समाज

देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?

ग्रेटगणेश's picture
ग्रेटगणेश in काथ्याकूट
30 Apr 2015 - 12:14 pm

देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?
(सदर लेख 'साप्ताहिक लोकप्रभा'त २७.१२.२०१४ रोजी प्रसिद्ध झालेला आहे.)

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४३

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
28 Apr 2015 - 10:37 pm

मागिल भाग..
पण त्यांच्या सरकारात-कामाला गेलं,की त्यांचं धोरण पाळणं अटळ असे. कारण जर का ते एकदा जरी चुकलं,की त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायची..ती कायमचीच!
पुढे चालू...
==================================================

संस्कृतीसमाजजीवनमानविरंगुळा

अ‍ॅलीना रोमरः मराठी विषयाची विद्यार्थिनी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
27 Apr 2015 - 1:21 am

नमस्ते,

माझे नाव अ‍ॅलीना रोमर आहे. मी नॉर्वेची नागरीक आहे. मी पुन्यात शिकते. मी पुने युनिवर्ससिटी मदे मराठी सब्जेक्टमदे बीए करते आहे. मला मराठी खुप खुप आवडते. मी रोज युनिवर्ससिटी मदे जाते. मला माझे कॉलेज खुप आवडते.
मी माझ्या घरमालकांकडे पेईंगगेस्ट आहे. मी कोथरूडला राहते. मी दररोज पायी चालत कॉलेजला जाते. चालत जातांना मला नागरीक दिसतात. दुकानदार दिसतात. रिक्षा दिसतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यामुळे मला दररोज नविन गोष्टी समजतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यावेळी मला भारतातले नागरीक दिसतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते.

संस्कृतीसमाजराहणीप्रवासराहती जागाप्रकटन

महात्मा घेता का ,महात्मा ??

नितिन शेंडगे's picture
नितिन शेंडगे in जनातलं, मनातलं
22 Apr 2015 - 5:01 pm

आज काल आरक्षण विषयी ची बातमी दर दोन दिवसाआड येते . कितीतरी संघटना, पक्ष त्यावर भांडत असतात. हे सगळे चालू असताना कुणी त्यांची पत्रक किंवा जे ब्यानर लावले जातात त्या कडे पाहिले आहे का ? कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीचे चित्र त्यावर असते.
त्याचा अर्थ काय ?

आज आपण कितीही पुढे गेलो तरी काही राजकीय पुढारी आणि समाजातील स्वताला श्रेष्ठ समजणारी माणसे आपल्याला जाती आणि धर्मा मध्ये वाटून टाकतात . कितीतरी मोठ्या व्यक्तींना ह्या लोकांनी एखाद्या जाती आणि धर्मामध्ये अडकवून ठेवले आहे. आणि आम्हीपण ते मान्य केले आहे .

खाली काही उदाहरणे देत आहे,

समाज

‘ती’ चा प्रवास....

प्रियंका देसाई's picture
प्रियंका देसाई in जनातलं, मनातलं
22 Apr 2015 - 11:43 am

चविष्ट स्वयंपाक बनवणारी ‘ती’, नटण्या-मुरडण्याची आवड असणारी ‘ती’, नवीन साड्या पाहून हरखून जाणारी ‘ती’, मुलाबाळांचं वात्सल्यानं संगोपन करणारी ‘ती’, काटकसरीनं संसार चालवणारी ‘ती’....वर्तमानपत्रातून, टीव्हीवरील बातम्यांमधून, मालिकांमधून अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून ‘ती’ आपल्याला नेहमीच भेटत असते. तिच्या वेगवेगळ्या रुपांमधून ‘ती’ उलगडत जाते. मीही अशाच ‘ती’ला भेटलेय, अगदी तुमच्या माझ्यासारखी सामान्य स्त्री. मात्र तिच्या असामान्य कर्तुत्वाने चारचौघींपेक्षा वेगळी असलेली ‘ती’. चविष्ट स्वयंपाक बनवायला ‘ती’लाही आवडतं पण कच्चं-पक्कं कसही दोन वेळा लेकरांच्या पोटात जाव ह्या प्रयत्नात ‘ती’ असते.

समाजलेख

न्याय मला दिसला होता......

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जनातलं, मनातलं
21 Apr 2015 - 11:44 am

न्याय मला दिसला होता......
लोकशाहीच्या, दुर्गंधी पसरवणाऱ्या, सडक्या प्रेताचे, उघडे बटबटीत डोळे, आपल्या अणकुचिदार चोचीने फोडणाऱ्या, धनिक, राजकारणी गिधाडांच्या नख्यांच्या, धारदार अचूक पकडीत,
न्याय मला दिसला होता.
भ्रष्ट, रक्तपिपासू लांडग्यांनी बनवलेल्या, क्रूर परिस्थितीच्या फासात अडकून मेलेल्या, स्वाभिमानी माणसांच्या मढ्यावरचे प्रसिद्धीचे लोणी खाऊन, करपट ढेकर देणाऱ्या, विकाऊ माध्यमांच्या कावीळ झालेल्या पिवळ्या डोळ्यांत,
न्याय मला दिसला होता.

समाजविचार

कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
20 Apr 2015 - 2:15 pm

माणसाची देवाला विनंती:
असूनही रणरणत्या उन्हाची वेळ
का चालवलायस तू पावसाचा खेळ?
बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ
सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ?

देवाचे सडेतोड उत्तर:
माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ
सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ
आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ
बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ

करुणकविताचारोळ्यासमाजजीवनमानभूगोल

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४२

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
20 Apr 2015 - 1:59 am

मागिल भाग..
अश्या तर्‍हेनी अखेर हे नावाला नाटकापुरतं-धरलेलं नाटक होऊन..
बर्‍याचश्या करमणुकि नंतर पब्लिक आपापल्या घरी पांगलं...
पुढे चालू...
==============================================

समाजजीवनमानविरंगुळा

समतेचा संदेश देणारं नाटक : कोण म्हणतं टक्का दिला ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
19 Apr 2015 - 10:26 pm

कला शाखेच्या पदवीच्या वर्गाला अभ्यासक्रमात असलेल्या नाटकावर खूप दिवसापासून लिहायचं ठरलं होतं. अभ्यासक्रम बदलला पण लिहिणं काही होत नव्हतं. आज नाटकावर लिहिलंच पाहिजे असं वाटलं म्हणून कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाचा हा परिचय.

कोण म्हणतं टक्का दिला ? हे लेखक संजय पवार यांचं नाटक. दलित नाट्यक्षेत्रात न आलेला एक वेगळा विषय नाटककार, दिग्दर्शक संजय पवार यांनी हाताळला आहे. नाटकाचे मूळ उद्दिष्ट समाजातील विषमता समोर आणून समतेचे बीज रोवले जावे. आणि म्हणूनच हे नाटक वेगळे ठरते.

समाजसमीक्षा

महिला दिन’: मोझाम्बिकचा: भाग २

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
19 Apr 2015 - 2:23 pm

भाग १
वाचून, ऐकून, पाहून स्त्रियांच्या स्थितीबाबत माझं जे मत तयार होतंय, ते तपासून घ्यायची एक उत्तम संधी अशा दृष्टिकोनातून मग मी ७ एप्रिलची वाट पाहायला लागले….

प्रत्येक शहरात सार्वजनिक समारंभाच्या जागा ठरलेल्या असतात, तशीच इथली जागा म्हणजे एक बाग आहे. मानिका प्रांताची राजधानी असलेल्या चिमोयो शहरात ’२५ सप्टेंबर’ हा खड्डा नसलेला एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर विधानसभा आहे, राज्यपाल निवास आणि बरीच मंत्रालयं आहेत. त्यामुळे हा रस्ता चांगल्या स्थितीत आहे. त्याच्या एका टोकाला असलेली ही बाग.

समाजप्रवासअनुभव