गझल

एवढासा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
23 Apr 2013 - 8:52 pm

भानावरी आज आलो जरासा
माझाच मी भासलो एवढासा

समजावुनी या मनाला पुन्हा मी
दिधला नव्या कल्पनेला दिलासा

रडू कधीचे स्मरून हसलो
आणि टाकला भावनेने उसासा

जशी रात्र आणि दिवस हा जसा
कधी मी नकोसा कधी मी हवासा

नको दूर शोधू सुखाला अपूर्व
खेळच मुळी हा असे एवढासा

२४-४-१३ १८:०१

मराठी गझलकवितागझल

फिर्याद

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
22 Apr 2013 - 3:45 pm

ही पुन्हा हवा आज, धुंदकुंद झाली
ही पुन्हा मला आज, तुझी याद आली

घनांचे पुरेपूर बरसून झाले
आता कोण आसवांना, अवेळी साद घाली

तु दिलास ना दगा, वाटते जगाला
तुला ठाव स्वप्ने, कुणाची बरबाद झाली

मी न कधी घेतले, नाव तुझे कोणापुढे
दोन शब्द लिहिले, हाय ती फिर्याद झाली

लपविले सदा मी, पाय भेगाळले माझे
वाटले जगास माझी, चाल सुखात झाली

ईतक्यात त्यांना माझे, एवढे रडू आले
आता कुठे सांगण्यास, माझी सुरुवात झाली

मराठी गझलगझल

त्यांचाच जीव घे तू ..

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
21 Apr 2013 - 10:48 am

त्यांचाच जीव घे तू .....

हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता
म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता

मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!

पर्जन्य, पीकपाणी, दुष्काळ, कर्ज, देणी
शांती महागडी अन केवळ तणाव सस्ता

मरतोय अन्नदाता पर्वा न शासकांना
करतात भाषणे ते आणून आव सस्ता

लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?

सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता

अभय-गझलअभय-लेखनमराठी गझलवीररसकवितागझल

इर्फान-ए-गम

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
17 Apr 2013 - 2:46 pm

अगदी लहानपणी महिन्यातून एकदा कटींग करायला न्हाव्याच्या दुकानात जायला लागायचेच. अर्थात हे वेळ सकाळची असायची. तेथे रेडिओ सिलोनवर जुन्या गीतांचा कार्यक्रम हमखास लागलेला असायचा व त्यात शेवटी स्व. सैगल साहेबांचे गाणे लागायचे. आता त्या कार्यक्रमाचे नाव आठवत नाही........त्यात पहिल्यांदी ही गज़ल स्व. सैगल यांच्या आवाजात ऐकलेली आठवते आहे आणि काहीतरी वेगळे ऐकल्याची भावना जी मनात आली ती आजही मनातून जात नाही. माझे आजोबा पखवाज उत्तम वाजवायचे व त्यांना संगिताची उत्तम जाण होती. मला वाटते त्यांना थोडेफार फारसीही यायचे.

गझलआस्वादविरंगुळा

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
2 Apr 2013 - 4:17 pm

आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.

या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.

(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)

(ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्‍यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)

कॉकटेल रेसिपीकोडाईकनालभूछत्रीमराठीचे श्लोकशृंगारभयानकहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

<नाव सुचले नाही>

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
2 Apr 2013 - 2:25 pm

काळजातल्या जखमांना, न्याय पाहिजे होता
तु घाईत होतीस अन् , त्यांना वेळ पाहिजे होता

तू गेलीस परंतु , हा वसंत ईथेच आहे
मोग-याला तुझा जरासा, सुगंध पाहिजे होता

रोजचेच आहे, हे ही धुके परंतु
सुर्यास आज यायला, उजेड पाहिजे होता

तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते
एकदा तरी पण करायला, मी वार पाहिजे होता

एकटाच येत गेलो , हरेक मैफिलीतून मी
ऎकल्या स्वरांचा मला, झंकार पाहिजे होता

हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू
आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता

मराठी गझलगझल

दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
25 Mar 2013 - 3:27 pm

                        दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे

कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे

अभय-गझलअभय-लेखनमराठी गझलकवितागझल

कदाचित

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
16 Mar 2013 - 2:49 pm

सुखासीन आयुष्य अळणी कदाचित
चवीला व्यथाही जरूरी कदाचित

म्हणावे तशी ती न जगली कधीही
जराही असोशी नसावी कदाचित

पुन्हा चंद्र, तारे झगडले निशेशी
पुन्हा अवस येण्याचि नांदी कदाचित

अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी
तुझी भेट झाली असावी कदाचित

जरा लांबलेलीच ती रात्र होती
दिशाहीन झाली असावी कदाचित

नको आणखी कोणताही उतारा
नशा वेदनांची पुरेशी कदाचित

उभा जन्म गेला करूनी गुलामी
हिशेबात अजुनी उधारी कदाचित

पिते ताक फुंकून फुंकून अजुनी
कुणी पोळलेली असावी कदाचित

मराठी गझलगझल

हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
5 Mar 2013 - 10:05 pm

हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना
एकास आवडे जे दुसऱ्यास का पटेना

स्पर्धेत जीवनाच्या का ताळमेळ नाही
कुठलाच मनपतंग कटता कसा कटेना

उपदेश कायद्याचा करण्यात गुंततो जो
सुधरावयास तोरा अपुलाच का झटेना

भिक्कार आहे म्हणुनी धिक्कारतो कुणी तो
किति छान आहे म्हणुनी हा दूर का हटेना

माझ्याचसारखा मी समजे कुणी स्वत:ला
गर्वात आत्मस्तुतिचा फुगता फुगा फुटेना
.

गझल