गझल

डायरीचे पान

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
17 Jun 2015 - 12:03 pm

मज व्यथेची हाव कुठे,
कुंपणाची धाव कुठे

दुःख ही जरासे पचले नाही,
वेदनेला वाव कुठे

जिंकला समर जरी तो,
तरी सुखाची हाव कुठे

झाली माणसे परागंदा,
राहिले मज गाव कुठे

रेखले होते तुझे नाव ज्याच्यात,
हरवले ते डायरीचे पान कुठे

#जिप्सी

gazalमराठी गझलहझलकवितामुक्तकगझल

समर

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
13 Jun 2015 - 10:43 am

अताशा जन्म झाला माझा
आता कुठे मी जगण्यास लायक होतो
त्यांनी केले मला पुढारी गुलामांचा
मला वाटले मी नायक होतो
प्रश्न जेव्हा जगण्याचा येतो
माझा लढ़ा निर्णायक होतो
एवढे समर जिंकुनही
कृष्ण तरी कुठे राधेचा होतो
-जिप्सी

मराठी गझलगझल

इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
5 Jun 2015 - 1:00 am

आता नकोत गप्पा खोट्या पराक्रमाच्या
येथे कितीक गाथा माझ्या पराभवाच्या

खांद्यावरी रुढींच्या जो वाहतो पखाली
इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या

येती कितीक येथे मशहूर रोज होती
गझला अजून माझ्या आधीन काफियांच्या

लुचतात स्वार्थ होउन 'हव्यास' माणसाला
विरते सदैव निष्ठा गर्दीत गारद्यांच्या

झिम्माड पावसाचे दिसते न दु:ख कोणा
लपतो विरह नभाचा धारेत आसवांच्या

माथ्यावरी सुखांचे ओझे 'विशाल' झाले
आधार शोधतो मी समवेत वेदनांच्या

विशाल...

मराठी गझलगझल

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
30 May 2015 - 2:37 pm

लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

एक केवळ बाप तो

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
27 May 2015 - 10:30 pm

एक केवळ बाप तो

तापणारा तापतो अन मजवरी संतापतो
मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो

तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी
ओढताना ओढणीला सूर्यही मग धापतो

अंतरात्म्याचा दुरावा वाढला जर फ़ार तर
अंतराला अंतराच्या अंतराने कापतो

वाचणारा वाचतो पण; का? कशाला? जाणतो?
वाढवाया आत्मगौरव छापणारा छापतो?

आसवांच्या आसवांना धीर द्याया धावतो
निर्भयाला अभय ज्याचे एक केवळ बाप तो

                            - गंगाधर मुटे 'अभय’
----------------------------------------------

अभय-गझलमराठी गझलकवितागझल

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
3 May 2015 - 1:30 pm

बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

...देव आहे अंतरी

अजय जोशी's picture
अजय जोशी in जे न देखे रवी...
30 Apr 2015 - 7:17 pm

गझल...

तू मला टाळून कळले, लपविले जे अंतरी..
आणखी आणू नको तू आव कुठले अंतरी..!

दूर तू असतेस आता, काळजी कुठली नसे...
भेट की भेटू नको विश्वास आहे अंतरी..!

मन तुझे कळले मला शब्दांविना स्पर्शातुनी..
फारही सांगू नको तू ठेव थोडे अंतरी..!

मी तुला भेटायला इतके मुखवटे चढविले..
आणि ओळखलेस तेंव्हा भाव फुलले अंतरी..!

ती गुलाबाची कळी पाहून मी स्मरले तुला..
फुलत गेले आठवांचे रोम हर्षे अंतरी..!

आज तू पुसलेस अश्रू, पायही दमले तुझे..
केवढे छळलेस पूर्वी, काय पिकते अंतरी..?

मराठी गझलगझल

पाहून घे महात्म्या

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
21 Apr 2015 - 3:54 pm

पाहून घे महात्म्या
पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने

तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने

चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने

संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने

मराठी गझलवाङ्मयशेतीगझल

वैश्विक खाज नाही

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
19 Apr 2015 - 1:51 am

वैश्विक खाज नाही

शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही

निष्णात सैन्य माझे; पण हारणार नक्की
मोफत लढ़ावयाचा, यांना रिवाज नाही

त्यांच्या कपटनितीला, चिरडून टाकतो मी
धर्मास जागणारा, मी धर्मराज नाही

खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही

गावे बकाल आणिक, शहरे सुजून आली
आम्हांस मात्र त्याची, अजिबात लाज नाही

शालेय पुस्तकांनी, मेंदू बधीर केला
बुद्धी भ्रमिष्टतेवर, उरला इलाज नाही

स्वातंत्र्य देवते तू, ये भारतात थोड़ी
जेथे 'अभय' कुणाला, कुठलेच आज़ नाही

अभय-काव्यअभय-गझलगझल

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
17 Apr 2015 - 9:41 am

पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र

श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन.

(काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच)

तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र.

आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा