महात्मा घेता का ,महात्मा ??
आज काल आरक्षण विषयी ची बातमी दर दोन दिवसाआड येते . कितीतरी संघटना, पक्ष त्यावर भांडत असतात. हे सगळे चालू असताना कुणी त्यांची पत्रक किंवा जे ब्यानर लावले जातात त्या कडे पाहिले आहे का ? कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीचे चित्र त्यावर असते.
त्याचा अर्थ काय ?
आज आपण कितीही पुढे गेलो तरी काही राजकीय पुढारी आणि समाजातील स्वताला श्रेष्ठ समजणारी माणसे आपल्याला जाती आणि धर्मा मध्ये वाटून टाकतात . कितीतरी मोठ्या व्यक्तींना ह्या लोकांनी एखाद्या जाती आणि धर्मामध्ये अडकवून ठेवले आहे. आणि आम्हीपण ते मान्य केले आहे .
खाली काही उदाहरणे देत आहे,
छत्रपति शिवराय : मराठा
महात्मा फुले : माळी
डॉ . बाबासाहेब आंबेडकर : बौद्ध
राणी अहिल्यादेवी होळकर : धनगर
लोकमान्य टिळक : ब्राम्हण
हि तर काही उदाहरणे आहेत , आमच्या मनावर हे सगळे इतके ठासवून भरले आहे कि काही साहित्यक पण जाती पातीचा उल्लेख करूनच ह्या सर्व व्यक्तींबद्दल लिहितात .
जर ह्या लोकाची चरित्र वाचली तर ह्यांनी मात्र कधीही जातीपातीला आपल्या मनात थारा दिला नव्हता . त्यांना एकच जात माहित होती , माणूस .
आज काल जर समजा मी वरील पैकी कुणाचेही गोडवे गावू लागलो कि लोक आधी माझी जात पाहतील.
कधी संपणार हे ?
आजही शाळेत जातीचा दाखला मागितला जातो , का म्हणून ? एका बाजूला जाती पाती संपवून टाका म्हणायचे आणि जिथून खरे संस्कार सुरु होतात त्या विद्यामंदिरात जात तपासायची .
वरील उल्लेख केलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत सर्व जाती धर्माची लोक होती. त्यांनी कधीही म्हटले नाही कि हा अमुक जातीचा आहे म्हणून ह्याला सोबत नको . मग आपण का ह्यांना जाती आणि धर्मात अडकवून टाकलेय ??
प्रत्येक वेळेस कुठल्या नि कुठल्या राजकीय स्वार्था साठी एखादे ऐतिहासिक व्यक्तिमत्व बळी जातेय.
http://goshtmanatil.blogspot.in/
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
पॉपकॉर्न सुद्धा नको
जाने दो कमुतै नया है वह!
कमु "तै" नैत =))
प्रकाटाआ
ह्यावर चर्चा करून काय फायदा
हा विषय च्युईंग गम चघळण्या
असल्या जिल्ब्या आजकाल तळल्या
गांधीबाबाला मात्र
छान
काही उदाहरणे ??
आडनाव लावायचे बंद केले तर
आम्ही जात-पात पाळत नाही असं
महात्मा घेता का ?महात्मा>>>
आवशीकखावव्हरान, आमच्यात कोन