दिवाळी अंक २०२० - आवाहन

यंदाचा मिपा दिवाळी अंक असणार आहे 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'!. प्रेमाची, शृंगाराची, रोमान्सची इतकी रूपं, इतक्या छटा, इतके रंग... तर या प्रेमावर तुमच्या लेखांची, अनुभवांंची, कथांची, कवितांची आम्ही वाट पाहतोय.

लेखन देण्याची मुदत : २५ ऑक्टोबर, २०२०.

दिवाळी अंक २०२० - आवाहन

अस्थी कृषीवलांच्या

Primary tabs

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
12 Jun 2014 - 3:56 am
अस्थी कृषीवलांच्या

पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे

अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला
करतात आत्महत्त्या का देश पोसणारे?

मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-काट्या
करतील आमरस्ता मागून चालणारे

देतो 'अभय' कशाला भगवंत या पिलांना
शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे

                             - गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------ 

अभय-गझलमराठी गझलवाङ्मयशेतीकवितागझल

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे's picture

12 Jun 2014 - 3:59 am | गंगाधर मुटे

मा. पंतप्रधान मोदींचे आजचे संसदेतील भाषण ऐकले.

अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला
करतात आत्महत्त्या का देश पोसणारे?

या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही, हे मला अपेक्षितच होते. शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.
मात्र
शेती सोडून अन्य बर्‍याच क्षेत्रांना ’अच्छे’ दिवस येतील, याची झलक त्यांच्या भाषणात जाणवली. विकासाचा मुद्दा आणि सामोपचाराने निर्णय घेऊन धोरण राबवायचे हा त्यांचा मुद्दा अत्यंत प्रामाणिक आणि देशहितासाठी प्रगल्भ राजकारण कसे असू शकते, हे अधोरेखित करणारा होता. आजचे त्यांचे भाषण अनेक क्षेत्रात क्रांतीकरक बदल घडवून आणणे शक्य आहे, याची ग्वाही देणारे आणि राष्ट्रासमोर सकारात्मक आशादायी चित्र निर्माण करणारे आहे. शिक्षण क्षेत्राविषयीचा त्यांचा मुद्दा ऐकताना माझ्या "वांगे अमर रहे" पुस्तकातील "प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती" या लेखाची आठवण झाली.

बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला
आणि
या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे.

- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------

मार्कस ऑरेलियस's picture

12 Jun 2014 - 3:21 pm | मार्कस ऑरेलियस

नक्की काय म्हणायचे आहे तेच कळले नाही ...

एकी कडे तुम्ही म्हणता की

शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.

आणि दुसरी कडे म्हणता की

बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला
आणि
या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे.

तुम्ही मोदींचे कौतुक करताय की निशेध की दोन्ही की काहीच नाही ?

जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !

गंगाधर मुटे's picture

12 Jun 2014 - 11:15 pm | गंगाधर मुटे

मला काय म्हणायचे आहे ते मी स्पष्टपणे कोणताही आडपडदा न ठेवता नोंदवले आहे. लेखनातील कोणताच मुद्दा गुढ किंवा समजण्यास कठीण असा नाहिये. परत एकदा वाचा, सहज लक्शात येईल.

जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !

या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाज डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही, असे तुमचे एकट्याचेच मत नाहीये, गेली ३५ वर्षे मी हेच ऐकत आलेलो आहे.
परंतू
याच तर्‍हेच्या मुद्द्यावर ३५ वर्षापूर्वी मी जाहिर आवाहन केले होते की,
ठीक आहे.... आम्ही साठ-सत्तर टक्के शेतकरी बेअक्कल,नालायक आहोत पण तुमच्यापैकी एखाद्या बिगरशेतकर्‍याने आम्हाला शेती कशी करावी, याचे मॉडेल म्हणून फक्त १ वर्ष प्रत्यक्ष शेती करून दाखवावी. आणि त्याच शेतीतील उत्पन्नाच्या बळावर जगून दाखवावे.

अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये.

दोन वर्षापूर्वी मी विद्यापिठाच्या कुलगूरूला असेच जाहिर आव्हान दिले होते. तोही पळपुटा निघाला. ते आव्हान माझ्या "वांगे अमर रहे" या पुस्तकात लेखी दस्तावेज म्हणून उपल्ब्ध आहे.
किंवा
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!
येथेही वाचता येईल.

सुनील's picture

13 Jun 2014 - 9:16 am | सुनील

या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाज

देशात ७०-८० कोटी लोक थेट शेतीवर (शेतीच्या उत्पन्नावर) अवलंबून आहेत, हीच खरी समस्या आहे.

सुनील's picture

13 Jun 2014 - 9:19 am | सुनील

कोणत्याही प्रगत देशात ही टक्केवारी ५ च्या वर नाही.

गंगाधर मुटे's picture

13 Jun 2014 - 11:08 am | गंगाधर मुटे

मग शेतकर्‍यांना आत्महत्त्या करायला लावून शेतीवर अवलंबून असणार्‍यांचे प्रमाण कमी करायचे, असा शासकीय डाव आहे, असे म्हणायचे काय? ;)

सुनील's picture

13 Jun 2014 - 11:35 am | सुनील

अर्थातच नाही!

पण ही अफाट लोकसंख्या अन्य क्षेत्रात (उद्योग अथवा सेवा) सामावून जाणे महत्त्वाचे. अर्थात हे कोणी करायचे, कसे करायचे, सरकारची यात भूमिका काय ह्याबाबत माझा अभ्यास नाही आणि म्हणून ठाम मतदेखिल नाही.

परंतु, हे झाले पाहिजे हे उमगते आहे.

गंगाधर मुटे's picture

13 Jun 2014 - 9:30 pm | गंगाधर मुटे

लोकसंख्या अन्य क्षेत्रात (उद्योग अथवा सेवा) सामावून जाणे महत्त्वाचे.

अजिबात नाही. याउलट शेतीमध्येच आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि शेतीमध्येच प्रचंड रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे.

वेळ मिळाला तर हे वाचा.

मार्कस ऑरेलियस's picture

13 Jun 2014 - 12:02 pm | मार्कस ऑरेलियस

अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये.

आमच्याच मित्रांच्या मित्रांपैकी एकाने चांगली आयटी मधील इन्फोसिस मधील नोकरी सोडुन मिरजेला जाऊन घरातील शेती कसायला घेतली आहे ... किमान २ वर्ष झाली..मस्त चाललय त्याचं ... त्याच्याशी प्रत्यक्ष बोलतो एकदा आणि त्याची हरकत नसेल तर त्याचे डीटेल्स इथे शेयर करेन :)

मग शेतकर्‍यांना आत्महत्त्या करायला लावून शेतीवर अवलंबून असणार्‍यांचे प्रमाण कमी करायचे, असा शासकीय डाव आहे, असे म्हणायचे काय?

=))))

गंगाधर मुटे's picture

13 Jun 2014 - 12:58 pm | गंगाधर मुटे

त्याचे डीटेल्स इथे नाव, गाव, पत्त्यासहीत शेयर करा. शेती व्यतिरिक्त आणखी काही व्यवसाय असल्यास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे.

कारण तो बिचारा उद्या तोंडघशी पडता कामा नये. कारण आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघणारच. :)

कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.

असे आपण का म्हणता आहात हे तेवढेसे नीट लक्षात नाही आले. उपरोक्त वाक्या मागाचा आपला दृष्टीकोण अधीक विस्ताराने जाणून घेणे आवडेल

गंगाधर मुटे's picture

12 Jun 2014 - 4:02 am | गंगाधर मुटे

4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या ४ महिन्यांच्या कालावधीत ५५९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली..

विधानपरिषदेत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या मदतीवर चर्चा होती. त्याला उत्तर देताना पतंगराव कदम यांनी ही आकडेवारी जाहीर केली.

हे सर्व शासकिय धोरणाचे बळी आहेत, म्हणून शेतकरी आत्महत्त्यांना शासकियबळीच म्हटले गेले पाहिजे.

4 महिन्यात 559 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असतील तर दिवसाला जवळपास तीन शेतक-यांनी आपले प्राण गमावलेत असा त्याचा अर्थ पण ...

पण ही समस्या इतकी थोडी गंभीर आहे कि,.......

- देश हादरून जावा,
किंवा
- सभ्य आणि सुशिक्षित समाजाला लांच्छनास्पद वाटून त्यांच्या माना खाली जाव्यात,
किंवा
- मुख्यमंत्र्यांची झोपमोड व्हावी,
किंवा
- पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू यावेत......

अरे! यह करोडोका देश है. इस विशाल जनसंख्यावाले देश मे ५५९ का आकडा क्या मायने रखता है?
चलो, इस बहाने आबादी तो घट रही है!
.
.
है ना दोस्तो??????????
-----------------------------------------------------------------------------

सर्वप्रथम आपला जाहीर निषेध!!!!! नकारात्मक लेखनाचा धिक्कार असो.

खरे म्हणजे मला या नकारात्मक धाग्यावर लिहावेसे वाटत नव्हते, परंतु अजुन ज्या शेतकर्‍यांच्या जीवात जीव आहे, त्यांसाठी तरी मला लिहिलेच पाहिजे असे वाटते आणि म्हणुनच आपल्या या नकारात्मक धाग्यावर शेवटचे लिहित आहे.

बुड्त्याला काडीचाही आधार पुरतो, आणि आपण सर्व मिपाकारांनी तो दिलाच पाहिजे.

"4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या" हे वाचून कोणाही सुज्ञ माणसाला याचे वाईटच वाटेल.पण म्हणुन आपल्या ह्या नकारात्मक कविता त्यांना मुळीच ऐकवू नका, ही विनंति.

क्रुपया कालचे भाषण परत कानात तेल घालुन ऐकावे.
modi speech in parliament

नरेंद्र मोदी यांनी आपल्या संसदेत केलेल्या पहिल्या भाषणात गरीब जनता व शेतकर्‍यांसाठी दिलेला निरोपः
-'श्रमेव जयते' हाच मूलमंत्र: नरेंद्र मोदी
- महात्मा गांधींकडून प्रेरणा घेत विकासासाठी देशव्यापी जनआंदोलन छेडले जावे
- शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून गरिबी उच्चाटन आणि ग्रामविकासाला सरकारचे प्राधान्य
- ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुधारायला हवे
- रुरल आणि अर्बन मिळून 'रुर्बन' विकास झाला पाहिजे
- महागाई घटविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू
- शिक्षणामधून कौशल्यांचा विकास करायला हवा
- गरिबीशी दोन हात करण्यासाठी शिक्षणाची गरज
- रेल्वेच्या मालवाहू प्रक्रियेत बदलाची गरज
- सर्व राज्यांनी विकासाबाबत स्पर्धा करायला हवी; आम्ही गुजरातला मागे टाकले, असे त्यांनी म्हणावे. ते ऐकण्यासाठी माझे कान आसुसले आहेत.
-आपली विवेकबुद्धी कायम राहणे आवश्यक असून समाजविरोधी कृतींना आळा घालणे आवश्यक आहे
-पारंपरिक पद्धतीने चालणारा शासकीय यंत्रणांचा कारभार आमूलाग्र पद्धतीने बदलणार आणि यंत्रणांना संवेदनशील बनविणार, असे सांगताना मोदींनी महागाई कमी करणार ही केवळ घोषणा नव्हे, तर ती सरकारची विचारसरणी आहे, असे सांगून महागाई कमी करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे स्पष्ट केले. मोदींनी कृषी क्षेत्र, धान्य खरेदी, साठवण आणि वितरणासाठी अन्न महामंडळाचा कारभार, रेल्वेचा कारभार सुधारणे यांवर विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले.

Real-time data on agriculture products, linkages between agriculture university laboratories and farms and use of research to boost farm produce were some of the innovative ideas that poured out in an extempore speech by PM Narendra Modi in Lok Sabha on Wednesday.

Responding to criticism and queries from opposition benches on how the government would accomplish the agendas set out in the President's speech, Modi put across simple solutions that would curb price rise and increase agriculture produce.

Replying to the motion of thanks to President's address in Lok Sabha, Modi said his government's top priority is to provide every citizen with a house that has running water, electricity and toilet. No person should go to bed hungry, he said while stressing the government's resolve to bring food prices under check.

Emphasising the importance of increasing farm productivity, Modi said there was a need for use of modern technique in the agriculture sector because farm land is shrinking with rising population. "There is a need for modernisation of farming practices. Faster we bring in technology, better it would be for productivity because the number of people is increasing but the land is shrinking," Modi said.

"We have to increase the soil productivity. For this, we need to expand the research work in our universities. It has been so many years, there has been no research on pulses. Pulses (production) has become challenge before us," he added. He added that farmers should have access to as oil health card that will help them judge the crop and fertilizer use.

He also highlighted the need for use information technology in the field of agriculture productivity and proper use of railway for transportation of farm products to food deficit area. The PM also said the country needs real-time data on agri products to deal with price rise.
Narendra Modi promises upgrade in farm sector, house for all

http://timesofindia.indiatimes.com/india/Narendra-Modi-promises-upgrade-in-farm-sector-house-for-all/articleshow/36414035.cms

गंगाधर मुटे's picture

12 Jun 2014 - 10:57 pm | गंगाधर मुटे

प्रारंभालाच धिक्कार नोंदवून मोकळे झाल्यानंतर आता मल्लीनाथी आणि चर्चेचे कारणच संपुष्ठात आलेले आहे.
मी तुमचा धिक्कार स्विकारत आहे.

मात्र आधि चर्चा आणि त्यानंतरही समाधान न झाल्यास धिक्कार असा मार्ग अवलंबला असता तर निदान मला माझी बाजू मांडायची संधी मिळाली असती, असे वाटत आहे.

गंगाधर मुटे's picture

13 Jun 2014 - 12:00 am | गंगाधर मुटे

दिनांक १९/१०/२०१२

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने २०११ सालच्या शेतकरी आत्महत्येची अलीकडेच आकडेवारी जाहीर करताना देशभरात १४ हजार ४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतक र्‍यांनी मृत्यूस कवटाळल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली असली तरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत घट झाल्याचे विधान करून या आकडेवारीला शह दिल्याने आकडेवारीच्या नेमक्या सत्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी हा आकडा ३१४१ एवढा होता. आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक र्‍यांची संख्या जवळजवळ ७० टक्के आहे.
महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात १९९५ ते २०११ या कालखंडादरम्यान देशभरात २ लाख ९० हजार ७४० शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. दिवाळखोरी किंवा आर्थिक चणचण आणि दारिद्रय़ या कारणांनी या आत्महत्या झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

--------------------------------------------------------------------
आत्महत्या असो की दुर्घटना, सरकारी मृतांचा आकडा हा वास्तवापेक्षा १/३ ने तरी कमीच असतो.

त्या हिशेबाने हा आकडा किमान ५ ते ६ लाखाच्या घरात असू शकतो.
---------------------------------------------------------------------

मदनबाण's picture

13 Jun 2014 - 9:32 am | मदनबाण

महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवारांनी ही माहिती सांगितली असेल तरी ती तपासुन घ्यायला हवी कारण...
Maharashtra since 2007, following the Prime Minister’s visit to Vidarbha. Union Minister for Agriculture Sharad Pawar has strictly avoided using NCRB farm data in Parliament since 2008 because the data are unpleasant. (The union government however quotes the NCRB for all other categories). Now, governments are deep into fiddling the data that goes from the States to the NCRB.
संदर्भ :- Farm suicides rise in Maharashtra, State still leads the list
{ Updated: July 9, 2012 00:23 IST }
जाता जाता :- Monsanto बद्धल मी अनेक वेळा ऐकले आहे आणि थोडेफार वाचले देखील आहे, आपण यावर अधिक प्रकाश टाकु शकाल काय ?
एक संदर्भ :- The Seeds Of Suicide: How Monsanto Destroys Farming

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}

गंगाधर मुटे's picture

13 Jun 2014 - 1:01 pm | गंगाधर मुटे

Monsanto बद्धल काय माहिती हवी हे कळले तर लिहिता येईल.

गंगाधर मुटे's picture

13 Jun 2014 - 9:11 pm | गंगाधर मुटे

Monsanto चे BT बियाणे आल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असे सांगणारा सध्या एक विद्वानांचा ग्रूप कार्यरत आहे.
ते धादांत खोटे आहे. याउलट या जनुकिय बियाणामुळे उत्पादन वाढले आहे. बियानाचा एकरी १००० रुपयाने खर्च वाढला असला तरी फवारणीचा खर्च २००० रुपयाने कमी झाला आहे.

उत्पादन वाढले तो बोनसचा भाग झाला.

ही मंडळी शेतीविषयक अशिक्षितांसमोर किंवा मिडियासमोर आपले ज्ञान पाजळू शकते. शेतकर्‍यांसमोर जाऊन बोलायची हिंमत यांच्यात कुठे आहे?

ते धादांत खोटे आहे. याउलट या जनुकिय बियाणामुळे उत्पादन वाढले आहे. बियानाचा एकरी १००० रुपयाने खर्च वाढला असला तरी फवारणीचा खर्च २००० रुपयाने कमी झाला आहे.
ओक्के... म्हणुनच तुम्हाला विचारले.विचारल्या शिवाय दुसरी बाजु असल्यास कशी समजणार ? :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }

गंगाधर मुटे's picture

14 Jun 2014 - 10:50 pm | गंगाधर मुटे

ते धादांत खोटे बोलतात, या बद्दल माझा आक्षेप नाही. काय बोलावे-कसे बोलावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण लोकं शेतकर्‍यांच्या भल्यासाठी आम्ही बोलत आहोत असे भासवून आपापला अजेंडा राबवतात, आपापला स्वार्थ साधण्यासाठी शेतकर्‍याला आणखी गर्तेत लोटून आपापले घोडे पुढे दामटतात ....

..... तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते.

आणि असे बोलणारे मग कुणीही असो, भले मग तो देशवासियांच्या मनात हिरो असो, आदरणीय असो वा पुज्यस्थानी...

.... मला मात्र तो कस्पटासमान दिसायला लागतो.

ह्म्म... हल्लीच जरा तू-नळीवर एक व्हिडीयो पाहण्यात आला होता, तो पाहुन या धाग्याची आठवण आली. तो व्हिडीयो इथे देतो.

मध्यंतरी एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्यावरची छोटीशी मुलाखत मध्यंतरी एबीपी माझावर पाहिली होती ती सुद्धा इथे देतो...

दोन्ही व्हिडीयो पाहण्यासारखे आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- AIB:Alia Bhatt - Genius of the Year

गंगाधर मुटेजी आपल्या मागच्या एका कवितेच्या वेळी चर्चा झाली तेव्हा पासून आपल्या कवितेच्या जगण्यातून येण्यामुळे आणि लक्षवेधकपणामुळे लक्ष जातेच. याही कवितेतील पहिल्या तीन कडव्यातील काही ओळी निश्चीत आवडल्या. जसे पाया रचून गेले कर्तव्य जागणारे.

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे; संगे हवे कशाला वाटेत धापणारे?; शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे; या ओळींचे प्रयोजन तीतकेसे उमजले नाही. मी "कले करता कला" या मताचा आहे, प्रबोधना करता कला असूच नये असेही नाही पण; कलावंताची वेदना हि स्वयमेवच प्रबोधन करत असते. पण प्रबोधन असो अथवा मनोरंजन विषय जाणीवपुर्वक जोडण्याचा प्रयासाने कलेची गाडी कधी कधी घसरल्या सारखी वाटते तसेही काही ओळीत आणि कदाचित आपण काव्याचे प्रयोजन नमुद केल्यामुळे अधीक जाणवले असेल.

आपण दिलेल्या दुव्यांवरचे कृषिविषयक समस्यांविषयीचे काही लेखही या निमीत्ताने वाचले. आपल्या दुव्यावरील "हरिश्चंद्राचे उत्तर होते. “मला राज्य चालविता येते”. पण ज्यांना काम करण्यासाठी मजूर हवे होते त्यांच्याकडे ‘राज्य’ कुठे होते, याला चालवायला द्यायला? " हे रूपक आवडले. अर्थात कृषिविषयक समस्यांविषयीच्या लेखनात काही बाबतीतील तर्कसुसंगतेस आणि सर्वस्पर्षी मांडणीस अधीक वाव आहे असे वाटले अर्थात हा विषय मोठा आहे सवड मिळेल तसे मी माझे मतांतर नोंदवण्यास उत्सूक असेन.

अर्थात हे सर्व विषय बाजूस ठेऊन मला आपणास एक वेगळीच विनंती करावयाची आहे. मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती नावाचा प्रकल्प आहे. वनस्पती शास्त्रातील वरीष्ठ संशोधक मंडळी मराठी विकिपीडियातून मराठीतून माहिती उपलब्ध करण्या बद्दल उत्सूक असतात. आपल्या सारखी शेती क्षेत्रातील आणि शेतकी विषयाची अभ्यासक मंडळीही या प्रकल्पास जोडली जावीत अशी मनोमन इच्छा आहे. त्या प्रकल्पास आकार येण्यासाठी फुल न फुलाची पाकळी आपल्या सारख्यांचे (लेखन) योगदान आपल्या सवडीनुसार लाभल्यास आनंद वाटेल.

गंगाधर मुटे's picture

15 Jun 2014 - 5:41 pm | गंगाधर मुटे

माहितगारजी,
तुम्ही याला नम्रपणा म्हणा की उर्मटपणा कींवा वाह्यातपणा पण; खरे सांगायचे तर कलावंत/कलाकार वगैरे या जातीचा मी नाहीच. शेतीचे वास्तव मांडण्याची संधी मिळतेय म्हणून मी लेखनी उचलली. खरे तर दुसरा उद्देशच नाही.

मी एक शेतकरी आंदोलक आहे, हे सांगताना मला जसा आनंद होतो तसा मी कवी किंवा साहित्यिक आहे, असे सांगताना होत नाही. हेही खरे आहे.

कदाचित त्यामुळेच माझे लेखन प्रचारकी प्रकाराकडे झुकण्याची शक्यता मला मान्य आहे. त्याची खंत देखिल नाही कारण या विचाराचा प्रसार करणे हेच माझे उद्दिष्ठ आहे.

असो.

विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती याबद्दल एक महिन्यानंतर मी माझ्यापरिने थोडेफार योगदान देऊ शकेल.

माहितगार's picture

15 Jun 2014 - 6:32 pm | माहितगार

विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती याबद्दल एक महिन्यानंतर मी माझ्यापरिने थोडेफार योगदान देऊ शकेल.

अगदी आपल्या सवडी नुसार. घाई मुळीच नाही. पण आठवणीने जरुर लिहावे.

(मतांतरे चालतच असतात) बाकी आपल्या उद्दीष्टांबद्दल आदर आहेच.

कृषी क्षेत्रात वाढ करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने पंतप्रधान ग्रामीण सिंचन योजना आखली असून, या योजनेची देशभरात लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली.

कृषिमंत्री राधामोहनसिंह म्हणाले, "पंतप्रधान ग्राम सिंचन योजनेचा उद्देश देशातील प्रत्येक कृषी क्षेत्रापर्यंत पाणी पोचविणे हा आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत कृषी उत्पादनात वाढ होणार नाही. लवकरच या योजनेचे तपशील जाहीर करण्यात येतील. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशातील 14 हजार हेक्‍टर शेतीयोग्य जमिनीपैकी केवळ 14 टक्के जमीन सिंचनाखाली आहे. उरलेली सर्व जमीन पावसावर अवलंबून आहे. खेडी आणि शेतकऱ्यांचा विकास करण्याला माझे प्राधान्य आहे. हे दोन घटक सशक्त झाल्यास देश सशक्‍त होईल. कृषी उत्पादनात वाढ झाल्यास बेरोजगार हातांना काम मिळेल"

"जमिनीच्या दर्जावर उत्पादकता अवलंबून आहे. जमीन कसदार असेल तर चांगले उत्पादन मिळू शकेल. यामुळे केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे. शास्त्रज्ञ आणि कृषी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने जमिनीचा पोत आणि कस तपासण्याचे हे अभियान राबविले जाणार आहे. मृदा आरोग्य कार्ड या योजनेअंतर्गत जमिनीचा दर्जा आणि उत्पादकता दर्शविणारे कार्ड वितरित केले जाणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना योग्य पीक घेण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. पंतप्रधान ग्रामीण सिंचन योजना आणि मृदा आरोग्य कार्ड या दोन्ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा भाग आहेत. देशाला सक्षम बनविण्यासाठी शेती आणि शेतकरी आधी सक्षम बनायला हवा, असे त्यांनी सांगितले

साभारः ग्रामीण सिंचन योजना राबविणार

''संशोधनाचा वापर हा कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी झाला पाहिजे. प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, तर त्यांचे उत्पन्नही वाढेल आणि देशाची अन्नची गरज पूर्ण होईल,'' असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) ८६व्या स्थापन दिवसानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॅब टू लँड (प्रयोगशाळेतून शेताकडे) ही घोषणा दिली.

कमी जमीन आणि कमी वेळ वापरून जास्त कृषी उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे सांगत मोदींनी हवामान बदल आणि संपत चाललेली नैसर्गिक साधने याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व देशाला अन्न कसे देता येईल आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल या दोन मुद्दय़ांचा विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

मोदी म्हणाले..
*हरितक्रांती व धवलक्रांतीच्या धर्तीवर मासेमारीच्या क्षेत्रात नीलक्रांती घडवून आणा.
*पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक (पर ड्रॉप मोअर क्रॉप) घेण्यासाठी भविष्यातील योजना आहे.
*भारत अजून खाद्यतेले व डाळींसाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यातही आपण स्वयंपूर्ण झाले पाहिजे.
*शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याशिवाय कृषीवाढीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, त्यामुळे सरकारची धोरणे त्याच दिशेने आखली जावीत.
*शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवावे. त्याच्या मदतीने त्यांची क्षमता वाढेल

साभारः प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा