महाराष्ट्रामधे काही पत्रकारांचे लिखाण गंभीरपणे वाचले जाते. काही जणांच्या लिखाणात नवी माहिती मिळते तर काहींच्या लिखाणात नवा विचार मिळतो. अशाच एका जाणकार पत्रकाराचा एक लेख वाचनात आला. त्यातल्या दोन वाक्यांनी काळजाला हात घातला. मोदींच्या बाबतीत बोलताना ते म्हणतात
एक म्हणजे हे मत आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेला आहे असे त्यांनी
मानले.
दुसरे वाक्य
याचे कारण देशात बहुसंख्येने वाढलेल्या तरुण मतदारांना हिंदुत्व, निधर्मीवाद या थोतांडी वादांमध्ये काडीचाही रस नाही. त्यातही प्रचंड संख्येने शहरात साचलेला हा नवा मतदार वृत्तीने मनापासून धर्मनिरपेक्ष आहे. ती धर्मनिरपेक्षता तो जगतो आहे. आपला सहकारी, जेवणाचा डबा पुरवणारा वगैरे कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे हे पाहण्याची गरजही त्याला वाटत नाही
अनेक पत्रकारांचे हे प्रातिनिधिक मत असू शकते त्यामुळे यावर गांभीर्याने विचार झाला पाहीजे आणि म्हणूनच पुन्हा एकदा मनात विचार आला की खरोखर तरुण मतदारांनी मोदींना मत का दिले.
विकास की राजनिती चालत असेल तर मग राज ठाकरेंची विकासाची ब्लू प्रिंट आणि उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत दाखवतात तो टॅब का चालला नाही. धर्म वजा करून केलेला विकास आमच्या देशात स्वीकारला जातो का ! १६ मेपूर्वीचे वातावरण काय होते आठवून पहा. देशात २६/११ सारखे हल्ले होत होते. १३/०२ सारखे पुण्यात स्फोट होत होते. या हल्ल्यांमागे धर्माचे तत्त्वज्ञान
होतेच. शिक्षणासाठी धर्माच्या आधारावर स्कॉलरशिप, लोनची सुविधा. याच्या जाहीराती टिव्हीवर झळकत होत्या.
या देशातल्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क .... त्या वेळच्या पंतप्रधानांचे हे वाक्य जनता विसरली नव्हती.
बाँबस्फोट झाल्यावर सत्ताधारी नेते अथवा त्यांचे सहकारी दहशतवाद्याच्या घरी जावून त्याच्या माता पित्याचे सांत्वन करीत. काही मदतही जाहीर करीत. जनतेच्या मनात त्यामुळे असुरक्षितता होती. या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. ही गोष्ट जनता विसरली नव्हती.
कुठलाही विकास हा एका बाँबस्फोटाने ठप्प होतो. जम्मू-काश्मीरमधील हिंदूंना देखील आपल्याच देशात निर्वासित व्हावे लागले. तेव्हाचे सरकारही त्यांना वाचवू शकले नाही. हे जनता पाहत होती.
आणि सर्वात महत्त्वाचे जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे.
महाराष्ट्रात अगदी कुठल्याही शहरात रेल्वे स्टेशनवर उतरा. रीक्षावाल्यांची फौज आपल्यावर चाल करून येते. त्यांचा हुलिया पाहून आपण भारतात आहोत की पाकिस्तानात असा प्रश्न पडतो. रेल्वे स्टेशन्स, एस टी स्टँड् तसेच निरनिराळ्या पुलाच्या कडेला आणि पुलाखाली उभ्या राहीलेल्या अभारतीय वास्तू पहा. त्यांचा विस्तार वाढतो आहे. तिथे सर्व भारतीयांना आत जायला परवानगी आहे का ! सगळंच भीतीदायक आहे.
त्यामुळे अशा भितीदायक वातावरणात हिंदूत्त्व न टिकवता जर कोणी विकासाच्या गप्पा मारत असेल तर त्यावर जनता विश्वास कसा ठेवणार !
त्यामुळे दहशतवाद्यांना बाँबस्फोट करू द्या आपण आपला विकास करुया असे म्हणण्यातला फोलपणा जनता जाणते.
तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही.
म्हणून अशा सर्व पत्रकारांना एक विनंती जरा तरुणांमधे मिसळा, त्यांच्या मनाचा कानोसा घ्या. म्हणजे नेमके वास्तव ध्यानात येइल.
प्रतिक्रिया
18 Feb 2015 - 4:21 pm | नया है वह
विकास हा हवाच आहे पण अस्मिता सुद्धा तितकिच महत्त्वाची आहे. मग ती भाषेची असो , प्रांताची असो वा धर्माची!
18 Feb 2015 - 8:37 pm | आशु जोग
नया है वह
अगदी बरोबर. काही पत्रकार उगाचच मतदारांना निधर्मी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.
18 Feb 2015 - 4:44 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
बाबा रे आशू, नरेंद्र व त्याचा पक्ष निवडून आला ह्याला एक कारण म्हणजे कॉन्ग्रेसचा कर्मदरिद्रीपणा व मौनी मनमोहन व त्यांचे भ्रष्ट सहकारी पक्ष.
तो लोकसत्तेचा पत्रकार म्हणतो ते खरे आहे.
23 Feb 2015 - 9:52 pm | आशु जोग
साहेब
तुम्ही स्वतःच दोन विसंगत विधाने करताय... हेही खरे आणि तेही खरे... असे कसे बुवा !
18 Feb 2015 - 5:30 pm | हाडक्या
बरं मग ?
[ बादवे अगदी अति-अवांतर : "हे आणि असेच" मोदी आणि समर्थक निवडणुकीआधी बोलले असते तर जास्त बरं झालं असतं, नाही का ?
उगी आपलं "देवालय से पहले शौचालय" अस्लं काहीबाही बोलत बसले आणि मग या असल्या अजाण पत्रकारांचा (आणि कदाचित अजाण मतदारांचापण) गोंधळ झाला बहुतेक.. तरी असोच. ]
(सकल सामाजिक दांभिकतेची आत्यंतिक चीड असलेला )
18 Feb 2015 - 8:43 pm | आशु जोग
मतदारांनी मत कशासाठी दिले होते तेवढेच माझे सांगणे आहे. विकास की राजनिती कुणाला नाही समजत. तसं असतं तर उद्धवचा टॅब आणि राजचे व्हिजन डॉक्यूमेंट का नाही चालले.
हिंदू म्हणून या देशात आपले काही अस्तित्त्व राहील का... अशी भिती १६ मे पूर्वी नक्की होती.
श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे असे वातावरण बनत चालले होते.
18 Feb 2015 - 9:59 pm | हाडक्या
"तुम्ही डोक्यावर पडला आहात काय" असा प्रश्न वैयक्तिक होईल म्हणून विचारण्याचे टाळतो आणि एकच विचारतो, "हिरवळ दाटे चोहिकडे" असे वातावरण बनत चालले होते तर मग काय आता भगवा पाऊस पडायला लागलाय काय ? मोदी निवडून आल्याने या बाबतीत असा काय बदल झालाय ? हिंदूंची प्रजनन क्षमता वाढलीय की अजून काही ?
की मोदी सरकारने अशी कोणती पावले उचलली आहेत की तुम्हाला असे वाटू लागले आहे ?
तुम्हाला पण असे वाटते काय की हिंदूनी धर्मकर्तव्य म्हणून चार-चार मुलं जन्माला घालावीत ? (कोणी किती मुलांना जन्म द्यावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहेच तसा).
क्लिंटन वगैरे सारखे विचार करणारे लोक जे समर्थन देतात (आणि आमच्यासारखे लोक काही इतर मुद्द्यावर विश्वास ठेवून देतात) ते असे नतदृष्ट लोक विपर्यास करून वापरतात म्हणून जास्त चीड येते आणि ही जर असल्या मते झेलावी लागणार असतील तर परत भाजपला मत आणि समर्थन देणे होणार नाही.
विकासापेक्षा पण आम्ही दिलेल्या बहुमताचा विपर्यास नक्कीच विश्वास-घात असेल.
राहता राहिला विषय हिंदुंच्या अस्तित्वाचा. तर त्यांना काही इतरांकडून धोका नाही लगेच. सध्या तुम्ही मराठी संस्कृतीची काळजी करायचे पहा, ती डोळ्यादेखत संपायच्या मार्गावर आहे (उपरोध आहे, समजावा म्हणून आधीच सांगतोय).
देशाची काळजी असेल तर असली निरुपयोगी विद्वेषी मते पसरवून मोदींच्या मार्गात अडथळे आणायची जरी कामे नाही केली तरी मोठीच मदत होईल हो.
अपनी अकल लगाओ भौ. ते हरले (किंवा त्यांचे सरकार नाही आले) म्हणून उगी कायपण निष्कर्ष काढू नका (परत एकदा, "तुम्ही डोक्यावर पडला आहात काय" असा प्रश्न वैयक्तिक होईल म्हणून विचारण्याचे टाळतो).
इत्यलम. तुमच्याशी अजून काही चर्चा करण्यात काही हशील नसणार हे स्पष्ट आहे. कारण तुमची मते दगडासारखी ठाम असणार आणि तुम्ही तीच तीच (अगदी वैदीक विमानांपासून गोडश्यांपर्यंत आणि हो नेहरु-खांग्रेसी इतिहास वगैरे वगैरे) आता घासून गुळगुळीत झालेली विधाने करण्यापूर्वीच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी माझ्याकडून इथेच थांबतो.
(सकल सामाजिक दांभिकतेची आत्यंतिक चीड असलेला )
19 Feb 2015 - 1:56 pm | काळा पहाड
हा प्रश्न विचारला नसला तरी तुम्हाला तोच अध्यारूत आहे हे उघड आहे. तेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न वैयक्तीक होईल म्हणून विचारायचा नाही हाच दांभिकपणा आहे. तुमच्या स्वतःच्या दांभिकपणाची चीड येते की नाही?
19 Feb 2015 - 2:57 pm | हाडक्या
तुम्हाला उपरोध कळतो की नाही.?
18 Feb 2015 - 7:14 pm | विशाखा पाटील
आणि सर्वात महत्त्वाचे जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे.
:))
हा धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर कुठेही विकासाला मारकच असतो हो!
(लोकसत्तातल्या लेखातल्या मुद्द्यांशी सहमत असणारी)
18 Feb 2015 - 7:18 pm | पिंपातला उंदीर
आणि सर्वात महत्त्वाचे जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे.
*lol* *LOL* :-)) :))
18 Feb 2015 - 7:49 pm | मृत्युन्जय
जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही.
माफ करा पण याएवढे बिनडोक विधान मी आजवर वाचलेले नाही. हिंदुत्वाचा आणि विकासाचा संबंधच काय? सगळे विकसित देश काय हिंदु आहेत काय? स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका, स्वीडन, जपान हे सगळे हिंदु देश आहेत का? की त्यांनी हिंदुत्व अंगिकारले आहे?
आणि बाँबस्फोट काय मोदी आलेत म्हणुन थांबलेत का? तिथे सीमेवेर मध्यंतरी इतका प्रचंड गोळीबार चालु होता त्याचे काय?
उगा काहितरी काड्या लावायच्या आणि गंमत बघत बसायचे असे चालु आहे.
बरे भारतात तर हिंदुत्व ठासुन भरले आहे ना? मग कुठे गेला भारताचा विकास? आणी हिंदुत्व दुबई मधुन पण हद्दपार आहे. मग कसा झाला त्यांचा विकास?
18 Feb 2015 - 9:21 pm | अर्धवटराव
ठाकरे बंधू कितीही आणि काहिही कोकलले तरी त्यांच्याकडुन विकास अशक्य आहे हे जनता जाणते, म्हणुन त्यांचं कार्ड एका मर्यादेपलिकडे चालत नाहि. काँग्रेसने आपला पराजय स्वतः ओढावुन घेतला. हिंदुत्व आणि विकासाचा काहि डायरेक्ट संबंध असता तर आज वाराणसी सर्वात विकसीत शहर असायला हवे होते. आणि मोदि जिंकले कारण अगेन्स्ट ऑल ऑड्स हा माणुस राष्ट्रगाडा चालवु शकेल असा जनतेला विश्वास वाटला....सगळं कसं विस्कळीत आहे...तरिही कनेक्टेड :)
19 Feb 2015 - 1:12 am | पिरतम
१००% सह्मत
19 Feb 2015 - 3:07 pm | नया है वह
प्रगत देश तसे आहेत कारण त्यांनी त्यांची धार्मीक, प्रादेशीक, भाषीक अस्मिता सोडुन दिली नाही.
21 Feb 2015 - 3:26 am | खटपट्या
"जेथे हींदूत्व संपते तीथली धर्मनिरपेक्षता संपते" हे कसे वाक्य कसे वाटतेय ?
23 Feb 2015 - 6:42 am | विटेकर
चान्गले आहे कि वाक्य !
फक्त .. हिन्दुत्व ची वेलांटी चुकली आहे.
26 Feb 2015 - 1:37 pm | विजुभाऊ
या इतके इनोदी वाक्य गेल्या दहा हज्जार वर्षात लिहीले गेले नसेल
दुबई , रीयाध ,आबुधाबी ,जेद्दाह , बंदार सेरी बगवान ( ब्रूनेई ) , मक्का ही शहरे कोणत्याही प्रकारे हिंदुत्ववादी नाहीत. मुस्लीम बहूल किंबहुना पूर्णपणे मुस्लीम राष्ट्रातील शहरे आहेत. यांचा विकास कसा झाला हो. तिथे कुठे हिंदुत्व आले.
पंढरपूर , जेजुरी , वाराणसी , प्रयाग, मथुरा , अयोध्या ही तर हिंदुंची तीर्थ क्षेत्रे. तुमच्या मते या शहरांचा संपूर्ण विकास व्हायला हवा होता. ही क्षेत्रे किमान व्हॅटिकन सिटी इतकी तरी विकसीत व्हायला हवी होती.
26 Feb 2015 - 2:09 pm | अत्रुप्त आत्मा
@. ही क्षेत्रे किमान व्हॅटिकन सिटी इतकी तरी विकसीत व्हायला हवी होती. >>> ब्बास! पुरावा दिलात ना तुम्ही? आता हे योग्य जागी पाय लाऊन पळुन जाणार बघा!
समांतर:- मागे एका राजकीय सभेत एका कथित हिंदुत्ववाद्याला "पाठशाळां मधे सर्व हिंन्दु ना प्रवेश देण्याची सख्ती करण्याचं आंदोलन करा" ... (जे हिन्दू एकिकरणाचा एक भाग आहे)असं नुसतं सांगितलं. तर अत्यंत मुर्दाड पणे आणि उन्मत्त पणे माला न्याहाळत नुसतं "हुं!" असं म्हणाला.
26 Feb 2015 - 2:27 pm | टवाळ कार्टा
गुर्जी...तुम्ही स्वतःची पाठशाळा काढायचे मनावर घ्या"च"
26 Feb 2015 - 2:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१०००
26 Feb 2015 - 3:15 pm | हाडक्या
अच्छा म्हणजे सगळं काही गुर्जींनीच करायच काय ? आणि त्यांनी फक्त पाठशाळा काढून काय होणारे ?
जे सध्या पाठशाळा चालवतात त्यांनी सर्वांना प्रवेश देणे किमान मान्य करावे, जे मंदिरांचे व्यवस्थापन पाहतात त्यांनी सर्वच इच्छूकांना पौरोहित्यास मान्यता द्यावी. तर त्याला काही अर्थ.
26 Feb 2015 - 4:23 pm | टवाळ कार्टा
सध्या जे आहेत ते बदलायला तयार नसतील तर नवीन बदल स्विकारलेले लोक तयार करावेत
26 Feb 2015 - 6:05 pm | हाडक्या
आणि त्यांना समाजाने स्वीकारण्याचे काय ? म्हणजे असे की गुर्जींनी नवे गुर्जी जरी तयार केले तरी समाजाने त्यांना "गुर्जी" म्हणून स्वीकारले पण पाहिजे ना. जर समाज यासाठी तयार झाला तर गुर्जी आपोआप (आधीच असलेल्या पाठशाळांतून) तयार होतील अशी आशा, त्यासाठी आपल्या गुर्जींनी नवी पाठशाळा काढायची गरज पडणार नाही मग. :)
26 Feb 2015 - 6:14 pm | टवाळ कार्टा
मिपाकर आणि बाकी संस्थळे काय फक्त बँडविड्थ वाया घालवायला आहे का?
सगळ्या संस्थळांवर जातीव्यवस्था नको असे लिहिणारे कमीत कमी १००० लोकं तरी असतील...गुर्जींनी पाठशाळा काढली तर सुरवातीला कदाचित शिष्यगण कमी असताना या १००० लोकांनी फक्त गुर्जींच्या हाताखाली तयार झालेल्या आणि "फक्त जन्माने ब्राम्हण नसणार्या ब्राम्हण गुर्जींना" वेगवेगळ्या पुजेअर्चेंसाठी बोलावले तर त्यांचे बघून आणखी १००० नाही तरी कदाचित ५० लोकंतरी बदलतील
आणि वरचा पर्याय जर प्रॅक्टिकल वाटत नसेल तर कठिण आहे या देशाचे
27 Feb 2015 - 3:36 pm | बॅटमॅन
टका रिलॅक्स. गुरुजींनी असा उपक्रम अल्प स्तरावर का होईना राबवलेला आहे.
27 Feb 2015 - 4:34 pm | टवाळ कार्टा
अर्रे व्वा...कै सांग्तोस
गुर्जी तुस्सी ग्रेट हैच :)
27 Feb 2015 - 4:24 pm | हाडक्या
टका, पर्याय प्रॅक्टिकल वाटत नाही असे नाही पण फक्त गुर्जींकडून अपेक्षा करून भागणार नाही हे निदर्शित करायचे होते.
उदा. म्हणून सांगतो, बाकी आमच्या एका मित्राने सत्यशोधक पध्दतीने लग्न केले (नो ब्राम्हण, नो रितिरिवाज वगैरे) तर त्याचीच भावकी त्याचे "नीट" लग्न झाले नाही असे म्हणते असते. लग्नानंतर दोन-एक महिन्यात त्याच्या गाडीला अपघात झाला तर ते "अशा" पद्धतीने लग्न केल्यामुळेच असे त्याच्या आईला सांगत होते. माऊली "एका प्रॉपर ब्राम्हणाकडून सत्यनारायण तरी करू" म्हणून त्याच्यामागे लागली होती पुरे एक वर्ष (त्याने घातला नाही ती वेगळी गोष्ट).
असो. तुझे म्हणणे पटतेय पण तरीही त्यातल्या मर्यादा आणि अडथळे मांडतोय इतकंच.
27 Feb 2015 - 4:40 pm | टवाळ कार्टा
फक्त गुर्जींकडून अपेक्षा नैच...मी फक्त १ पर्याय सुचवला
बाकी अपघात फक्त आणि फक्त चालवणार्याच्या चुकीमुळे होतात असे माझे सपश्ट मत आहे
आणि भावकी म्हणाल तर अश्या बाबतीत सरळ फाट्यावर मारावे एखादी चांगली गोष्ट घडली तर म्हणणार आहेत का की सत्यशोधक पध्दतीने लग्न केले म्हणूनच झाले
देव भक्तीभावाचा भुकेला असतो...पूजा कशी करावी हे मर्त्य माणसानेच ठरवलेले आहे नाहीतर तिकिट काढून दर्शनाच्या स्पेशल रांगा लागल्याच नसत्या....हेच मला माहित...आणि देव दगडात किंवा मूर्तीत नसतो...त्यामुळे बाकी चर्चेसाठी माझा पास
27 Feb 2015 - 8:27 pm | आशु जोग
त्याचीच भावकी त्याचे "नीट" लग्न झाले नाही
यावरून हाडक्या आणि त्याचे मित्र यांच्या काही गोष्टी न सांगता कळाल्या
27 Feb 2015 - 10:19 pm | टवाळ कार्टा
??????/
28 Feb 2015 - 12:44 pm | अत्रुप्त आत्मा
@
>>> जोगबाबा...,काहिही वाटत नसेल नै...अश्या कॉमेंट द्यायला???
खरच. तुमच्यासारख्यांमुळेच तर या देशाला हिंदुत्वाची भव्य आणि भली पहाट दिसणार आहे एक दिवस. __/\__
1 Mar 2015 - 12:32 am | आशु जोग
अहो पण त्याला तेच सांगायचंय आणि त्यांच्या मित्राचे पाव्हणे असतील ज्यांच काही म्हणणं असेल
2 Mar 2015 - 5:26 am | हाडक्या
जोग भौ.. आम्ही तुम्हाला काही अवघड वाटणारे प्रतिसाद दिले (ज्यांची तुम्ही उत्तरेपण देऊ शकला नाहीत, पण ते असो) तर तुम्ही आम्हाला जोखायला निघालात.? अरेरे. आणि या प्रतिसादातले ध्वनित अर्थ पाहून तर तुमची अजूनच शरम वाटतेय आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमचे मित्र "कोब्रा" पण आहेत आणि "सत्यशोधक"पण.
आम्ही स्वतः (इच्छा असेल तेव्हा) पठण पण करतो आणि पक्षी-तीर्थप्राशन पण. तुम्ही उगी आमच्या नामाभिधानावरून आणि (इथे उदाहरणार्थ समोर आलेल्या) मित्रांवरून आम्हाला judge करु धजू नका. (जाती-पातीची प्रचंड घृणा असलेला हाडक्या)
*nea*
असो, किमान गुर्जींनी प्रतिक्रिया दिली आहेच त्यामुळे त्याबद्दल काहीही जास्त बोलत नाही.
तुम्ही आम्हाला "अरे तुरे" करायला आपली ओळख नाही त्यामुळे नाव "हाडक्या" घेतले (अगदी "देवेंद्र फडणवीस" घेतले असते तर तुम्ही काही नमस्कार घातला असता जणु) म्हणून तुम्ही माझ्याशी सौजन्य सोडून बोलायची गरज नाही.
मुद्द्याशी गाठ घाला आणि "काय" बोलतोय यावर आणि यावरच बोला, "कोण" बोलतोय त्यावरुन बोलू नका.
2 Mar 2015 - 11:01 am | आशु जोग
त्यांच्या मित्राचे पाव्हणे
अरे तुरे कुठायत्याला तेच सांगायचंय
यामुळे फार दुखावला असाल तरत्यांना तेच सांगायचंय
असं म्हणेन म्हणजे तेवढ्याच एका खुंटीला झोके घेत बसायला नको.2 Mar 2015 - 11:09 am | आशु जोग
आमचे मित्र "कोब्रा" पण आहेत आणि "सत्यशोधक"पण
टाका आपल्याच मित्रांना वेगवेगळ्या कॅटेगरीत टाका म्हणजे नंतर आपण फार पुढारलेले आहोत असं म्हणायला चांगला जोर येतो
जरा हेही पहा
2 Mar 2015 - 3:47 pm | हाडक्या
अहो, आम्ही मित्रांच्यात आणि इतर कोणातही कसल्याच कॅटेगर्या करत नाही ( तुम्ही मात्र (तुमच्या तथाकथित हिदुत्वाच्या) आडपडद्याने जातिविषयक, धर्मविषयक बरेच काही बोलला आहात आधीच).
हे तुम्ही सुरु केलेत, आणि प्रतिक्रिया म्हणून तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगितले वर कित्ती कित्ती तो मानभावीपणाचा आव.. आणि आम्ही तुमच्या संज्ञेतलेदेखील "पुढारलेले" आहोत असा कोणताही दावा केलेला नाही (त्याचा तुमच्याबाबतीत व्यत्यास करावा की काय असा विचार करतोय, पण असोच) उगी काहीही अवांतर बोलून विषय भरकटवणे (की स्वतःच्या धाग्याला ट्यार्पी देणे) हाच तुमचा उद्देश दिसतोय त्यामुळे इथून पुढे आमचा पास.
बादवे त्या दारुवरच्या धाग्यातला सोत्रिंचा प्रतिसाद (आणि इतरपण दारुबद्दलचे धागे आहेत लचे, तुमचे मिपा-वय पाहता तुम्हाला माहित असेलच) तुम्ही वाचला नसेलच, कारण तुमच्या सोईचे वाचून बाकीचे गाळणे हाच तुमची पद्धत दिसतेय. असो, दारुवर आता इथे तुम्हाला चर्चा अपेक्षित दिसतेय (स्वगत : कित्ती तो शतकाचा अट्टाहास? काही झाले तरी वधु-वर सोडा, या धाग्याचे काश्मीरदेखील होत नाही हो इथे), तिकडे पुरेशी चर्चा झाल्याने आणि त्यानेही तुमच्या मनात कमीत कमी किमान सहिष्णुता ही निर्माण न होऊ शकल्याने अजून चर्चा निरर्थक आहे.
चर्चा अशांशी होते जे विचार मांडतात, दुसर्याने मांडलेले विचार विचारात घेतात (वरती विकासभौंचे प्रतिसाद पहा त्यासाठी), तुम्ही विचार मांडण्यात अथवा विचारात घेण्यात काडीचे इच्छूक नाही आहात असे दिसतेय वरून सवंग धागा-प्रसिद्धीसाठी अवांतरावर अवांतरे करताय. त्यामुळे आता याही तुमच्या नवीन उपचर्चा विषयावर आमचा पास.
आत्मुबुवांच्या इथल्या प्रतिक्रियांशी सहमती दर्शवून तुम्हाला भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा.. :)
28 Feb 2015 - 12:41 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
मी केलेला प्रयत्न अत्यंत छोटा आणि अल्पकाळासाठिचा होता. शिवाय मी पाठशाळा उघडू शकेन..असं कोणत्याच स्वरुपाचं बळ माझ्याकडे नाही. कुणि मदत केली..तरी वर हाडक्या म्हणतो ..., तसं असल्या पुरोहितांना समाज किती स्विकारेल ही शंका आहेच. अर्थात स्विकारेलंही..पण वेळ बराच लागेल. दुसरे असे,की आमच्या भटजींपैकी अनेकांना स्पर्धेचं आकर्षण वाटण्या ऐवजी भय वाटतं. गेल्या दहा वर्षात अनेक कारणांनी स्पर्धा वाढलेली आहेच. त्यात अजुन ही भर कशाला ? असा व्यावसायिक विचारंही अनेक जण करतात. पण यामुळे विषमेतेच्या मार्गातला एक अडथळा दूर होइल.याच्याशी त्यांना काहिही घेणं देणं नसतं. सगळे धंदाच करायला उतरलेले असल्यामुळे, शालेय विद्यार्थ्यांना सोडणार्या रिक्षावाल्यांप्रमाणे...,ते ही नविन येणार्या (धंदा खाणार्या) स्कूलबस/व्हॅन सारख्या पर्यायांना भितात/जळतात..इत्यादी सर्व काहि. आणि सगळ्यात जास्त राग असतो,तो मोनोपॉली गेल्याचा! भैय्ये इस्त्रीच्या धंद्यात पडले,अधिक नम्र आणि प्रामाणिक सेवा देऊ लागले..मग आपल्या माजोरड्या इस्त्रीवाल्यांचं पित्त खवळलं. पूर्वी गिर्हाइक म्हणजे अत्यंत भि*&^#@ गोष्ट होती..आता स्पर्धा वाढल्यामुळे..त्यांना हवी-ती सर्व्हिस द्यायची वेळ आली. आपलं माजोरिपणा करायचे हक्काचे दिवस संपले...ही जशी खंत त्यांना सतावते आहे...तसलच भय आमच्याही लोकांना वाटतं.
1 Mar 2015 - 12:16 am | आशु जोग
आता हा गुर्जी विषय चालू झालाच आहे तर त्यावर...
बरेच तरुण गुर्जी लोक बिनधास्त कानाला मोबाइल लावून गाडी चालवतात. या मर्त्य मानवाच्या जगातले कोणतेच नियम त्यांना लागू होत नाहीत .
गेल्या दहा वर्षात अनेक कारणांनी स्पर्धा वाढलेली आहेच. त्यात अजुन ही भर कशाला ?
त्यामुळे बरेच गुर्जी लोक प्रचंड स्पीडमधे गाड्या चालवतात. जणू पटकन पोचलं नाही तर गेलेल्या माणसाचा पुनर्जन्मच होइल आणि धंदा हातचा जाइल
1 Mar 2015 - 1:47 am | अत्रुप्त आत्मा
व्वाह! बिनडोक निरर्थक कयाच्या काय विषयांतरही येतं की तुम्हाला!
आता मात्र खात्रीच पटली...
अकाली दीर्घजीवी मती-मंदत्व प्राप्त झालच्च आहे तुम्हास जोगाबाबा! =))
27 Feb 2015 - 4:26 pm | हाडक्या
आणि हो, देशाचे कठिण आहेच, फक्त भविष्यात चांगले काही होण्याच्या आशेवर बरेच काही चाललेय .. :)
18 Feb 2015 - 9:32 pm | विकास
तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही.
याचाच व्यत्यास (अर्थात converse) हा दिल्ली निवडणुकांच्या संदर्भात काय होऊ शकतो?
----------
हिंदूत्व या शब्दाचा अर्थ अनेकदा त्याच्या समर्थकांना देखील समजत नाही तर त्याच्या विरोधकांना अथवा जे कशातच नाहीत त्यांना कसा समजणार? बरं, तुम्ही म्हणता तसे पत्रकारांनी तरूणांमधे फिरायला हवे, हे खरेच. पण नक्की कुठल्या विचारसरणीच्या? त्या लेखात परत त्यांच्या मोदींच्या कोटावरचे भाष्य आलेले आहे ते मला पटले नाही कारण तो लेख लिहून होई पर्यंत, टाईम्सने चुकीची बातमी दिली म्हणून माफी पण देऊन झाली होती आणि मोदींनी, ते मुख्यमंत्री असल्यापासून लावलेल्या सवयीनुसार लिलाव करणे पण जाहीर केले होते. असल्या फुटकळ गोष्टींनी मतदार मते कशी देयची ते ठरवत नाहीत.
"प्राणीमात्र झाले दु:खी पाहता कोणी नाही सुखी, कठीण काळे वोळखी धरीनात कोणी..." या अशा गांजलेल्या अवस्थेत भारतातील बराचसा समाज होता आणि अजूनही आहे. मोदींच्या नऊ महीन्याच्या कारकिर्दीत एकदम बदल शक्य नाहीत हे ते जाणून आहे. पण त्याला मोदींकडून आशा होती आणि अजूनही आहे. तीच गोष्ट स्थानिक स्तरावर दिल्लीमधे झालेली आहे. स्थानिक स्तरावरील निवडणूक होती त्यामुळे सामान्यांना केजरीवाल यांच्या मोफत आश्वासनाकडून अधिक तात्काळ लाभ होण्याची आशा आहे.
थोडक्यात मोदी असोत अथवा केजरीवाल, मते ही प्रस्थापित यंत्रणेतील, राजकीय परीस्थितीतील बदलास दिली गेली आहेत तसेच ती सामान्यांपर्यंत पोहचू शकेल असा काही प्रत्यक्ष फायदा होईल अशा अपेक्षेने दिली आहेत. आज मोदी, अनेक गोष्टीत मुलभूत बदल करत आहेत असे दिसते आहे (उ.दा. ब्रिटीशांच्या काळातले जवळपास १७०० जुनाट कायदे मोडीत काढणे, सरकारी कामाला शिस्त लावणे, मेक इन इंडीया आव्हानातून कारखाने तयार करणे आणि त्यातून रोजगार तवगैरे...) पण त्यातून प्रत्यक्ष फायदा होण्यास वेळ लागणार. तेच काही अर्थी आपचे पण होऊ शकेल... त्यामुळे दोघांनाही त्यांच्या त्यांच्या मतदारांना आनंदी ठेवण्यासाठी "deliverables" चा विचार करावा लागेल, नाहीतर आज मोदींना त्यांची "दिल्ली" मिळाली, उद्या तीच अवस्था केजरीवालांची देखील होईल.
असो.
18 Feb 2015 - 10:19 pm | हाडक्या
+१ विकास भौ..
त्याचबरोबर, कोणी मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही.
असा बहुमताचा अर्थ काढू पहात असेल तर त्याला तीव्र आक्षेप. सगळ्यांना अगदी भाजपच्या कट्टर समर्थकांना देखील ही जाणीव असेल की हिंदूत्वाच्या मुद्यावर मते मिळालेली नाहीत तेव्हा कोणी तसा अर्थ काढून स्वतःचे अजेंडे रेटू पहात असेल तर त्याला स्पष्ट शब्दात विरोध दर्शवलाच पाहिजे (त्यासाठी केजरिवाल मध्ये आणायची गरजही नाही).
मान्य. पण तो या निवडणूकीचा मुद्दा होता का ? नाही. मग आता कोणी असा दावा का करावा ?
ही शुद्ध फसवणूक झाली. वरुन जर कोणी हसत बसणार असेल "कसे फसवले" म्हणून तर त्यांनी लक्षात ठेवावे ही काही शेवटची निवडणूक नाही.
मला वाटते असल्या दांभिकतेमुळेच नाकर्ते असले तरी काँग्रेससारख्या पक्षांना परत परत यायची संधी मिळते. भाजपला उजवा पक्ष म्हणताना त्यांची ही बाजू नेहमीच त्यांची विश्वासार्हता धोक्यात आणते असं वाटतं.
18 Feb 2015 - 11:55 pm | 'पिंक' पॅंथर्न
हिंदुत्व या मुद्यावर भाजपा लोकसभा निवडणुकीत जिंकला नसुन केवळ आणि केवळ विकास या मुद्यावर जिंकला आहे. कारण प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेसचा 'विकास' हा एकच मुद्दा राहीला होता तर भाजपा राम मंदीर, हिंदुत्व यासारखे पत्ते टाकत होती. यातला विनोदाचा भाग म्हणजे दोन्ही पक्ष आपाआपले मुद्दे प्रत्यक्षात पुर्ण करु शकले नाही.
मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पुर्णपणे 'विकास' हा एकच मुद्दा लावुन धरला. त्यामुळे कदाचित विकासाचा मुद्दा बोलणा-या भाजपाला एखादी विकासाची संधी द्यावी अशी भावना मतदारांत निर्माण झाली असावी. काराण मागची १० वर्षे काँग्रेस ने देशाचा केलेला विकास(?) मतदार जनतेने अनुभवला होता.
शेवटी अर्थातच प्रबळ नेतृत्वाचा अभाव हे सुद्धा कॉंग्रेसच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे.
20 Feb 2015 - 4:14 pm | आशु जोग
भाजपाच्या प्रचारात काय बोललं जात होतं यापेक्षा मतदार मोदींकडे कोणत्या नजरेने आणि अपेक्षेने पाहत होता ते पहा. गेली १० वर्षे विरोधकांनी मोदींची तशी प्रतिमा केली होती. त्यामुळे हा मनुष्य अरेला कारे करेल, योग्य तिथे स्क्रू पिळेल, अडवेल त्याला नडेल हा विश्वास होता. मोदी आले की ९८ % हिंदूत्त्व अबोलपणे येतच. बाकी भाषणात येतो तो २ % विकास.
20 Feb 2015 - 6:04 pm | विकास
वास्तवात.. ९८% हिंदूत्व आणि २% विकास केला तर त्यात आपण सुखान राहू शकू का?
आरे ला कारे करण्याची नक्कीच गरज आहे. आणि कणखर नेतृत्व तर कायमच महत्वाचे आहे. हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्वाचेच दुसरे नाव हिंदूत्व म्हणून त्या अर्थाने(च) ते देखील समर्थनीयच आहे. पण यातील काही विकासाविना लोकशाहीत खपणार नाही... म्हणूनच सबका साथ सबका विकास हे आचरणात आणले नाही तर कुणालाच चालणार नाही आणि कुणाचेच चालणार नाही - तशी घोषणा करणार्या मोदींचे पण चालणार नाही आणि तो अर्थ असलेले पण दुसरे काही बोलणार्या काँग्रेस, आप अथवा अजून कोणी गोम्या-सोम्या नेतृत्वाचे पण चालणार नाही...
तरी देखील मोदींना आणि दिल्लीत नव्याने आलेल्या केजरीवालांना वेळ देणे महत्वाचे आहे.
20 Feb 2015 - 7:27 pm | पिंपातला उंदीर
आरे ला कारे करण्याची नक्कीच गरज आहे.
कोणी? कुणाशि?
20 Feb 2015 - 8:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
उंदरानी जीवावर उठलेल्या बोक्याला.
20 Feb 2015 - 9:05 pm | पिंपातला उंदीर
मजा असेल तर ठीक आहे . नसेल तर कुणाची बिषाद आहे *lol* *LOL*
20 Feb 2015 - 9:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
21 Feb 2015 - 4:03 am | विकास
जे कोणी "आरे" करतील त्यांच्याशी! :)
उदा. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दहशतवादी, भारताच्या हितसंबंधात अडचण आणणारे वगैरे... कोणिही. (आत्ताचे लेटेश्ट उदाहरण म्हणजे श्रीलंका निवडणुका आणि आत्ता श्रीलंकेबरोबर केला गेलेला अणुकरार). असो.
26 Feb 2015 - 4:02 pm | ऋषिकेश
आरेला कारे म्हणताना तुम्ही हवा तो अर्थ काढा.. आशु तै ना असा अर्थ नक्कीच अभिप्रेत नव्हता.
त्यामुळे तुमची सहमती बघुन उंचावलेल्या भिवया वरील प्रतिसादाने किंचित बसल्या तरी
हे वाक्य सुद्धा दु:खदायीच आहे. पण असो. चालायचेच!
26 Feb 2015 - 6:09 pm | बॅटमॅन
पाहिजे तो अर्थ काढला की दु:ख वाटायचेच! नुआन्स हा प्रकार फक्त आयव्हरी टावरातील विचारजंतांपुरताच राखीव ठेवायचा असतो ही ढोंगी शिकवण मिळाल्यावर दुसरे काय होणार?
26 Feb 2015 - 7:39 pm | विकास
हे वाक्य सुद्धा दु:खदायीच आहे. पण असो. चालायचेच!
अहो पण परत त्यातून मला अभिप्रेत असलेला अर्थ हा सावरकरांचा आहे, ज्यांनी ती टर्म "कॉईन" केली... आता अनेकांना हिंदूत्वच काय पण राष्ट्रीयत्वपण मान्य नसते. पण तो वेगळा चालू रहाणारा वाद आहे. त्यात आपण "आरे ला कारे" करायला नको. ;)
19 Feb 2015 - 10:28 am | प्रदीप
balderdash
noun
1. senseless, stupid, or exaggerated talk or writing; nonsense.
2. Obsolete. a muddled mixture of liquors.
हा लेख वाचून सदर शब्द अगदी अनाहूतपणे आठवला!
19 Feb 2015 - 10:56 am | विटेकर
वा!!
आपल्या विरोधी मत असेल तर सेन्स्लेस ?
एकदा सेन्स्लेस म्हंटले की खंडन करण्याची जबाबदारी येत नाही !
19 Feb 2015 - 10:38 am | विटेकर
विकास म्हणजे काय ? ते नीट माहीत नसल्याने वाराणसी ... विकास असे कै च्या कै संबंध जोडले जातात.
चकाचक रस्ते आणि पॉश मॉल्स ही विकासाची व्याख्या असेल तर सॉरी .. आपण एका पातळीवरुन विचार करत नाही असे म्हणावे लागेल.
हिन्दुत्व आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत! कोणी सत्यदेव म्हणते कोणी सत्यनारायण , इतकाच फरक!
इतके परखड्पणाने नव्हे पण देशातील तरुणाईला हे ही हवे होते आणि सहिष्णु भारतीय ( पुन्हा हिन्दू म्हणत नाही , दोन्हीचा अर्थ एकच ! ) असल्याने त्याला हिन्दुत्व हा शब्द स्वीकारण्याऐवजी " विकास" शब्द स्वीकारला इतकेच ! ( खोण्ग्रेसनी आपल्या लोकांचे इतके ब्रेन वॉशिन्ग करुन ठेवले आहे की लोक स्वतः ला हिन्दू म्हणून घेताना लाजतात )
इत्यलम !
19 Feb 2015 - 3:31 pm | मदनबाण
बजेट नंतर अच्छे दिन येणार आणि "विकास" होईल का ते पाहणे रोचक ठरणार आहे !
महाराष्ट्राचे मात्र बुरे दिन सुरु होणार आहेत !
उपनगरवासीयांची वीज महागणार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?
21 Feb 2015 - 7:41 am | खटासि खट
श्री.कुबेर गुजराथी यांचे ज्येष्ठ सुपूत्र
चि. विकास
आणि
श्री शब्दप्रभू मराठे यांची एकमेव सुकन्या
चि. सौ. कां. अस्मिता
यांचा विवाह १ मे रोजी, संपन्न करण्याचे ठरवले आहे. आपण या विवाहास उपस्थित राहून वधूवरास शुभार्शिवाद देण्याचे करावेत ही णम्र विनंती.
23 Feb 2015 - 10:39 am | माहितगार
तुम्ही ज्या देशात राहता तेथील संस्कृतीशी मिळून मिसळून राहण्याचे, तेथील स्थानीक संस्कृतीचा आदर करण्याचे महत्व आहे ते मी मुळीच नाकारत नाही. कष्ट करून जगणार्यांना केवळ हुलिया वरून परस्पर पाकिस्तानी ठरवणे, जराशी खटकणारी बाब आहे.
आज आफ्रिका, युरोप, आमेरीका, ऑस्ट्रेलीआ सिंगापोर मलेशीया इंडोनेशीया, फिजी, मयन्मार, अशा अनेक खंड आणि देशातून मूळचे भारतीय वंशाचे लोक पिढ्यान पिढ्या राहतात ते आता तेथील नागरीक आहेत. हिंदू परंपरा वेश्भूषा सांभाळून त्यांच्या स्वतःच्या देशावरच प्रेम करतात. त्या देशातील स्थानिक बहुसंख्यकांनी केवळ कुणी भारतीय वेषभूषा करते परंपरा पाळते म्हणून त्यांना देशद्रोही समजून वंशवादी वागणूक द्यावी हे योग्य होईल का ? अधून मधून इतर देशात भारतीय वंशाच्या नागरीकांना वंशवादाचा सामना करावा लागल्याच्या बातम्या येतात त्यांचाच कित्ता आपण भारतात गिरवणे कित्पत उचीत आहे ?अलिकडे आमेरीकेत सुरेशभाई पटेल नावाच्या माणसावर हुलीया पाहून तेथील पोलिसांनी जखमी केले हे आदर्श आहे का ? भारतात नेपाळी आणि नैऋत्य भारतातील भारतीय नागरीकांना हुलीया आणि धर्म पाहून वेगळेपणाची वागणूक देणे योग्य होईल का ?
गुन्ह्याबद्दल कायदे करा, कायदे मोडणार्यांना जरूर शासन करा. जे इमाने इतबारे कष्ट करून खातात त्यांच्या हुलीयावरून नाहक संशय हि परस्पर अनावश्यक अविश्वास निर्माणकरणारी भूमीका म्हणून धागाकर्त्याने आपली भूमीका पुन्हा एकदा तपासून पहावी असे वाटते.
23 Feb 2015 - 2:34 pm | आशु जोग
कष्ट करून जगणार्यांना केवळ हुलिया वरून परस्पर पाकिस्तानी ठरवणे, जराशी खटकणारी बाब आहे.
तुम्ही अजून कष्ट करणार्यांपर्यंतच आहात हे पाहून गम्मत वाटली. मोहम्मद बिन कासिम येऊन गेला हे माहीत नाही का तुम्हाला
24 Feb 2015 - 7:57 pm | पिंपातला उंदीर
वाद विवाद करताना कायम आक्रमक आणि जोरजोरात बोलल पाहिजे असा एक विनाकारण गैरसमज आहे . या गैरसमजाला छेद देणाऱ्या काही अपवादापैकी एक म्हणजे योगेंद्र यादव . खाली एक क्लीप देत आहे . थोडी मोठी आहे . साधारण २० मिनिटाची . ज्याना कमी वेळ असेल त्यांनी १० व्या मिनिटा पासून बघायला पण हरकत नाही . पण मी हि क्लीप सर्वांनी पहिल्यापासून बघावी अशी जोरदार शिफारस करेन . याचे मुख्य कारण म्हणजे चर्चेत सहभागी केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या argument बघितल्यावर सत्तेचा दर्प , अहंकार कसा असतो हे वारंवार जाणवत . दुसर म्हणजे केंद्रीय सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे पंजाब , राजस्थान , उत्तर प्रदेश आणि हरियाणा सारख्या राज्यातल्या हजारो शेतकर्यांना युरिया मिळत नाहीये आणि ज्याना मिळतोय तो हजारो रुपये मोजून . कुठल्याही शेतकऱ्यासाठी युरिया च महत्व काय असत हे वेगळ सांगण्याची गरज नाही . हा एक गंभीर प्रश्न आहे . पण माझ्यासारख्या आयवरि टॉवर मध्ये राहणाऱ्या माणसाला याबद्दल काही माहित नाही याची लाज वाटली . दुसर म्हणजे मोदी सरकार ने आपल्या जाहीरनाम्यात एक वचन दिल होत . पण आता मोदी सरकार ने सर्वोच्च न्यायालयात आम्ही अस काही करणारच नाही अस शपथपत्र दिल आहे . ते काय आहे ते क्लिप बघितल्यावर कळेल . या सगळ्यावर योगेंद्र यादव जे अभिनिवेश विरहित , शांत argument देतो ते बघण्यासारख आहे . विशेषतः एका बाजूला रविशंकर प्रसाद जो आक्रस्ताळा आरडा ओरडा करतो त्या पार्श्वभूमीवर तर हे मुद्द्यावर आधारीत argument अजूनच उठून दिसत . या चर्चेत अशी एक वेळ येते की रवी शंकर प्रसाद चा दर्प उतरतो आणि एक तर तो उठेल किंवा रडायला लागेल अस वाटायला लागत . बघा हि क्लिप नक्की . बाकी अच्छे दिन वैगेरे बद्दल फारस काही बोलण्यासारखे आहे असे वाटत नाही
https://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=HPyOkBNwoSk#t=543
24 Feb 2015 - 8:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की माझा कोणत्याही पक्षाला / व्यक्तीला विनाशर्त (मिपाच्या भाषेत "बेशर्त") पाठींबा नसतो / नसेल... जे खरे वाटेल आणि व्यावहारीक आहे त्याला असतो. हे गृहितक स्प्ष्ट करून तुम्ही दिलेल्या क्लिपबद्दलची खालची मते आहेत.
१. योगेंद्र यादव हे अनेक वर्षांपासून कसलेले व्यावसायीक टिव्ही प्रेझेंटर आहेत. चेहरा सरळ ठेऊन आणि आवाज ताब्यात ठेऊन दुसर्याला कसे चिडवावे या त्यांच्या व्यावसायीक शिक्षणाच्या भागात ते कसलेले तज्ञ आहेत हे त्यांनी अगोदर अनेक वर्षे वारंवार सिद्ध केलेले पाहिले आहे. याबाबतीत रविशंकर प्रसाद कमी पडले हे निर्विवाद.
पण, मी बोलण्याच्या पद्धतीपेक्षा बोलण्यातील माहितीच्या खरेपणाला जास्त महत्व देतो. कारण देशाच्या भवितव्याच्या बाबतीत डिबेट जिंकण्यापेक्षा खरेपणाने जमिनीवरचे काम करणे जास्त मदत करते.
२. जमीनीच्या किंमतीबद्दल योगेंद्र यादव यांनी वादाच्या पहिल्या भागात "कायद्यात X२ असे गुणोत्तर आहे आणि हरियाणा सरकारने कोर्टात त्याविरुद्ध X१ किंमतीचे अॅफिडेविट केले" असा स्पष्ट आरोप केला. पण नंतर "कायद्यात X१ ते X२ अशी तरतूद असून राज्य सरकारला त्यामधला नक्की आकडा ठरवायची मुभा आहे आणि हे कलम/सूट वापरून हरियाना सरकारने X१ किंमतीचे अॅफिडेविट कोर्टात केले" हे सत्य मान्य केले.
माझ्या मते ही चलाखी झाली... किंवा सोप्या मराठीत "खोटे बोलणे" झाले.
माझ्या अनुभवात सत्याने वागणारा अगदी आक्रस्ताळी माणुससुद्धा परवडला... पण शांतपणे, चेहरा मख्ख ठेऊन खोटे बोलणार्या (आणि म्हणून समोरच्या माणसाची सहजपणे दिशाभूल करु शकणार्या) माणसाइतका धोकादायक माणूस सापडणे कठीण. व्यवहारात अश्या माणसांपासून फार सावधगिरीने रहावे हे मी बोटेच नाही तर आख्खा हात पोळून घेऊन शिकलो आहे.
असो. बाकी चालू द्या.
25 Feb 2015 - 12:28 pm | शलभ
क्लिप बघितली नाही. पण तुमचे प्रतिसाद आवडले आणि पटले. :)
26 Feb 2015 - 3:31 pm | हाडक्या
सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की माझा कोणत्याही पक्षाला / व्यक्तीला विनाशर्त (मिपाच्या भाषेत "बेशर्त") पाठींबा नसतो / नसेल... जे खरे वाटेल आणि व्यावहारीक आहे त्याला असतो. हे गृहितक स्प्ष्ट करून तुम्ही दिलेल्या क्लिपबद्दलची खालची मते आहेत.
आम्ही पण हेच म्हणून सांगतो एक्का साहेब की तुम्ही जो अर्थ काढलाय तो बरोबरच आहे आणि तांत्रिकदृष्ट्या त्यास काही प्रतिवाद नाही. पण माझ्या मते, यादव इथे म्हणतायत की "निवडणूकीच्या दरम्यान X२ गुणोत्तर देणार अशी दवंडी पिटवली आणि सरकारात आल्यावर मात्र X१ चे प्रतिज्ञापत्र दिले", हा विश्वासघात झाला.
(हेच "टोलमुक्त महाराष्ट्र" बद्दलपण, पण ते इथे अवांतर )
बाकी तुम्ही चलाखी वगैरे म्हणताय ते तेवढे मान्य नाही. खूप पूर्वीपासून यादव यांना पाहिल्यास लक्षात येते की कमीत कमी जे मांडत आहेत त्याचे क्रॉस-वेरिफिकेशन करता येते. त्यांना इमेल केल्यास मुद्देसूद उत्तरे येतात की जी पडताळून पाहता येतात (या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही आपचे किंवा त्यांचे समर्थक असण्याची गरज भासत नाही, हे आवडलं). इतर लोकानुनयी विचारवंतांच्यापेक्षा यादवांची मते जास्त सुस्पष्ट असल्याने त्यांच्याबद्द्ल तसा आदर आहे.
इथे त्यांनी फक्त हरियानाचे मुद्दे मांडून "माननीय कॅबिनेट मंत्री" यांना ठाऊक नाही काय ? हे आवडले नाहीच. कारण मला खरंच उत्तरे हवी असतील तर या फोरम पेक्षा इतर मार्ग आहेतच की. इथे ते फक्त त्याच्या विवादकौशल्याचा वापर करून समोरच्यास अडचणीत आणण्यासाठी "त्यांना माहित असलेल्या" पण "वस्तुनिष्ठ" मुद्द्यांचा वापर करतायत असे वाटले. शरद पवार किंवा मोदी असल्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी हवेत खरंतर. :)
26 Feb 2015 - 7:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
मला वाटतं की या क्लिपबाबतीत मी माझा मुख्य मुद्दा परत स्पष्ट करायची गरज वाटते. तर...
या जगात असत्य सरळ सरळ फार कमी वेळा बोलले जाते. कारण ते लगेच पकडले जाते. बहुतेक वेळा अर्धसत्य बोलून आपला मतलब साधला जातो. असे करणारे लोक जास्त धोकादायक आणि अविश्वासू असतात. शिवाय चेहरा गंभीर ठेऊन अर्धसत्य हेच पूर्ण सत्य असल्याचे ठासून सांगणारे अत्यंत धोकादायक असतात, ते केव्हा कोणाचा गळा केसाने कापतील हे सांगणे अशक्य असते. ते कोणाचाही (अगदी त्यांचा समर्थक गैरसोईचा झाला तर त्याचाही) केव्हा कसा सफाईने खातमा करतील हे कळणे मोठे कठीण असते.
दुर्दैवाने अश्या चलाखीचे भारतीय लोक हुशारी / राजकारण समजून मोठे कौतूक करतात. आजवर तशीच चलाखी त्यांच्यावरच वापरून त्यांच्या कमरेचे काढून घेतले जात आहे याचे भान त्यांना नाही.
उद्धटपणा मला अजिबात आवडत नाही. तरीही, एकवेळ उर्मट पण प्रामाणिक माणूस परवडला. पण शांतपणे / प्रेमळपणे अर्धसत्य सांगणार्यापासून मी फार फार सावध राहतो."
आता त्या क्लिपबद्दल थोडे...
त्या डिबेटमध्ये रविशंकर यांच्या पदाशी तडक संबंध नसलेले, त्याबाबत खोलवर माहिती नसणार याची बर्यापैकी खात्री असणारे तीनचार मुद्दे यादव यांनी मांडले.
१. डिबेटच्या नॉर्म्सच्या दृष्टीने हे गैर आहे, हे यादवांसारख्या कसलेल्या डीबेटरला माहीत नव्हते हे शक्य नाही. असे मुद्दे मांडायचे असल्यास अगोदर तसे सर्व संबंधीतांना सांगणे आवश्यक असते. कारण मगच सर्वजण आपले पुरावे बरोबर आणून खर-खोटे सिद्ध करू शकतात. हे मत रविशंकर यांनी मांडल्याचे क्लिपमध्ये आहेच आणि त्याचे यादव यांनी खंडनही केलेले नाही (कारण ते खंडन करू शकले नसते).
२. त्या मुद्द्यांपैकी एक कसा चुकीचा आहे हे रविशंकर सांगू लागल्यावर यादवांनी तो मुद्दा मागे घेत खरी वस्तूस्थिती मान्य केली. यात यादवांनी मोठेपणा दाखविला नाही तर चोरी सापडल्यावर संभावितपणे आपली बाजू सांभाळली, हे कळले तर बरेच काही कळले. आता इतर मुद्देसुद्धा तसेच अर्धसत्ये असल्यास आश्चर्य वाटणार नाही !
वरच्या घटनेतून मी काय शिकलो ?
पूर्ण सत्य पाहिले असता चुकीचा असलेला एक मुद्दा अर्धसत्याचा (म्हणजेच खोटेपणाचा) आधार घेत केवळ टीव्ही डिबेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणण्यासाठी वापरणार्या... विशेषतः अश्या माणसाला की जो "मी प्रामाणिकपणापेक्षा जास्त प्रामाणिक आहे" अशी स्वतःची उघड जाहिरात करतो... माणसावर मी जपूनच विश्वास ठेवेन ! जो माणूस केवळ डिबेट जिंकण्यासाठी राष्ट्रीय टिव्ही चॅनलवर अर्धसत्य सांगू शकतो तर मग ऑफिसच्या दारामागे काय करू शकेल ? असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही... आणि मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना माझ्यामते विश्वासार्हता गमावतो !
असो, मला प्रत्येक गोष्टीचे (माणूस आणि त्याच्यामागचे वलय विसरून) कोण म्हणाला यापेक्षा जास्त तो "काय म्हणाला ?, का म्हणाला ? आणि कसे म्हणाला ?" यावरून मग मत बनवायची सवय आहे. कारण त्यामुळे आपण "बनण्याची" शक्यता कमी होते :)
इतरांना इतर अनेक मार्ग बरोबर वाटू शकतात हे सुद्धा मान्य आहेच.
असो. या बाबीवर इतकेच पुरे.
26 Feb 2015 - 10:15 am | आशु जोग
रविशंकर प्रसादचे बोलणे ऐकून अतुल भातखळकर काकांची आठवण झाली. तेही काही उत्तर सुचलं नाही की तुम्हाला जनतेनी नाकारलेले आहे असे वाक्य ठोकून देतात.
26 Feb 2015 - 10:22 am | पिंपातला उंदीर
*lol* *LOL*
25 Feb 2015 - 6:50 am | अत्रुप्त आत्मा
@तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही.
म्हणून अशा सर्व पत्रकारांना एक विनंती जरा तरुणांमधे मिसळा, त्यांच्या मनाचा कानोसा घ्या. म्हणजे नेमके वास्तव ध्यानात येइल.>>> =))))) आत्मभ्रामक स्वार्थप्रपिडित आशुजोगबाबा, आपणास लवकरच "अकाली दीर्घजीवी मति-मंदत्व प्राप्त होणार आहे ".... असे सांगुन मी माझे ११ शब्द संपवतो. :-D
हल्ली सर्वत्र, प्रचंड विनोदी लिहितायत ही मोदिसमर्थकं! =))
25 Feb 2015 - 4:47 pm | हाडक्या
मी पण ११ च शब्द ल्ह्यायला पायजे होते ब्वा.. वरती कळकळीने मोठ्ठे मोठ्ठे पर्तिसाद लिहले ते सगळे तशे वायाच गेले बघा. :)
25 Feb 2015 - 12:03 pm | बाळ सप्रे
लोकसत्तेतला लेख जास्त सत्याच्या जवळ आहे असे वाटते..
बाकी
अशा विधानांनी खूप करमणूक झाली..
26 Feb 2015 - 3:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
असे लेख मोदींनी वाचले तर म्हणतील...
"असे समर्थक असले तर विरोधकांची काय गरज ???!!!" *dash1* , *help* , *dirol* , +D
26 Feb 2015 - 3:17 pm | हाडक्या
+१ .. हे तर ते आधीच म्हणत असतील.. :))))
26 Feb 2015 - 5:39 pm | असंका
+१... अन तेही दिवसातून दोन वेळा!!
8 Mar 2015 - 8:32 pm | आशु जोग
टोपी घालायला इन्कार यासाठीच होता...
विपरीत परिणाम झाला असता
26 Feb 2015 - 8:19 pm | टवाळ कार्टा
http://www.misalpav.com/comment/669613#comment-669613
हा विकास शोधताय कै? ;)
27 Feb 2015 - 5:13 pm | होबासराव
28 Feb 2015 - 12:53 pm | खटासि खट
ज्यांनी मत दिले त्यांनी आपण मत कशाच्या आधारे दिले याचे फॉर्म भरून दिलेले आहेत का ?
बाकी ईकासाचं म्हणत असाल तर डान्सबार आणि गुटख्यावर बंदी घातल्यापास्नं गावागावचं इकासपुरूष लैच खवळलेलं हैत.
1 Mar 2015 - 7:32 am | खटासि खट
खटासि खट, तू बावला हो गया क्या ?
2 Mar 2015 - 2:11 pm | खटासि खट
@ वरचे दोन्ही,
कृपया शांत बसायचे काय घ्याल ? गहन विषयावर काथ्या चालू आहे.
2 Mar 2015 - 5:22 pm | विकास
आपुलाची वाद आपणासी! :)
2 Mar 2015 - 10:32 pm | आशु जोग
एका खटासि दुसरा खट संवादतो त्याला म्हणतात खटासि खट
1 Mar 2015 - 2:28 am | निनाद मुक्काम प...
प्रस्थापितांच्या विरुद्ध रोष व त्यास पर्याय म्हणून उभरते नवे प्रभारी नेतृत्वास जनता एक डाव संधी देते
लोकसभेत मोदी विधानसभेत दिल्लीत आप ला जनतेने संधी दिली.
मोदींच्या विजयात त्यांचे स्टार प्रचारक राहुल गांधींचा महत्वाचा हात आहे.
मोदी व संघाच्या विचारसरणीचा मनापासून तिरस्कार करणारे सुद्धा राहुल चे भाषण विचार आचार पाहून मोदींच्या पक्षाला
जनतेने मत दिले .लालू माया मुलायम ह्यांना जनता विटली आहे मात्र विधानसभेत जातीचे व स्थानिक मुद्यांचे राजकारण ह्या लोकांना फायद्याचे ठरते
.
1 Mar 2015 - 11:18 pm | आशु जोग
प्रभारी नेतृत्वास
का प्रभावी !1 Mar 2015 - 11:50 pm | खटासि खट
अहो, तुम्हाला काहीच माहीती दिसत नाही. एका नमोरुग्णाने सांगितलं की केजरीवाल यांना नमोंनीच मदत केलीय दिल्लीत. नमोंचं कसं असतं की जो नडला त्याला ते विसरत नाहीत. केजरी पण नडले. मग नमो गाझी शहांना म्हणाले, इसे मेजॉरिटी से चुनके लायेंगे तो इसे पाच साल की सजा होगी । ४९ दिन तो कैसे भी निकालेगा, उसके बाद ये भागना चाहेगा, लेकीन मेजॉरीटी के कारण भाग नही सकेगा । फिर हरेक दिन उसे मेण्टल टॉर्चर होगा । इसे हम पांच साल के लिए यही सजा देंगे ।
2 Mar 2015 - 12:24 am | आशु जोग
ते बाकीचं शेपूट नका वाढवू लोक हो
लोकसभेच्या निवडणूकीला मतदारांचा काय मूड होता तेवढेच मी मांडत होतो. बाकीच्या चर्चांचे आय पी एल मी सवडीने आणिनच :)