आळी मिळी गुप चिळी!
तू पेटव चिता,
त्यावर मी भाजतो पोळी..
आळी मिळी गुप चिळी!
तू शोध साधू,
त्याना मी देतो सुळी..
आळी मिळी गुप चिळी!
तू बनव शत्रू,
त्याना मी देतो हाळी..
आळी मिळी गुप चिळी!
तू लागल्यासारखे कर,
मी ठोकतो आरोळी..
आळी मिळी गुप चिळी!
अर्धे शतक माझे
आता आली तुझी खेळी..
आळी मिळी गुप चिळी!
मी नागवलेच आहे,
आता तू फेडशील ती वेगळी..
प्रतिक्रिया
9 Jun 2015 - 8:36 pm | सतिश गावडे
तुम्ही अमितसांगली यांची हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी ही नितांत सुंदर कविता वाचून त्यापासून प्रेरणा घेतली का?
9 Jun 2015 - 8:42 pm | सटक
ती कविता खरेच सुन्दर आहे! तुम्ही म्हणलात आणि वाचली! राजकारणात सध्या दुसरे सान्गण्यासारखे आहेच काय? खूप सारख्या असल्या तरी प्रेरणा नाही!
माझे मिसळपाववरचे वाचन अगदी तुटपुन्जे आहे!
9 Jun 2015 - 8:37 pm | होबासराव
.
9 Jun 2015 - 9:59 pm | सस्नेह
नीसो कोण ?
9 Jun 2015 - 10:02 pm | आदूबाळ
अहो असं काय करता? उरे नामाचा व्यवहार...
9 Jun 2015 - 10:23 pm | सूड
हेवनवासी गुरुवर्य का?
9 Jun 2015 - 10:42 pm | सतिश गावडे
हे असावेत कदाचित.
9 Jun 2015 - 10:51 pm | सूड
ओक्के, कोणाचाही काही शॉर्टफॉर्म करतात राव. ते काय गुर्देव आहेत का नुसत्या शॉर्टफॉर्मवर ओळखायला.
9 Jun 2015 - 11:09 pm | सतिश गावडे
या कवितेचा आणि निसोंच्या कवितांचा साकल्याने विचार केलात तर त्यांनी केलेला शॉर्टफॉर्म चुकीचा नाही हे तुमच्याही लक्षात येईल. तोच कॉन्टेक्स्ट वापरुन मी ही हा शॉर्टफॉर्म शोधला. :)
9 Jun 2015 - 8:50 pm | जेपी
असल्या कवितांसाठी खरडफळा नामक सुविधेचा वापर करावा..
च्यामारी झीट आला आता असल्या कवितांचा.
9 Jun 2015 - 8:53 pm | सटक
पडला नसाल तर...वाचू नका कविता..झीट येणे चान्गले नाही!
9 Jun 2015 - 9:03 pm | जेपी
हम्म...
सत्कार केला असता पण तेवढी ही लायकी नाही या कवितेची..
9 Jun 2015 - 9:11 pm | सटक
धन्यवाद!!
9 Jun 2015 - 9:21 pm | अत्रुप्त आत्मा
हिचं विडंबन पडलं, आणि तरी तुम्ही हिते टीकलात.. तर मग टुम्म्ही खरे मि पाकर व्हाल!
9 Jun 2015 - 9:28 pm | सटक
असय व्हय!! व्हुन्देत की मग!
10 Jun 2015 - 12:00 am | अत्रुप्त आत्मा
ऊंssssssssssssssबं!!!
.
.
.
.
आह!
10 Jun 2015 - 12:31 am | सटक
..
9 Jun 2015 - 8:59 pm | होबासराव
जेपी सत्कार कर रे ह्यांचा