जम्मू-काश्मीर व झारखन्ड निवडणू़क निकाल

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
23 Dec 2014 - 12:44 am
गाभा: 

जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़ नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कलम ३७० , दहशतवादी फुटीर कारवाया , तसेच अन्य अनेक समस्यानी जखडलेल्या काश्मिर मध्ये हिन्दुबहुल भाजप ला निर्णायक जागा मिळाल्यास त्याचा काश्मिर प्रश्न कायमचा निकालात काढण्याच्या दॄष्टीने घडामोडी होतील ,असा अन्दाज आहे.

या निवडणूक निकालासंबन्धी चर्चा करण्यासाठी हा धागा ..

प्रतिक्रिया

कंजूस's picture

23 Dec 2014 - 4:14 am | कंजूस

१)विजय पचू देतील का ?२)त्रांगडं झाल्यास काय करणार हाच मोठा प्रश्न आहे.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 8:59 am | क्लिंटन

सकाळी ८.५८ वाजता

जम्मू काश्मीर
एकूण कल: २६
भाजप: ८ (+३)
कॉंग्रेस: ६ (०)
नॅशनल कॉन्फरन्स: ६ (-३)
पीडीपी: ५ (-१)
इतर: १

झारखंड
एकूण कल: २३
भाजप: १२ (+५)
झामुमो: ४ (०)
कॉंग्रेस: २ (-२)
झाविमो: ३ (-१)
इतर: २

भाजप उमेदवार हिना भट काश्मीर खोऱ्यातील अमीरकदल मतदारसंघातून आघाडीवर.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 9:03 am | क्लिंटन

सकाळी ९.०३ वाजता

जम्मू काश्मीर
एकूण कल: २७
भाजप: ९
नॅशनल कॉन्फरन्स: ६
कॉंग्रेस: ५
पीडीपी: ५
इतर: १

झारखंड
एकूण कल: ३०
भाजप: १७
झामुमो: ६
झाविमो: ३
कॉंग्रेस: २
इतर: २

भाजप उमेदवार हिना भट काश्मीर खोऱ्यातील अमीरकदल मतदारसंघातून आघाडीवर.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 9:09 am | क्लिंटन

सकाळी ९.०९ वाजता

जम्मू काश्मीर
एकूण कल: ३०
भाजप: १०
पीडीपी: ८
नॅशनल कॉन्फरन्स: ६
कॉंग्रेस: ५
इतर: १

झारखंड
एकूण कल: ३४
भाजप: १९
झामुमो: ८
झाविमो: ३
कॉंग्रेस: २
इतर: २

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 9:14 am | क्लिंटन

झारखंडमध्ये भाजपने आता ४१ पैकी २३ ठिकाणी आघाडी घेतली आहे. झारखंडमध्ये भाजपला बहुमत मिळणार असे दिसते. झारखंड मुक्त्ती मोर्चा आणि काँग्रेसमधील युती तुटल्याचा फायदा भाजपला होणार होता हे नक्कीच. जसे अधिकाधिक निकाल येऊ लागतात त्याप्रमाणे आघाडीवरच्या पक्षाला अजून जास्त फायदा होताना दिसतो असे अनेकवेळा बघायला मिळाले आहे. त्यानुसार ८१ पैकी ४७-४९ जागा पक्षाला मिळायला हव्यात.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 9:17 am | क्लिंटन

सकाळी ९.१७ वाजता

जम्मू काश्मीर
एकूण कल: ४१
भाजप: १५
पीडीपी: १०
नॅशनल कॉन्फरन्स: ६
कॉंग्रेस: ६
इतर: ४

झारखंड
एकूण कल: ४६
भाजप: २५
झामुमो: १०
झाविमो: ५
कॉंग्रेस: ४
इतर: २

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 9:22 am | क्लिंटन

एन.डी.टी.व्ही वरील नकाशा बघता भाजपला ज्या १७ जागी आघाडी आहे त्यापैकी १५ जागा जम्मू भागात, १ जागा लडाखमध्ये तर १ जागा काश्मीर खोर्‍यात (श्रीनगर शहरातील अमीरकदाल) आहे. अपेक्षेप्रमाणे जम्मूमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. तर खोर्‍यामध्ये मात्र पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यात टक्कर आहे. जर भाजपने जम्मू भागात स्वीप केले आणि खोर्‍यात इतर तीन पक्षांमध्ये लढत राहिली तर जम्मू-काश्मीर विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल अशी चिन्हे आहेत-- साधारण २६ ते २८ जागा जिंकून.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 9:27 am | क्लिंटन

सकाळी ९.१७ वाजता

जम्मू काश्मीर
एकूण कल: ५३
भाजप: २१
पीडीपी: १४
नॅशनल कॉन्फरन्स: ८
कॉंग्रेस: ६
इतर: ४

झारखंड
एकूण कल: ५५
भाजप: २८
झामुमो: १४
झाविमो: ५
कॉंग्रेस: ५
इतर: ३

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 10:03 am | क्लिंटन

सकाळी ९.१७ वाजता

जम्मू काश्मीर
एकूण कल: ८४
भाजप: २३
पीडीपी: २३
नॅशनल कॉन्फरन्स: १७
कॉंग्रेस: १४
इतर: ५

झारखंड
एकूण कल: ८०
भाजप: ३९
झामुमो: २०
झाविमो: ८
कॉंग्रेस: ६
इतर: ७

सव्यसाची's picture

23 Dec 2014 - 10:06 am | सव्यसाची

सकाळी १०.१० वाजता :
जम्मू काश्मीर ८४/८७:
भाजप : २३
पीडी पी:२३
एनसी : १७
कॉंग्रेस : १४
इतर : ७

झारखंड : ८०/८१
भाजप : ३८
झामुमो : २१
जेविएम : ८
कॉंग्रेस : ६
इतर : ७

अनुप ढेरे's picture

23 Dec 2014 - 10:06 am | अनुप ढेरे

झारखंडमध्ये भाजपा सरकार स्वबळावर येणार असं दिसतय. काश्मिरमध्ये पीडीपी+ कॉन्ग्रेस अस येण्याची चिन्ह.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 10:14 am | क्लिंटन

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे असे दिसते. तर पीडीपीने अपेक्षेपेक्षा थोडी वाईट कामगिरी केली आहे. हे लिहित असताना पीडीपी २४ तर भाजप २३ जागांवर आहे. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र येणे कठिण आहे. काँग्रेस पीडीपी किंवा नॅशनल कॉन्फरन्सबरोबर गेला तरी आकडे ४४ पर्यंत जात नाहीत. इतरांना ७ जागांवर आघाडी आहे.त्यापैकी सज्जद लोन सारखे लोक भाजपबरोबर येऊ शकतील.पॅन्थर पार्टीला किती जागा आहेत हे बघायला हवे. सध्यातरी असे चित्र आहे की भाजप+पीडीपी किंवा भाजप+नॅशनल कॉन्फरन्स असे सरकार येईल. भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स पूर्वी एकत्र होते आणि पीडीपीबरोबर जाणे भाजपला महाग पडू शकेल.तेव्हा असे दिसते की भाजप+नॅशनल कॉन्फरन्स असे सरकार येईल. बघू काय होते ते.

हे लिहित असताना झारखंडमध्ये ८० पैकी ३८ ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. इतरांना ७ जागा आहेत. तेव्हा राज्यात भाजपचे सरकार येणार हे नक्की दिसते. झारखंडमध्ये ही तिसरी निवडणुक आहे. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. २००५ मध्ये भाजपला २९ जागा ही आतापर्यंतची कोणत्याही पक्षाची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यापेक्षा भाजपला जास्त जागा मिळत आहेत तरीही लोकसभा निवडणुकांमधला स्वीप लक्षात घेता सहा महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळण्यास अपयश येणे हे भाजपसाठी चांगले चिन्ह नक्कीच नाही. बाबूलाल मरांडींना पक्षात परत आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर यापुढे झारखंडमध्ये अस्थिरता कायमच राहिल असे दिसते.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 10:19 am | क्लिंटन

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी पीडीपी-नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात असे काँग्रेसने म्हटले आहे असे एन.डी.टी.व्ही वर आले आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवायला इतर सगळ्यांनी एकत्र येणे हा प्रकार जम्मू-काश्मीर या राज्यातही होईल असे पूर्वी कोणाला वाटलेही नसेल :)

हे टाईप करताना भाजप आणि पीडीपी दोन्ही २३ तर झारखंडमध्ये भाजप ४०.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 10:27 am | क्लिंटन

सकाळी १०.२६ वाजता

जम्मू काश्मीर
एकूण कल: ८७
भाजप: २४
पीडीपी: २३
नॅशनल कॉन्फरन्स: १७
कॉंग्रेस: १५
इतर: ८

झारखंड
एकूण कल: ८१
भाजप: ४३
झामुमो: १९
झाविमो: ९
कॉंग्रेस: ५
इतर: ५

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 10:43 am | क्लिंटन

काँग्रेसचे प्रवक्ते पवन वर्मा म्हणतात-- बघा भाजपने मिशन ४४+ असे लक्ष्य जम्मू-काश्मीरात ठेवले होते.आता त्यांना त्याच्या अर्ध्याच जागा मिळताना दिसत आहेत.म्हणजे बघा नरेंद्र मोदींचा प्रभाव नाहीच मुळी :) म्हणजे भाजपने आमचे मिशन आमचे डिपॉझिट वाचविणे आहे असे म्हणत निवडणुकांना सामोरे जायला हवे होते की काय?

हे लिहित असताना: भाजप आणि पीडीपी दोन्ही २३, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स दोन्ही १७, इतरः ७

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 10:50 am | क्लिंटन

अजूनही नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला १७ अधिक १६ बरोबर ३३ जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे ओमर अब्दुल्लांचे सरकार लोकप्रिय नसूनही आणि नुकत्याच झालेल्या पुरात मोठे नुकसान होऊनही जर हे दोन पक्ष एकत्र लढले असते तर ही युती बहुमताच्या बरीच जवळ गेली असती. तीच गोष्ट झारखंडमध्ये. झामुमो आणि काँग्रेस या दोन पक्षांना आता २०+७=२७ जागा मिळताना दिसत आहेत. हे दोन पक्ष एकत्र लढले असते तर अजून काही जागांचा फायदा झाला असता. काँग्रेसचा अभूतपूर्व असा मोठा पराभव लोकसभा निवडणुकांमध्ये झाल्यावर आणि गेल्या सहा महिन्यात पक्ष कमबॅक करत आहे असे चित्र दिसत नाही. तरीही या दोन्ही राज्यांमध्ये युती तोडून स्वबळावर लढायचा निर्णय पक्षाला महाग पडला असे दिसत आहे.

अनुप ढेरे's picture

23 Dec 2014 - 11:01 am | अनुप ढेरे

स्वबळावर लढायचा निर्णय

भाजपाचे स्वबळावर लढून मिळालेले यश पाहून हा निर्णय घेतलेला असू शकतो. याने आमचा पक्ष कुठल्या प्रादेशिक पक्षासमोर लोळणार नाही असा ताकदीचा संदेश जात असावा.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 11:01 am | क्लिंटन

सकाळी ११.०० वाजता

जम्मू काश्मीर
एकूण कल: ८७
भाजप: २४
पीडीपी: २४
नॅशनल कॉन्फरन्स: १७
कॉंग्रेस: १६
इतर: ६

झारखंड
एकूण कल: ८१
भाजप: ४०
झामुमो: २१
कॉंग्रेस: ८
झाविमो: ७
इतर: ५

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 11:23 am | क्लिंटन

गेल्या १५ मिनिटात परिस्थिती आणखी बदलली आहे. झारखंडमध्ये भाजप ३७ जागांवर आघाडीवर आहे. राज्यात भाजप बहुमतापेक्षा ३-४ जागा कमी पडत असतील तर ते पक्षासाठी नक्कीच काळजी करण्यासारखे आहे. खरे सांगायचे तर भाजपला सुशासन आणि स्थैर्य या मुद्द्यावर कुठचे राज्य जिंकणे सर्वात सोपे होते तर ते म्हणजे झारखंड. तरीही स्वबळावर बहुमत मिळवता येत नसेल तर मात्र नक्कीच चिंतेची गोष्ट आहे.

काश्मीरात आता पीडीपीला २७ तर भाजपला २३ जागा मिळाल्या आहेत.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 11:29 am | क्लिंटन

सकाळी ११.०१ वाजता

जम्मू काश्मीर
एकूण कल: ८७
पीडीपी: २९
भाजप: २५
कॉंग्रेस: १५
नॅशनल कॉन्फरन्स: १२
इतर: ६

झारखंड
एकूण कल: ८१
भाजप: ३८
झामुमो: २२
कॉंग्रेस: ८
झाविमो: ८
इतर: ५

जम्मू-काश्मीरमध्ये २००२ ची पुनरावृत्ती व्हायची शक्यता दिसत आहे. सध्या पीडीपीला ३० तर काँग्रेसला १४ ठिकाणी आघाडी आहे.म्हणजे हे दोन पक्ष एकत्र आले तर बहुमत होईल.परत एकदा मुफ्ती महंमद सईद मुख्यमंत्री होतील ही शक्यता सर्वात जास्त. २००२ मध्ये काँग्रेसला २० तर पीडीपीला १६ जागा होत्या.तेव्हा पहिली ३ वर्षे मुफ्ती महंमद सईद तर नंतरची ३ वर्षे गुलाम नबी आझाद मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरला होता. यावेळी पीडीपीला बर्‍याच जास्त जागा आहेत. तेव्हा पीडीपी काँग्रेसला अर्धा काळ मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होईल असे वाटत नाही.

माहितगार's picture

23 Dec 2014 - 12:20 pm | माहितगार

जम्मू काश्मिरमध्ये या वेळी मतदानाची टक्केवारी बरी होती म्हणतात. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती टक्के मते मिळतात हे बघणे रोचक असू शकेल. या क्षणाला भाजपा सर्वाधिक म्हणजे २४.३ % मते घेऊन टक्केवारीत पुढे आहे. पिडीपी २२.१ टक्के घेउन दुसर्‍या क्रमांकावर , नॅशनल कॉन्फरन्स २०.५% काँग्रेस १७.९ टक्के उर्वरीत टक्केवारी इतर छोट्या पक्षांमध्ये. अजुन मत मोजणी चालू असली तरी ट्रेंडचा अंदाजा येण्यास पुरेसे असावे. (संदर्भ)

ढोबळ मानाने पहावयाचे झाल्यास या चारी पक्षांचे मिळून ८५ % होतात १५% मते उर्वरीत छोट्या पक्षांकडे म्हणजे बर्‍यापैकी आहेत असे दिसते.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 12:38 pm | क्लिंटन

दुपारी १२.३८ वाजता

जम्मू काश्मीर
एकूण कल: ८७
पीडीपी: २९
भाजप: २५
कॉंग्रेस: १५
नॅशनल कॉन्फरन्स: १२
इतर: ६

झारखंड
एकूण कल: ८१
भाजप: ३९
झामुमो: २०
कॉंग्रेस: ७
झाविमो: ७
इतर: ८

चुकूनमाकून भाजपाचे सरकार आलेच जम्मू-काश्मिरात तर लय मजा येईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Dec 2014 - 12:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

धुमशान होईल =))

बॅटमॅन's picture

23 Dec 2014 - 12:57 pm | बॅटमॅन

लैच =))

टवाळ कार्टा's picture

23 Dec 2014 - 1:25 pm | टवाळ कार्टा

घंटा काय होत नाय...अवघड जागेचे दुखणे झाले आहे काश्मिर

मजा येईल म्हणजे पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल असा दावा नाहीये, तर विचारजंतांची अवस्था बघायला मजा येईल असा अंमळ स्वार्थी इ. विच्यार आहे.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 1:55 pm | क्लिंटन

चुकूनमाकून भाजपाचे सरकार आलेच जम्मू-काश्मिरात तर लय मजा येईल.

सध्या तरी तसे होताना दिसत नाही. भाजपला २६ तर पीडीपीला ३० जागांवर आघाडी आहे.जर हे आकडे उलटे असतील तर भाजपचा मुख्यमंत्री व्हायची जरा तरी शक्यता असेल अन्यथा नाही. त्यासाठी जम्मूमधून आणखी ३-४ जागा जिंकायला हव्यात.

मलाही जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा हिंदू नेता मुख्यमंत्री व्हावा असे फार वाटते.मग कळेल कोण खरे सेक्युलर आहे ते. तसेही २००८ मध्ये अमरनाथ बोर्डाला श्रीनगरमध्ये जागा देण्यावरून जे घमासान झाले त्यावरून ही स्वयंघोषित सेक्युलर मंडळी किती हलकट आहेत ते समजले होतेच.

बॅटमॅन's picture

23 Dec 2014 - 1:59 pm | बॅटमॅन

खरंय.

ओमार अब्दुल्ला ने भाजपला ऑफर दिली आहे म्हणे...फक्त ३७० चा आग्रह सोडण्याची अट ठेवलीय.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Dec 2014 - 3:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी मुख्यमंत्री नाही झाला तरी दबावगट तर तयार करता येईल की.

श्रीगुरुजी's picture

23 Dec 2014 - 12:51 pm | श्रीगुरुजी

४ वाजेपर्यंत थांबा. झारखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसेल.

आताची परिस्थिती: भाजप - ४०, झामुमो - १८, झाविमो - ७, काँग्रेस - ७, इतर - ९

जम्मू-काश्मिरमध्ये (१) पीडीपी + काँग्रेस किंवा (२) पीडीपी + भाजप अशा दोनच शक्यता आहेत. नॅकॉ कोणत्याही परिस्थितीत सत्तेत नसेल.

आताची परिस्थिती: भाजप - २५, पीडीपी - ३२, नॅकॉ - १२, काँग्रेस - १२, इतर - ६

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 12:53 pm | क्लिंटन

झारखंडमध्ये आता भाजप ४१ जागांवर आघाडीवर आहे. भाजपच्या आघाडीचा आकडा ३६ ते ४२ मध्ये वरखाली होत आहे. मागच्या वर्षी छत्तिसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जबरदस्त चुरस चालू होती त्याची आठवण होत आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Dec 2014 - 12:55 pm | श्रीगुरुजी

ओमर अब्दुल्ला सोनवारमधून पडला. बिरवामधूनही तो उभा होता. तिथली अजून बातमी नाही.

झारखंडमध्येही मधू कोडा पडला.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 1:13 pm | क्लिंटन

आताच राजदीप सरदेसाईने हेडलाईन्स टुडेवर जाहीर केले की ओमर अब्दुल्लाचा बिरवामधूनही पराभव झाला आहे. २००२ मध्ये त्याचा गंदरबाल या अब्दुल्ला कुटुंबियांच्या तथाकथित बालेकिल्ल्यातूनही पराभव झाला होता.

श्रीगुरुजी's picture

23 Dec 2014 - 1:15 pm | श्रीगुरुजी

हुर्रे!

या अब्दुल्ला कुटुंबियांनीच जम्मू-काश्मिरचे वाटोळे केले आहे. दोन्हीकडून पराभव ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. झारखंडमध्ये मात्र मधू कोडा सोडला तर फारसे खळबळजनक निकाल नाहीत.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 2:05 pm | क्लिंटन

हेडलाईन्स टुडेवर एक तासापूर्वी ओमर अब्दुल्लाचा बिरवाहमध्ये पराभव झाला असे जाहिर केले होते.पण आताच एन.डी.टी.व्ही वर ओमर अब्दुल्ला इतका वेळ बिरवाहमध्ये मागे होता पण आता १०० मतांनी आघाडीवर आहे असे जाहिर केले. निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावही ओमर १०८ मतांनी आघाडीवर आहे असे दिले आहे.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 2:08 pm | क्लिंटन

आताच ओमर अब्दुल्लाचा बिरवामधून विजय झाला आहे असे एन.डी.टी.व्ही वर जाहिर केले आहे.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 1:07 pm | क्लिंटन

जम्मू लोकसभा मतदारसंघात २० विधानसभा जागा आहेत. २००८ मध्ये त्यापैकी ८ मतदारसंघांमध्ये भाजपने, ५ मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसने, ४ मतदारसंघांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने, २ मतदारसंघांमध्ये पीडीपीने तर एका मतदारसंघात बसपाने विजय मिळविला होता. सध्या उपलब्ध असलेल्या कलांनुसार १३ जागांवर भाजप, ३ जागांवर नॅशनल कॉन्फरन्स, ३ जागांवर पीडीपी तर एका जागेवर आघाडीवर आहे. भाजपने जम्मू शहरामधील सर्व मतदारसंघांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. काही मतदारसंघांमध्ये (उदाहरणार्थ कालाकोट आणि अखनूर) भाजपने आश्चर्यकारक आघाडी मिळवली आहे.या दोन मतदारसंघांमध्ये भाजपला २००८ मध्ये बरीच कमी मते मिळवली होती. तरीही जम्मूमध्ये २० पैकी १३ हा आकडा अजून तरी कमी वाटत आहे. किमान १६ ते १७ जागा भाजप जम्मू लोकसभा मतदारसंघातून जिंकेल असे वाटले होते. नागरोटा या मागच्या वेळी जिंकलेल्या जागेवर भाजप पिछाडीवर आहे. तरीही ठिक आहे. २० पैकी १३ हा आकडा तितकाही वाईट नाही.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला बिरवाह मतदार संघातूनही पराभूत (टीव्ही रिपोर्ट)

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 1:18 pm | क्लिंटन

उधमपूर लोकसभा मतदारसंघात १७ विधानसभा जागा आहेत. २००८ मध्ये त्यापैकी ५ मतदारसंघांमध्ये भाजपने, ८ मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसने, १ मतदारसंघांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने, २ मतदारसंघांमध्ये पॅन्थर्स पार्टीने तर १ मतदारसंघात बसपाने विजय मिळवला होता. सध्या उपलब्ध असलेल्या कलांनुसार १२ जागांवर भाजप, ४ जागांवर कॉंग्रेस तर एका जागेवर अपक्ष आघाडीवर आहे. भाजपला उधमपूरमध्ये चांगले यश मिळत आहे. म्हणजे जम्मू विभागातील ३७ जागांपैकी २६ जागांवर भाजपने आघाडी मिळवली आहे.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 1:50 pm | क्लिंटन

झारखंडमध्ये याक्षणाला लालूंचा राष्ट्रीय जनता दल दोन जागांवर तर नितीश कुमारांचा जनता दल (संयुक्त) एकाही जागेवर आघाडीवर नाही. गेल्या काही महिन्यात मुलायम,लालू आणि नितीश कुमार एकत्र येऊन आणखी एका जनता दलाचे लोणचे घालणार अशा बातम्या आल्या आहेत. ही समाजवादी मंडळी किती वेळा एकत्र आली आहेत आणि किती वेळा फुटली आहेत याची गणतीच नाही. तरीही झारखंडमध्ये या लोणच्याचा जो धुव्वा उडत आहे त्यावरून सुरवात तर खूपच चांगली होत आहे असे दिसते.

श्रीगुरुजी's picture

23 Dec 2014 - 2:12 pm | श्रीगुरुजी

झारखंड

आताची परिस्थिती: भाजप - ४२, झामुमो - १७, झाविमो - ६, काँग्रेस - ८, इतर - ८

भाजपचा माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा पडलेला आहे आणि आधी भाजप व नंतर झारखंड विकास मोर्चाचा माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी मागे आहे. विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन एका मतदारसंघातून जिंकला आहे व दुसर्‍या मतदारसंघात मागे आहे.

जम्मू-काश्मिर

परिस्थिती थोडी बदलली आहे.

आताची परिस्थिती: भाजप - २५, पीडीपी - २९, नॅकॉ - १५, काँग्रेस - १२, इतर - ६

श्रीगुरुजी's picture

23 Dec 2014 - 2:22 pm | श्रीगुरुजी

झारखंड

आताची परिस्थिती: भाजप - ४०, झामुमो - १९, झाविमो - ६, काँग्रेस - ८, इतर - ८

जम्मू-काश्मिर

आताची परिस्थिती: भाजप - २५, पीडीपी - २९, नॅकॉ - १६, काँग्रेस - ११, इतर - ६

काळा पहाड's picture

23 Dec 2014 - 2:49 pm | काळा पहाड

Rahul

माहितगार's picture

23 Dec 2014 - 3:07 pm | माहितगार

भाच्च्यांशी खेळताहेत ?

एनीवे या धाग्यात संबंध काय लक्षात आला नाही

काळा पहाड's picture

23 Dec 2014 - 3:14 pm | काळा पहाड

पप्पूची कंडीशन अशी झालीय या इलेक्षन नंतर..

श्रीगुरुजी's picture

23 Dec 2014 - 8:35 pm | श्रीगुरुजी

झारखंड (एकूण जागा - ८१)

भाजप+ : ४२, झामुमो - १९, झाविमो - ८, काँग्रेस - ६, इतर - ६

जम्मू-काश्मिर (एकूण जागा - ८७)

भाजप - २५, पीडीपी - २८, नॅकॉ - १५, काँग्रेस - १२, इतर - ७

मोदी पंतप्रधान झाल्यावर एकूण ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यापैकी २ रा़ज्यात भाजपला बहुमत मिळाले, एका राज्यात सर्वाधिक मोठा पक्ष ठरून भाजपचा मुख्यमंत्री झाला आणि एका राज्यात भाजप दुसर्‍या क्रमांकावर आहे. यापूर्वी या चारपैकी ३ राज्यात भाजप ३ र्‍या क्रमांकाचा किंवा त्यापेक्षा खालचा क्रमांक असलेला पक्ष होता. झारखंडमध्ये मात्र भाजप व झामुमो प्रत्येकी १८ जागा मिळवून प्रथम क्रमांकावर होते. या चारही राज्यात भाजप सत्तेवर नव्हता. परंतु आता ३ राज्यात भाजप सत्तेवर असेल व कदाचित काश्मिरमध्येही सत्तेत सहभागी असेल. २००८/०९ च्या तुलनेत भाजपने मोठी झेप घेतलेली आहे.

२००८/०९ मध्ये काँग्रेस हरयाना व महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर होती आणि झारखंड व काश्मिरमध्ये तिसर्‍या क्रमांकावर होती. हरयाना व महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री होता व इतर दोन राज्यात काँग्रेस सत्तेत सहभागी होती. २०१४ मध्ये काँग्रेस दोन राज्यात ४ थ्या क्रमांकावर गेली आहे आणि हरयाना व महाराष्ट्रात काँग्रेस ३ र्‍या क्रमांकावर घसरली आहे. कोणत्याही रा़ज्यात काँग्रेस सत्तेत नाही.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या काही रा़ज्यांच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावरून राजकीय पंडीतांनी मोदीलाट संपली असा निष्कर्ष काढून आनंद व्यक्त केला होता. या चार राज्यांचे निकाल पाहून आपलेच शब्द गिळण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 9:32 pm | क्लिंटन

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या काही रा़ज्यांच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावरून राजकीय पंडीतांनी मोदीलाट संपली असा निष्कर्ष काढून आनंद व्यक्त केला होता. या चार राज्यांचे निकाल पाहून आपलेच शब्द गिळण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

+१.

आता यापुढे २०१५ मध्ये सुरवातीला दिल्ली आणि नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभा निवडणुका ही दोन मोठी आव्हाने मोदींपुढे आहेत. दिल्लीच्या निवडणुका वाटतात तितक्या सोप्या जाणार नाहीत.लोकसभेत भाजपने दिल्लीत पूर्ण स्वीप केला पण विधानसभा निवडणुकांच्या वेळी परत आआप डोके वर काढेल ही शक्यता आहेच. तसेच बिहारमध्ये लालू आणि नितीश कुमार यांचे संयुक्त आव्हान परतवून लावणे तितके सोपे जाणार नाही. या दोन्ही निवडणुका भाजपने जिंकल्यास मात्र पक्षात, संसदेत आणि राज्यांमध्येही एकहाती वर्चस्व असलेल्या पंतप्रधानांमध्ये इंदिरा गांधींनंतर मोदी त्या लीगमध्ये सामील व्हायच्या बरेच जवळ जातील.

सव्यसाची's picture

23 Dec 2014 - 10:15 pm | सव्यसाची

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला झारखंड मध्ये ६० विधानसभा क्षेत्रामधून आघाडी होती. आता फक्त ३७ जागा भाजप स्वतः जिंकू शकली. पण त्यामुळे भाजपला अपयश आले असे म्हणणे मला चुकीचे वाटते. मला वाटते विधानसभेचे dynamics पूर्णत: वेगळे असतात. त्यामुळे बरेच पत्रकार लोकसभेसारखे यश का मिळाले नाही असा प्रश्न करताना हा मुद्दा विसरत आहेत.
बाकी बिहार आणि दिल्ली मध्ये नेमके काय होते हे पाहण्यासारखे आहे.

क्लिंटन's picture

24 Dec 2014 - 11:01 am | क्लिंटन

झारखंडमध्ये मित्रपक्षांसह ८१ पैकी ४२ जागा जिंकून भाजपने बहुमत मिळविले.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मते देताना मतदार वेगळ्या मुद्द्यांचा विचार करून मते देतात हा माझा अत्यंत आवडता हायपोथिसिस आहे.झारखंड हे राज्य त्याचे बर्‍यापैकी चपखल उदाहरण आहे असे म्हटले तरी चालेल. २००४ मध्ये भाजपचा राज्यात धुव्वा उडाला होता. १४ पैकी अवघी १ जागा (बाबूलाल मरांडींची कोदरमा) भाजपने जिंकली होती. त्या निवडणुकांमध्ये यशवंत सिन्हांचाही पराभव झाला होता.पण त्यानंतर ९ महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र भाजपने २९ तर मित्रपक्ष जनता दल (युनायटेड) ने ६ अशा ३५ जागा जिंकल्या. लोकसभेत २००९ मध्ये भाजप आघाडीने १४ पैकी ८ जागा जिंकल्या पण त्यानंतर ७ महिन्यातच विधानसभेत प्रचंड प्रमाणावर फ्रॅक्चर्ड जनादेश लोकांनी दिला.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात किती मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली होती हा नक्की आकडा मला माहित नाही. पण तरीही नरेंद्र मोदी हे आतापर्यंतचे प्रस्थापित राजकारणातील आडाखे बदलून टाकणारे नेते आहेत असे चित्र आतापर्यंत उभे राहिले आहे. झारखंडने असा प्रचंड वेगळा कौल देणे हे आतापर्यंतचे प्रस्थापित राजकारण झाले.ते मोदी बदलू शकतात का हा प्रश्न होता. त्यामुळे पत्रकार असे प्रश्न विचारत आहेत. तरीही भाजपने काठावरचे का होईना बहुमत मिळवले त्यामुळे मोदींच्या प्रस्थापित राजकारण बदलायच्या क्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहावे असे काही झाले नाही. पण गाडी तर ३४-३५ मध्ये अडकली असती तर मात्र मोदींच्या त्या क्षमतेवर मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहिले असते.

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2014 - 3:13 pm | श्रीगुरुजी

>>> २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात किती मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली होती हा नक्की आकडा मला माहित नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने झारखंडमध्ये ५६ मतदारसंघामध्ये व काश्मिरमध्ये ४४ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली होती.

क्लिंटन's picture

24 Dec 2014 - 3:31 pm | क्लिंटन

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने झारखंडमध्ये ५६ मतदारसंघामध्ये व काश्मिरमध्ये ४४ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली होती.

काश्मीरमध्ये ४४? जम्मू विभागात (जम्मू आणि उधमपूर लोकसभा मतदारसंघ) ३७ तर लडाखमध्ये ४ जागा आहेत. म्हणजे भाजपला काश्मीर खोर्‍यातील ३ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती?

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2014 - 3:35 pm | श्रीगुरुजी

काल विविध चॅनेल्सवर दिवसभर हेच आकडे सांगत होते.

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2014 - 12:28 pm | श्रीगुरुजी

>>> लोकसभेत भाजपने दिल्लीत पूर्ण स्वीप केला पण विधानसभा निवडणुकांच्या वेळी परत आआप डोके वर काढेल ही शक्यता आहेच.

तशी शक्यता कमी आहे. मुख्यमंत्रीपद सोडून पलायन करणार्‍या केजरीवालांना दिल्लीकर अजूनही क्षमा करण्याच्या मनस्थितीत नाहीत. गेल्या २ महिन्यात ३-४ मतदान सर्वेक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. सर्व सर्वेक्षणात भाजप ४०+, आआप २५ च्या आसपास व काँग्रेस ५-६ असा अंदाज आहे. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आआपचे अनेक नेते भाजपमध्ये सामील होत आहेत. जशी निवडणुक जवळ येईल तसे आआपला अजून मोठे भगदाड पडेल.

>>> तसेच बिहारमध्ये लालू आणि नितीश कुमार यांचे संयुक्त आव्हान परतवून लावणे तितके सोपे जाणार नाही.

लालू, नितीश व काँग्रेस नुकत्याच झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत एकत्र आले होते. राजद ४, संजद ४ व काँग्रेस २ असे जागावाटप होते. राजदने ३, संजदने २ व काँग्रेसने १ जागा जिंकली होती.

परंतु डिसेंबर २०१५ असणार्‍या विधानसभा निवडणुकीत हे पक्ष एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही. वरील फॉर्म्युलाप्रमाणे बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी राजद व संजद च्या वाट्याला प्रत्येकी ९७-९८ जागा येतील व काँग्रेसच्या वाट्याला ४८ जागा येतील. सध्याच्या विधानसभेत संजदचे १२३ आमदार आहेत. इतके आमदार असताना संजद फक्त ९७-९८ जागा लढविणे अशक्य आहे. राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हवे असल्याने राजद देखील निम्म्यापेक्षा कमी जागा लढविणे शक्य नाही. जरी काँग्रेसला बाजूला ठेवले तरी राजद व संजदच्या वाट्याला जेमतेम १२१-१२२ जागा येतील व त्यामुळे दोन्ही पक्षांना इतक्या कमी जागा लढविणे मान्य होणार नाही. जर संजदने ९७-९८ जागाच लढविल्या तर किमान २५ आमदारांचे तिकीट कापावे लागेल व ते आमदार तातडीने भाजपमध्ये जातील. त्यामुळे या तीन पक्षांची भविष्यात युती अशक्य आहे. राजद + काँग्रेस किंवा संजद + काँग्रेस अशी युती मात्र नक्की होऊ शकते. अशा परिस्थितीत तिरंगी लढत होऊन फायदा भाजपचाच होईल.

जातीयवादी पक्षांविरूद्ध एकजूट करून लढण्याच्या गप्पा मारणे सोपे असते. प्रत्यक्षात कोणताही पक्ष कमी जागांवर लढायला तयार होत नाही. सर्वांचाच तोटा होत आहे हे लक्षात येऊनसुद्धा कोणताही पक्ष दुसर्‍या पक्षाला जास्त जागा देण्यास तयार नसतो. महाराष्ट्रात सेना-भाजपच्या बाबतीत असेच झाले होते. एकटे लढल्यावर आपले खूप नुकसान होईल हे माहीत असूनसुद्धा सेनेच्या ताठरपणामुळे युती होऊ शकली नव्हती व सेना १०० च्या पुढे जाण्याऐवजी ६३ वरच अडकली.

ग्रेटथिंकर's picture

24 Dec 2014 - 1:10 pm | ग्रेटथिंकर

जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी राजीनामा देऊन नैतिकतेचे प्रदर्शन केले होते त्याल पलायन म्हणणे मंजै वैचारिक पात्रता नसण्याचे लक्षण आहे, नाहितर या देशाने तेरा दिवसाच्या सत्तेसाठी पिपासु असलेले व ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करुन निवडणुक जिंकली, त्यांच्याशी निर्लज्ज युती करणारे भाज्यपेही पाहिले आहेत.
उठसुठ नैतिकतेचा राग आळवणारे संघी सत्तेसाठी कुणाशीही युती करु शकतात हेच सांप्रत सत्य आहे

बोका-ए-आझम's picture

24 Dec 2014 - 1:24 pm | बोका-ए-आझम

जर केजरीवालांनी नैतिकता दाखवली होती तर आता परत एकदा संधी द्या, त्यावेळी राजीनामा दिला ही चूक झाली असं म्हणून जनतेसमोर भीक का मागत आहेत? तेव्हा लोकसभा निवडणुकीत हीरो बनून आपल्याला राष्ट्रीय पातळीवर प्रोजेक्ट करण्याची त्यांना घाई झाली होती हेच खरं. बरं, निवडणूक लढवून मग पद सोडणं हेही केजरीवाल करू शकले असते पण आम आदमी पार्टी म्हणजे आपणच असा त्यांचा भ्रम होता.बरं, त्या ४९ दिवसांत काय दिवे लावले? जनता दरबार गुंडाळावा लागला, सोमनाथ भारतींनी अधिकार नसताना किरकी एक्स्टेन्शन भागात परकीय नागरिकांवर दादागिरी करुन स्वत:चं हसं करुन घेतलं. त्यामुळे सत्ता संभाळणं वाटतं तितकं सोपं नाही हे केजरीवालांना कळलं आणि त्यांनी जनलोकपाल विधेयकाची संधी साधून पलायन केलं. नैतिकता? My Foot!

कपिलमुनी's picture

24 Dec 2014 - 3:19 pm | कपिलमुनी

बाकी माहीत नाही , पण स्थानिक मित्राच्या महिती नुसार त्या भगात राहणारे नायजेरियन आणि इतर परदेशी मुले ड्रग्स आणी देहविक्रय या मध्ये गुंतले होते आणि त्यांच्या पार्टीज , व्यवसाय यांचा त्रास सोसायटी मधे सर्वांना व्ह्यायचा. पोलिस हप्ता घेउन गप्प बसायचे , त्या मुळे य कारवाईला स्थानिक पाठिंबा मिळाला .

बोका-ए-आझम's picture

24 Dec 2014 - 9:01 pm | बोका-ए-आझम

सोमनाथ भारतींना अशी 'टिप' मिळाली होती की हे परकीय नागरिक अशा प्रकारच्या गोष्टी करतात. त्याची शहानिशा न करताच त्यांनी धाड टाकली. बरं, ते ठीक आहे पण तिथे त्यांची झडती घेण्याचा आणि त्यांना (अगदी स्त्रियांनाही) लघवीचा नमुना देण्याचा अधिकार पोलिसांशिवाय कोणालाही नव्हता. शिवाय दिल्लीमध्ये पोलिस हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येतात त्यामुळे त्यांनी भारतींनी केलेल्या ' कारवाई' बद्दल नापसंती व्यक्त केली आणि त्यामुळे दुस-या दिवशी लगेचच दिल्लीचे मुख्यमंत्री धरणं धरून बसले. सोमनाथ भारतींच्या या कृत्याची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आणि त्यांना नोटिस पाठवली जिला भारतींनी उत्तर पाठवलं नाही आणि नंतर आपल्याला ही प्रक्रिया माहीत नव्हती अशी सारवासारव केली. रच्याकने, हा माणूस वकील आहे. ही केजरीवाल आणि त्यांच्या कंपूची 'नैतिकता' आहे.

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2014 - 2:06 pm | श्रीगुरुजी

>>> जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी राजीनामा देऊन नैतिकतेचे प्रदर्शन केले होते त्याल पलायन म्हणणे मंजै वैचारिक पात्रता नसण्याचे लक्षण आहे,

हहपुवा :YAHOO:

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2014 - 3:33 pm | श्रीगुरुजी

>>> जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी राजीनामा देऊन नैतिकतेचे प्रदर्शन केले होते त्याल पलायन म्हणणे मंजै वैचारिक पात्रता नसण्याचे लक्षण आहे

नानासाहेब,

तुम्ही तुमच्या पूर्वीच्या "टॉपगिअर्ड फिलॉसॉफर" या अवतारात असताना केजरीवालांविषयी खालील भाष्य केले होते. तुमच्या आठवणीसाठी ते खाली देत आहे. (http://www.misalpav.com/node/26781). जरा विचारात सातत्यता तरी राखा.
________________________________________________________________________________

केजरीवाल हा खोटारडा आहे हे
टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Sat, 18/01/2014 - 21:32
केजरीवाल हा खोटारडा आहे हे त्याच्याकडे बघितल्यावरच कळते ,आप हे 'खाप'च्याच औलादीचे वाटायला लागलेत,याचा बोलवता धनी वेगळाच असावा ....

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥
________________________________________________________________________________

आता अचानक केजरीवाल तुम्हाला नैतिकतेचे प्रदर्शन करणारे वाटायला लागले काय. कमाल आहे तुमच्या कोलांट्या उडीची.

क्लिंटन's picture

24 Dec 2014 - 1:38 pm | क्लिंटन

इतके आमदार असताना संजद फक्त ९७-९८ जागा लढविणे अशक्य आहे. राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हवे असल्याने राजद देखील निम्म्यापेक्षा कमी जागा लढविणे शक्य नाही. जरी काँग्रेसला बाजूला ठेवले तरी राजद व संजदच्या वाट्याला जेमतेम १२१-१२२ जागा येतील व त्यामुळे दोन्ही पक्षांना इतक्या कमी जागा लढविणे मान्य होणार नाही.

ही शक्यता आहेच.

नोव्हेंबर २०१५ पर्यंत काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणावर मार खायला सुरवात होऊन २ वर्षे झाली असतील. बिहारमध्ये सत्तेत येणे पक्षाच्या भवितव्यासाठी अगदीच महत्वाचे असेल.२००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लालू-काँग्रेस आणि पासवान अशी महायुती होती.त्यात काँग्रेसने ४० पैकी ४ जागा लढवायला तयार होऊन पडती बाजू स्विकारली होतीच.त्याची पुनरावृत्ती अगदीच अशक्य नाही.

दुसरे म्हणजे लालूंच्या राजकिय भवितव्याचा प्रश्न असल्यामु़ळे तडजोड करायला ते तयार होऊ शकतील ही पण शक्यता आहेच. २०१० मध्ये नितीश कुमारांनी भाजपसाठी ११० जागा सोडल्या होत्या.तितक्या जागांवर लालू तयार होणारच नाहीत असेही नाही.शेवटी राजदचे विधानसभेत २२ आमदारच आहेत.त्या तुलनेत ११० जागा मिळणार असतील तर राजदला अगदीच चालणार नाही असेही नाही.तसेच या ११० जागांवर गेली कित्येक वर्षे नितीश कुमारांचा उमेदवार नसल्यामुळे त्यांनाही या जागा राजदसाठी सोडायला हरकत असेल असे वाटत नाही.

१९९० च्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि जनता दलाने गुजरात आणि राजस्थानात सीट अ‍ॅडजस्टमेन्ट केले होते. म्हणजे बहुसंख्य जागांवर सहमती झाली तिथे एका पक्षाचाच उमेदवार होता.तर उरलेल्या तीसेक जागांवर दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले होते.तसे बिहारमध्ये होऊच शकणार नाही असेही नाही. मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरूध्द आपलाच एखादा बंडखोर उभा करायचा आणि तो जिंकल्यास त्याला "सन्मानाने" स्वगृही परत घेऊन आपले बळ एकने वाढवायचे असे प्रकारही युती करणारे पक्ष करत असतातच. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुका हा लालू आणि नितीश या दोघांसाठीही अस्तित्वाची लढाई असल्यामुळे ते एकत्र लढणार असे गृहित धरूनच भाजपने व्यूहरचना केली पाहिजे. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे महागात पडू शकते.

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2014 - 2:03 pm | श्रीगुरुजी

>>> दुसरे म्हणजे लालूंच्या राजकिय भवितव्याचा प्रश्न असल्यामु़ळे तडजोड करायला ते तयार होऊ शकतील ही पण शक्यता आहेच. २०१० मध्ये नितीश कुमारांनी भाजपसाठी ११० जागा सोडल्या होत्या.

२०१० मध्ये भाजप १०२ व संजद १४१ असे जागावाटप होते.

>> तितक्या जागांवर लालू तयार होणारच नाहीत असेही नाही.शेवटी राजदचे विधानसभेत २२ आमदारच आहेत.त्या तुलनेत ११० जागा मिळणार असतील तर राजदला अगदीच चालणार नाही असेही नाही.तसेच या ११० जागांवर गेली कित्येक वर्षे नितीश कुमारांचा उमेदवार नसल्यामुळे त्यांनाही या जागा राजदसाठी सोडायला हरकत असेल असे वाटत नाही.

राजदचे फक्त २२ आमदार असले व संजदचे १२३ असले तरी मे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजदचे ४ खासदार निवडून आले आहेत तर संजदचे फक्त २ आले आहेत. त्यामुळे सद्यपरिस्थितीत आपलीच ताकद जास्त असल्याची लालूची समजूत आहे. दुसरीकडे १२३ सिटिंग आमदार असताना संजद १५० पेक्षा कमी जागा मान्य करणे शक्य नाही. तसे झाले तर राजद व काँग्रेससाठी एकत्रित जेमतेम ९३ जागा उरतात. काँग्रेस आघाडीत आले नाही तरी राजद फक्त ९३ जागा लढविणे मान्य करणार नाही. संजदपेक्षा कमी जागा लढविणे म्हणजे मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडून देण्यासारखे आहे. लालू हे कधीच मान्य करणार नाही. लालू आणि नितीशकुमार सध्या कितीही प्रेमाने एकमेकांना मिठ्या मारत असले तरी मनातून दोघेही एकमेकांवर डूख धरून आहेत. निव्वळ पोटनिवडणुकीसाठी दोघे एकत्र होते. प्रत्यक्ष निवडणुकीत ते एकमेकांविरूद्धच असतील.

>>> २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुका हा लालू आणि नितीश या दोघांसाठीही अस्तित्वाची लढाई असल्यामुळे ते एकत्र लढणार असे गृहित धरूनच भाजपने व्यूहरचना केली पाहिजे. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे महागात पडू शकते.

राजद व संजद एकत्र येणे अशक्य आहे. राजद + काँग्रेस किंवा संजद + काँग्रेस अशी युती नक्कीच होईल. काँग्रेसला ७०-८० जागा सोडून उरलेला पक्ष १६०-१७० जागा लढवेल.

क्लिंटन's picture

24 Dec 2014 - 2:11 pm | क्लिंटन

२०१० मध्ये भाजप १०२ व संजद १४१ असे जागावाटप होते.

हो बरोबर. त्यावेळी भाजपचा स्ट्राईक रेट ९०% पेक्षा जास्त होता.

लालू आणि नितीशकुमार सध्या कितीही प्रेमाने एकमेकांना मिठ्या मारत असले तरी मनातून दोघेही एकमेकांवर डूख धरून आहेत. निव्वळ पोटनिवडणुकीसाठी दोघे एकत्र होते. प्रत्यक्ष निवडणुकीत ते एकमेकांविरूद्धच असतील.

तसे झाले तर अति उत्तम.

बोका-ए-आझम's picture

24 Dec 2014 - 11:34 pm | बोका-ए-आझम

जर बिहार विधानसभेत त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही तरच हे घडू शकते असं मला वाटतं. आत्ता दोघंही परस्परांची गरज म्हणून एकत्र आले आहेत. पण जर पराभव झाला तर सच्च्या समाजवाद्यांप्रमाणे एकमेकांवर दोषारोप करुन ते वेगळे होतील.

प्रसाद१९७१'s picture

24 Dec 2014 - 2:38 pm | प्रसाद१९७१

दोन पक्षांची युती झाल्याने त्यांना मिळालेल्या मतांची पण बेरीज होते हा चुकीचा समज आहे. बर्‍याच वेळेला युती करुन नुकसानच होत असते. ज्या प़क्षाला दुसर्‍या प़क्षासाठी जागा सोडायला लागते त्या प़क्षाचे बरेसचे लॉयल मतदार हे एक तर मतदानच करत नाहीत किंवा विरुद्ध पक्षाला करतात.
युती करुन मतांची बेरीज होत असती तर आठलल्यांच्या आरपीआय ला २-४ जागा तरी मिळाल्या असत्या आत्ताच्या निवडणुकीमधे.

प्रसाद१९७१'s picture

24 Dec 2014 - 2:41 pm | प्रसाद१९७१

कोथरुड मधल्या भाजपाच्या नेहमीच्या मतदारांनी २००९ मधे मनसे चा पर्याय उपलब्ध झाल्यावर मनसेला मतदान केले. पण २०१४ मधे भाजप पण रींगणात आल्यामुळे कोथरुड मधले भाजपीय मतदार पुन्हा भाजप कडे आले.
कोथरुड मधे ह्या वेळेस पण युती असती तर कदाचित मनसे निवडुन आली असती.

क्लिंटन's picture

24 Dec 2014 - 3:28 pm | क्लिंटन

हो बरोबर. ही गोष्ट महाराष्ट्रात नक्कीच लागू पडते.पण बिहारसारख्या राज्यात मतदान जातीनिहाय होत असल्यामुळे दोन अधिक दोन चार हे आतापर्यंत बघायला मिळाले आहे. (२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वेगळे निकाल लागले). यापुढचे सांगता येत नाही.

पिंपातला उंदीर's picture

24 Dec 2014 - 10:14 am | पिंपातला उंदीर

आजच्या लोकसत्तेच्या अग्रलेखात काही गंभीर म्हणता येतील अशा चुका आहेत . छत्तिस गड च्या अजित जोगी ना त्यांनी झारखंड मध्ये नेउन टाकले आहे . नुकत्याच झालेल्या झारखंड निवडणुका मध्ये त्यांनी कॉंग्रेस च नेतृत्व केल असा जावई शोध त्यांनी लावला असून वर कॉंग्रेस च्या पराभवाच खापर पण जोगी यांच्या डोक्यावर फोडलं आहे . तसच अब्दुल्ला घराण्यां मधल यापूर्वी कोणीही निवडणुकीत पडल नाही अस विधान बेधडक पण केल आहे . वास्तविक पाहता उमर अब्दुल्ला एकदा यापूर्वी पण निवडणुकीत पडले आहेत . ज्या गोष्टी राजकारणात रस असणारया सर्वसामान्य लोकाना पण माहित असतात त्या गांजलेल्या शेतकऱ्यापासून देशाच्या पंतप्रधाना ना उपदेशाचे डोस पाजणार्या लोकसत्ता काराना माहित नसाव्यात याचे अमळ आश्चर्य वाटून राहिले भौ

सव्यसाची's picture

24 Dec 2014 - 1:23 pm | सव्यसाची

तुमचे म्हणणे बरोबर आहे. आजच्या लेखामध्ये भयानक चुका आहेत.
जोगी यांच्या बाबतीतली चूक तर टाळण्याजोगीच होती.
अब्दुल्ला हरले नाहीत हे म्हणणे पण चुकीचे आहे. ओमर अब्दुल्ला यांचा पराभव झाला आहे.

क्लिंटन's picture

24 Dec 2014 - 1:53 pm | क्लिंटन

जोगी यांच्या बाबतीतली चूक तर टाळण्याजोगीच होती.

+१. एक गोष्ट समजत नाही. "या राज्यात अजित जोगीसारख्या बनेल नेत्यास काँग्रेसने पुढे करून पाहिले" हे या अग्रलेखातील वाक्य आहे. समजा झारखंडमध्ये काँग्रेसचा कोणी मोठा नेता असता तर त्या नेत्याऐवजी अजित जोगी हे चुकून लिहिले आहे असा बेनेफिट ऑफ डाऊट गिरीश कुबेरांना देता आला असता.पण राज्यात काँग्रेसचा असा कोणी नेताही नाही. मग इतकी मोठी चूक कशी काय झाली हे समजत नाही.

अब्दुल्ला हरले नाहीत हे म्हणणे पण चुकीचे आहे. ओमर अब्दुल्ला यांचा पराभव झाला आहे.

समजा ओमर अब्दुल्लांचा २००२ च्या विधानसभा निवडणुकांमधला गंदरबालमधून झालेला पराभव कुबेर विसरले तरी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अगदी सहा महिन्यांपूर्वीच श्रीनगरमधून फारूख अब्दुल्लांचाही पराभव झाला होता हे पण ते विसरले?

ग्रेटथिंकर's picture

24 Dec 2014 - 11:45 am | ग्रेटथिंकर

निवडणुका जिंकने येवढेच काम मोदी करत आहेत ,विकासाच्या बाबतीत मात्र मूग गिळुन गप्प. महागाई भ्रष्टाचार कमी करणे दूरच ,उलट काँग्रेस सरकारच्या निर्णयांना पुढे चालू ठेवणे व त्यांच्या विकासकामांचे श्रेय लाटणे चालू आहे.

बोका-ए-आझम's picture

24 Dec 2014 - 1:15 pm | बोका-ए-आझम

सोनिया आणि राहुल यांनी एकदा ' भाजपला फक्त सत्ता हवी आहे 'असे वेडगळ विधान केले होते. कुठल्याही राजकीय पक्षाचा हेतू हा सत्ता हाच असतो. मोदी फक्त निवडणुका जिंकण्याचं काम करत आहेत हे त्याच धर्तीचं विधान आहे. मोदींनी निवडणुका जिंकण्याचं काम केलेलं नाही, लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या पक्षाला मतं दिलेलेी आहेत. मेक इन इंडिया, जन धन योजना, किरकोळ विक्री क्षेत्रात परकीय गुंतवणूक न आणणे हे काँग्रेसचे निर्णय होते की काय? GST आणि विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक काँग्रेसच्या काळात जाहीर झाली होती पण अंमलबजावणी कोण करतो हे महत्वाचं आहेच. उद्या मी आयफोन ८ जाहीर केला आणि अॅपलने तो बाजारात आणल्यावर त्याचं श्रेय घेतलं तर चालेल काय?

बॅटमॅन's picture

24 Dec 2014 - 1:55 pm | बॅटमॅन

ओ बोकेश्वर! कुणाला उत्तरे देऊन एनर्जी वाया घालवताय? त्यांचे कामच आहे ते. मोदी हे नाव दिसले की गरळ ओकणे हा यांचा विरंगुळा आहे. खरेतर गरज आहे, कारण नायतर यांना कोणी भाव देत नाही.

बोका-ए-आझम's picture

24 Dec 2014 - 4:10 pm | बोका-ए-आझम

कसं आहे की उगाचच कुणीही उंदीर काहीही किचकिच करु लागला की फिसकारणं आणि नख्या काढणं हा बोक्याचा सहजस्वभाव आहे.

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2014 - 1:54 pm | श्रीगुरुजी

वेलकम बॅक नानासाहेब! पुनर्जन्माबद्दल अभिनंदन!!

मस्त्य, कस्त्य, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, ... या उच्च अवतारी परंपरेप्रमाणेच "ग्रेटथिन्कर, टॉपगिअर्ड फिलॉसॉफर, नानासाहेब नेफळे, माईसाहेब कुरसुंदीकर, ग्रेटथिंकर, ..." ही थोर डूआय परंपरा आहे.

मृत्युन्जय's picture

24 Dec 2014 - 3:45 pm | मृत्युन्जय

महागाई भ्रष्टाचार कमी करणे दूरच

??????

जरासे गूगलुन बघितले तर कळेल की महागाई कमीच होत चालली आहे:
The inflation rate in India was recorded at 4.38 percent in November of 2014. Inflation Rate in India averaged 9.09 percent from 2012 until 2014, reaching an all time high of 11.16 percent in November of 2013 and a record low of 4.38 percent in November of 2014. Inflation Rate in India is reported by the Ministry of Statistics and Programme Implementation (MOSPI), India.

अरे, ग्रे.थिं. फिलौसोफर उत्तर दे.


निवडणुका जिंकने येवढेच काम

तुला, बाजारात जाउन तुझ्या वांगी-पावट्याच्या भाजीसाठी तांबाटु आणण्याइतके सोपे वाटले का ??

ग्रेटथिंकर's picture

24 Dec 2014 - 5:58 pm | ग्रेटथिंकर

ग्रेटथिन्कर व मी ,आमच्यात फरक आहे. मी ग्रेटथिंकर आहे ,नामसाधर्म्याचा अर्थ असा नव्हे कि आम्ही एकच व्यक्ती आहोत. बाकी ते नानासाहेब माईसाहेब टॉपगेअर्ड वगैरेची काहीच टोटल लागली नाही.
@कपिलमुनी, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाची किंमत प्रचंड उतरल्याने मोदींने पेट्रोल डीझेलचे दर कमी केले ,त्यामुळे महागाई कमी झाल्याची आकडेवारी व प्रत्यक्ष किंमती यांच्यात भ्रामकता पैदा झाली आहे. एण्ड युजरला या आकड्यांचा फायदा होताना दिसत नाही.

कपिलमुनी's picture

24 Dec 2014 - 6:17 pm | कपिलमुनी

@कपिलमुनी, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाची किंमत प्रचंड उतरल्याने मोदींने पेट्रोल डीझेलचे दर कमी केले ,त्यामुळे महागाई कमी झाल्याची आकडेवारी व प्रत्यक्ष किंमती यांच्यात भ्रामकता पैदा झाली आहे. एण्ड युजरला या आकड्यांचा फायदा होताना दिसत नाही.

म्या कुटं काय बोल्लो ?

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2014 - 8:55 pm | श्रीगुरुजी

>>> बाकी ते नानासाहेब माईसाहेब टॉपगेअर्ड वगैरेची काहीच टोटल लागली नाही.

तुम्हाला लागली नसेल एखादेवेळेस, पण आम्हाला लागली ना!

ही किंमत उतरल्यामुळे महागाई कमी झाली आहे, त्यात मोदी सरकारचं काही श्रेय नाही!बरोबर. याचा अर्थ उद्या हे दर वाढून महागाई भडकली तर त्यालाही मोदी सरकार जबाबदार नाही!

नांदेडीअन's picture

1 Mar 2015 - 5:26 pm | नांदेडीअन

"मैं शुक्रगुजार हूँ श्रीनगर के लोगो का, हुर्रियत का, सभी अतंकवादियो का, जिन्होंने कश्मीर में उस समय कोई गलत घटना को अंजाम नहीं दिया, वरना वो चाहते तो कुछ भी कर सकते थे.
पाकिस्तान ने भी माहौल को सहायक बनाने में मदद किया, मेरा ऐसा मानना है की अगर वो नहीं चाहते तो श्रीनगर में शांति से चुनाव नहीं हो सकता था."

- मुफ्ती मोहम्मद सईद

नांदेडीअन's picture

1 Mar 2015 - 5:30 pm | नांदेडीअन

माफ करा, वरील विधान शपथविधीनंतरचे आहे हे सांगायला विसरलो.

आणि हो, अजून एक...
ग्रेटेस्ट देशभक्त ऑफ ऑल टाईम, माननीय श्री. सज्जाद जी लोन यांनी J&K मध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

पिंपातला उंदीर's picture

1 Mar 2015 - 8:02 pm | पिंपातला उंदीर

इथले भाजप चे चिरपरिचित भक्त निवडणुकीपूर्वी असा दावा करत होते की काँग्रेस सत्तेसाठी कुणासोबत पण (ओमार अथवा मुफ्ती ) शय्यासोबत करेल . बिचाऱ्या भक्तांना मोदी देवानेच तोंडघशी पडले . ते जाऊ दे राष्ट्रगीत चालू असताना महबुबा मुफ्ती ची body language पाहिली का ? त्याहून मोठी गोष्ट म्हणजे सरकार ने ३७० कलम मागे घेतले जाणार नाही अशी भाषा वापरली आहे . ते जाऊ दे इथले भक्त या गोष्टीचे समर्थन करतील . बघतच राहा . बाय द वे सीमेवर गेल्या काही दिवसात मारल्या गेलेले जवान त्यांच्यासाठी collateral damage असावेत बहुदा . एवढं दुतोंडी सरकार देशाने कधी पाहिलं नसेल

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2015 - 9:28 pm | श्रीगुरुजी

>>> एवढं दुतोंडी सरकार देशाने कधी पाहिलं नसेल

There is no change in the BJP’s stand on repealing Article 370 of the constitution, which guarantees special status to Jammu and Kashmir, Parliamentary Affairs Minister M. Venkaiah Naidu said Sunday.

He replied in the negative when asked if the BJP had compromised on the issue to form a coalition government with the People’s Democratic Party (PDP). “We stand where we were and we will be,” he said.

“Why will they accept our stand and why will we accept their stand?” he said, when asked whether the PDP had agreed to the Bharatiya Janata Party’s stand on the issue.

According to sources privy to the developments, the two sides have possibly agreed on formation of a Committee which will go into the Armed Forces Special Powers Act (AFSPA) and suggest areas from where it could be revoked.

On Article 370, while BJP has given no written assurance as demanded by the PDP, the CMP is expected to say that both parties will respect the aspirations of the people of the state within the Constitution.

सत्तेसाठी आपली देशहिताची भूमिका न बदलता त्यावर ठाम राहणारे सरकार देशाने यापूर्वी कधीही पाहिले नसेल.

आजानुकर्ण's picture

2 Mar 2015 - 8:03 pm | आजानुकर्ण

सत्तेसाठी आपली देशहिताची भूमिका न बदलता त्यावर ठाम राहणारे सरकार देशाने यापूर्वी कधीही पाहिले नसेल.

हम्म. सत्तेसाठी कायपण ही भाजपाची भूमिका कायमच ठाम राहिली आहे.

प्रसाद१९७१'s picture

3 Mar 2015 - 10:52 am | प्रसाद१९७१

गुरुजी, तुम्ही भाजपचे भक्त आहात हे मान्य. पण काय लेव्हलच्या चुकांचे तुम्ही समर्थन करत आहात? भाजपच्या मतदारांनी, पुढे भाजप पीडीपी शी लग्न करेल म्हणुन मते दिली होती का? इतकी सत्ता का हवी आहे भाजपला की कमरेचे पण सोडुन डोक्याला बांधावे.

आणि तुमच्या सारख्या भाजप भक्तांना अजुन एक सल्ला. तुम्ही ह्या चुकांचे समर्थन करुन आणि असले प्रतिसाद लिहुन भाजपचेच नुकसान करत आहात. अश्या वेळी गप्प बसावे. नाहीतर तुमचे असले समर्थन बघुन सामान्य मतदार भाजप पासुन कायमचे दूर जातील.

नांदेडीअन's picture

3 Mar 2015 - 11:16 am | नांदेडीअन

तुम्ही ह्या चुकांचे समर्थन करुन आणि असले प्रतिसाद लिहुन भाजपचेच नुकसान करत आहात.
अश्या वेळी गप्प बसावे.
नाहीतर तुमचे असले समर्थन बघुन सामान्य मतदार भाजप पासुन कायमचे दूर जातील.

अगदी हेच होत आहे सध्या.
माझ्या ज्या मित्रांनी ‘विकासासाठी’ म्हणून भाजपाला मत दिले होते, ते आता ‘आप’चा परफॉर्मन्स बघून आपले मत बदलत आहेत.
अगदीच काही ‘आप’चे समर्थक वगैरे झाले नाहीत, पण आप हा पक्ष कॉंग्रेस-भाजपपेक्षा नक्कीच वेगळा आहे हे त्यांना कळून चुकले आहे.

मी पूर्वी भाजपचा कट्टर विरोधक होतो (कॉंग्रेसचासुद्धा), पण भक्तांचे वागणे बघून मला आता भाजपवरच दया यायला लागली आहे.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2015 - 12:35 pm | श्रीगुरुजी

मग तिथे भाजपने काय करायला हवे होते? तिथे तीन पर्याय होते. (१) कोणीच सरकार स्थापन न केल्याने राज्यपाल राजवट लावणे, (२) पीडीपी + नॅकॉ किंवा पीडीपी + काँग्रेस अशी युती होऊन सरकार स्थापन करणे आणि भाजपने विरोधात बसणे, (३) पीडीपी + भाजप असे सरकार स्थापन करणे.

भाजप वगळता काश्मिर राज्यातील सर्व पक्ष पाकिस्तानविषयी व अतिरेक्यांविषयी सहानुभूती बाळगणारे व काश्मिरमधील हिंदूंकडे पूर्ण दुर्लक्ष करणारे आहेत. भाजप तिथे स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही. भाजपने विरोधात बसणे म्हणजे या उरलेल्या पक्षांना पुन्हा एकदा मुक्तहस्त देण्यासारखे आहे.

तिथे राज्यपाल राजवट चालविणे म्हणजे अनागोंदी माजविण्यासारखे आहे. या ज्वलंत सीमावर्ती राज्यात फार काळ अनागोंदी परवडण्यासारखी नाही.

भाजपकडे आता निदान सत्तेचा निम्मा तरी वाटा असल्याने या पक्षांना पूर्वीइतके मोकळे रान मिळणार नाही आणि पीडीपीच्या कारवायांवर काही प्रमाणात तरी नियंत्रण राहू शकेल. त्याचबरोबर भाजपला आपला पक्ष विस्तारण्यास संधी मिळेल. हुरियत सारख्या फुटीर संघटनांचे पूर्वीपेक्षा कमी लाड होतील.

काश्मिरमध्ये श्रीनगर खोर्‍यात मुस्लिम बहुसंख्य आहेत, लडाखमध्ये बौद्ध व जम्मूमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपचे सर्व आमदार जम्मू विभागातील आहेत, तर पीडीपीचे सर्व आमदार श्रीनगर खोर्‍यातील आहेत. भाजपने गप्प बसून राहणे म्हणजे जम्मू विभागाला शून्य प्रतिनिधित्व मिळणे आणि पाकिस्तानवादी पीडीपी, नॅकॉ आणि काँग्रेसला मुक्तद्वार देण्यासारखे आहे. भाजपच्या निमित्ताने सत्तेत प्रथमच जम्मूला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले. काश्मिरमधील लाखो पंडीत कुटुंबे गेली २०-२५ वर्षे निर्वासित म्हणून दिल्लीत राहत आहेत. पीडीपी, नॅकॉ आणि काँग्रेसने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे (कारण उघड आहे). हीच मंडळी परत सत्तेत आली असती तर हे दुर्लक्ष कायम राहिले असते. परंतु आता भाजप सत्तेत आल्याने ही कुटुंबे परत आणण्याच्या हालचाली सुरू होतील.

राहता राहिला प्रश्न मुफ्तीच्या प्रक्षोभक वक्तव्यांचा. अफझल गुरूच्या फाशीला पीडीपीचा सुरवातीपासूनच विरोध होता. त्यामुळे काल मुफ्ती जे बडबडला त्यात काहीच नवीन नव्हते. भाजपबरोबर सरकार स्थापन करताना पीडीपी व भाजप हे दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. निव्वळ पीडीपी नव्हे तर अरूंधती रॉय, ह्यूमन राईट्स वॉच अशा अनेकांनी अफझल गुरुच्या फाशीला विरोध केला होता. निवडणुक शांततेने पार पडल्याबद्दल पाकिस्तान व अतिरेक्यांचे आभार मानणे ही मुफ्तीची विचारपूर्वक केलेली चाल होती. भाजपबरोबर युती केल्याने नाराज झालेल्या या घटकांना चुचकारण्यासाठी व आपण आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहोत हा संदेश देण्यासाठी त्याने हे वक्तव्य केले. भाजपने तातडीने या वक्तव्याविरोधात आपली भूमिका मांडून आपण त्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले आहे.

पुढे काय होईल याचा अजून अंदाज येत नाही. दोन्ही पक्ष अत्यंत परस्परविरोधी आहेत. मुफ्ती आपला फुटिरतावादी अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करेल आणि भाजप त्याला विरोध करेल. कदाचित ही युती अल्पकालीन ठरेल. परंतु भाजप विरोधात असता किंवा पीडीपीची इतर पक्षांबरोबर युती झाली असती तर पीडीपीला आपला अजेंडा नक्कीच पुढे रेटता आला असता. परंतु आता भाजप बरोबर असल्याने ते तितकेसे सोपे नाही.

भविष्यात भाजपचे पूर्ण सरकार येण्याच्या दृष्टीने निदान भाजपचे पहिले पाऊल तरी पडले आहे.

आजानुकर्ण's picture

2 Mar 2015 - 8:02 pm | आजानुकर्ण

खरंय. भक्तांनी लगेच समर्थनही सुरु केलेले दिसते. जम्मू-काश्मीरबाबत काहीतरी वादग्रस्त विधान करणाऱ्या आपच्या नेत्यांविरूद्ध देशद्रोही वगैरे भाषा वापरणारे नमोरुग्ण आता पाकिस्तान-हुर्रियत-अतिरेक्यांचे आभार मानणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-पीडीपीच्या शय्यासोबतीबाबत काय करताहेत ते पाहायला जाम मजा येतेय!

नांदेडीअन's picture

2 Mar 2015 - 8:08 pm | नांदेडीअन

जम्मू कश्मीर में भाजपा के साथ गठबंधन में सत्ता संभालने के एक दिन बाद सत्तारूढ़ पीडीपी ने सोमवार को केंद्र की राजग सरकार से मांग की कि संसद पर हमले के दोषी अफजल गुरू के अवशेष लौटाये जाएं।
पीडीपी के आठ विधायकों ने इस संबंध में बयान जारी कर कहा कि पार्टी अवशेषों की वापसी के लिए पूरी ताकत से लगे रहने का वादा करती है।
- झी न्यूज २ मार्च २०१५

श्रीगुरुजी's picture

2 Mar 2015 - 8:46 pm | श्रीगुरुजी

मुफ्ती काहीही बरळेल. किंबहुना तो असे बरळणार याची खात्रीच होती. मुफ्तीने निवडणुक यशस्वी पार पडल्याबद्दल जे विधान केले त्याबद्दल लगेचच भाजपने योग्य ते प्रत्युत्तर दिलेले आहे. मुफ्तीचा पक्ष किंवा अब्दुल्लाचा नॅशनल कॉन्फरन्स किंवा जम्मू-काश्मिरमधील काँग्रेस यांच्यात काहीही गुणात्मक फरक नाही. काँग्रेस मुफ्तीच्या बडबडीबद्दल त्याला चकार शब्दात जाब न विचारता भाजपने निवेदन करावे म्हणून मागे लागला आहे. वास्तविक मुफ्तीच्या मताशी असहमती दर्शवून मग भाजपला जाब विचारायला हवा होता. पण मुफ्तीबद्दल चकार शब्द न उच्चारता काँग्रेस भाजपलाच जाब विचारत आहे. त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत.

पीडीपी सर्वात मोठा पक्ष असल्याने व पॉडीपीला बहुमत नसल्याने त्यांना कोणत्यातरी पक्षाबरोबर युती करावीच लागली असती. पीडीपी, नॅकॉ आणि काँग्रेस हे एकाच विचारधारेचे पक्ष असल्याने त्यांची आपापसात युती होणे चांगले नव्हते. भाजप व हे इतर पक्ष हे दोन टोके आहेत. पीडीपी व भाजप एकत्र आल्याने निदान निम्मे मंत्री तरी वेगळ्या विचारसरणीचे असतील व भाजपमुळे पीडीपी वर नियंत्रण राहील. मुफ्ती वाटेल ते बरळणारच आणि त्यावर कोणीच नियंत्रण आणू शकत नाही. परंतु हुरियतशी चर्चा करणे, पाकिस्तानी निर्वासितांना सामावून घेणे, लष्कराला दिलेला विशेषाधिकार कायदा रद्द करून संवेदनाशील क्षेत्रातून लष्कर काढून घेणे, पाकिस्तानबद्दल व अतिरेक्यांबद्दल सहानुभूती बाळगणे इ. बाबतीत नॅकॉ व काँग्रेसने अजिबात विरोध केला नसता. पण भाजपचा या गोष्टींना विरोध राहील व त्यामुळे मुफ्तीला एककल्ली कारभार करता येणार नाही.

अफझल गुरूबद्दल काश्मिरी पक्षांना पूर्वीपासूनच सहानुभूती होती. त्यामुळे मुफ्ती बडबडला त्याबद्दल नवीन काहीच नाही. फक्त मुफ्तीला कशाला दोष द्यायचा, भारतातील काही निधर्मांधांनी सुद्धा यापूर्वी अफझल गुरूबद्दल आपली सहानुभूती अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखविली आहे. (उदा. सुझन अरूंधती रॉय). मुफ्ती जे बडबडतो तेच भारतातील अनेक निधर्मांध अनेकवेळा बोललेले आहेत. जेव्हा भाजप सत्तेत नव्हता तेव्हा सुद्धा पाकिस्तानप्रेमी अनेकवेळा जाहीरपणे तसेच बोलायचे. त्यांचे तोंड बंद करता येणार नाही.

आजानुकर्ण's picture

3 Mar 2015 - 12:49 am | आजानुकर्ण

हहपुवा
*mosking*

त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत.

*clapping*
मग काँग्रेसी विचारांच्या पक्षाबरोबर भाजपाने युती का केली म्हणे? एवढं सत्तेवाचून नक्की काय अडलं होतं.

भाजपमुळे पीडीपी वर नियंत्रण राहील. मुफ्ती वाटेल ते बरळणारच आणि त्यावर कोणीच नियंत्रण आणू शकत नाही

*clapping*
नियंत्रण राहील की राहणार नाही? भाजपामुळे अशा युतीतील घटकपक्षावर कितपत नियंत्रण राहते आहे ते महाराष्ट्रातही दिसतेच आहे!!

बाकी प्रतिसाद आवडला आहे. राजनाथसिंग-मोदींसकट अनेक भाजपेयी देशभक्त मंत्र्यांसमोर मुफ्तींनी पाकिस्तानचे गुणगान गाऊनही खुर्चीसाठी युती टिकवून ठेवण्यासाठी करावी लागणारी कसरत पाहून फारच मनोरंजन होतंय.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2015 - 12:54 pm | श्रीगुरुजी

>>> मग काँग्रेसी विचारांच्या पक्षाबरोबर भाजपाने युती का केली म्हणे? एवढं सत्तेवाचून नक्की काय अडलं होतं.

वर एका प्रतिसादात सविस्तर उत्तर दिलं आहे.

>>> नियंत्रण राहील की राहणार नाही? भाजपामुळे अशा युतीतील घटकपक्षावर कितपत नियंत्रण राहते आहे ते महाराष्ट्रातही दिसतेच आहे!!

बरळण्यावर कोणीच नियंत्रण आणू शकणार नाही. परंतु पाकिस्तानवादी, अतिरेक्यांना मदत देण्याची कृती, निर्वासित पंडितांकडे दुर्लक्ष इ. गोष्टी आता पीडीपीला अनिर्बंधपणे करणे शक्य होणार नाही.

>>> बाकी प्रतिसाद आवडला आहे. राजनाथसिंग-मोदींसकट अनेक भाजपेयी देशभक्त मंत्र्यांसमोर मुफ्तींनी पाकिस्तानचे गुणगान गाऊनही खुर्चीसाठी युती टिकवून ठेवण्यासाठी करावी लागणारी कसरत पाहून फारच मनोरंजन होतंय.

त्यात काहीच कसरत नाही. मुफ्तीचे पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे. त्यात नवे काहीच नाही. भाजप नेत्यांच्या अनुपस्थितीतही मुफ्ती हेच करत होता. दोन्ही पक्षांनी आपापल्या भूमिका सोडलेल्या नाहीत.

सुनील's picture

3 Mar 2015 - 8:28 am | सुनील

पण मुफ्तीबद्दल चकार शब्द न उच्चारता काँग्रेस भाजपलाच जाब विचारत आहे. त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत

सईद यांच्या या वादग्रस्त वक्तव्याकडे काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल यांनी लक्ष वेधले. काश्मीर निवडणुकीच्या विविध टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी देत त्यांनी मुख्यमंत्री सईद यांचा दावा खोडून काढला. काश्मिरातील जनता, सीमेवर अहोरात्र तैनात सैन्यदल आणि निवडणूक आयोगाला या निवडणुकीचे श्रेय जाते, असे सांगून, सभागृहाने सईद यांच्या विधानाचा निषेध करणारा प्रस्ताव करावा, अशी वेणुगोपल यांनी केली. पाकिस्तान आणि हुर्रियतच्या सहकार्यामुळे निवडणूक यशस्वी झाल्याचे आपण पंतप्रधानांना सांगितल्याचा दावा मुख्यमंत्री सईद यांनी केला आहे. त्यामुळे सईद यांच्याशी काय बोलणे झाले हे पंतप्रधानांनी स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. मुलायमसिंह यादव यांच्यासह अनेक सदस्यांनी या मागणीला पाठिंबा दिला, पण गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही मागणी फेटाळून लावली.

(स्त्रोत - http://maharashtratimes.indiatimes.com/international/Afzal-guru/articles...)

असो...

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2015 - 12:45 pm | श्रीगुरुजी

याच बातमीतला खालील शेवटचा परिच्छेद द्यायचा विसरलात का मुद्दाम देण्याचे टाळले?

सईद यांच्या विधानाशी केंद्र सरकार आणि भाजप पूर्णपणे असहमत असल्याची भूमिका राजनाथ सिंह यांनी मांडली. आपण हे विधान विचारपूर्वक आणि पंतप्रधान मोदी यांच्या सहमतीने करीत असून, त्याविषयी कोणताही वाद वा संभ्रम निर्माण होऊ नये. जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीचे श्रेय निवडणूक आयोग, लष्कर आणि निमलष्कराचे जवान तसेच तेथील जनतेला जाते, असे राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंग यांनी अगदी स्पष्ट व निसंदिग्ध शब्दात काश्मिरमधील शांततेत पार पडलेल्या निवडणुकीचे श्रेय काश्मिरमधील जनतेला, निवडणुक आयोगाला व लष्कराला दिले आहे. त्यामुळे यावर अजून काही वेगळे बोलण्याची गरज नाही.

भारतात अनेकजण, अनेक ठिकाणी, अनेकवेळा प्रक्षोभक विधाने करत असतात. अशा प्रत्येक विधानाचा संसदेत निषेध व्हायचा असेल तर दरवर्षी फक्त निषेधासाठी संसदेचे एक वेगळे अधिवेशन बोलवावे लागेल.

सुनील's picture

3 Mar 2015 - 1:24 pm | सुनील

माझा प्रतिसाद तुमच्या खालील वाक्याबद्दल होता.

पण मुफ्तीबद्दल चकार शब्द न उच्चारता काँग्रेस भाजपलाच जाब विचारत आहे. त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत

ते चुकीचे आहे, हेच सिद्ध करायचे होते, जे झाले आहे.

असो.

कपिलमुनी's picture

3 Mar 2015 - 2:51 pm | कपिलमुनी

आता इकडे प्रतिवाद नाही. कारण ते त्यांना सोयीस्कर नाही.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2015 - 9:58 pm | श्रीगुरुजी

मी प्रतिवाद करतोच. जेव्हा लॉगिन होईन तेव्हाच प्रतिवाद करणे शक्य असते. इतरांसारखा मी अहोरात्र मिपावर नसतो. तेव्हा सुतावरून स्वर्गाला जाण्याऐवजी जरा धीर धरा.

खाली उत्तर दिलेले आहे.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2015 - 9:57 pm | श्रीगुरुजी

काँग्रेस दुतोंडी आहे. एकीकडे लोकसभेत मुफ्तीच्या विधानाचा संसदेने निषेध करावा व थेट मोदींनी याबाबत निवेदन करावे अशी मागणी करताना दुसरीकडे काँग्रेसचा वरिष्ठ नेता असलेल्या मणिशंकरने "अफझल गुरूवर अन्याय झाला. त्याला फाशी देण्यासाठी पुरावा नव्हता. त्याचे शव नातेवाईकांच्या ताब्यात द्यायला हवे." असे जाहिररित्या सांगितले आहे. मुफ्तीच्या विधानावर मोदींनी निवेदन करावे अशी मागणी करताना मण्याच्या विधानावर काँग्रेसच्या कोणी निवेदन करायचे? सोनिया गांधींनी का मनमोहन सिंगांनी? म्हणूनच मी लिहिले की मुफ्तीला जाब न विचारता काँग्रेस मोदींना जाब विचारत आहे आणि मण्याच्या विधानावर तर काँग्रेसची नेहमीप्रमाणे दातखीळ बसलेली आहे. काँग्रेसची संसदेतील भूमिका खरी का मण्याच्या तोंडातून येणारी मुक्ताफळे खरी? नेहमीप्रमाणे काँग्रेस दुतोंडी भूमिका बजावत आहे. एकीकडे मुफ्तीच्या विधानाचा निषेध करावा असा आग्रह धरून आपण राष्ट्रप्रेमी असण्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे अफझल गुरूबद्दल सहानुभूती दाखवून आपले किळसवाणे व्होटबँक राजकारण सुरूच ठेवायचे.

सुदैवाने अफझल गुरूबाबत भाजपमध्ये वरपासून खालपर्यंत सर्व नेत्यांची एकच भूमिका आहे.

मोदींनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना अत्यंत स्पष्ट व निसंदिग्ध शब्दात मुफ्तीच्या विधानाविषयी असहमती दर्शविली. गृहमंत्रालयाने अफझल गुरूचे अवशेष ताब्यात द्यायची मागणी फेटाळून लावलेली आहे.

आजानुकर्ण's picture

3 Mar 2015 - 10:37 pm | आजानुकर्ण

अहो गुरुजी मोदींनाच जाब विचारणार. ५६ इंचाची छाती घेऊन पाकिस्तानपासून भारताचे रक्षण करण्याचा दावा मोदींनी केला होता, मण्याने नाही. आता भाजपा-पीडीपी शय्यासोबत असलेल्या मंत्रीमंडळाच्या पाकिस्तान-हुर्रियत-अतिरेकीप्रेमी मुख्यमंत्री मुफ्तीच्या पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेच्या दाव्याबाबतचा जाब मोदींना विचारणार नाही तर काय मण्याला विचारणार का?

तिकडे काश्मीरमध्ये पीडीपीशी व्याभिचार करायचा आणि दिल्लीत पतिव्रतेचा आव आणायचा याला दुतोंडीपणा म्हणतात. काँग्रेस जे करत आहे त्याला नाही. एवढं शिंपल तुम्हाला कळू नये याचं आश्चर्य वाटतं.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2015 - 10:45 pm | श्रीगुरुजी

>>> अहो गुरुजी मोदींनाच जाब विचारणार. ५६ इंचाची छाती घेऊन पाकिस्तानपासून भारताचे रक्षण करण्याचा दावा मोदींनी केला होता, मण्याने नाही. आता भाजपा-पीडीपी शय्यासोबत असलेल्या मंत्रीमंडळाच्या पाकिस्तान-हुर्रियत-अतिरेकीप्रेमी मुख्यमंत्री मुफ्तीच्या पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेच्या दाव्याबाबतचा जाब मोदींना विचारणार नाही तर काय मण्याला विचारणार का?

अहो ज्याने हे विधान केले त्यालाच जाब विचारायला नको का? मोदी तुम्हाला आवडत नसेल, पण म्हणून इतर कोणी काहीही बरळलं तरी त्या व्यक्तीला न विचारता मोदींनाच जाब विचारायचा?

असो. मोदींनी त्यावर सविस्तर उत्तर दिलेले आहे.

>>> तिकडे काश्मीरमध्ये पीडीपीशी व्याभिचार करायचा आणि दिल्लीत पतिव्रतेचा आव आणायचा याला दुतोंडीपणा म्हणतात. काँग्रेस जे करत आहे त्याला नाही. एवढं शिंपल तुम्हाला कळू नये याचं आश्चर्य वाटतं.

काय व्यभिचार केला? काँग्रेस दोन तोंडांनी परस्परविरोधी देशहितविरोधी भूमिका मांडत आहे आणि तो तुम्हाला दुतोंडीपणा वाटत नाही! धन्य आहे.

आजानुकर्ण's picture

4 Mar 2015 - 3:14 am | आजानुकर्ण

अहो ज्याने हे विधान केले त्यालाच जाब विचारायला नको का? मोदी तुम्हाला आवडत नसेल, पण म्हणून इतर कोणी काहीही बरळलं तरी त्या व्यक्तीला न विचारता मोदींनाच जाब विचारायचा?

अहो आधी तुम्हीच म्हणालात की मुफ्तीचं पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे. जी गोष्ट जगजाहीर आहे त्याबाबत त्याच व्यक्तीला जाब कसाकाय विचारणार? नंतर ती व्यक्ती आपल्या देशप्रेमी ५६ इंच परिधानमंत्र्यांच्या चर्चेचा उल्लेख करते तेव्हा नमोजीशेठला विचारणे आवश्यकच आहे.

काय व्यभिचार केला?

व्यभिचार हाच की ज्या व्यक्तीचे पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे त्याच्याच नेतृत्वाखाली सत्तेची पोळी लाटण्यासाठी शय्यासोबत करणे आणि नंतर दिल्लीत येऊन आम्ही आमच्या धोरणावर ठाम आहोत हे सांगणे!

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2015 - 12:25 pm | श्रीगुरुजी

>>> अहो आधी तुम्हीच म्हणालात की मुफ्तीचं पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे. जी गोष्ट जगजाहीर आहे त्याबाबत त्याच व्यक्तीला जाब कसाकाय विचारणार? नंतर ती व्यक्ती आपल्या देशप्रेमी ५६ इंच परिधानमंत्र्यांच्या चर्चेचा उल्लेख करते तेव्हा नमोजीशेठला विचारणे आवश्यकच आहे.

मग फक्त मोदींना कशाला? ज्या व्यक्तीने मुक्ताफळे उधळली त्याला जाब विचारण्याची तुमची हिंमत नाही. उलट ज्यांनी हे वक्तव्य केले नाही त्यालाच जाब विचारताय? तर मग फक्त मोदी कशाला? पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, नवीन पटनाईकांना विचारा, गेलाबाजार सोनिया गांधींना विचारा. फक्त मोदींना कशाला?

>>> व्यभिचार हाच की ज्या व्यक्तीचे पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे त्याच्याच नेतृत्वाखाली सत्तेची पोळी लाटण्यासाठी शय्यासोबत करणे आणि नंतर दिल्लीत येऊन आम्ही आमच्या धोरणावर ठाम आहोत हे सांगणे!

मुफ्तीने नॅकॉ किंवा/आणि काँग्रेसबरोबर युती केली असती तर या दोन पक्षांनी त्याच्या सुरात सुर मिसळला असता किंवा मौन पाळले असते. याउलट भाजपने स्पष्ट शब्दात प्रत्युत्तर दिलेले आहे. मुफ्तीसारख्यांना कह्यात ठेवण्यासाठी हा बडगा आवश्यक होताच. भाजप बरोबर असल्याने आता मुफ्ती कितीही बरळला तरी त्याला प्रत्यक्ष कृतीसाठी मोकळे रान मिळणार नाही कारण तसे करायचा प्रयत्न केला तर भाजपचा सोटा लगेच पाठीत बसेल. त्यामुळे हा व्यभिचार नसून मुफ्तीसारख्यांना ताब्यात ठेवण्यासाठी योग्य ते पाऊल उचललेले आहे.

प्रसाद१९७१'s picture

4 Mar 2015 - 11:01 am | प्रसाद१९७१

अहो ज्याने हे विधान केले त्यालाच जाब विचारायला नको का? मोदी तुम्हाला आवडत नसेल, पण म्हणून इतर कोणी काहीही बरळलं तरी त्या व्यक्तीला न विचारता मोदींनाच जाब विचारायचा?

अहो ज्याने विधान केले आहे, तो तुमचा विधीवत पार्टनर आहे ( नवरा का बायको ते द्या सोडुन ). तो कोणीही नाहीये. उद्या कॉग्रेस चे कोणी काही बरळले तर मोदींना कोणी विचारणार नाहीये.

आधी सरकार मधुन बाहेर पडा आणि मग मुफ्ती म्हणला ते चूक आहे वैगरे म्हणा.

इथेही भाजपनी इतकी लाचारी दाखवली आहे. भाजपचे २५ आणि पीडीपी चे २८ असे आमदार असताना, अर्थ, गृह अशी महत्वाची खाती पीडीपी कडेच.

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2015 - 12:31 pm | श्रीगुरुजी

>>> अहो ज्याने विधान केले आहे, तो तुमचा विधीवत पार्टनर आहे ( नवरा का बायको ते द्या सोडुन ). तो कोणीही नाहीये. उद्या कॉग्रेस चे कोणी काही बरळले तर मोदींना कोणी विचारणार नाहीये.

पार्टनर असला तरी त्याला जाब न विचारता मोदींना जाब विचारणे हास्यास्पद आहे.

>>> आधी सरकार मधुन बाहेर पडा आणि मग मुफ्ती म्हणला ते चूक आहे वैगरे म्हणा.

कशाला बाहेर पडायचं? मुफ्तीवर वचक ठेवण्यासाठी भाजपने बरोबर असणे गरजेचे आहे. आज भाजपची त्याला गरज आहे. त्याने इतर पक्षांबरोबर युती केली असती तर त्याला रान मोकळे मिळाले असते. आता तसे होणे नाही.

>>> इथेही भाजपनी इतकी लाचारी दाखवली आहे. भाजपचे २५ आणि पीडीपी चे २८ असे आमदार असताना, अर्थ, गृह अशी महत्वाची खाती पीडीपी कडेच.

त्याने काहीच फरक पडत नाही. काश्मिरमधील गृह व अर्थ खात्याला काहीच अर्थ नाही. काश्मिरची सुरक्षा सैन्याच्या ताब्यात आहे आणि सैन्य केंद्राच्या ताब्यात आहे. अ‍ॅफ्स्पामुळे सैन्याला विशेष अधिकार मिळालेले आहेत. प्रॅक्टीकली काश्मिरचे गृहखाते केंद्राकडेच आहे, काश्मिरचा गृहमंत्री नामधारी आहे. अर्थखात्याची तीच अवस्था आहे. काश्मिरची अर्थव्यवस्था केंद्राच्या मदतीवरच चालते. तिथला अर्थमंत्री नामधारी असतो.

तुमचे वाचन आणि आकलन कमी असल्याने तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत.

प्रसाद१९७१'s picture

4 Mar 2015 - 1:17 pm | प्रसाद१९७१

पडलो तरी नाक वरच असे तुमचे आहे:-)
किंवा तुम्ही भाजप मधे नोकरी करता.

थॉर माणूस's picture

4 Mar 2015 - 2:04 pm | थॉर माणूस

Now you got it right. :D

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2015 - 10:49 pm | श्रीगुरुजी

>>> पडलो तरी नाक वरच असे तुमचे आहे:-)
किंवा तुम्ही भाजप मधे नोकरी करता.

मी पडलेलो नाही आणि पडल्यानंतर सुद्धा नाक वर करण्याची सवय मला नाही. त्याचप्रमाणे मी भाजपमध्ये नोकरी करत नाही.

तुमचा वरील प्रतिसाद तुमच्या वैफल्याचे प्रतिबिंब आहे. तुमचे वाचन कमी आहे, तुमची माहिती अत्यल्प व चुकीची आहे व तुमच्या मनात पूर्वग्रह आणि चुकीची मते ठासून भरलेली आहेत. त्यामुळेच राजकारण असो वा अर्थकारण, तुमचे आकलन कमी आहे.

या धाग्यावरील तुमचे प्रतिसाद पाहिले तर हे सहज लक्षात येईल. खालील धाग्यावर तुमचा प्रतिसाद व त्याला मिळालेले यथायोग्य उत्तर यामुळे मी वर दिलेला अभिप्राय सिद्ध होते. असे माझे एकट्याचेच मत नाही, इतरांचेही आहे हे लक्षात आले असावे अशी आशा आहे.

http://www.misalpav.com/comment/671362#comment-671362

http://www.misalpav.com/comment/671446#comment-671446

असे असले तरी वरील अभिप्रायाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास तुम्हालाच फायदा होईल. वाचन वाढविलेत, अभ्यास वाढविलात, स्वयंप्रयत्नाने नवीन माहिती मिळविलीत, मनातले पूर्वग्रह काढून टाकलेत तर नक्कीच सुधारणा होऊ शकेल.

असो.

अनुप ढेरे's picture

4 Mar 2015 - 1:32 pm | अनुप ढेरे

त्याने इतर पक्षांबरोबर युती केली असती तर त्याला रान मोकळे मिळाले असते.

काहिही. सईद आधी देखील कॉंग्रेस बरोबर सत्तेत होते. काय केलं मोकळ्या रानाचं? या सत्तेची गरज भाजपाला जास्तं आहे असं वाटतय.

पण मुफ्तीबद्दल चकार शब्द न उच्चारता काँग्रेस भाजपलाच जाब विचारत आहे. त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत

हे तुमचे विधान निखालस चुकीचे होते हे सिद्ध झाले आहे. बाकी फाफटपसारा तुम्हालाच लखलाभ!

इत्यलम.

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2015 - 12:37 pm | श्रीगुरुजी

नाही सिद्ध झालं. कारण एकीकडे मुफ्तीच्या विधानाचा स्वतः प्रत्यक्ष निषेध न करता किंवा मुफ्तीला जाब न विचारता, संसदेने मुफ्तीच्या निषेधाचा ठराव मंजूर करावा व त्याबाबत मोदींनी जाब द्यावा असा काँग्रेसने आग्रह धरला आहे आणि त्याचवेळी मण्याच्या तोंडातून मुफ्तीच्या बरळण्याशी काँग्रेसने संमती दर्शविली आहे.

मी आधीच लिहिलं होतं की मुफ्तीचे विचार आणि काँग्रेसचे विचार वेगळे नाहीत. मण्याच्या बडबडण्यामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं इतकंच.

कपिलमुनी's picture

4 Mar 2015 - 1:35 pm | कपिलमुनी

काँग्रेस वायझेड आहे . दिग्गू , मण्या काहीही बरळतात . मुफ्ती तर पाकिस्तानी धार्जिना आने . केजरी आणि गँग देशाच्या एकात्मतेला धोका आहे.

हे सगळ मान्य केला तरीही भाजपाने अजूनही मांडलेला संसार समर्थनीय ठरू शकत नाही.
भाजपाची आणि पीडीपी ची भुमिका एक नसेल तर मग कोणत्या आधारावर राज्य चालू आहे ?

केंद्र सरकार कारवाई का करत नाहिये ?
जाता जाता भाजपची मंत्री यादी मधे पण फुटीरतावादी आहेत्च

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2015 - 10:52 pm | श्रीगुरुजी

>>> हे सगळ मान्य केला तरीही भाजपाने अजूनही मांडलेला संसार समर्थनीय ठरू शकत नाही.

काही जणांच्या मते हा संसार समर्थनीय नसू शकतो. असे मत असण्यास काहीच चूक नाही. भारतात किंवा जगात कोणत्याही गोष्टीवर एकमत असणे अत्यंत अवघड आहे.

>>> भाजपाची आणि पीडीपी ची भुमिका एक नसेल तर मग कोणत्या आधारावर राज्य चालू आहे ?

किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर राज्य चालेल.

>>> केंद्र सरकार कारवाई का करत नाहिये ?

कोणावर आणि घटनेच्या कोणत्या कलमाखाली कारवाई करणार? मुफ्तीच्या बोलण्यामुळे कोणत्या कायद्याचे किंवा घटनेच्या कलमाचे उल्लंघन झाले आहे?

>>> जाता जाता भाजपची मंत्री यादी मधे पण फुटीरतावादी आहेत्च

कोण हा मंत्री?

कपिलमुनी's picture

5 Mar 2015 - 2:44 pm | कपिलमुनी

सज्जाद गनी लोन : बाकी माहिती गुगलबाबा पुरवेलच

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2015 - 5:05 pm | श्रीगुरुजी

सज्जाद गनी लोनचे वडील अब्दुल गनी लोन पूर्वी काँग्रेसमध्ये होते. १९६७ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढविली होती. १९७८ मध्ये त्यांनी पीपल्स कॉन्फरन्स नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. १९९० च्या दशकात अनेक फुटिरतावादी संघटनांनी व पक्षांनी एकत्र येऊन ऑल पार्टी हुरियत कॉन्फरन्स नावाची संघटना स्थापन केली. हुरियतमध्ये अब्दुल गनी लोन च्या बरोबरीने मिरवैझ फारूक, यासीन मलिक, शाबीर शाह, अब्दुल गनी भट, गिलानी इ. मंडळी होती. यात तीन मतप्रवाह होते. गिलानी, भट इ. ना काश्मिरचे पाकिस्तानबरोबर विलिनीकरण हवे होते, इतरांना काश्मिर हा वेगळा देश म्हणून हवा होता. अब्दुल गनी लोन ला भारताच्या अंतर्गत काश्मिरला संपूर्ण स्वायत्तता हवी होती.

अब्दुल गनी लोन हे त्यातला त्यात मवाळ व्यक्तिमत्व. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय ला काश्मिरचे पाकिस्तानमध्ये विलिनीकरण हवे होते. काश्मिर स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहणे किंवा काश्मिर अधिक स्वायत्ततेसह भारताचा भाग म्हणून राहणे हे आयएसआयच्या योजनेच्या विरोधात होते. अतिरेकी कारवाया करून आपल्याला हवे ते पदरात पाडून घ्यावे याला अब्दुल गनी लोनचा विरोध होता. त्यांना शांततापूर्ण तोडगा हवा होता. हुरियतमधील इतरांचा अतिरेक्यांना विरोध नव्हता.

आपल्या योजनेच्या विरोधात अब्दुल गनी लोन जात आहे हे लक्षात आल्याने २००२ मध्ये आयएसआय ने भर सभेत त्यांची हत्या घडवून आणली. त्यावेळी जाहीरपणे सज्जाद लोन ने हत्येमागे आयएसआय असल्याचा आरोप केला होता.

आपल्या वडीलांच्या हत्येनंतर सज्जाद लोन हळूहळू हुरियतपासून दूर जाउ लागला. कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीत सहभागी होण्यास हुरियतचा प्रखर विरोध होता. सज्जाद लोन २००९ पर्यंत हुरियत बरोबर होता. परंतु २००९ मध्ये तो हुरियतपासून दूर गेला. हुरियतचा विरोध डावलून सज्जाद प्रथम २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहिला, पण निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर २०१४ मध्ये जम्मू-काश्मिर विधानसभा निवडणुकीत सज्जाद लोन च्या पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते. त्यात तो स्वतः व अजून एक उमेदवार निवडून आला. भाजपने सज्जाद लोन विरूद्ध आपला उमेदवार दिलेला नव्हता. नरेंद्र मोदींना दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याला टीका सहन करावी लागली होती.

आता पीडीपी-भाजपच्या मंत्रीमंडळात भाजपच्या कोट्यातून सज्जाद लोन ला मंत्रीपद देण्यात आले आहे.

Separatist leaders say Lone had moved away from separatism long ago. "The day he participated in the elections in 2009, he ceased to be a separatist. Calling him a former pro-freedom or separatist is wrong and it will not have any impact on the ideology of separatists," said a senior pro-independence Jammu and Kashmir Liberation Front (JKLF) leader.

सज्जाद लोन हा २००९ पर्यंत फुटिरतावादी गटाबरोबर होता, परंतु आता फुटिरतावादी नाही. परंतु २००९ पासून तो फुटिरतावादी गटापासून दूर गेला आहे. तो हुरियतपासून दूर गेल्यामुळे फुटिरतावाद्यांमध्ये काही प्रमाणात तरी फूट पडलेली आहे. सज्जाद सारख्या इतरांना हुरियत कॉन्फरन्स किंवा त्यासारख्या फुटिरतावादी गटांपासून दूर करणे आवश्यक आहे. ही मंडळी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही यंत्रणेत सामील झाली तर फुटिरतावाद कमी होऊ शकेल. सज्जाद सारख्या इतरांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. फुटिरतावाद्यांची ताकद कमी करण्यासाठी त्यांच्यातील मवाळांना फोडणे ही जुनी युक्ती आहे. १९८० च्या दशकात खलिस्तानी चळवळीतील कट्टर भिंद्रनवालेचे महत्त्व कमी करण्यासाठी तुलनेने मवाळ अशा लोंगोवाल यांना तत्कालीन सरकारने पुढे आणले होते. आता तसेच होत आहे.

बादवे, तुम्हाला "लाल डेंगा" माहिती असेल ना?

प्रसाद१९७१'s picture

3 Mar 2015 - 1:31 pm | प्रसाद१९७१

सईद यांच्या विधानाशी केंद्र सरकार आणि भाजप पूर्णपणे असहमत असल्याची भूमिका राजनाथ सिंह यांनी मांडली.

कोणाला फसवताय गुरुजी. शिवसेनेनी विरोधी मत मांडले की लगेच विचारतात भाजपेयी की तुम्ही पण सत्तेत आहात ना, मग एक तर सत्ता सोडा नाहीतर गप्प बसा.

मुख्यमंत्र्याचे मत हे त्या पूर्ण सरकारचे मत असते. काश्मीर च्या केस मधे ह्या सरकारमधे भाजप पण आहे. जर मत पटत नसेल तर सरकार मधुन बाहेर पडा. नाहीतर मत पटले आहे असे सांगा.
सत्ते साठी कोलांट्याउड्या मारु नका.
शामाप्रसाद मुखर्जींची थोडीतरी आठवण ठेवा. त्यांना तर नेहरु मंत्रीमंडळात मानाचे स्थान मिळत होते, पण ते गेले नाहीत. आणि ही लोक पीडीपी शी लग्न लावून बसली आहेत.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2015 - 10:06 pm | श्रीगुरुजी

>>> कोणाला फसवताय गुरुजी. शिवसेनेनी विरोधी मत मांडले की लगेच विचारतात भाजपेयी की तुम्ही पण सत्तेत आहात ना, मग एक तर सत्ता सोडा नाहीतर गप्प बसा.

मग मुफ्ती तसं सांगू दे भाजपला. भाजपने स्पष्ट शब्दात विरोध करून का गप्प बसलाय तो?

>>> मुख्यमंत्र्याचे मत हे त्या पूर्ण सरकारचे मत असते.

असं नसतं. निर्णय पूर्ण सरकारचे असतात. प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. नरेंद्र मोदींचं मत म्हणजे शिवसेना, अकाली दल अशा पक्षांचं मत नाही. मात्र मोदी सरकारचे निर्णय हे पूर्ण सरकारचे असतात.

>>> काश्मीर च्या केस मधे ह्या सरकारमधे भाजप पण आहे. जर मत पटत नसेल तर सरकार मधुन बाहेर पडा. नाहीतर मत पटले आहे असे सांगा. सत्ते साठी कोलांट्याउड्या मारु नका.

मुफ्तीला ठणकावण्यासाठी भाजप हवाच. काँग्रेस किंवा नॅकॉ ते जमणार नाही. पीडीपीच्या सुरात सुर मिसळून काँग्रेसने अफझल गुरूच्या बाबतीत मुफ्तीचे जे मत होते त्याचेच समर्थन केले आहे. काश्मिरमध्ये इतर सर्व पक्ष देशहिताविरूद्ध भूमिका घेत असताना देशहिताची भूमिका घेणारा भाजपसारखा एक तरी पक्ष हवाच.

आजानुकर्ण's picture

3 Mar 2015 - 7:32 pm | आजानुकर्ण

भारतात अनेकजण, अनेक ठिकाणी, अनेकवेळा प्रक्षोभक विधाने करत असतात. अशा प्रत्येक विधानाचा संसदेत निषेध व्हायचा असेल तर दरवर्षी फक्त निषेधासाठी संसदेचे एक वेगळे अधिवेशन बोलवावे लागेल.

गुरुजी हे मान्य आहे. त्यामुळेच ओवेसी किंवा भागवत यांच्या प्रत्येक विधानाचा निषेध करण्याची गरजही नसते. पण लोकनियुक्त सरकारचा प्रमुख जेव्हा असे विधान करतो तेव्हा त्याची विशेष दखल घ्यावीच लागते. माननीय मुख्यमंत्री मुफ्ती सईद म्हणजे असदु्द्दीन ओवेसी किंवा मोहन भागवत नाही की ज्यांच्या विधानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे.

राजनाथ सिंग यांनी अगदी स्पष्ट व निसंदिग्ध शब्दात काश्मिरमधील शांततेत पार पडलेल्या निवडणुकीचे श्रेय काश्मिरमधील जनतेला, निवडणुक आयोगाला व लष्कराला दिले आहे. त्यामुळे यावर अजून काही वेगळे बोलण्याची गरज नाही.

हो हे खरंय, पण ज्या मंत्रीमंडळाच्या प्रमुखपदी पाकिस्तानचे आभार मानणारी आणि अतिरेकी-हुर्रियतप्रती कृतज्ञ असणारी व्यक्ती आहे त्या मंत्रीमंडळात राहणे आणि पीडीपीसोबत शय्यासोबत करणे अनैतिक वाटत नाही का? अगदी काही दिवसांपूर्वी त्या प्रशांतभूषणने काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केले म्हणून त्याच्या देशभक्तीबाबत शंका काढून आकाशपाताळ करणारी मंडळी आता मुफ्ती सईदच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि भक्तांकडून त्याचे समर्थनही केले जाते याचे आश्चर्य वाटते इतकेच.

विरोधी मते असणाऱ्या पक्षासोबत युती करुन त्या पक्षावर नियंत्रण ठेवता येते हा राजकारणातला गुरुजी सिद्धांत म्हणावा काय? या सिद्धांतानुसार उद्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत, कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दलासोबत आणि केरळात कम्युनिष्ट पक्षासोबत युती करण्यात काहीही हरकत दिसत नाही. नाहीतरी बारामतीला येऊन त्याची पायाभरणी झालीच आहे.

बाकी उद्या त्या अफजलगुरुच्या पार्थिवावरुन भाजपाने सरकारमधून अंग काढून घेतले तर त्या निर्णयाचाही तुम्ही बचाव कसा कराल याची आता फक्त उत्सुकता आहे!

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2015 - 10:29 pm | श्रीगुरुजी

>>> गुरुजी हे मान्य आहे. त्यामुळेच ओवेसी किंवा भागवत यांच्या प्रत्येक विधानाचा निषेध करण्याची गरजही नसते. पण लोकनियुक्त सरकारचा प्रमुख जेव्हा असे विधान करतो तेव्हा त्याची विशेष दखल घ्यावीच लागते. माननीय मुख्यमंत्री मुफ्ती सईद म्हणजे असदु्द्दीन ओवेसी किंवा मोहन भागवत नाही की ज्यांच्या विधानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे.

मोदींनी अत्यंत स्पष्ट व निसंदिग्ध शब्दात मुफ्तीच्या विधानाला विरोध केलेला आहे. अर्थात याची गरज नव्हती कारण राजनाथ सिंगांनी कालच हे निवेदन केलेले होते. अशी वादग्रस्त विधाने करणार्‍या मुफ्तीसारख्यांच्या विधानाला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही.

>>> हो हे खरंय, पण ज्या मंत्रीमंडळाच्या प्रमुखपदी पाकिस्तानचे आभार मानणारी आणि अतिरेकी-हुर्रियतप्रती कृतज्ञ असणारी व्यक्ती आहे त्या मंत्रीमंडळात राहणे आणि पीडीपीसोबत शय्यासोबत करणे अनैतिक वाटत नाही का? अगदी काही दिवसांपूर्वी त्या प्रशांतभूषणने काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केले म्हणून त्याच्या देशभक्तीबाबत शंका काढून आकाशपाताळ करणारी मंडळी आता मुफ्ती सईदच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि भक्तांकडून त्याचे समर्थनही केले जाते याचे आश्चर्य वाटते इतकेच.

>>> विरोधी मते असणाऱ्या पक्षासोबत युती करुन त्या पक्षावर नियंत्रण ठेवता येते हा राजकारणातला गुरुजी सिद्धांत म्हणावा काय? या सिद्धांतानुसार उद्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत, कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दलासोबत आणि केरळात कम्युनिष्ट पक्षासोबत युती करण्यात काहीही हरकत दिसत नाही.

हे पक्ष एकमेकांच्या पूर्णपणे विरोधी मतांचे आहेत हा गैरसमज आहे. बहुसंख्य बाबतीत जवळपास सर्वच पक्षांची सारखीच मते आहेत. काही थोड्या बाबतीत वेगळी मते असतात.

नियंत्रणाचे एक उदाहरण देतो. १९९८-२००४ या काळात भाजपची नॅकॉ बरोबर युती होती. फारूक अब्दुल्ला काश्मिरचा मुख्यमंत्री होता व उमर अब्दुल्ला वाजपेयी मंत्रीमंडळात परराष्ट्र राज्यमंत्री होते. २०००/२००१ साली जम्मू-काश्मिर राज्याला १९५३ च्या पूर्वी जशी स्वायत्तता होती (संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे इ. फक्त ४ विभाग केंद्राकडे आणि उर्वरीत सर्व राज्याकडे अशी १९५३ पूर्वी स्थिती होती) तशीच स्वायत्तता पुन्हा द्यावी असा ठराव विधानसभेत मंजूर करून घेतला. असा ठराव मांडू नका असे वाजपेयींनी सांगूनसुद्धा फारूक अब्दुल्लाने त्यांची सूचना धुडकावून हा ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठविला. आपला सहकारी पक्ष असूनसुद्धा गृहमंत्रालयाने तातडीने बैठक घेऊन काही दिवसांच्या अवधीतच हा फुटिरतावादी ठराव फेटाळून लावला. त्यानंतर परत तसला ठराव आलेला नाही. सहकारी पक्ष फुटिरातवादी असूनसुद्धा त्यावर नियंत्रण ठेवता येते ते असे.

>>> बाकी उद्या त्या अफजलगुरुच्या पार्थिवावरुन भाजपाने सरकारमधून अंग काढून घेतले तर त्या निर्णयाचाही तुम्ही बचाव कसा कराल याची आता फक्त उत्सुकता आहे!

कोणत्या परिस्थितीत व कोणत्या मुद्द्यांवरून सरकारमधून बाहेर पडतील त्यावर माझा प्रतिसाद अवलंबून राहील.

थॉर माणूस's picture

3 Mar 2015 - 10:20 am | थॉर माणूस

अहो आता माती खाल्ली तर खाल्ली. मग त्यात काजू, बदाम आहेत वगैरे बाता कशाला.

त्रिशंकू बद्दल येवढंच वाईट वाटंतय तर परत निवडणूका लावा. आणि या बहुमत घेऊन, हाकानाका. :)

रमेश आठवले's picture

3 Mar 2015 - 3:35 am | रमेश आठवले

१९ व्या शतकातील जर्मन पुढारी ओट्टो फोन बिस्मार्क यांनी छोट्या छोट्या जर्मन भाषी गणराज्याचे एकत्रीकरण करून सध्याचे जर्मन संघ राज्य निर्माण केले. त्यांनी असे म्हटले आहे की-
“Politics is the art of the possible, the attainable — the art of the next best”
सध्याचे जम्मू काश्मीरचे सरकार या तत्वाचेच उदाहरण आहे. एकदा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले की आधीच्या सर्व वल्गना विसरून राजकीय पक्षांना तडजोड करावी लागते.
मुफ्ती किंवा त्यांचे सहकारी काहीही बोलले तरी त्यांना सरकार चालवण्यासाठी राज्यात आणि केंद्रात भाजपा वर अवलंबून रहावे लागणार आहे.
इतर राज्यांच्या तुलनेने काश्मीर हे राज्य आर्थिक दृष्ट्या केंद्रावर फार जास्त अवलंबून आहे हे सत्य ही मुफ्ती आणि त्यांच्या साथीदारांना माहिती आहे.
काश्मीर मध्ये भाजपा सत्तेत भागीदार आहे ही एकच फार मोठी आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे

अर्धवटराव's picture

3 Mar 2015 - 4:03 am | अर्धवटराव

सगळेच स्टेक होल्डर्स एका नव्या डावाला सुरुवात करुन बसलेत. कुणी काय म्हटलं आणि कोणाची कशी जिरली वगैरे गॉसीप्सपेक्षा हे प्रकरण फार खोल आहे.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2015 - 12:38 pm | श्रीगुरुजी

काश्मीर मध्ये भाजपा सत्तेत भागीदार आहे ही एकच फार मोठी आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे

+१

अगदी बरोबर सांगितलंत.

प्रसाद१९७१'s picture

3 Mar 2015 - 10:56 am | प्रसाद१९७१

अगदी शरम वाटते आहे भाजपला मत दिल्याबद्दल आणि हे माझे नाही माझ्या आसपासच्या अनेक लोकांचे मत आहे. आत्ता निवडणुक झाली तर हे मतदार मतदानाला बाहेर पडतील असे वाटत नाही.

महाराष्ट्रात देवेंद्र सरकार नी तर कमाल केली आहे. गोहत्या बंदीच्या मागे लागले आहेत, पण सत्तेवर येण्यासाठी टोल बंदीचे आश्वासन दिले होते ते विसरलेत. तसेच म्हशी मारल्यातर चालतील पण गाई नाहीत, हे कसले मूर्ख लॉजिक आहे? १ महीन्यात भ्रष्टाचारी तुरुंगात जाणार होते, अजुन चौकशी पण नाही सुरु केली.
आणि ती काय भिकार बजेट दिली मोदी सरकारनी, अगदी लाज आणली.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2015 - 12:49 pm | श्रीगुरुजी

>>> अगदी शरम वाटते आहे भाजपला मत दिल्याबद्दल

मग नका देऊ पुढच्या वेळी भाजपला मत. हाकानाका.

>>> १ महीन्यात भ्रष्टाचारी तुरुंगात जाणार होते, अजुन चौकशी पण नाही सुरु केली.

जरा वाचन वाढवा.

>>> आणि ती काय भिकार बजेट दिली मोदी सरकारनी, अगदी लाज आणली.

अर्थसंकल्पातील नक्की कोणकोणत्या तरतुदींमुळे लाज आणली हे जरा सविस्तर सांगाल का?

हाडक्या's picture

4 Mar 2015 - 6:11 am | हाडक्या

मग नका देऊ पुढच्या वेळी भाजपला मत. हाकानाका.

:)))) . :))))
हे बाकी आवडलं.. वाखू साठवता येत नसली तरी या प्रतिसादाचा भविष्यात रेफरन्स म्हणून भलताच उपयोग दिसतोय.

प्रसाद१९७१'s picture

3 Mar 2015 - 1:25 pm | प्रसाद१९७१

>>> १ महीन्यात भ्रष्टाचारी तुरुंगात जाणार होते, अजुन चौकशी पण नाही सुरु केली.

जरा वाचन वाढवा.

कुठली चौकशी केली सुरु गुरुजी? ती भुजबळांची? आणि सत्तेवर येउन ४ महीने झाले, पाटबंधारे आणि PWD आणि सहकार खात्यातल्या कीती चौकश्या चालू झाल्या? आणि इतक्या उघड भ्रष्टाचारांच्या चौकशी ला इतका वेळ का लागावा? कीती अधिकार्‍यांवर FIR झाला? ४ महीने बक्कळ वेळ आहे ज्याला काही करायचे आहे त्याच्या साठी.
तुम्हीच जरा नीट डोळे उघडे ठेवुन बघा. आत्ता पर्यंत स्पेशल कोर्ट सुरु करुन खटले उभे रहायला पाहीजे होते.

आणि मोदींनी तर बारामतीला जाउन कळस केला आहे.

टोल चे काय झाले? त्या बाबत निर्णय घ्यायला वेळ लागावा असे त्यात काय अवघड आहे? आणि मग प्रचारात धाधांत खोटे का सांगितले? केजरीवालांकडुन शिका काहीतरी.

अर्थसंकल्पातील नक्की कोणकोणत्या तरतुदींमुळे लाज आणली हे जरा सविस्तर सांगाल का?

काही तरतुदीच नव्हत्या हेच वाईट होते. फक्त यांव करु आणि त्यांव करु. ९ महीन्यात एक गोष्ट केली नाही. सर्विस टॅक्स मात्र वाढवुन ठेवला.
क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे कीतीतरी टॅक्स मधे सुधारणा करणे शक्य होते. तेलात वाचलेले काही लाख कोटी कुठे गेले ते कळतच नाही. २ IIM आणि ३ एम्स चालू करु हे सांगायला बजेट कशाला पाहीजे. ते तर BAU होयला पाहीजे. पुढच्या बजेट मधे १० संडास बांधणार आहोत असे सांगितले तरी आश्चर्य वाटणार नाही. कुठल्याच गोष्टीला टाइमलाइन नाही. समिती बसवू, बील आणु असली भाषा सगळी. ९ महीन्यात आणायची होती ना बिले.
आणुन आणुन कुठले बील आणले तर वीमा आणि जमीन अधिकरणाचे. भारतात सरकार कडे लाखो एकर जमीन पडुन आहे. पुण्याच्या आसपासच्या MIDC मधे बघा, शेकडो एकर जमिन पडुन आहे, अगदी हिंजवडीत सुद्धा जमीन पडुन आहे. मग ह्यांना कशाला नविन जमीनी पाहीजेत.
लोकांना प्रत्येक्षात दिसेल असे काहीतरी करुन दाखवा ना. पोलिस भरती साठी पैसे वापरा, न्यायालयांची संख्या वाढवा.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2015 - 10:42 pm | श्रीगुरुजी

>>> कुठली चौकशी केली सुरु गुरुजी? ती भुजबळांची? आणि सत्तेवर येउन ४ महीने झाले, पाटबंधारे आणि PWD आणि सहकार खात्यातल्या कीती चौकश्या चालू झाल्या? आणि इतक्या उघड भ्रष्टाचारांच्या चौकशी ला इतका वेळ का लागावा? कीती अधिकार्‍यांवर FIR झाला? ४ महीने बक्कळ वेळ आहे ज्याला काही करायचे आहे त्याच्या साठी.
तुम्हीच जरा नीट डोळे उघडे ठेवुन बघा. आत्ता पर्यंत स्पेशल कोर्ट सुरु करुन खटले उभे रहायला पाहीजे होते.

मी आधीच सांगितलं होतं की जरा वाचन वाढवा, म्हणजे असे पोकळ प्रश्न पडणार नाहीत. तुम्हाला अजिबातच माहिती नसल्याने जरा सविस्तर सांगतो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याघेतल्या लगेचच फडणविसांनी भुजबळांची अँटी करप्शन ब्यूरो (एसीबी) मार्फत चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले होते. ही चौकशी होऊ नये यासाठी त्याविरूद्ध भुजबळ उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने चौकशीत हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने भुजबळ सर्वोच्च न्यायालयात गेले. १०-१२ दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने देखील चौकशीला हिरवा कंदील दाखविल्यावर लगेचच दुसर्‍या दिवशी समीर भुजबळची चौकशी सुरू झाली. त्यानंतर पंकज भुजबळला चौकशीसाठी समन्स धाडण्यात आले आहे. सत्तेवर येऊन ४ महिने झाले, अजून चौकशी का नाही, विशेष न्यायालये स्थापन करा असे मिपावर लिहिणे सोपे असते. प्रत्यक्षात चौकशीची प्रक्रिया अत्यंत किचकट व वेळखाऊ असते व आरोपींकडे तगड्या वकिलांची फौज असल्याने कायद्यातील असंख्य पळवाटा शोधून ते चौकशीपासून दूर राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. आदर्श प्रकरणात अशोक चव्हाणांवर अजूनही कारवाई झालेली नाही किंवा त्यांची चौकशीही झालेली नाही त्याला हीच कारणे आहेत.

तुम्ही जरा नीट वाचन केलेत तर असे प्रश्न पडणार नाहीत.

>>> आणि मोदींनी तर बारामतीला जाउन कळस केला आहे.

काय कळस केला?

>>> टोल चे काय झाले? त्या बाबत निर्णय घ्यायला वेळ लागावा असे त्यात काय अवघड आहे? आणि मग प्रचारात धाधांत खोटे का सांगितले? केजरीवालांकडुन शिका काहीतरी.

वाचन वाढवा हो. मुदत संपलेल्या टोलनाक्यांचे लेखापरीक्षण केव्हाच सुरू झाले आहे.

काही तरतुदीच नव्हत्या हेच वाईट होते. फक्त यांव करु आणि त्यांव करु. ९ महीन्यात एक गोष्ट केली नाही. सर्विस टॅक्स मात्र वाढवुन ठेवला. क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे कीतीतरी टॅक्स मधे सुधारणा करणे शक्य होते. तेलात वाचलेले काही लाख कोटी कुठे गेले ते कळतच नाही. २ IIM आणि ३ एम्स चालू करु हे सांगायला बजेट कशाला पाहीजे. ते तर BAU होयला पाहीजे. पुढच्या बजेट मधे १० संडास बांधणार आहोत असे सांगितले तरी आश्चर्य वाटणार नाही. कुठल्याच गोष्टीला टाइमलाइन नाही. समिती बसवू, बील आणु असली भाषा सगळी. ९ महीन्यात आणायची होती ना बिले.
आणुन आणुन कुठले बील आणले तर वीमा आणि जमीन अधिकरणाचे. भारतात सरकार कडे लाखो एकर जमीन पडुन आहे. पुण्याच्या आसपासच्या MIDC मधे बघा, शेकडो एकर जमिन पडुन आहे, अगदी हिंजवडीत सुद्धा जमीन पडुन आहे. मग ह्यांना कशाला नविन जमीनी पाहीजेत.
लोकांना प्रत्येक्षात दिसेल असे काहीतरी करुन दाखवा ना. पोलिस भरती साठी पैसे वापरा, न्यायालयांची संख्या वाढवा.

एवढं पाल्हाळ लावण्यापेक्षा अर्थसंकल्पातील नक्की कोणकोणत्या तरतुदींमुळे लाज आणली आणि का लाज आणली ते जरा सांगता का? जर ते जमत नसेल तर निदान हे तरी वाचा आणि मग उत्तर द्या.

http://www.misalpav.com/node/30526

प्रसाद१९७१'s picture

4 Mar 2015 - 11:11 am | प्रसाद१९७१

प्रत्यक्षात चौकशीची प्रक्रिया अत्यंत किचकट व वेळखाऊ असते व आरोपींकडे तगड्या वकिलांची फौज असल्याने कायद्यातील असंख्य पळवाटा शोधून ते चौकशीपासून दूर राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.

काय सांगताय गुर्जी. ज्याला करायचे आहे त्याला ४ महीने खूप खूप झाले. कोर्टात केस तर उभी करा, काय पळवाटा काढायच्या त्या काढु द्या ना. आणि भुजबळ सोडुन बाकी काय? तटकरे, अजित पवारांचे काय?

वाचन वाढवा हो. मुदत संपलेल्या टोलनाक्यांचे लेखापरीक्षण केव्हाच सुरू झाले आहे.

मुदत संपलेल्या टोलनाक्यांचे लेखापरीक्षण कशाला हो गुर्जी? कै च्या कै.
आणि सगळेच टोल नाके बंद होणार होते. फक्त मुदत संपलेले नाही.

लाज आणली ते जरा सांगता का?

लाज ह्या साठी आली मला स्वताला की आपण कोणाला मत दिले, पार फसवले की ह्या लोकांनी.
मला तरी कोणी मला फसवले की स्वताचीच लाज वाटते
.

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2015 - 12:40 pm | श्रीगुरुजी

दुर्दैवाने तुमचं वाचन अत्यंत कमी असून आकलनही अत्यंत कमी आहे हे अनेकवेळा दिसून आलं आहे. अर्थसंकल्पाच्या धाग्यावरही हेच सिद्ध झालं. वाचन कमी आणि मनात कमालीचे पूर्वग्रह अशी तुमची परिस्थिती आहे. मी सर्व आक्षेपांना पूर्वीच सविस्तर उत्तर दिले आहे. आता आपल्या बाजूने तुम्ही अधिक वाचन करावे, परिस्थिती समजून घ्यावी आणि मनातील पूर्वग्रह काढून स्वच्छ मनाने मत बनवावे एवढीच अपेक्षा आहे.

प्रसाद१९७१'s picture

4 Mar 2015 - 1:18 pm | प्रसाद१९७१

मोठे व्हा. तुमची रोजगार म्हणुन भाजपला डीफेंड करत असाल तर काही हरकत नाही. नाहीतर काळजी घ्या.

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

वाचन वाढवा हो. मुदत संपलेल्या टोलनाक्यांचे लेखापरीक्षण केव्हाच सुरू झाले आहे.

गुर्जी बाकी इतर प्रतिसादाबद्दल काहीच म्हणणे आत्ता नोंदवत नाही परंतु टोलनाक्यासंदर्भात, सरकार आल्यापासून चार नवीन टोलनाके सुरु झालेत याची पण नोंद घ्यावी.

पिंपातला उंदीर's picture

3 Mar 2015 - 3:03 pm | पिंपातला उंदीर

गुर्जींच्या प्रतिसादात

भाजप तिथे स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही.

आणि

भविष्यात भाजपचे पूर्ण सरकार येण्याच्या दृष्टीने निदान भाजपचे पहिले पाऊल तरी पडले आहे.

अशी परस्परविरोधी वाक्य आहेत . 'श्रीगुरुंजीचे भावविश्व ' अशी मालिका चालू करा रे कुणीतरी

पिंपातला उंदीर's picture

7 Mar 2015 - 8:28 pm | पिंपातला उंदीर

बाकी कडवा फुटीरतावादी नेता आणि २००८ ते २०१० दरम्यान काश्मीरमध्ये चालेल्या दगडफेक आंदोलनाचा मुख्य सूत्रधार मसरत आलम याला जम्मू -काश्मीर सरकारने (यात भाजप पण आल ) याला तुरुंगातून सोडून दिल . वाजवा रे वाजवा

http://www.ndtv.com/india-news/hurriyat-hardliner-masarat-alam-released-...

हाडक्या's picture

8 Mar 2015 - 4:00 pm | हाडक्या

हा हा हा...

भाजपासमर्थकांकडून तुम्हाला सविनय इग्नोर मारण्यात आले आहे. :))) . :))))

(अर्थात भाजपने निषेध नोंदवण्याचे काम केलेले आहे त्यामुळे भाजपने युती ही असा विरोध करण्यासाठीच केली आहे यावर शिक्कामोर्तब होत आहे आणि संघानेपण तीव्र आक्षेप नोंदवलाय त्यामुळे तर तुम्हाला बोलायला जागाच उरली नाही आता.. ;) )

असो, त्याच्या डोक्यावर १० लाखाचे इनाम होते आणि आता ते पुढच्यावेळेस किमान ५० लाख असावे अशी त्याने मागणी केली आहे असे समजते. तसेच आता सरकार पडले तरी मुफ्तींना काळजी नसावी. सर्वत्र स्वतःचा अजेंडा ते तरी प्रामाणिकपणे राबवत आहेत त्यामुळे त्यांना मतांची चिंता नसावी. :)

(हा, ते टोलमुक्त महाराष्ट्राचे काय झाले वो ? नै म्हंजे मुफ्ती सायेबांचा झपाटा पाहून आठवन आली, बाकी कै नै. )

आमच्या सारख्या सामान्य मतदारांची लोकसभा आणि विधानसभेत घोर फसवणूक झाल्याची भावना निर्माण होईल असे किमान प्रयत्न व्हावेत हीच अपेक्षा.. असेही कोणत्याही पक्षाचे आंधळे समर्थक नाही (कधी होणारपण नाही) पण भाजपने जर फसवणूक केली तर ते मनातून मात्र उतरतील कायमचे (मग नोटाच).

पिंपातला उंदीर's picture

8 Mar 2015 - 4:21 pm | पिंपातला उंदीर

अर्थात भाजपने निषेध नोंदवण्याचे काम केलेले आहे त्यामुळे भाजपने युती ही असा विरोध करण्यासाठीच केली आहे यावर शिक्कामोर्तब होत आहे आणि संघानेपण तीव्र आक्षेप नोंदवलाय त्यामुळे तर तुम्हाला बोलायला जागाच उरली नाही आता..

Not fair . गुर्जींचा प्रतिसाद तुम्हीच दिलात . आता गुर्जी काय प्रतिसाद कसा देणार .

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2015 - 2:35 pm | श्रीगुरुजी

मुफ्तीने मसरत आलमची स्थानबद्धतेतून मुक्तता करून भयंकर चूक केली आहे यात शंकाच नाही. दुर्दैवाने भाजपचा आलमच्या सुटकेला तीव्र विरोध असूनही आलमची सुटका झाल्यामुळे भाजपची प्रचंड अडचण झाली आहे. भाजपने पीडीपी बरोबर युती करून जम्मू-काश्मिरमध्ये सरकार स्थापन केल्यामुळे या पापात भाजपला भागीदार व्हावे लागत आहे.

जरा या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेऊ या, म्हणजे आलम इतक्या सहजासहजी कसा सुटला हे लक्षात येईल. आलमने २०१० मध्ये श्रीनगर खोर्‍यातील जनतेला भडकावून सुरक्षा दलांवर दगडफेक करायला प्रवृत्त केले होते. त्यात काही सुरक्षा जवानांचा मृत्यु झाला होता. आपल्या सुरक्षेसाठी सुरक्षा दलांना दगडफेक करणार्‍या जमावावर गोळीबार करावा लागला होता. या प्रकारात काही सुरक्षा सैनिक व नागरिक अशा ११२ जणांचा मृत्यु झाला होता.

या प्रकाराचा सूत्रधार मसरत आलम याला तत्कालीन नॅकॉ-काँग्रेस सरकारने Public Safety Act (PSA) या कलमाखाली प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ऑक्टोबर २०१० मध्ये स्थानबद्ध केले होते. त्याला नुसतेच स्थानबद्ध करून तुरूंगात ठेवले होते, परंतु त्याच्यावर कोणताही गुन्हा नोंदविला नाही व त्यामुळे त्याच्यावर एकही एफआयआर झाला नाही आणि त्यामुळे त्याच्यावर कोणताही खटला भरला गेला नाही.

Public Safety Act (PSA) या कलमाखाली डीटेन केल्यास विनाचौकशी २ वर्षे स्थानबद्ध करता येते. याचा फायदा घेऊन प्रत्येकवेळी न्यायालयाने त्याची स्थानबद्धतेतून मुक्तता केल्यावर लगेचच त्याला याच कलमाखाली पुन्हा एकदा स्थानबद्ध करणे हाच कार्यक्रम उमर अब्दुल्ला आणि त्यापूर्वीच्या सर्व सरकारांनी सुरू ठेवला होता. ऑक्टोबर २०१० पासून आजतगायत, म्हणजे गेल्या जवळपास साडेचार वर्षात, त्याच्यावर कोणताही गुन्हा न नोंदविता त्याला नुसतेच स्थानबद्ध करण्यात आले होते.

महाराष्ट्रात गणेशोत्सवात किंवा निवडणुकीच्या काळात समाजकंटकांना स्थानबद्ध करण्यात येते (त्यांच्यावर कोणताही नवीन गुन्हा न नोंदविता प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना स्थानबद्ध करण्यात येते) व उत्सव/निवडणुक संपल्यावर त्यांना सोडून दिले जाते. अगदी तसेच आलमच्या बाबतीत घडत होते.

जम्मू-काश्मिरच्या गृहखात्याचे मुख्य सचिव सुरेश कुमार यांनी सांगितले की त्याच्या स्थानबद्धतेला मुदतवाढ न देता त्याला सोडून देण्याचा निर्णय गृहखात्याने जानेवारी-फेब्रुवारी २०१५ मध्येच (पीडीपी-भाजप सरकार स्थापन होण्याआधीच) घेतला होता. मुफ्ती १ मार्चला मुख्यमंत्री झाल्यावर लगेचच त्याने भाजपचा विरोध डावलून या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय राज्यघटनेनुसार गुन्हेगारांची शिक्षा माफ करणे, शिक्षा कमी करणे, तडीपारी माफ करणे, पॅरोल देणे हे राज्यांचे अधिकार असतात. या अधिकारांचा अर्थातच गैरफायदा घेतला जातो. ५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेली असूनसुद्धा २०१४ मध्ये संजय दत्त तब्बल ३ महिने पॅरोल, फर्लो इ. कारणांखाली बाहेर होता तो राज्य सरकारच्या कृपेमुळेच. आता मुफ्तीने त्याच अधिकाराचा गैरवापर केला आहे.

२००२ मध्ये पीडीपी-काँग्रेसचे सरकार जम्मू-काश्मिरमध्ये असताना सय्य्द अलीशाह गिलानी, यासिन मलीक, शब्बीर शाह इ. फुटिरतावादी हुरियतच्या स्थानबद्ध नेत्यांना असेच मुक्त करण्यात आले होते. त्यामुळे आता आलमच्या मुक्ततेविरूद्ध बोलणार्‍या काँग्रेसचे आश्चर्य वाटते.

आलमने १९९० पासून काश्मिरमधील वेगवेगळ्या तुरूंगात १५ वर्षे स्थानबद्ध म्हणून काढली आहेत. या कालावधीत त्याच्यावर कोणत्याही पोलिस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही व त्यामुळे एकही एफआयआर नाही. प्रतिबंधात्मक कारवाई या नावाखाली त्याला १५ वर्षे तुरूंगात ठेवण्यात आले होते. मानवी हक्क संघटनांनी देखील त्याला अशा तर्‍हेने अडकवून ठेवल्याबद्दल आवाज उठविला होता. त्याच्यावर जर योग्य त्या कलमांखाली गुन्हे दाखल करून खटला चालविला असता तर त्याला योग्य ती शिक्षा मिळून आज तो असा सुटला नसता.

२०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थानबद्ध करण्याच्या विरूद्ध निकाल दिलेला असूनसुद्धा तत्कालीन नॅकॉ-काँग्रेस सरकारने पुन्हा एकदा नव्याने (PSA) या कलमाखाली प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्याला स्थानबद्ध केले होते. जून २०१४ मध्ये तो सुटला होता परंतु काही तासातच पुन्हा एकदा त्याला स्थानबद्ध करण्यात आले होते.

Since his arrest in 2010, the government has booked Masarat for nearly six times under the PSA. The PSA allows a district magistrate to take any person in his jurisdiction into preventive custody for up to two years without trial. Masarat's lawyers said each time he would approach the HC, the court would quash the detention order and direct the police to release him. However, according to them, the police would re-arrest Masarat outside the court and book him again under the PSA.

हे असे किती दिवस सुरू राहणार होते? विनाचौकशी, विनाएफआयआर, विनाखटला अशा स्थितीत त्याला अजून किती वर्षे तुरूंगात स्थानबद्ध करून ठेवता आले असते? १९९६-२००२ या काळातील नॅकॉ चे सरकार, २००२-०८ या काळातील पीडीपी-काँग्रेसचे सरकार आणि २००८-१४ या काळातील नॅकॉ-काँग्रेसचे सरकार या सर्व सरकारांनी त्याच्यावर गुन्हा दाखल न करता त्याला निव्वळ स्थानबद्ध करून ठेवले. इतकी वर्षे त्याला पकडून ठेवल्यावर त्याच्यावर एकही गुन्हा का नोंदविला गेला नव्हता? कायद्याच्या कचाट्यात तो न अडकता सुटावा यासाठीच बहुतेक कोणताही गुन्हा न नोंदविता (PSA) या कलमाखाली स्थानबद्ध करून ठेवण्याची पळवाट मुद्दामच सोडलेली असावी, जेणेकरून पाहिजे तेव्हा त्याला मुक्त करण्यात येईल. २०१० सालीच दहशतवाद, जमावाला भडकावणे, प्रक्षोभक भाषणे करून अनेकांच्या मृत्युला कारणीभूत होणे, सैनिकांवर दगडफेक करणे अशा गंभीर गुन्ह्यांच्या कलमाखाली त्याच्यावर खटला दाखल केला असता तर आज तो तुरूंगात अधिकृत शिक्षा भोगत असता. परंतु त्याच्यावर कोणताच गुन्हा नसल्याने तो आता सुटला आहे. तो सुटण्यामागचे खरे गुन्हेगार १९९६ पासून २०१४ पर्यंत जम्मू-काश्मिर मध्ये सत्तेवर असलेली नॅकॉ, पीडीपी आणि काँग्रेसची सरकारे आहेत.

भाजप दुर्दैवाने पीडीपीचा भागीदार असल्याने भाजपलाही टीका सहन करावी लागत आहे. याबाबतीत केंद्राला हस्तक्षेप करण्यासाठी फारसे पर्याय नाहीत. सरकारमधून बाहेर पडणे हा एकमेव उपाय दिसतो. शपथविधीनंतर अवघ्या ६-७ दिवसातच हे प्रकार झाल्याने भाजपची प्रचंड अडचण झाली आहे. मुफ्ती एकंदरीत फारच त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. पुढील काही दिवसात भाजप काय भूमिका घेतो ते कळेल. एकंदरीत हा संसार फार काळ चालणार नाही अशी चिन्हे दिसायला लागली आहेत.

पिंपातला उंदीर's picture

9 Mar 2015 - 2:49 pm | पिंपातला उंदीर

Facepalm

कपिलमुनी's picture

9 Mar 2015 - 2:54 pm | कपिलमुनी

भाजपा भक्त मोड ऑन>>

हा निर्णय मुफ्ती यांच्य सरकारने घेतलेला आहे. गृह खाते हे मुफ्ती सरकारकडे असल्याने या निर्णयाची जबाबदारी त्यांचीच आहे. या मध्ये भाजपाची काहीही चूक नाही.
ही सुटका राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने केंद्र सरकारने किंवा मोदींनी या वर स्पष्टीकरण देण्याचा प्रश्नच नाही.
यासाठी काँग्रेस जबाब्दार आहे .
आणि जे काही वाईट होइल त्याला फक्त काँग्रेसच जबाब्दार असेल आणि जे चांगले होइल तेवढे मात्र भाजपाने केले आहे.

नांदेडीअन's picture

9 Mar 2015 - 3:11 pm | नांदेडीअन

कुणीतरी याचेही जस्टिफिकेशन देऊन टाका हो आत्ताच.
नेहमी नेहमी या धाग्यावर येणे होणार नाही. :(
m.indiatvnews.com/politics/national/mufti-to-release-another-separatist-leader-ashiq-hussain-faktoo-27154.html

कपिलमुनी's picture

9 Mar 2015 - 3:19 pm | कपिलमुनी

वरचेच जस्टिफिकेशन शब्द बदलून वाचणे . आणि यापुढे असे काही झाले तर हेच धागे पुन्हा पुन्हा उगाळून वाचणे .

पिंपातला उंदीर's picture

9 Mar 2015 - 3:11 pm | पिंपातला उंदीर

तसा भाजप चा track record फारसा उत्साहवर्धक नाहीच याबाबतीत . यांचे माजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग अतिरेक्यांना स्वतःच्या गाडीतून सोडायला गेले होते . पाकिस्तान दिनाच्या दिवशी (२३ मार्च ??) ह्यांचे नेते मेजवान्या झोडायला पाकिस्तानी दुतावासात सर्व प्रथम पोहोन्चातात . यांचे नेते कराची ला जाऊन जिना शांतीप्रिय होते असे प्रमाणपत्र देतात . सीमेवर अनेक जवान मारले गेल्यावर पण शरीफ यांच्याशी लगट करतात . कारगिल युद्धात अनेक भारतीय जवानांचे बळी घेणाऱ्या मुशरफ़ ला आग्रा समिट च आमंत्रण देऊन त्याच्या लष्करी बंडाला अधिष्ठान देतात आणि तोंडघशी पडतात . यांचा रेकोर्ड असला दिव्य. यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार . सत्तेसाठी हे काही पण करू शकतात

पिंपातला उंदीर's picture

10 Mar 2015 - 10:43 am | पिंपातला उंदीर

बाय द वे हुरियत नेते पुन्हा गिलानीं पुन्हा पाकिस्तानी उच्चायुक्तांना भेटले . मागे याच कारणावरून मोदी सरकारने पाकिस्तानशी होणारी बोलणी थांबवली होती . पण आता भारत पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार आहे हो . बोलणी पण लवकरच सुरु होणार आहेत . मौनी पंतप्रधान आणि ५६ इंची छाती फारसा फरक दिसत नाही . वाजवा रे वाजवा

http://www.ibtimes.com/indias-narendra-modi-using-cricket-diplomacy-try-...

http://www.dailymail.co.uk/wires/ap/article-2952084/India-resume-talks-P...

प्रसाद१९७१'s picture

10 Mar 2015 - 11:29 am | प्रसाद१९७१

निरशा निराशा आणि फक्त निराशा.

श्रीगुरुजी's picture

10 Mar 2015 - 1:33 pm | श्रीगुरुजी

स्वतः ज्या लिंक्स देता त्या देण्यापूर्वी एकदा नीट वाचा आणि नंतर प्रतिसाद द्या. तुमचं आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत राजकारणातलं ज्ञान अत्यल्प, त्यामुळे अभ्यास कमी आणि त्यामुळे आकलनही यथातथाच आणि त्यात भर म्हणजे मनात संघ/भाजप/मोदी यांच्याबद्दल कमालीचे दूषित पूर्वग्रह. त्यामुळे असे सुतावरून स्वर्ग गाठणारे प्रतिसाद येतात.

तुम्ही वर ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या खूप जुन्या आहेत (१३/०२/२०१५). आता इतक्या दिवसानंतर या शिळ्या बातम्या इथे देऊन काय मिळविलेत खुदा जाने.

भारत-पाकिस्तानची बोलणी पुन्हा सुरू होणार आहेत हा तुमचा चुकीचा निष्कर्ष आहे. सर्व सार्क देशांशी संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेतील एक पाऊल म्हणून मोदींनी परराष्ट्र सचिव यांना बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, भूतान, अफगाणिस्तान, श्रीलंका, मालदीव या सर्व देशांच्या दौर्‍यावर पाठविले आहे. जयशंकर फक्त पाकिस्तानला न जाता सर्व ७ देशांना जाणार आहेत. तुमच्याच बातमीपत्रातील खालील वाक्ये पहा.

Modi said in a tweet he would be sending Jaishankar to the capitals of all countries that come under the South Asian Association of Regional Cooperation (SAARC), whose members, besides the two countries, include Bangladesh, Nepal, Bhutan, Afghanistan, Sri Lanka and Maldives.

मागे हुरियत नेत्यांनी पाकिस्तानी उच्चायुक्तांची भेट घेतल्याने मोदी सरकारने बोलणी थांबविली होती. आता काल गिलानी पाकिस्तानी उच्चायुक्तांना पुन्हा भेटला. तरीसुद्धा आता भारत पुन्हा बोलणी सुरू करणार. . . हे तुमचे निष्कर्ष विचित्र आहेत. एकतर वेगवेगळ्या काळातील घटना तुम्ही जोडू पहात आहात.

हुरियत नेत्यांनी पाकिस्तानी उच्चायुक्तांची भेट घेतल्याने मोदी सरकारने बोलणी थांबविली होती ती घटना ऑगस्ट २०१४ मधील. नंतर मोदींनी जयशंकर यांना सर्व सार्क देशांच्या भेटीवर पाठविले ते फेब्रुवारी २०१५ मध्ये. आणि गिलानी पाकिस्तानी उच्चायुक्ताला भेटला ते ९ मार्च २०१५ या दिवशी. वेगवेगळ्या काळातील या घटना असूनसुद्धा गिलानी पाकच्या उच्चायुक्तांना भेटला तरीसुद्धा मोदी सरकार पाकिस्तानशी बोलणी करणार आहे असा तद्दन चुकीचा निष्कर्ष काढून तुम्ही मोकळे झालात. अचूक माहितीचा अभाव आणि मनातले दूषित पूर्वग्रह यामुळेच असे निष्कर्ष मनात तयार होतात. असो.

आता भारत पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार आहे हा पण असाच तुमच्या मनातला कल्पनाविलास. तुमच्याच बातमीपत्रात खालील ओळी आहेत.

Modi also tweeted that he had called up Pakistan's Prime Minister Nawaz Sharif and the leaders of other SAARC countries, which are participating in the cricket world cup that begins Saturday, to wish their respective teams luck. Cricket is by far the most watched sport in the Indian sub-continent.

या वाक्यांचा अर्थ स्पष्ट आहे. या बातमीपत्रात इतरत्र कोठेही 'क्रिकेट' हा शब्द आलेला नाही. असे असताना 'आता भारत पाकिस्तानशी क्रिकेट खेळ्णार आहे हो' असा थेट चुकीचा आणि पूर्वग्रहदूषित निष्कर्ष काढून मोकळे झालात.

बादवे, जानेवारी २०१३ मध्ये पाकिस्तानच्या संघाला ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका व २ ट-२० सामने खेळण्यासाठी कोणाच्या सरकारने आमंत्रित केले होते व त्यासाठी दाऊद इब्राहिमचा मेव्हणा असलेल्या जावेद मियांदादला कोणाच्या सरकारने व्हिसा दिला होता हे माहिती असावे अशी अपेक्षा करतो.

'भारत पाकिस्तानशी परत बोलणी सुरू करणार' व 'भारत पाकिस्तानशी परत क्रिकेट खेळायला सुरूवात करणार' असा उल्लेख संपूर्ण बातमीपत्रात कोठेही नाही. बातमीपत्राचे शीर्षकच "Is India's Narendra Modi Using Cricket Diplomacy To Try And Resume Talks With Pakistan?" असे आहे.

सारांश - वाचन वाढवा, अधिकाधिक माहिती मिळ्वा आणि त्याद्वारे स्वत:चे आकलन व समज वाढवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनातील सर्व दूषित पूर्वग्रह झटकून टाकून चुकीचे निष्कर्ष काढण्याचे टाळा.

पिंपातला उंदीर's picture

10 Mar 2015 - 2:59 pm | पिंपातला उंदीर

कस आहे तुमची बौद्धिक कुवत मुळात कमी . त्यात इंग्रजी पण कच्च दिसत आहे . वर एका विचारसरणीचा आंधळा चष्मा डोळ्यावर लावला आहे . त्यामुळे सुधारणेला या वयात काही संधी नाही असे वाटते . असो चालायचच .

तुम्ही वर ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या खूप जुन्या आहेत (१३/०२/२०१५). आता इतक्या दिवसानंतर या शिळ्या बातम्या इथे देऊन काय मिळविलेत खुदा जाने.

अहो या बातमीला महिना नाही पूर्ण झाला आणि ती जुनी ? बहुतेक जुनाट विचारसरणी असल्यावर असे होत असावे .

जयशंकर फक्त पाकिस्तानला न जाता सर्व ७ देशांना जाणार आहेत.

आता बौद्धिक कुवतच कमी म्हंटल्यावर इलाज नाही . पण डोक्यात प्रकाश पडावा म्हणून अजून एक लिंक देतो . ती आजची आहे पण त्याला जून समजू नका . आणि हो ती इंग्रजी मध्ये आहे . झेपतंय का बघा . तुमच्यासाठी काही भाग बोल्ड करतो . समजल नाही तर भाषांतर करून देईल कस ?

http://timesofindia.indiatimes.com/india/India-Pak-break-ice-as-foreign-...

http://nation.com.pk/columns/09-Mar-2015/india-pakistan-talks

मागे हुरियत नेत्यांनी पाकिस्तानी उच्चायुक्तांची भेट घेतल्याने मोदी सरकारने बोलणी थांबविली होती. आता काल गिलानी पाकिस्तानी उच्चायुक्तांना पुन्हा भेटला. तरीसुद्धा आता भारत पुन्हा बोलणी सुरू करणार. . . हे तुमचे निष्कर्ष विचित्र आहेत. एकतर वेगवेगळ्या काळातील घटना तुम्ही जोडू पहात आहात.

या दाव्यातली हवा वरच्या लिंक मुळे फुस्स झाली असेलच . आणि जर माहितीबाबत अप डेट राहत जा हो . इथे भाजप ने असा दावा केला आहे की हुरियत नेत्याच्या पाकिस्तान भेटीचा भारत पाकिस्तान बोलनीवर काही परिणाम होणार नाही .

http://timesofindia.indiatimes.com/india/Meet-has-no-bearing-on-Pak-talk...

आता क्रिकेट बद्दल . खालील लिंक बघा .

https://www.youtube.com/watch?v=gSSIFtEulPU

मागचा एक प्रतिसाद पुन्हा एकदा देतो . अनेक आंतरजालीय आंतरराष्ट्रीय फोरम वर आपल्या सरकारची /देशाची /पक्षाची बाजू मांडण्यासाठी चीनी कम्युनिस्ट सरकारने काही सदस्य पे रोल वर ठेवले आहेत . कितीही मोठ हत्याकांड होऊ दे , कुणालाही फाशी देऊ दे , कितीही मानवी हक्कांची पायमल्ली होऊ दे या सायबर आर्मी च एकाच काम असत . आपल्या सरकारच /पक्षाच समर्थन करायचं . या आर्मी च्या सदस्यांना टु सेंट आर्मी अस हेटाळनिने म्हंटले जात . इथंही तुमचे प्रतिसाद पाहून असा काही प्रकार सुरु झालाय की काय अस वाटायला लागल आहे .

सारांश - बेटा तुमसे ना हो पायेगा -एका चित्रपटातला संवाद .

(संपादित)