गझल

बलिदान त्याविना हे ... (गझल)

अमेय६३७७'s picture
अमेय६३७७ in जे न देखे रवी...
30 Dec 2013 - 1:50 pm

असते मनात काही उमजून येत नाही
वाटे किती फुलावे उगवून येत नाही

घनघोर मंथनाची आश्वासने फुकाची
नुसतेच भोवरे पण घुसळून येत नाही

कुंकू पुसून केली तलवार रक्तवर्णी
बलिदान त्याविना हे उजळून येत नाही

तू बोल ऐकतो मी माझेहि ऐक काही
मौनात प्रेमगाणे उमलून येत नाही

पेरून चिंतना घे शिंपून लेखणीला
शब्दास अर्थ आता लगडून येत नाही

-- अमेय

गझल

टिकले तुफान काही

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
28 Dec 2013 - 12:47 am

टिकले तुफान काही

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही

कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही

अभय-गझलमराठी गझलवाङ्मयशेतीवाङ्मयकवितागझल

कवडसे

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
21 Dec 2013 - 9:33 pm

पाऊल माझे चालले रस्ता जिथे जाई तसे
शोधायला येऊ नका माझ्या इराद्यांचे ठसे

नाही दिली जन्मात या कोणासही मी सावली
आयुष्यभर जपलेत मी माझ्या उन्हाचे वारसे

विश्वास या दुनियेवरी ठेवायचा कोणी कसा
एकाच खाणीच्या उरी यावे हिरे अन् कोळसे

वाटेवरी माझ्या जिथे अंधार होता दाटला
पेरीत मी गेलो तिथे माझ्या विजांचे कवडसे

आयुष्य येथे भेटते प्रत्येक वळणावर नवे
ताजी पुन्हा होते गझल धरते नव्याने बाळसे

-- उपटसुंभ

मराठी गझलगझल

भांडणानंतर...

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
25 Oct 2013 - 6:20 pm

खोटेच आहे रागावणे, तुझेही अन् माझेही
तोंड फिरवून झोपणे, तुझेही अन् माझेही

अबोला जरी धरून, आसमंत आज सारा
अस्वस्थ मनाशी बोलणे, तुझेही अन् माझेही

कोण चुकले कोठे, जाणतो मनी दोघेही
माघार परी न घेणे, तुझेही अन् माझेही

घन बरसत आला होता, त्या कोणी ना पाहीले
सांग कसे हे वागणे, तुझेही अन् माझेही

अंगार निवता जरा, स्वत:शीच हासून मग
ते विषय बोलण्या शोधणे, तुझेही अन् माझेही

- चाणक्य
२०/१०/२०१३

मराठी गझलगझल

प्रथमच एक गझल लिहण्याचा प्रयत्न केला आहे.

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
22 Oct 2013 - 3:34 pm

मी प्रथमच एक गझल लिहण्याचा प्रयत्न केला आहे. ओढून ताणून आणलेल्या शब्दापेक्षा त्यामध्ये भावना याव्यात या हेतूने लिहलेली माझी ही पहिली गझल आहे. या गझल मध्ये मी ऱ्हस्व - दीर्घ, नुकता, रदीफ किंवा काफिया या पैकी कशाचाही योग्य वापर केला नाही याची मला कल्पना आहे. (गोड मानून घ्या)
- साजीद पठाण

गीत

आयुष्याचे गीत गाण्या, जमते ‘खास’ एखाद्याला
वेचतात दु:खात फुले, येतो ‘सुवास’ एखाद्याला !!

वेदनांना टाकून पाठी, ज्यांची चालण्याची रीत
टेकतो हात विधाता, देऊन ‘त्रास’ एखाद्याला !!

मराठी गझलगझल

मी....

घन निल's picture
घन निल in जे न देखे रवी...
21 Oct 2013 - 12:27 pm

दुखः माझे एकट्याचे एकलाच भोगतो मी …
रात्रीस चांदण्यांसवे एकटाच जागतो मी …
मी दिले तुला माझे आकाश चांदण्यांचे …
कैफात निखळले जे रुपेरी तारे मोजतो मी ….
माझ्या ओल्या जाणिवांची खुलीच होती कवाडे …
आठवून तुझे धुमारे एकटाच लाजतो मी ….
मकरंद तुझ्या ओष्टीचा अजुनी ओठांस आहे …
ओलावल्या आठवांत एकटाच भिजतो मी …
घनभार तुझ्या केसांची ती किरमिजी संध्याकाळ …
प्राक्तनात माझ्या फुले वेचतो मी ….
जगलो एकच पहाट जी तुझ्या मिठीत उगवली ….
ओथंबल्या दवांत एकटाच नाचतो मी …

शृंगारगझल

तुझिया डोळ्यांत तेंव्हा पाऊस दाटला होता …

घन निल's picture
घन निल in जे न देखे रवी...
15 Oct 2013 - 4:56 pm

तुझिया डोळ्यांत तेंव्हा पाऊस दाटला होता …
तुझा हात जेंव्हा माझ्या हातून सुटला होता ….
तू थांबवलीस असावे तुझी ,
पण बांध तरीही फुटला होता …
ऊन पिऊन अंगणात सुकला पारिजात माझ्या,
निळा कोवळा पाऊस मी नियतीस विकला होता …
ओंजळीत भरलेस तू श्वास तुझे सुगंधी,
मी हात त्यावरी एक झाकला होता …
मी न थांबलो तिथे , न वळून बघितले निघताना,
विश्वास तुझा तरीही न थकला होता …
मी चेतविल्या पुन्हा तुझ्या आठवणी,
मी विझलो तेंव्हा त्यांचा उजेड फाकला होता …

मराठी गझलगझल

आईना - ए -गजल लेखक डॉक्टर विनय वाईकर/ डॉक्टर जरीना सानी

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in जनातलं, मनातलं
8 Sep 2013 - 9:12 pm

गजल ऐकताना काहीवेळा एखादा उर्दू शब्द कानी पडतो, त्याचा अर्थ न समजल्यामुळे तो शेर मनाला भिडत नाही. "डॉक्टर जरीना सानी आणि डॉक्टर विनय वाईकर" यांनी लिहिलेले "आईना -ए -गजल" हे पुस्तक हाताशी असेल तर हा रसभंग टाळता येतो. या पुस्तकात ८५०० पेक्षा जास्त शब्द आणि ५५०० पेक्षा जास्त शेर अर्थासह दिले आहेत. अर्थ मराठी आणि इंग्रजी भाषेत दिले आहेत.

गझलसाहित्यिकमाहिती

वाटते मजला भिती - (गझल)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
27 Jul 2013 - 3:12 pm

जीवनाची सांगता ही वाटते मजला भिती
ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती

सागरावर का उसळती जीवघेणी वादळे
हा किनारा एकटा ही वाटते मजला भिती

ढोलताशा ऐकुनी मज खूप होतो त्रास हा
देवळातिल शांततेची वाटते मजला भिती

वाटले घ्यावा विसावा टेकुनी खांद्यावरी
वाट ती अडवील कोणी वाटते मजला भिती

माजलो पैशात लोळत चेहरा सुजला किती
ओळखेना आरसाही वाटते मजला भिती

जागणे अन् झोपणे का फरक नाही राहिला
जीवनाची ओढ नुरली वाटते मजला भिती
.

शांतरसकवितागझल