३१ डिसेंबरची संध्याकाळ. माझ्या मित्राची मुलगी. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे वय असेल २०, २१. पार्टीला निघाली. जाताना वडिलांची परवानगी घ्यायला आली. वडिलांनी विचारले "पार्टीला बरोबर कोण कोण आहे ?" तिने सांगितले अजून २ मैत्रिणी आहेत आणि त्यांचे २ मित्र(मुलगे) आहेत. यावर वडिलांनी(आमच्या मित्राने) विचारले या सगळ्यांची वये काय आहेत. ती म्हणाली, "सगळे आमच्याच वयाचे आहेत." मित्राने विचारले, "ड्रिंक्स घेतात का ?" ती म्हणाली "कधी कधी घेतात. सोशल ड्रिंकर आहेत" यावर आमच्या मित्राने निर्णय ऐकवला, "तुमचे मित्र अजून तरुण आहेत, पुरेशी समज नाही. त्यात पुन्हा दारु पिणार असतील तर कंट्रोल राहणार नाही.