वाङ्मय

आरोप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बदनामी आणि अब्रूनुकसानी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
29 May 2014 - 4:11 pm

भारतीय राज्यघटनेच्या १९.१.अ अन्वये व्यक्तीच्या सभांषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला जातो, त्याच १९व्या कलमातील २ र्‍या उपकलमात इतर काही गोष्टींसोबत बदनामी/बेअब्रू (डिफामेशन) करण्यासाठी हे स्वातंत्र्य नसल्याची आणि त्या दृष्टीने कायदे करण्याचा कायदे मंडळांना अधिकारही प्रदान करत.

बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा

विश्वनाथ मेहेंदळे's picture
विश्वनाथ मेहेंदळे in जनातलं, मनातलं
23 May 2014 - 1:01 am

मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत.

येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे.

तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा.

समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.

हे ठिकाणवावरसंस्कृतीकलानाट्यसंगीतइतिहासवाङ्मयकविताविनोदराहणीप्रवासदेशांतरज्योतिषफलज्योतिषराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटप्रकटनसद्भावनाअनुभवमाहितीवादविरंगुळा

दीड शतकी धागे - एक अभ्यास

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं
11 May 2014 - 11:43 am

प्रेरणा: ते काय सांगायलाच पाहिजे का! तरीही क्लिंटन यांचे निवडणुकीचे विश्लेषण आणि अंदाज आणि इस्पीकचा एक्का यांचा हा प्रतिसाद

___________________________________________________________________

सुरुवातीला मिपावर २०१०-२०१२ आणि २०१२-२०१४ मध्ये काय झालेलं ते पाहू, ( शतकी धागे अनेक झालेत पण सेफ्टी मार्जीन ठेवण्यासाठी आपण आकडेवारी मध्ये फक्त दीड शतकी धाग्यांबद्दल चर्चा करू.

a

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनसुभाषितेविनोदऔषधोपचारशिक्षणमौजमजाप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीविरंगुळा

गुढी उभारनी

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
5 May 2014 - 9:50 am

गुढी उभारनी (कवियत्री बहिणाबाई चौधरी )

गुढीपाडव्याचा सन

आतां उभारा रे गुढी

नव्या वरसाचं देनं

सोडा मनांतली आढी

गेलसालीं गेली आढी

आतां पाडवा पाडवा

तुम्ही येरांयेरांवरी

लोभ वाढवा वाढवा

.........उर्वरीत कविता: http://www.transliteral.org/pages/z70717225241/view
......... बहिणाबाईंची "गुढी उभारनी": एक आस्वाद - डॉ. सुधीर रा. देवरे: http://sudhirdeore29.blogspot.in/2014/05/blog-post.html

संस्कृतीइतिहासवाङ्मयभाषाव्युत्पत्तीमाहिती

साजण / काही चोरोळ्या

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
3 May 2014 - 6:22 pm

हिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन ' या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्थिनुसार काही 'साजण' चोरोळ्या (कोडे स्वरूपातल्या)

(१)

लपत छपत तो बिछान्यात येतो
गोड गोड गाणी कानात म्हणतो
कधी चुंबितो कधी चावतो
सारी रात्र मला तो छळतो

का सखी साजण?
ना सखी डास.

(२)

कधी काळी येतो
गोड गोड बोलतो
खोटी वचने देऊनी
सर्वस्व लुबाडीतो

का सखी साजण?
ना सखी नेता.

(३)

वाङ्मयप्रतिभा

कलगीतुरा - पूर्वार्ध २

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in जनातलं, मनातलं
30 Apr 2014 - 9:23 pm

याआधीचा लेख खालील लिंकमध्ये वाचणे.
कलगीतुरा - पूर्वार्ध
कांतीशेठ गेल्यानंतर दार लावायला गेलो तर आमच्या सोसायटीतला त्रस्त समंध गोगटया गॅलरीतून कुचेष्टेने हसत ऊभा होताच. लगेच खवचटपणे " काय दिगूशेठ ? नवीन व्हेंचर का? " असे म्हणत खिदळलाच. या गोगटयाची गॅलरी आणि आमची खिडकी समोरासमोरच आहे. हरामखोराला आमच्या घरातली एकूणएक वित्तंबातमी गॅलरीत बसून कळते. या थेरडयाचे मी शंभर अपराध भरायची वाट बघतोय. मला लगेच वाशाला गाठायचे होते, म्हणून मी गोगटयाकडे दुर्लक्ष केले.

वाङ्मयकथाविडंबनविनोदलेखविरंगुळा

विल्यम शेक्सपियर, कॉपीराईट आणि भारत

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
23 Apr 2014 - 9:25 pm

विल्यम शेक्सपियर यांची आज पुण्यतिथी २३ एप्रिल, इ.स. १६१६ ला ते सहित्यिकांच्या स्वर्गात वास करण्यास गेले. त्यांची पुण्यतिथी जगभर जागतीक पुस्तकदिवस आणि कॉपीराईट दिवस म्हणून साजरी केली जाते.

shaksepear

छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स

वाङ्मयविचार

गीताई , गीतेचे अनुवाद आणि जादुचीकांडी

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
18 Apr 2014 - 6:51 pm

मराठी विकिप्रकल्पात मराठी विकिबुक्स नामे एक प्रकल्प आहे. या प्रकल्पात कुणा गीताईप्रेमीने विनोबा भावेंच्या गीताईचे काही वर्षांपुर्वी युनिकोडात टंकन केले. युनिकोडात टंकन करताना गीताई हा ग्रंथ कॉपीराईटेड आहे आणि आपली ही मेहनत वगळली जाऊ शकते हे सदगृहस्थांनी लक्षात घेतले नसावे. त्यांनी टंकन केले त्या काळात मूळस्वरूपातील ग्रंथ जतन करावयाचा विकिस्रोत प्रकल्प नव्हता. युनिकोडात टंकनाच्या मेहनतीचा आदर म्हणून मी तो मराठी विकिबुक्स मध्ये वगळण्या एवजी मराठी विकिस्रोतात (प्रताधिकार मुक्त असतात तर मजकुर विकिस्रोत प्रकल्पात राहीला असता) तात्पुरता निर्यात करून लगेच वगळणार आहे.

वाङ्मयमाहिती