समाज

काही गंभीर सामाजिक्/राजकीय प्रश्न/शंका

तुषार काळभोर's picture
तुषार काळभोर in काथ्याकूट
22 Feb 2015 - 2:52 pm

संपादक मंडळास विनंती: हा धागा/त्यातील प्रश्न/त्यांची उत्तरे/प्रतिसाद यातील काहीही जर कोणाच्या संवेदना दुखावणारे असेल तर लागलीच उडवून टाकावे.

शिकाम्बा-मशाम्बा

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
19 Feb 2015 - 3:39 pm

कोणत्या गोष्टी कधी आठवतील, काही सांगता येत नाही.

त्या दिवशी मी होते मॅक्वेन्जेरे (Macuenjere) नामक एका गावात. निमित्त होतं ‘स्कूल कौन्सिल’ प्रशिक्षणाचं.

समाजअनुभव

वनविहार -सिंहावलोकन क्यामेरा- मुलुंड ते कशेळे….

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in काथ्याकूट
19 Feb 2015 - 3:04 pm

येणार येणार म्हणता म्हणता १५ फेब्रुवारी उजाडलाच …. दोनच गोष्टींसाठी ह्या दिवसाकडे डोळे लावून बसलो होतो…. एक म्हणजे म्याच आणि दुसरा मिपा महाकट्टा संमेलन ! दोन्हीपैकी एकच काहीतरी करता येण्यासारखे होते म्हणून मग कट्ट्याला पसंती दिली …. (म्याचचे समालोचन करणारे तिथेही असणार हे माहिती होतेच ) …. कट्ट्याचा धागा रोज पाहत असताना त्यावर येणारे प्रतिसाद वाचून कशेळेला मिपाकरांचा महामोर्चा वगैरे निघतो की काय अशीही शंका आली होती (परंतु ऐनवेळी मोर्चाचे रुपांतर भूमिगत चळवळीत झाले ! ). मी जाणार आहे असे जाहीर केल्यावर सौ.

पुन्हा पुन्हा बलात्कार

भिंगरी's picture
भिंगरी in जनातलं, मनातलं
19 Feb 2015 - 3:01 pm

लोणावळ्याची घटना सगळ्यांनी वाचली असेल, बातम्यांमध्ये पाहीली असेलच.
आता अशा घटना घडल्या कि आपण चुकचुकतो,थोडफार मत देतो,राग व्यक्त करतो आणि विसरून जातो.
मात्र आपल्या अगदी जवळ घडली कि भांबावून जातो किंवा हादरून जातो.

त्या दोन मुली, ही आणि एक ६ महिन्याची. मुलगी लहान असल्याने आई लग्नाला गेली नाही ७ वर्षाच्या मुलीला वडिलांबरोबर पाठवले. त्या मुलीला डोळ्याने नीट दिसत नाही. एक ऑपरेशन झाले पण विशेष फरक नाही. खर तर आई मुलीला पाठवायला तयार नव्हती. पण मुलीच्या हौसेसाठी वडील घेऊन गेले. तिच्या नशिबी हे भोग होते.

समाजप्रकटन

धर्मांतर....आपल्या सर्वांचं घडून गेलेलं !

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
17 Feb 2015 - 9:53 pm

मला जाणवत असलेल्या विविध गोष्टी (संकीर्ण संग्रह म्हणा हवं तर) इथे एकत्रित लिहितो आहे.
कुणाला काही दुरुस्ती सुचवायची असल्यास, मूळ मुद्द्यांत भर टाकायची असल्यास(किंवा लेखाला छानपैकी
शिव्या घालायच्या असल्या तरी) स्वागत आहे.
.
.
हे अमुक पुरेसे "आधुनिक " नाहित; ते तमुक आधुनिक आहेत; असं येतं बोलण्यात कधी कधी.
" आधुनिक " ह्या शब्दाखाली जे जे काही येतं; त्यावर अमेरिकन आचार-विचार-संस्कृतीचा मोठाच पगडा दिसतो.
शिवाय "आंतरराष्ट्रिय" , "जागतिक" ह्या शब्दाचा खरा अर्थ खूपदा "अमेरिकेच्या कानावर पडलेली गोष्ट" असा असतो.

समाजजीवनमानविचारमत

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३०

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
12 Feb 2015 - 3:26 pm

मागिल भाग..यातल्या प्रेम आणि वात्सल्याच्या या आहुतीला.. सांगता कधिच नसते.असूही शकत नाही. कारण ज्या दिवशी ह्याची सांगता होइल..त्या दिवशी लौकिक अर्थानी हे जग संपलेलं असेल.!
पुढे चालू....
=============================

संस्कृतीसमाजविरंगुळा

PMPL ने प्रवास का करावा?

सह्यमित्र's picture
सह्यमित्र in काथ्याकूट
12 Feb 2015 - 1:34 pm

PMPL चे वाढते दर आणि खालावत /जाणारा सेवेचा दर्जा ह्या कडे बघता असा प्रश्न मनात येतो. तसेही पुण्यातील बहुतांश लोक PMPL च्या वाटेला जात नाहीतच . तरीही एक गणित मनात आले ते येथे मांडत आहे :

१. उदाहरण दाखल धायरी ते राजाराम पूल / स्वारगेट / पुणे स्टेशन / हे तीन दर बघू
२. हे तीन दर अनुक्रमे १०/ २० / २५ असे आहेत. अंतर अनुक्रमे (साधारण ) ५/१०/१२ किमी आहे. म्हणजे प्रती किमी २ रुपये दर पडतो

आता हेच जर स्वतःच्या दुचाकीने जायचे असेल तर गणित काहीसे असे येईल :

भूमी अधिग्रहण कायदा

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in काथ्याकूट
11 Feb 2015 - 6:18 pm

भूमी अधिग्रहण कायदामध्ये सध्याच्या केंद्र सरकारने काही बदल केले आहेत.
त्यामधले मुख्य बदल खालीलप्रमाणे
१. पूर्वी संपादनासाठी 70 टक्के शेतकऱ्यांची संमती बंधनकारक होती . ही अट आता काढून टाकण्यात आली आहे.
यामुळे विरोध असतानाही सरकार बळजबरीने खाजगी / सरकारी प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेउ शकते .
२. संपादन केलेली जमीन त्या प्रोजेक्टसाठी जर ५ वर्षात वापरली गेली नाही तर ती जमीन मूळ शेतकर्‍याला परत करण्यात यावी . ही अट काढून टाकली आहे.

आणिक एक आरक्षण

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
11 Feb 2015 - 4:12 pm

दोन दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी होती; 'शेअर टॅक्सी मधे पुढची पॅसेंजर सीट महिलांसाठी आरक्षित.' त्यावर अनेक प्रतिक्रिया होत्या. सामाजिक संस्था, प्रवासी संघटना, इत्यादींनी अगदी स्वागतार्ह निर्णय वगैरे संबोधून या गोष्टीचं कौतुक केलं होतं. ट्रेनचे डबे झाले, बसच्या सीट झाल्या आता टॅक्सीच्याहि सीट महिलांसाठी आरक्षित; किंवा राखीव.