समाज

कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
27 Mar 2015 - 10:23 am

हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे.

जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

समाजजीवनमानतंत्रराहणीविचार

किन्नर - बृहन्नडा

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
26 Mar 2015 - 10:28 pm

किन्नर बृहन्नडा किंवा मुंबईच्या भाषेत हिजडे किंवा छक्के ...

अलीकडे ह्यांचा वावर ठाण्यातील विशिष्ट भागांमध्ये फारच वाढला आहे (किंवा निदांन मला तसे वाटते आहे)...

त्यांच्या बीभत्स दर्शनापलीकडे त्यांच्याकडे एक माणूस म्हणून बघण्याची आणि जाणून घेण्याची इच्छा आहे आणि म्हणून हा धागा ...

१. हे लोक काही पुरुषी स्त्रिया आणि बायकी पुरुष ह्यांच्यापेक्षा किंवा सामान्य स्त्री किंवा पुरुषांपेक्षा नेमके काय वेगळे असतात ...
२. ज्या स्वरुपात ते सतत लोकांसमोर येतात ते तसे का ?
३. भारता बाहेर हे लोक्स दिसत नाहीत हे कसे ?

कुणी ह्यावर गंभीरपणे सत्य सांगू शकेल का ?

गनिमी कावा

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
26 Mar 2015 - 10:05 am

विचारत इकडे तिकडे आले
आज पाहुणे घरात आले
अहाहा सदन धन्य झाले ..

निवांत खुर्चीवर ते बसले
मान डोलवत जरासे हसले
रुमालाने तोंडही पुसले ..

'कसे काय तुम्ही वाट चुकला
आठव आमचा कसा जाहला ?'
- गूळपाणी देत प्रश्न विचारला ..

ओशाळवाणे पाहुणे हसले
हळूच इकडे तिकडे पाहिले
प्रश्नाचे उत्तर देणे टाळले ..

पिशवीतून मोबाईल काढला
रुमालाने स्वच्छही पुसला
माझ्या हाती तो सोपवला ..

"गनिमी कावा" त्याचा ध्यानी
आला माझ्या त्याच क्षणी
मुकाट उठलो हाती धरुनी ..

काहीच्या काही कवितासमाजजीवनमानप्रवासमौजमजा

संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कायदा

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
24 Mar 2015 - 9:37 pm

पूर्वपीठीका:
स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, डेंगी, गॅस्ट्रोपासून इबोलासारख्या संसर्गजन्य आजारांवर भविष्यात नियंत्रण मिळविणे शक्य व्हावे आणि आरोग्य विभागाचा इतर खात्यांशी समन्वय साधला जावा, यासाठी महाराष्ट्र संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कायदा करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या संदर्भातील आदेश आरोग्य खात्याला दिले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा कायदा संमत करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

मानवी स्पंज आणि स्प्रिंग!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
24 Mar 2015 - 11:27 am

तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.

समाजजीवनमानतंत्रराहणीप्रकटनविचारप्रतिसादअनुभवमत

Veer Garjana | वीरगर्जना @ Gudhi Padwa 2015

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
23 Mar 2015 - 7:37 am

वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो.

कलासाहित्यिकसमाजजीवनमानछायाचित्रणसमीक्षालेखअनुभवमाहिती

भीतीच्या भिंती ६: ‘दरी’

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
22 Mar 2015 - 4:43 am

भाग ,, , ,
(विनंती : या लेखात मी ‘दरी’ शब्दांचे जे उच्चार दिले आहेत, ते वाचकांनी कृपया ग्राह्य धरू नयेत.)

समाजजीवनमानप्रवासआस्वादअनुभव

बोलाचीच बिर्याणी!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
22 Mar 2015 - 12:43 am

कसाबविरुद्ध खटला लढवणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम ह्यांनी असे विधान केले आहे की कसाबला बिर्याणी खिलवण्यात येते अशी वदंता त्यांनीच पसरवली होती. कसाबबद्दल सहानुभूती वाटू नये म्हणून त्यांनी हे खोटे पसरवले.
इतके क्रूर कृत्य केलेल्या आरोपीबद्दल लोकांना सहानुभूती वाटेल असे निकमांना का वाटावे हे एक कोडेच आहे.

रसज्ञ नरभक्षक

देवदत्त परुळेकर's picture
देवदत्त परुळेकर in जे न देखे रवी...
20 Mar 2015 - 10:06 am

कां उगीच घाबरतोय आम्ही?
कां उगीच गळा काढून रडतोय?
कां उगीच त्यांचा वारसा सांगतोय?

तो नरभक्षक चटावलाय
आपला क्रुस
आपल्याच खांद्यावरून वाहणार्‍या
महात्म्यांच्या रक्ताला

तो क्रुस खांद्यावरून वाहण्यासाठी
खांदे मजबूत लागतात
ख्रिस्तासारखे
गांधीबाबासारखे
दाभोलकरांसारखे
पानसरेंसारखे

आजन्म व्रतस्थ जनसेवेतून
बहूमताच्याही विरोधात सत्यच सांगेन
अशा निर्धारी आचारातून
ऋशींनाही लाजवेल
अशा निर्मोही चारित्र्यातून
मजबूत होतात असे खांदे

कवितामुक्तकसमाज

स्मशान शांततेची शिकवण

देवदत्त परुळेकर's picture
देवदत्त परुळेकर in जे न देखे रवी...
20 Mar 2015 - 9:54 am

अरे, वर्गात कितीरेही गडबड
सगळे शांत बसा बघू
प्रश्न विचारु नका
उत्तरे शोधू नका
चर्चा करु नका
सगळे पास होणार आहात तुम्ही
आपो‌आप परिक्षेशिवाय
पुढच्या वर्गात जाणार आहात

काय म्हणता?
विचार स्वातंत्र्य
उच्चार स्वातंत्र्य
ढोल ताशे
किती गोंगाट करताय तुम्ही
एका गोळीने बंद करता येतात
सारे शब्द
हो, आणि आजकाल पिस्तुलांनाही बसवले असतात सायलेन्सर
एका सेकंदात सारे खल्लास
सगळी भाषणे बंद
मोर्चे बंद
सभा बंद
चर्चा बंद
संघटन बंद
शूऽऽऽ शांतता
चौकशी चालू आहे

सांत्वनाकवितामुक्तकसमाज