समर

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
13 Jun 2015 - 10:43 am

अताशा जन्म झाला माझा
आता कुठे मी जगण्यास लायक होतो
त्यांनी केले मला पुढारी गुलामांचा
मला वाटले मी नायक होतो
प्रश्न जेव्हा जगण्याचा येतो
माझा लढ़ा निर्णायक होतो
एवढे समर जिंकुनही
कृष्ण तरी कुठे राधेचा होतो
-जिप्सी

मराठी गझलगझल

प्रतिक्रिया

गुनि's picture

13 Jun 2015 - 10:48 am | गुनि

Kay aahe he !!!!!
zapla nahi rao

विशाल कुलकर्णी's picture

13 Jun 2015 - 11:34 am | विशाल कुलकर्णी

कल्पना खासच. आवडली कविता. पण शेवटच्या ओळी खटकल्या..

एवढे समर जिंकुनही
कृष्ण तरी कुठे राधेचा होतो

कृष्ण आणि राधा हे वेगळे करताच येत नाहीत. देहपातळीवरचं नातं नाहीये ते. रादर राधा-कृष्ण हे व्यक्तींचं नाव नसून एका भावनेचं , नात्याचं नाव आहे. जेव्हा राधाकृष्ण हा शब्द उच्चारला जातो तेव्हा डोळ्यासमोर उभी राहते ते अभीन्नता, सायुज्यता. तिथे कुठला भेद राहीलेलाच नाहीये.