प्रबंध
लेखनविषय:
काव्यरस
चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा
मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा
येऊनिया न यावा माझा प्रयास कामी
नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा
ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा
एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा
एकी अशी असावी, निश्चय असा असावा
हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा
झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी
प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा
विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा
आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा
माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी
कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा
- अपूर्व ओक
वाचने
3874
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
"एकी अशी असावी, निश्चय असा असावा
हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा"
हे जमायला हवं !
In reply to खूप छान गजल ! आवडली ! by psajid
अन मार्ग रुंद व्हावा ऐवजी "अन मार्ग स्पष्ट व्हावा" चालेल काय?
In reply to हातात हात यावे, by राजेंद्र मेहेंदळे
नाही..; काफिया जुळत नाही. स्पष्ट पेक्षाही अर्थाने रुंदच अभिप्रेत आहे. थिन लाईन ऑफ डिफरन्स.
:)
गजल नव्हे गझल वाचावे !
एकाहून एक कविता पाडायलेत राव लोक!! मस्तच हो!!
क्या बात वेल्लाः
सुंदर. :)
वाह!
एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावासुंदर!!
आज छान कवितांचा दिवस आहे मिपावर!
खूप आवडली.
माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी
कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा >>> अत्तीशय सुंदर!
सुंदर !!!
क्या बात है वेल्लाशेठ, मस्तच लिहिलंय!
_/\_ धन्यवाद सगळ्यांचे :)
आवाडली
मस्तये.. आवडली..
एकी अशी असावी, निश्चय असा असावा
हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा
झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी
प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा
जबरदस्त आशावाद प्रकट झाला आहे!
आपले मनातले स्वप्न पुरे होवो.
फक्त
विश्वास या मनीचा, कदापि न मंद व्हावा
आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा
हे जास्त योग्य होइल असे वाटते.
In reply to जबरदस्त आशावाद! by आयुर्हित
आभार !:)
सुंदर आवडलीच.
खूप छान गजल ! आवडली !