वाङ्मय

भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
20 Oct 2014 - 4:07 pm

भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाण्याची शक्यता असते. या धाग्याचा उद्देश इंग्रजी मराठी आणि इतरही भाषी विकिपीडियातून भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या नोंदींची दखल घेणे असा आहे.

हायकू - २

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
18 Oct 2014 - 11:23 am

हायकूवरील पहिल्या लेखाला चांगला प्रतिसाद मिळाला व अनेकांनी स्वरचित हायकू दिले म्हणून आता दुसर्‍या भागात हायकूचा जरा खोलात विचार करू..पहिल्या लेखात सांगायचा राहिलेला एक सोपा नियम बघा पहिल्या-तिसर्‍या अथवा दुसर्‍या-तिसर्‍या ओळीत यमक पाहिजे. एकच यमक जुळवावयाचे असल्याने सोपे आहे. मराठीत ५-७-५ ही भानगडच नसल्याने प्रत्येक ओळीतील शब्दसंख्या कमी जास्त होते. हरकत नाही. पण त्या रचनेत "लय" पाहिजेच. स्वत:शीच गुणगुणले तरी लय आहे की काही बदल पाहिजे हे लगेच कळेल. शब्दसंख्या मर्यादित असल्याने त्यांची निवड करतांना जास्त काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक शब्दाच्या जवळच्या अर्थाच्या छटा दाखविणारे अनेक शब्द असतात.

वाङ्मयआस्वाद

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ - १

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in काथ्याकूट
17 Oct 2014 - 5:24 pm

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ

           मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी जागतिक मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी मी माझ्यापरीने काहीतरी करावे म्हणून शेतकरी साहित्य चळवळ स्थापन करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता.

हायकू

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
16 Oct 2014 - 10:58 am

हायकू : मराठीत न रुजलेला

एवढी आवडते जपानी हायकू,
तर कशाला केलीत मराठी बायकू ?

महाराष्ट्राबाहेरचे दोन काव्यप्रकार म्हणजे गझल व हायकू. हे काही आपल्या भूमीतील, संस्कृतीतील नव्हेत. पण कलाप्रेमी महाराष्ट्राने जसे कथक, भरतनाट्य बाहेरून आल्यावरही प्रेमाने आपले म्हटले, उत्तर हिंदुस्थानातील शास्त्रीय संगीत आवडीने जोपासले तसे गझलला गळ्यात गोवले. पण हायकू मात्र दुर्लक्षीला गेला. एक श्री. शिरीष पै सोडल्या तर इतरांनी हा प्रकार आवडीने हाताळलाच नाही. असे का झाले ?

वाङ्मयआस्वाद

मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे

पुस्तकमित्र's picture
पुस्तकमित्र in जनातलं, मनातलं
15 Oct 2014 - 1:46 pm

http://www.misalpav.com/node/28198
http://www.misalpav.com/node/28241
http://www.misalpav.com/node/29133

-------------------------------------------------------------------------------

या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल.

वाङ्मयभाषासाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामतप्रतिभाविरंगुळा

मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र

पुस्तकमित्र's picture
पुस्तकमित्र in जनातलं, मनातलं
15 Oct 2014 - 1:12 pm

http://www.misalpav.com/node/28198
http://www.misalpav.com/node/28241

________________________________________________________

नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्‍यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया!

वाङ्मयसमाजजीवनमानप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

निरवतापाची जत्रा

निराकार गाढव's picture
निराकार गाढव in जनातलं, मनातलं
12 Oct 2014 - 9:39 pm

अताशा निरवतापाच्या जत्रंला पूर्वीसारखी मजा नाय रावली.

तुमी इचाराल ह्यो निरवताप कोणचा गाव... तर आपल्या सार्वेजेनिक पारापासून तसा अगदी हाकंच्या अंतरावर हाय. येक पाच कोस आलिकडं म्हनाना.

तर निरवतापात खूप जत्रा लागतात. खंडोबाची जत्रा, नीळावण्ती देवीची जत्रा, अंबाबायचा गोंदोळ, ग्यानबाची पाल्की, नरसोबाची गाडी,...  निसता उच्छाद असतुया.

धर्मवाङ्मयसमाजरेखाटनप्रकटनसद्भावनाआस्वादअनुभवविरंगुळा

मी, ग्रेस आणि १० रुपये

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
8 Oct 2014 - 4:02 pm

मी, ग्रेस आणि दहा रुपये

काय ? ग्रेसच्या कवितेसारखेच दुर्बोध वाटते की नाही ? आता ग्रेस म्हटले की दुर्बोधता आलीच. म्हणजे ग्रेसच्या आधीही मर्ढेकरांनी आपला क्लेम लावला होता पण त्यांचे "पिंपातले ओले उंदीर" आम्ही समीक्षकांच्या मदतीने केंव्हाच समजावून घेतले होते (पचविले म्हणणार होतो पण ओले उंदीर व पचवणे एकत्र आणण्याइतके सत्यकथेचे लेखक नव्हतो ना ! ते जावू दे, सांगत काय होतो

वाङ्मयसमीक्षा

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
6 Oct 2014 - 2:07 am

ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.

डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे.

ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.

डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...

१. ठिकाण ===> नंदी पॅलेस

२. दिनांक ===> १८-१०-२०१४

३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०

४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.

डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा