अमिताभ व कबुलीजबाब

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
24 Dec 2014 - 12:00 am
गाभा: 

नुकतेच जुने जाणते सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात असे कबूल केले की सन २००० मध्ये त्याना टीबी रोग झाला होता ,परंतु उपचार घेवून त्यानंतर ते पूर्ण बरे झाले .तरी टीबी च्या पेशंट नी /परिवाराने हताश न होता पेशंटवर पूर्ण उपचार करून घ्यावेत . हे वाचल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले . \

अमिताभ यांनी ही गोष्ट इतके दिवस लपवून का ठेवली ? याआधी मला आठवते त्यानुसार २००० सालच्या दरम्याने त्यांची तब्येत बिघडून हॉस्पिटल मध्ये admit झाले होते व त्यानंतर काही काल सिनेमा/ टीव्ही पासून दूर होते .(त्याच वेळी कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम अमिताभ ऐवजी शाहरुख खानने सादर केला होता ) त्यावेळी आजाराचे कारण पोटदुखी अथवा तत्सम काहीतरी सांगितले गेले होते . याचाच अर्थ टीबी रोगाबद्दल एकूण समाजात असलेले भय अथवा तत्सम भावना आणि टीबी पेशंट ना मिळणारी वागणूक (संसर्गजन्य असल्याने ) यामुळे कुठेतरी " आपल्याला टीबी आहे". हे सांगणे किंवा जाहीर करणे कमीपणाचे वाटले असावे का ? कारण तसे जाहीर झाले असते तर त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला असता का ?किंवा त्यानंतरच्या काळात त्यांच्याबरोबर काम करणार्या इतर अभिनेते/अभिनेत्री यांचा approach बदलला असता का ? किंबहुना एकूणच "अमिताभ" या नावाभोवती असलेले लोकप्रियतेचे वलय कमी होईल या भीतीने इतके वर्षे ही बाब लपवून ठेवली होती का?

आपणास काय वाटते ?

प्रतिक्रिया

यश राज's picture

24 Dec 2014 - 1:10 am | यश राज

(त्याच वेळी कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम अमिताभ ऐवजी शाहरुख खानने सादर केला होता )

कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम २००० सालीच सुरू झाला होता व अमिताभच त्याचा सुत्रसंचालक होता.
शाहरुखने २००७ साली कौन बनेगा करोडपतीचे सुत्रसंचालन केले.

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 9:21 am | टवाळ कार्टा

माहिती बरोबर आहे..पण अमिताभ, शारुक आणि यश राज अशी नावे पाहून अंमळ मौज वाटली :)

साती's picture

24 Dec 2014 - 9:37 am | साती

कुणाला टिबी झालाय की नाही याने काय फरक पडतो?
सेलिब्रिटीजने आपल्याला गॅसेस जरी झाले तरी ट्विट करून जगभर सांगायची पद्धत २०००साली भारतात नव्हती.
(आता अमिताभही वारंवार ट्रीट करतो म्हणा)
टीबी काही प्रत्येकवेळी संसर्गजन्य नसतो. आणि आपण म्हणता त्याप्रमाणे जर त्यांना २००० साली पोटदुखी झाली असेल तर कदाचित पोटाचा असंसर्गजन्य टिबी (ईलिओसिकल कॉक्सही) झालेला असू शकतो.
तो गावभर सांगायची गरज आहे का? सांगितले तरी रूग्णाची मर्जी नाही सांगितले तरी रूग्णाची मर्जी.
उद्या एखाद्याला लूज्मोशनसाठी अ‍ॅडमिट केले तर ई कोली होता की क्लेब्जिएला याचा त्याच्या फॅन्सना काय फरक पडावा?
उगाच आपलं असे धागे काढून टिबी म्हणजे काही फार मोठा लज्जास्पद आजार असावा असा (आपलाच) गैरसमज लोकांपुढे मांडताय.

पैसा's picture

24 Dec 2014 - 10:27 am | पैसा

सांगितले आणि नाही सांगितले काय फरक पडतो? त्याने काही रस्त्यावर भरधाव गाडीखाली गवत कापल्यासारखी माणसे मारली नाहीत की शिकारीच्या नावावर गरीब बिचारी हरणे मारली नाहीत.

टीबी हा काही आता असाध्य आजार राहिला नाही. आणि सतत कृत्रिम प्रकाशात राहिल्याने (नैसर्गिक वातावरणात रहायची संधी न मिळाल्याने) बर्‍याच अगदी उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना होऊ शकतो असेही वाचले होते. ही काही विशेष मोठी गोष्ट नव्हे.

एस's picture

24 Dec 2014 - 11:28 am | एस

वरील दोन्ही प्रतिसादांना +१.

अमिताभजी ने ही गोष्ट लपविल्या मुळे मिपाचे अन मिपाकराचे काही नुकसान झाले आहे का ;) अन होणार कसे २००० साली मिपा नव्हतच मुळी :p उगा काहीतरीच्च !
( मार्तोय बाबा आता )

मराठी_माणूस's picture

24 Dec 2014 - 11:19 am | मराठी_माणूस

महानगरपालीकेच्या टीबी संबंधातल्या एका मोहीमे साठीच्या कार्यक्रमात त्यांनी हे सांगीतले.जे अर्थातच समयोचीत होते आणि हे उघडपणे सांगणे निश्चितच कौतुकास्पद आहे.
पुर्वी का नाही सांगीतले ह्या प्रश्नाला काहीच अर्थ नाही.

उमेश येवले's picture

24 Dec 2014 - 11:42 am | उमेश येवले

महानगरपालीकेच्या टीबी संबंधातल्या एका मोहीमे साठीच्या कार्यक्रमात उघडपणे सांगणे निश्चितच कौतुकास्पद आहे.
पुर्वी का नाही सांगीतले ह्या प्रश्नाला खरच काहीच अर्थ नाहि. त्याना सांगून असे सुचवायचे आहे कि टि.बी गरीब श्रीमंत किवा चांगले राहणीमान असा भेद ठेवत नाही तर तो कोणालाही होवू शकतो त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Dec 2014 - 11:56 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मिडियाने खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी ह्यांची मागणी-
१) शहारूखला हगवण केव्हा लागली होती?
२)सलमानला कांजिण्या केव्हा आल्या होत्या? त्यावर त्याने काय उपचार केले?
३)अक्षय कुमारला भस्म्या रोग लागला होता का?

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2014 - 9:06 pm | श्रीगुरुजी

माई,

तुमच्या 'ह्यांना' आताच्या पिढीतले शाहरूख, सलमान, अक्षयकुमार वगैरे नट माहिती आहेत हे वाचून धक्का बसला. सैगल, दामुअण्णा मालवणकर, भारतभूषण, ललिता पवार, बालगंधर्व इ. जुन्या नटनट्यांच्या आठवणींनी तुमचे 'हे' नॉस्टॅल्जिक होतात हे आम्हाला माहिती आहे. पण या पिढीतले नट त्यांना माहिती आहेत हे धक्कादायक आहे. त्यांच्या रसिकतेला सलाम! :YAHOO:

प्रतिसाद गमतीशीर असला तरी....
>>> आताच्या पिढीतले शाहरूख, सलमान, अक्षयकुमार वगैरे नट
आताच्या पिढीतले ह्या शब्दांवर आक्षेप. २० २५ वर्षं झाली त्यांची! एक पिढी तरी?
त्या अर्थे थोरले बच्चन आजही नायक म्हणून काम करतात. आजच्या पिढीतला नायक म्हणायचं का त्यांना?

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2014 - 9:14 pm | श्रीगुरुजी

>>> आताच्या पिढीतले ह्या शब्दांवर आक्षेप. २० २५ वर्षं झाली त्यांची! एक पिढी तरी?

अजूनही ही मंडळी २४-२५ वर्षांच्या नायिकेसमोर मुख्य नायकाचे काम करतात. म्हणजे ते आजच्या पिढीतलेच झाले ना?

hitesh's picture

24 Dec 2014 - 3:40 pm | hitesh

टी बी हा रोग टी बी च्या जिवाणुंपासुन होतो.

टी बी चा मुख्य प्रादुर्भाव फुफ्फुसाना होतो. फुफ्फुसात हे टीबीचे जंतू टी बी चा फोकस तयार करतात. त्यावेळी दीर्घकालीन खोकला, भूक मंदावणे , खोकल्यातुन बडखा , क्वचित रक्तमिश्रित बडखा , संध्याकाळचा बारीक ताप , वजन घटणे अशी लक्षणे आढळतात. क्वचितप्रसंगी छातीत पाणी होते. प्लुरल इफ्युजन.

फुफ्फुसाला बाधा झालेले रुग्ण हे महत्वाचे असतात. कारण खोकला , थुंकी , शिंकणे याद्वारे ते जंतुंच्या प्रसाराला कारणी भूत होतात.

पण एकदा टी बी चे जंतु शरीरात गेले की ते इतर अवयवांकडे जाऊ शकतात .. जसे की हृदयाचे आवरण , डोळा , मेंदु , स्वरयंत्र , आतडी , लसिका ग्रंथी , मणके , इतर हाडे , जननेण्द्रिये ... ( म्हणजे संपूर्ण शरीरच की ! )

इतर अवयवाना टी बी झाला की त्याचे निदान कठीण असते. कारण फुफ्फुसाचा टी बी ची लक्षणे , निदान व उपचार त्यामानाने सोपे असतात. फुफ्फुसाच्या टी बी साठी छातीचा फोटो व बडका तपासणी करावी लागते. याशिवाय रक्ताच्या तपासण्या इ एस आर , स्किन टेस्ट वगैरे वापरतात.

इतर अवयवांसाठी एक्स रे , सोनोग्राफी , सी टी स्कॅन उपयोगी पडतात . गळ्याजवळच्या टीबीच्या गाठींचा तुकडा तपासुन त्यात जंतुंचे दर्शनघडु शकते.

बडखा , गाठीचा तुकडा हे सँपल वापरुन कल्चर व सेन्सिटिविटी टेस्टही करता येतात. पण हे रिपोर्ट यायला काही आठवडे लागतात. त्यामुळे सुरुवातीच्यi उपचारात यांचे महत्व शून्यच असते. या रिपोर्टवरुन नंतर उपचारात बदल होउ शकतस्त.

....................

अ‍ॅच आय व्ही , मधुमेह , कुपोषण यात टीबीची शक्यता वाढते. प्रत्येक टीबीचा रुग्ण एच आय व्ही साठी व प्रत्येक एच आय व्ही रुग्ण टीबीसाठी तपासावाच लागतो.

.......

टीबीवर खाजगी व सरकारी दोन्ही ठिकाणी उपचार आहेत. खाजगी गोळ्या रोज खाव्या लागतात.

सरकारी कोर्स डॉट्स या नावाने सर्वत्र मिळतो. त्यात एक आड एक दिवस गोळ्या असतात.

दोन्ही उपचार तितकेच गुणकारी आहेत. पण कोणताही कोर्स पूर्णपणे घ्यावा. अर्धा हा अर्धा तो , असे करु नये.

कालावधी ... ६ म ते २ वर्षे.

योग्य उपचारानी टी बी पूर्णपणे बरा होतो.
...............

औषधे अर्धवट घेतल्यास टीबीचा जंतू मुर्दाड होतो व उपचाराना दाद देत नाही. त्याला मल्टी ड्रग रसिस्टन्स = एम डी आर टीबी असे म्हणतात. त्यावर रिजर्वला ठेवलेली विशेष औषधे वापरावी लागतात. अशाआ टीबीच्य निदानाला थुंकीचे सँपल घेऊन जीन एक्सपर्ट टेस्ट करतात. काही सरकारी दवाखानात ही टेस्ट फुकट होते. खाजगीत केली तर तीन हजार खर्च आहे.
खाजगीत यांची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. शिवडीच्या सरकारी टीबी रुग्णालयात ही औषधे मिळतात.

............

आता वळुया टीबी आणि बच्चन !

टी बी हा प्रामुख्याने गरिबी , घनदाट लोकवस्ती , घरात खेळती हवा नसणे यामुळे होणारा आजार आहे.

पण टीबीचे जंतू सर्वत्र असतात. त्यामुळे टीबी कुणालाही होऊ शकतो.. आणि कुणावाटेही पसरु शकतो. सतत ए सी गाडी वापरणार्‍या अती श्रीमंत माणसाला टीबी होऊ शकतो. गाडीच्या काचा तर बंद होत्या ! जंतू गेला कुठुन ? ड्रायव्हरच्या फुफ्फुसात टीबीचे जंतू होते !

त्यामुळे माधवराव पेशवे , गोपाळ गणेश आगरकर , कविवर्य भा रा तांबे , सायन हॉस्पिटलचे डॉक्टर , बच्चन ... कुणालाही टीबी होऊ शकतो.

भारताच्या पहिल्या महिला डॉ. आनंदी गोपाळ जोशी यांचाही बळी टीबी ने घेतला. परदेशात जाऊन त्याना शिक्षण घेअत असताना त्याना टीबी झाला. त्या भारतात परतल्या ते गंभीर टीबी घेऊनच आणि एकही रुग्ण न पहाताच त्या कालवश झाल्या.

त्यामुळे टीबी च्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळणे व इतरानी खबरदारी घेणे दोन्ही महत्वाचे आहे. टीबीच्या सान्निध्यात वावरणार्‍या लोकानी व टीबीच्या रुग्णानीही मास्क वापरावा. सकस आहार घ्यावा.

आमच्या एच आय व्ही रुग्णात टीबीचा आढळ सुमारे वीस टक्के आहे. त्यामुळे मास्क कंपल्सरीच आहे. रुग्णानाही व स्टाफलाही

hitesh's picture

24 Dec 2014 - 3:51 pm | hitesh

tb