व्हा पुढं … २०१५ साठी
२०१४ च्या उत्तरार्धात एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे कुठल्याही फालतू चारोळी कवितेला वारेमाप प्रसिध्दी मिळवून द्यायची असेल असेल तर त्या कवितेच्या/ चारोळीच्या खाली फक्त लिहायचे
कवी: " तुम्हाला माहीतच आहे ", " सांगायला हवे का? " , "आपले नेहमीचेच" इ. इ.
बस ! ती कविता/ चारोळी अशी प्रसिध्द पावते की विचारायची सोय नाही
कुणी तरी म्हणले आहे ना , नावात काय आहे ?
(हे कोण म्हणले , आठवले का…. ? असे कृपया विचारू नये )
तर असो मला काय म्हणायचे आहे की …. मला काय म्हणायचे आहे की ….