हरवला जीव तो …
कुठे शोधू
समजता समजता सापडेना.....!!!
जीव लागला मागं
त्याचं त्यालाच समजेना
हरवून पण गवसला तो
जीव थांबता थांबता थांबेना.....!!!
वेडाच जीव तो
आस लागलीया माग
हरवलेल्या उत्तराची …
स्वत:च धावूनिया लागे
त्या वेड्या उत्तरासाठी
गुंतून गेला जीव तो
वाट पाहता पाहता थांबेना … !!!
विचाऱ्याच्या गराड्यात अडकलेला
तो जीव बाहेर येईना
अजिचेयी ....
कसं हे जीवनाच कोडं
त्यालाच उत्तर मिळेना
तरीसुद्धा जीव तो
प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत
धावायचं … …
थांबता थांबता थांबेना.…...!!!