लग्नाचे अमिष दाखवून

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in काथ्याकूट
29 Dec 2014 - 8:06 pm
गाभा: 

खर्‍याचा जमाना आता राहीला नाही. पावलोपावली अबला स्त्रीची फसवणूक होताना दिसते आहे. आजचा स्वार्थी पुरुष एखाद्या विवाहीत वा अविवाहीत स्त्रीच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिला लग्नाचे अमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतो आणि अत्याचार करतो. काय चाललंय हे... कुठे नेऊन ठेवला...

काश्मीरातला एक कॉलेज युवक, तिथलीच एक कॉलेज युवती. युवतीला त्या युवकाकडे पाहून 'लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट' झाले. ती प्रेमात पडली. प्रकरण घरच्यांपर्यंत गेले. घरच्यांचा विरोध नव्हता. मात्र त्यांनी आधी शिक्षण पूर्ण करा असा सल्ला दिला. त्याप्रमाणे दोघेही पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. पुण्यात आल्यावरही प्रेम टिकून होते. पण नंतर युवतीच्या आयुष्यात बरोबर शिकणारा आणखी एक नवा युवक आला. पुन्हा 'लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट' झाले. पहिला अडचण ठरू लागला. एके दिवशी नवा
युवक आणि युवती यांनी पहिल्याला कुठलातरी प्रसाद दिला. पहिला थेट देवाकडेच गेला. मार्गातली जुनी अडचण दूर झाली.

एक विवाहित तरुणी वय असेल २७ वर्षे. दोन मुले असलेली. नर्स म्हणून हॉस्पिटलमधे कामाला लागली. तिथेच जवळ एक पानटपरी होती. जाता येता पानटपरीवरच्या तरुणाबरोबर(वय २२ वर्षे) नजरानजर होऊ लागली. कामामधून वेळ काढून दोघे जवळच्या लॉजमधे जाऊ लागले. दोघांच्याही घरच्यांना या गोष्टी माहीत झाल्या. एक दिवस दोघे दुपारच्या वेळी लॉजमधे गेले. तरुण लग्नाचा आग्रह करु लागला. पण पतीपरमेश्वराला सोडून येणे या विवाहीतेला शक्य नव्हते. जग काय म्हणेल ही भिती होतीच. तिने नम्र नकार दिला.
दुसर्‍या दिवशी दोघेही लॉजच्या खोलीत संपलेले आढळले आणि बातमी बाहेर आली.

आणखी एक घटना. एक विवाहीता. दोन मुले. पतीपरमेश्वर सकाळी कामाला जात असे. ही घरीच घरकाम करीत असे. वय २८ वर्षे. घरासमोर एक तरुण वय २१ वर्षे रहायला आला. ओळख वाढायला लागली. एक एक टप्पा पुढे सरकू लागले. पुढे तिच्या लक्षात आले हे जग आपल्या या प्रेमाला मान्यता देणार नाही. त्यांनी ठरवले हे दुष्ट जगच सोडून जाऊया. हातात हात घालून दोघेजण
रेल्वे रूळावर जाऊन....
एकत्र जगता येणार नाही पण मरता तरी येइल असा त्यांनी विचार केला.

एक अबला स्त्री पोलिस स्टेशनला आली. भितीने थरथर कापत होती. पाण्याने भिजली होती. स्त्री म्हटल्यावर पोलिसांनी तिला सहानुभूती दाखवली, तिची आस्थेने विचारपूस केली. तिने खरोखरच भितीदायक कहाणी सांगितली.

२ वर्षांपूर्वी तिला एक तरुण भेटला. तिला त्याच्यावर 'लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट' झाले. त्यालाही ती पसंत होती. दोघांचा प्रेमविवाह झाला. लग्नानंतर दोघे अनेकदा गाडीवरून फिरायला जात. नदीवरच्या पूलावरून जाताना कधी कधी हा तरुण गाडी थांबवून
पूलावरून हातात हात घालून चालत जाण्याचा आग्रह करीत असे. किती रोंमँटिक आयडीया ना... पण बरोबर जाताना तो तिला नेहमी नदीच्या बाजूला ठेवी. याची नजर सदैव नदीकडे असे. हिला पाण्यात ढकलून देण्याच्या संधीची तो वाटच पाहत होता. असा संशय या तरुणीला आला. त्याचे एका दुसर्‍या स्त्रीबरोबर प्रकरण आहे असा तिचा अंदाज होता आणि त्यासाठी हिला तो
वाटेतून दूर करू इच्छित होता.

पोलिस स्टेशनमधे तिने ही सगळी हकीकत सांगितली आणि आज तर रात्रीच्या वेळी तो तिला नदीवरच्या पूलावरून चालत जाताना पाण्यात ढकलून देण्यात यशस्वी झाला होता. ती पाण्यात पडली. रात्रभर कशीबशी हातपाय मारत जिवंत राहिली. केव्हातरी पाण्याबाहेर आली. नवर्‍याच्या घरी जाण्याचा प्रश्नच नव्हता. जवळच नवर्‍याच्या मित्राचे घर होते. त्याच्या मदतीने पोलिस स्टेशनला हजर झाली.
तक्रारीप्रमाणे नवर्‍याला ताब्यात घेण्यात आले.

सर्वांनाच या अबलेबद्दल सहानुभूती होती. एक पोलिस कर्मचारी मात्र थोडासा शंकित होता. त्याने तपास केला. या तरुणीची केव्हातरी नवर्‍यामुळेच नवर्‍याच्या मित्राशी ओळख झाली. त्या मित्राबरोबर 'लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट' झाले. नवर्‍यावर खूनाच्या प्रयत्नाचा आरोप ठेवून त्याला तुरुंगात धाडणे शक्य होते. त्यानंतर ही अबला नवर्‍याच्याच
मित्राबरोबर आरामात....
पोलिसाच्या काठीने साप मारण्याचा बेत होता.

अशीच एक काश्मिरी तरुणी. नवरा गेल्यावर पुण्यात नोकरी धंदा शोधण्यासाठी आली. एके ठिकाणी मुलाखतीला गेली असता तिला एक तरुण भेटला. पुण्यात नोकरी मिळवण्यासाठी तो उपयोगी पडेल असे तिला वाटले. मैत्री वाढवली. त्यानेही नोकरी मिळवून देण्याचे तिला आश्वासन दिले. पण नोकरीचे अमिष दाखवून तो कित्येक महिने ती राहत होती त्या लॉजवर येऊन तिच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत राहीला. पुढे तिला नोकरी मिळाली. भोळेपणा संपला. तिला नोकरी नसताना झालेल्या अन्यायाची जाणीव झाली. त्याप्रमाणे तिने पोलिसात तक्रार दिली. तरुणाला अटक झाली. अबलेच्या भाबडेपणाचा फायदा उठवण्याची बरी शिक्षा मिळाली.

तर सध्या लग्नाचे अमिष दाखवून बरेच प्रकार होत आहेत.

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

29 Dec 2014 - 11:08 pm | धर्मराजमुटके

हं ! आज अंमळ अजीर्ण झालयं. सविस्तर प्रतिसाद नंतर केव्हातरी :)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Dec 2014 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा

बोला....छापा की काटा?

स्पंदना's picture

30 Dec 2014 - 3:32 am | स्पंदना

होय. अश्या गोष्टी सर्रास घडताहेत. पण या लेखाला लग्नाचे आमिष दाखवुन अस नाव का ठेवलय ते कळल नाही.
खरोखर आपण लग्न करु अस म्हणत शारिरीक संबंध ठेवणे अन नंतर लग्नाला नकार देणे हे प्रकार घडताहेत ना? असो.
परवाच पेपर मध्ये मुकबधिर तरुणीला लग्नाचे वचन देउन नंतर जेंव्हा तिच्या आईवडिलांच्या लक्षात ही गोष्ट आली तेंव्हा पळ काढणारा युवक ही बातमी वाचली असेलच. त्या प्रकाराला फसवणुक म्हणतात.
बाकीचे तुम्ही दिलेली उदाहरणे ही स्त्रीयांकडुन फसवले गेलेले पुरुषांची आहेत. त्या प्रमाणे नाव द्या. लेखनातला तिरकस पणा कळतो मला, नाही अस नाही, पण अश्या विषयांना तिरकसपणा देउन काय साधायच आहे ते नाही कळल.
असोच.

hitesh's picture

30 Dec 2014 - 3:51 am | hitesh

कुठे नेऊन ठेवला युयुत्सु माझा ?

अत्रुप्त आत्मा's picture

30 Dec 2014 - 8:53 am | अत्रुप्त आत्मा

=)))))) कुठे नेऊन ठेवला युयुत्सु माझा ? =))))))

कपिलमुनी's picture

30 Dec 2014 - 1:48 pm | कपिलमुनी

hitesh
सदस्यकाळ
2 months 2 weeks

वयाच्या मानाने बरेच जुने आठवते कि पुर्वजन्मीचे आठवते आहे ;)

नाखु's picture

30 Dec 2014 - 9:58 am | नाखु

पटापटा मटा दिल्याबद्दल..

अत्रुप्त आत्मा's picture

30 Dec 2014 - 10:31 am | अत्रुप्त आत्मा

चांगली लिंक आहे रे धन्या :)

काळा पहाड's picture

30 Dec 2014 - 12:02 pm | काळा पहाड

पाटील आणि देशमुख म्हणजे वेगळे धर्म कसे काय ब्वा?

रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव 'पाटील' हे जैनधर्मीय होते. देशमुख कदाचित मराठा असतील.

काळा पहाड's picture

30 Dec 2014 - 2:15 pm | काळा पहाड

जैन म्हणजे हिंदूच हो. जैन असा वेगळा धर्म नाहिये. त्यांना वाटला तरी.

प्यारे१'s picture

30 Dec 2014 - 2:21 pm | प्यारे१

बास्स का????

मराठी कथालेखक's picture

25 Sep 2017 - 5:42 pm | मराठी कथालेखक

जैन म्हणजे हिंदूच हो. जैन असा वेगळा धर्म नाहिये

हे काय ?? भारतातील बरेचसे हिंदू कायदे जैनांना लागू होतात हे मान्य, पण म्हणून जैन असा वेगळा धर्म नाहिये असं म्हणता येणार नाही.
जैन हा वेगळा धर्मच आहे.

नर्मदेतला गोटा's picture

30 Dec 2014 - 11:44 am | नर्मदेतला गोटा

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार!

बोदवड (प्रतिनिधी)- सुरवाडे येथील २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिषदाखवून अत्याचार करणार्‍या आरोपीसह तिची बदनामी करणार्यांविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

http://jalgaonlive.com/लग्नाचे-आमिष-दाखवून-बलात/

सूड's picture

30 Dec 2014 - 12:25 pm | सूड

ह्म्म!! अशा दोन तीन कहाण्या डोळ्यासमोर आहे. त्यातली एक एका प्रतिसादात लिहीली पण आहे. पुन्हा पुन्हा तेच नको.

काळा पहाड's picture

30 Dec 2014 - 12:34 pm | काळा पहाड

हे लग्नाचं आमिष कसं दाखवायचं या बद्दल जाणकार मार्गदर्शन करतील काय?

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2014 - 12:56 pm | टवाळ कार्टा

त्याआधी इथले "जाणकार" कोण ते समजायला नको का ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Dec 2014 - 8:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

नर्मदेतला गोटा's picture

21 Dec 2015 - 3:17 pm | नर्मदेतला गोटा
तुषार काळभोर's picture

30 Dec 2014 - 1:44 pm | तुषार काळभोर

जाणकार=अनुभवी??
(प्लीज बी स्पेसीफिक)

काळा पहाड's picture

30 Dec 2014 - 2:21 pm | काळा पहाड

अनुभवी (प्रॅक्टिकल) जाणकार (थेअरेटीकल) असू शकतो. असेलंच असं नाही. तसंच जाणकार अनुभवी असेलच असं नाही. उदा: रुग्ण अनुभवी असतो (त्याला अनुभव असतो). डॉक्टर जाणकार असतो.
तस्मात, दोघांचेही सल्ले मोलाचेच.

नर्मदेतला गोटा's picture

1 Aug 2017 - 12:58 am | नर्मदेतला गोटा

एरवी ठीक होतं, इथे नव्हे.

अनुभवी जाणकार नसेल तर जाणून बुजून न केल्याने आणि हेतु तसा नसल्याने अजाण बालक म्हणून सोडून द्यायचे का
तेव्हा इथे लागू होत नाही तुमचे प्रॅक्टिकल थेअरेटीकल वगैरे

नर्मदेतला गोटा's picture

1 Jan 2015 - 1:20 pm | नर्मदेतला गोटा

इथे पहा

(13 Dec) कराड : प्रतिनिधीकोल्हापूर येथील महिलेस लग्नाचे आमिष दाखवून कराड शहरातील विविध लॉजवर नेऊन तिच्यावर ५ वर्षे बलात्कार केल्याप्रकरणी व त्या महिलेच्या मुलीला अश्लील मेजेस पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी येथील दोन युवकांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईर्शाद हाफिज बागवान (रा. गुरुवार पेठ, कराड) व मुन्ना (पूर्ण नाव माहीत नाही),

नर्मदेतला गोटा's picture

25 Sep 2017 - 5:13 pm | नर्मदेतला गोटा

पांडेवर लग्नाचे आमिष दाखवून २७ वर्षीय गायिकेवर ***

मनोज आणि तिची ओळख २०१२ मध्ये एका सिनेमाच्या सेटवर झाली. यावेळी मनोजने तिच्यासोबत प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार पांडेचा भाऊ सांगून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी मुंबईत कांदिवलमध्ये भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. या घराचे भाडेही पीडिताच भरत होती.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार म्हणजे दोघांच्या घरी लग्न ठरलं आहे हे माहीत आहे , मुलीच्या घरी तयारीही चालू झाली आहे आणि मुलगा अनपेक्षितरीत्या मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार करतो अशी घटना असली पाहिजे . प्रेम असल्याचे भासवून किंवा लग्नाचे आश्वासन देऊन , इमोशनली ब्लॅकमेल करून ( उदा . तू नाही म्हणतेस याचा अर्थ तुझा माझ्यावर विश्वासच नाही ... विश्वास नाही तिथे प्रेम नाही इत्यादी इत्यादी ) ज्यावेळी परस्परसंमतीने शरीरसंबंध ठेवले जातात तेव्हा तो बलात्कार कसा काय ? इव्हन दोन्ही कुटुंबांच्या संमतीने , ऑफिशियली लग्न ठरलं असतानाही जर मुलगी लग्नपूर्व शरीरसंबंधांना मान्यता देत असेल आणि पुढे काही कारणाने लग्न फिसकटलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तिची तयारी असली पाहिजे . एकतर मला लग्नापूर्वी कोणत्याही परिस्थितीत शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत यावर मुलीने ठाम असलं पाहिजे , कुठल्याही इमोशनल ब्लॅकमेलला बळी न पडता .... किंवा मग दुर्दैवाने फसवणूक झाल्यास त्याची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली पाहिजे .

नर्मदेतला गोटा's picture

26 Sep 2017 - 11:51 am | नर्मदेतला गोटा

खरंय

बलात्कार हा बलात्कारच. यात लग्नाचं अमिष कसलं

आणि

एखादा पुरुष विवाहीत असेल तरी त्याच्या लग्नाच्या अमिषाला माशाने भूलावंच का
हिंदू असेल तर एका वेळी एकच म्हणजे पहील्या पत्नीला हाकलायचे हे त्या महीलेला अपेक्षितच असते ना

मग

इतरांसाठीच्या खड्यात आपण पडलो हे मान्य करणार नाही का

आणि यामधल्या पुरुषालाही सूट नाही, चूक ते चूकच

नर्मदेतला गोटा's picture

19 Apr 2021 - 12:12 am | नर्मदेतला गोटा

सहाय्यक पोलीस निरीक्षकाने लग्नाचे आमिष देऊन अनेकदा लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडित महिला अधिकाऱ्याने केला आहे.