समाज

स्पष्टवक्ता की भ्रष्टवक्ता ?

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
10 Mar 2015 - 3:26 pm

आधीच "सुखी" असलेले स्पष्टवक्ते "स्पष्टवक्ता सुखी भव" या म्हणीमुळे आणखीनच सुखावतात आणि त्यांना चेव चढतो.
ही म्हण तयार करणारांनी फक्त एकतर्फी विचार केलेला आहे. म्हणजे त्यांनी या तथाकथित स्वयंघोषित स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या बिचार्‍या बापुड्या श्रोत्यांचा विचार केलेलाच नाही.
म्हणून सर्वप्रथम मी ही अपूर्ण म्हण पूर्ण करतो ती अशी:
"स्पष्टवक्ता सुखी भव । कष्टश्रोता दु:खी भव ।"

म्हणीसमाजजीवनमानतंत्रविचार

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३३

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
9 Mar 2015 - 10:55 pm

मागिल भाग..
आणि मी मात्र रात्रिची जेवणं झाल्यानंतर..झोपताना काहि क्षण पुन्हा त्या देवळातल्या प्रसंगाच्या शेवटाला गेलो.
मला भेटलेला देव नक्की कोण???..............असुरेश्वर? की तो धनगर???
पुढे चालू...
================================

संस्कृतीसमाजविरंगुळा

चलती का नाम गाडी- ६: वाहन सुरक्षितता

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
7 Mar 2015 - 6:44 pm
मांडणीसमाजजीवनमानप्रकटनविचारआस्वादमत

वाडा (भाग 2)

जयंत माळी's picture
जयंत माळी in जनातलं, मनातलं
6 Mar 2015 - 11:20 am

दुसर्या दिवशी सकाळी रामरावांचे लक्ष त्या खोलीकडे गेले तर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी ती खोली उघडली आहे. ते चौकशी करायला विकासकडे गेले असता त्यांना सर्व समजले.
दुसरीकडे पोलिसांची चोकशी चालु होती.
रामरावांनी लगेचच त्या मांत्रिकाला बोलावून ती खोली बंद केली पण त्याचा आता काहीच उपयोग झाला नाही.
त्या मांत्रिकाने सांगितले की तुमच्या वाड्यात पहिली घटना घडली ती पोर्णिमेदिवशी घडली होती आणि या दुष्टचक्राचा शेवट येणार्या अमावस्येला होईल
सचिनला मांत्रिकाचे बोलणे पटले त्याने मांत्रिकाला मदत मागितली पण मांत्रिकाने त्या वाड्यात क्षणभरसुद्धा थांबण्यास नकार दिला.

समाजविरंगुळा

वजन कमी करणारा आहार

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in जनातलं, मनातलं
4 Mar 2015 - 8:48 pm

वजन कमी करणारा आहार
१) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे.
२) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी.
३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा.

समाजजीवनमानराहणीऔषधोपचारलेखअनुभवशिफारससल्ला

थैमान

जयंत माळी's picture
जयंत माळी in जनातलं, मनातलं
4 Mar 2015 - 3:11 pm

स्वाइन फ्लूने सध्या सर्वत्र
थैमान घातले आहे.
सध्या महाराष्ट्रात स्वाइन फ्लू
झालेल्या रुग्णांचा आकडा
झपाट्याने वाढत आहे.

समाजऔषधोपचारमाहिती

निर्भया डॉक्युमेंटरी वगैरे ....

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in काथ्याकूट
4 Mar 2015 - 2:45 pm

मी
सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
माझे आदर्श गांधी, सावरकर , मार्क्स वगैरे
मला मनापासून पटतो स्त्रियांचा सन्मान , त्यांचे स्वातंत्र्य वगैरे
मी मानतो हवे ते कपडे घालण्याचा ,कुठल्याही वेळी , कठेही एकटीने फिरण्याचा त्यांचा हक्क वगैरे
बलात्कार , स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील गुन्हे ई .वर मी चिडतो वगैरे
त्यावर तावातावाने बोलतो ,चर्चा करतो , फेसबुक वर लिहितो वगैरे ……

व्यक्ती स्वतंत्र

निनाद जोशी's picture
निनाद जोशी in काथ्याकूट
4 Mar 2015 - 2:27 pm

व्यक्ती स्वतंत्र हा सध्याचा फारच ज्वलंत मुद्दा आहे. प्रत्तेक माणूस आपण जे काही करू त्याला व्यक्ती स्वातंत्र्याची जोड लाऊन ते बरोबरच आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतो. हे व्यक्ती स्वातंत्र्य नक्की आहे तरी काय??? ह्याला काही मर्यादा आहेत का नाहीत??? आज मणिशंकर अय्यर सारखा माणूस अफझल गुरुला दिलेली फाशी हि निष्कारण होती आणि तो दोषी आहे हे निश्चित झाले नव्हते असे म्हणू शकतो. एक चित्रकार भारतमातेचे नग्नचित्र भारतात राहून काढू शकतो. एक लेखक दिग्दर्शक भारतात राहून भारतीय फौजेला गुन्हेगार ठरवणारा आणि स्वतंत्र काश्मीरला समर्थन देणारा चित्रपट काढतो.

लावणी – एक मराठमोळी निशाणी (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
2 Mar 2015 - 3:25 am

‘टांग टांग टांग धडांग टांग टिक टिक..’ असा ढोलकी-हलगीचा आवाज कानावर पडला की सजग होऊन कान टवकारणार नाही तो मराठी माणूसच नव्हे ! तमाशा आणि खास करून लावणी ही खास ‘मऱ्हाटी’पणाची ओळख.

संस्कृतीकलावाङ्मयसमाजप्रकटनआस्वादसमीक्षामाहिती