 pm | ऋतुराज चित्रे
माझ ब्राम्हण असण
माझं ब्राह्मण असणं
6 Oct 2014 - 7:18 pm | ऋतुराज चित्रे
एकदा आम्ही चाळीतील मित्र गोट्या खेळत होतो. शेजारचा मित्र मराठे त्याच्या पाहुणा आलेल्या आतेभावाबरोबर आला. आमच्याबरोबर खेळण्यासाठी त्याने खिशातून गोट्या काढल्या तेव्हड्यात त्याच्या आतेभावाने त्याला बाजुला ओढले व विचारले अरे गोट्या खेळायला आपण थोडेच मराठे आहोत?
मित्र म्हणाला तू नसशील पण मी आहे.
6 Oct 2014 - 8:32 pm | काउबॉय
कधी कधी असते कधी कधी नसते हेच वास्तव आहे पण मिपाकर जातिधारित कंपूव्यवस्थेचा पुरस्कार कटाक्षाने टाळतात. इथे कंपू लेखन क्षमता , समान शत्रु , गाव, विचार, टारगेट या घटकातुन निर्माण होतात. कट्यात तर जात हां विषयही उपस्थित झालेला अनुभवलेला नाही. थोडक्यात मिपा तुमच्या जातीला नाही सोशल नेट्वर्किंग स्किल ला न्याय देते.
6 Oct 2014 - 9:40 pm | रामपुरी
ब्राह्मणांना आरक्षण देण्याची वेळ लवकरच येईल (जर तोपर्यंत ब्राह्मण भारतात शिल्लक राहीले तर)
या निवडणुकीत मराठ्यांना मिळालं पुढच्या निवडणुकीत ब्राह्मणांना...
जय आरक्षण!
6 Oct 2014 - 10:29 pm | काळा पहाड
गपा हो!ब्राह्मणांना आरक्षणाची काहीही गरज नाहिये. परिश्रम, अभ्यास आणि चिकाटी या जोरावर जगात टिकून रहायला ते समर्थ आहेत.
6 Oct 2014 - 10:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
+९९९
7 Oct 2014 - 11:54 am | श्रीगुरुजी
ब्राह्मण असणं म्हणजे आपलं लोकांनी जाळलेलं घर उघड्या डोळ्यांनी पाहणे,
ब्राह्मण असणं म्हणजे स्वतःची शेतजमीन इतरजण गिळंकृत करत असताना हताश होऊन बघत बसणं,
ब्राह्मण असणं म्हणजे गुणवत्ता असताना सुद्धा डावललं जाणं,
ब्राह्मण असणं म्हणजे सरकारच्या पाठिंब्याने सुरू असलेली इतिहासातील ब्राह्मण संत/स्वातंत्र्यसैनिक/राज्यकर्ते इ. ची असभ्य बदनामी मुकाट्याने सहन करणं,
ब्राह्मण असणं म्हणजे इतरांच्या मत्सराला पात्र होणे,
ब्राह्मण असणं म्हणजे जातीयवादी टिंगल व उपरोधाला बळी पडणं,
ब्राह्मण असणं म्हणजे राजकारणातून हद्दपार होणं,
.
.
.
आणि
ब्राह्मण असणं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणे,
ब्राह्मण असणं म्हणजे सर्व वाटा बंद होत असताना नवीन वाट शोधणं,
ब्राह्मण असणं म्हणजे कालबाह्य होत असलेल्या जुन्या रूढी त्यागून आधुनिक विचार स्वीकारणं,
ब्राह्मण असणं म्हणजे शिक्षणावर भर देणं,
ब्राह्मण असणं म्हणजे परंपरागत क्षेत्रे टाळून नवीन क्षेत्र शोधणं,
.
.
.
7 Oct 2014 - 12:48 pm | प्रसाद१९७१
माझे एक नेहमीचेच मत आहे.
ब्राह्मणांनी हींदू धर्मातुन बाहेर पडुन, कुठल्यातरी दुसर्या धर्माची स्थापना केली पाहीजे ( नावापुरते का होइना ). तसे केले तर अल्पसंख्या़क म्हणुन गणना होइल आणी मग ब्राहम्णांसाठी च्या अल्पसंख्यांक शाळा कॉलेज काढता येतील.
7 Oct 2014 - 1:36 pm | ज्ञानव
एवढे च बाकी राहिले आहे. जर पार्श्वभागावर निरनिराळ्या जातीच्या सेवा सवलतींच्या लाथा लागल्यावर युरोप अमेरीकेपर्यंतच्या वाट शोधायच्याच आहेत तर धर्मांतर तरी करू. पण शिंचे तिथे हि चित्पावन देशस्थ कऱ्हाडे
देवरुखे (ह्यांची वेदना अंमळ जास्तच आहे.) हे आरक्षण येईल त्याचे कसे करायचे ? सारस्वत आणि दैवेज्ञ(!!??)
ह्यांन्ना प्रवेश द्यायचा का ? एक ना धड असे चालूच राहील.
त्यापेक्षा "निर्जात " अशीच एक जात काढा आणि जे जात मनापासून मानत नाहीत त्या "ब्राम्हणांना" प्रवेश द्या ?
7 Oct 2014 - 2:50 pm | काळा पहाड
या धर्माचं नाव ब्रह्मधर्म असेल असा प्रस्ताव मी मांडतो.
7 Oct 2014 - 7:06 pm | पुण्याचे वटवाघूळ
अपेक्षित असलेला परिणाम झाला. पेटवापेटवी करून धागालेखक पळून गेले आणि लांबून मजा बघत आहेत.
7 Oct 2014 - 7:22 pm | काळा पहाड
बाकी पुण्यातल्या लोकांनी कसं ओळखलं ब्वा या धागालेखकाला असं वागवायला हवं म्हणून? यांचे पाय पाळण्यातच दिसले होते वाटतं!
7 Oct 2014 - 7:32 pm | पुण्याचे वटवाघूळ
म्हणूनच मला पुण्याचा असल्याचा जाज्वल्य अभिमान आहे :)
जोक्स अपार्ट, सदर धागाकर्त्याची आजपर्यंतची मिसळपावीय कारकिर्द बघितलीत तर हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही :)
8 Oct 2014 - 3:49 am | निनाद मुक्काम प...
हा तद्दन भपंक व एकांगी लेख वाचला आणि रामदास काकांच्या एका लेखात वाचलेले वाक्य आठवले
जे कूळ कायद्यात गमावले ते सिलिकॉन वैलीमध्ये कमावले,
व पु च्या वाक्यात थोडाफार बाल करून लिहितो
अजूनही अनेकांना आरक्षणाची पिसे लावून गरुड भरारी मारता
आली नाही. कारण आकाशात झेप घेण्याची ओढ जन्मजात असावी लागते ,
रक्तात धंदा असलेले ज्यू अमेरिकेत व सिंधी भारतात नेसत्या वस्त्रानिशी आले त्यांना जगण्याची सोय तत्कालीन सरकारने केली पण आज ते वैभवाच्या शिखरावर आहेत , तसेस महाराष्ट्रीयन ब्राह्मणाने स्वतःचा उत्कर्ष स्वतः केला आहे ,इतरांना तो करता येत नसेल तर त्यासाठी उगाच ब्राह्मणांना दोष देऊ नये पुराणातील वांगी पुराणातच असू द्या
14 Oct 2014 - 11:00 am | विटेकर
टाळ्या!
जळितात घर जळाल्यावर माझ्या आजोबांनी गांव सोडले, सांगलीला भाड्याच्या घरात बिर्हाड केले. वर्षाभरातच गावचे लोक सांगलीला आले , हाता- पाया पडले , म्हणाले , काका , गांवी चला, आमची चूक झाली. तुमचे घर पुन्हा बाम्धून देतो.
.
.
.
आजचे माझे आजोळचे घर गावकर्यांनी बांधून दिले आहे.
ब्राह्मण द्वेषाचे वाईट परिणाम सार्या गावाने भोगले.
8 Oct 2014 - 5:32 pm | बॅटमॅन
बाकी काही म्हणा. ब्राह्मण यांव नि ब्राह्मण त्यांव छापाचे लेख नेहमी सेंच्युरी मारतातच! ब्राह्मणांची महती ती हीच असावी काय? =))