गझल

प्रबंध

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
25 Jul 2014 - 2:34 pm

चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा
मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा

येऊनिया न यावा माझा प्रयास कामी
नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा

ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा
एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा

एकी अशी असावी, निश्चय असा असावा
हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा

झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी
प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा

विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा
आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा

माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी
कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा

- अपूर्व ओक

अभय-गझलगझल

बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
11 Jul 2014 - 11:54 am

एक उदासीचा महौल, बहादुरशा जफ़रचा सिद्धहस्त कलाम, आणि मेहदी हसन साहेबांची पेशकश!

नकोनकोशी वाटणारी उदासी देखिल किती कलात्मकपणे मांडता येते, याची कमाल म्हणजे ही ग़ज़ल. पावसाळी कुंद हवेत या ग़ज़लची जादू असा काही रंग घेते की इन्शाल्ला, आपण नि:शब्द होऊन जातो!

संदीप म्हणतो :

बरा बोलता बोलता स्तब्द्ध होतो,
कशी शांतता शून्य, शब्दात येते.
आताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते ।

गझलप्रकटन

"माझी गझल निराळी" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
1 Jul 2014 - 9:25 pm

दिनांक : ०१-०७-२०१४

"माझी गझल निराळी" : दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

                     शब्दांजली प्रकाशन, पुणे तर्फे दिनांक २९-०६-२०१४ रोजी पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे सकाळी ११:३० वाजता "माझी गझल निराळी" या गझलसंग्रहाच्या दुसर्‍या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संगीता जोशी,  सौ. विनिता देशमुख आणि डॉ. अविनाश भोंडवे उपस्थित होते.

अभय-लेखनमराठी गझलवाङ्मयशेतीवाङ्मयकवितागझल

शायरी - भाग २

चिनार's picture
चिनार in जे न देखे रवी...
30 Jun 2014 - 1:54 pm

मेरी जिंदगी मे तेरा वजूद कुछ ऐसा है, ,
के तू नही तो मेरा कोई वजूद नही !
तुझे पाने के ख्वाईश कुछ ऐसी है, ,
के तू नही तो कोई और ख्वाईश नही ! !

यू तो अकेला ही चला था मै एक राह पर , ,
हां ! ,तेरे मिलने से राहत मिली
अब तेरे ना होने का गम तो नही, ,
पर सामने देखता हू तो कोई मंजिल भी नही ! !

करुणगझल

शायरी ...

चिनार's picture
चिनार in जे न देखे रवी...
23 Jun 2014 - 9:53 am

१. तेरे जाने का असर कुछ ऐसा हुआ मुझपे ,
के तुझे धून्डते धून्डते मैने खुदको खो दिया !
और जब खुदको धून्डने निकला, ,
तो हर जगह सिर्फ तेरा चेहरा नजर आया ! !

२. तेरी आखो में खोकर कई ख्वाब देख लीये मैने ,
तेरी सांसो में मिलकर एक जिंदगी जी ली मैने ,
अब ना तेरी आखे है ,
ना तेरी सांसे है, ,
ना कोई ख्वाब है ,,
बस्स एक जिंदगी है…. जो पिछा नही छोडती ! !

३.तेरा ना मिलना तनहाई से क्या कम था ,
के अब जीने से मै घबराऊ ?
तनहा जिंदगी नरक से क्या कम थी ,
के अब मरने से मै घबराऊ ??

गझल

मरीज़े मुहोब्बत उन्हींका फ़साना

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
22 Jun 2014 - 2:08 pm

उस्ताद क़मर जलालवींची ही दिलकश ग़ज़ल, ग़ुलाम अलींनी यमनच्या माहौलमधे जी काय बेहद्द रंगवली आहे ती पुन्हा पुन्हा ऐकण्याजोगी आहे.

इश्काचा बिमार तिचीच कहाणी अखेरपर्यंत गात राहिला. पण (गीतात) जेंव्हा संध्याकाळच्या (तिच्या समवेत व्यतीत झालेल्या भेटीच्या आठवणींचे) उल्लेख (दाटून) आले तेव्हा (मात्र माहौल इतका व्याकूळ झाली की) पहाटपर्यंत साथ देणार्‍या दिपीका सुद्धा निमावून गेल्या.

दुसर्‍या ओळीतल्या `शामे-अलम' या शब्दावर गुलाम अलींनी केलेली तीव्र मध्यमाची जादू निव्वळ श्रवणीय.

गझलप्रकटन

मी रिक्त हस्त आहे -------------- एक गझल

डॉ. दत्ता फाटक's picture
डॉ. दत्ता फाटक in जे न देखे रवी...
12 Jun 2014 - 8:48 pm

माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे
माझाचं पोसलेला मी एक मात्र आहे
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------1 -----

आयुष्य मी असे हे उधळून टाकलेले ,
माझ्या सवेच उरले हे रिक्त दु:ख ओले ,
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------2 --------

तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे
माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------3 --------

मराठी गझलगझल

अस्थी कृषीवलांच्या

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
12 Jun 2014 - 3:56 am

अस्थी कृषीवलांच्या

पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे

अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला
करतात आत्महत्त्या का देश पोसणारे?

अभय-गझलमराठी गझलवाङ्मयशेतीकवितागझल

तू मला वगळून उरणे शक्य नाही

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
24 May 2014 - 4:24 pm

तू कुणावर प्रेम करणे शक्य नाही
जन्मभर वणव्यात जळणे शक्य नाही

तू सुखाच्या सोबतीने चाल राणी
मी दगा दुःखास देणे शक्य नाही

हे तुझे आंगण तुला लखलाभ आता
ते पुन्हा केव्हा बहरणे शक्य नाही

जीवना, हा छान बंदीवास आहे
जो उभ्या जन्मात सरणे शक्य नाही

मी सुगंधासारखा अस्थिर होतो
मी तुझ्या हातात ठरणे शक्य नाही

तू हवे तर आण उसनी चार दुःखे
ती अशी आतून झरणे शक्य नाही ..

तू कितीही बांध भिंती अस्मितेच्या
तू मला वगळून उरणे शक्य नाही

डॉ.सुनील अहिरराव

गझल

पराचा पारवा होतो

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
5 May 2014 - 7:22 pm

किती हे शांत होते गाव ,जेव्हा मी नवा होतो
अता भेटीस मी आलो तुझ्या की गवगवा होतो

किती गावे इथे सूरात मी, पण दाद ना मिळते
किती केलास तू कल्ला तरीही वाहवा होतो

इशार्यावर इशारे ते कुणाचे सांगना होते
जरा मी हात धरला तर पराचा पारवा होतो

तुझ्यामाझ्यातला हा वाद आता सोडवावा तू -
जरा मी बोललो हलके तरीही वाढवा होतो

अता कळते, कशासाठी मला तू टाळले तेव्हा ..
तुला मी नेहमीसाठी तुझ्याजवळी हवा होतो

डॉ.सुनील अहिरराव

गझल