कथा: विश्वरचनेचे "अज्ञात" भविष्य!
दिनांक- 27/02/2050
वार- रविवार!
वेळ- सकाळी चार!
मुंबईत अंधेरी येथे "के. के." हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता. वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता!
"सी.एम. डब्ल्यू" कार ताशी 80 च्या वेगाने भन्नाट धावत होती. त्यात एकच व्यक्ती बसलेली होती. ड्रायव्हर सीटवर. गाडी चालवत!
त्या व्यक्तीचा मोबाईल हॅण्डसेट एका केबलद्वारे त्या कारमधल्या एका फ्रंट डिस्प्ले पॅनेल ला जोडलेला होता. त्यातून डॅनियल नावचा व्यक्ती त्या कारमधल्या व्यक्तीशी इंग्लीशमधून बोलत होता, "विक्रम, कुठे आहेस? पोहोचला नाहीस का अजून?"