विल्यम शेक्सपियर, कॉपीराईट आणि भारत

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
23 Apr 2014 - 9:25 pm

विल्यम शेक्सपियर यांची आज पुण्यतिथी २३ एप्रिल, इ.स. १६१६ ला ते सहित्यिकांच्या स्वर्गात वास करण्यास गेले. त्यांची पुण्यतिथी जगभर जागतीक पुस्तकदिवस आणि कॉपीराईट दिवस म्हणून साजरी केली जाते.

shaksepear

छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स

आजच्या दिवसासहीत या महिन्यात गूगलबातम्यावर भारतातील एकमेव कॉपीराईट बद्दलच वृत्त दिसलं त्यात जेटलीमहोदयांनी प्रियांकाबाईंना तुमचा भारतावर कॉपीराईट नाही हे सांगितलं. बाकी भारतीय जनता निवडणूकीच्या दंग्यात रंगलेली असताना आमेरीकेत एका भारतीय वंशाच्या माणसाने त्याच्या संशोधनाने आमेरीकेच्या सर्वोच्च न्यायालया समोर कॉपीराईट क्षेत्रातल एक मोठच आव्हान उभ केल आहे. सॅटेलाईट वरून प्रक्षेपीत होणारे टिव्ही सिग्नल महाशयांच्या पोस्ट तिकीटा एवढ्या आकाराच्या इंस्ट्रूमेंटने पकडता येतात म्हणे. आमेरीकेतील टिव्ही कंपन्यांनी या शोधाला त्यांच्या कॉपीराईटच उल्लंघन होत म्हणून आक्षेप घेतला आहे.

आपल्याकडे कॉपीराईटच ज्ञान थोड थोड वाढायला लागल आहे. ज्या गोष्टींच्या कॉपीराईटच्या उल्लंघनाने एखाद्याच उत्पन्न बुडत ती उल्लंघने बिनदिक्कत केली जाताना दिसतात दुसरीकडे ज्या लेखनावर कपर्दिकेचे उत्पन्नही होण्याची शक्यता कमी अशा साहित्याचेही कॉपीराईट आग्रहाने जपण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत ! महाराष्ट्र शासनाच वेबसाईट पुर्वी अगदी अलिकडेपर्यंत कॉपीराईट फ्री असल्याची त्यावर सुचना होती. शिवाय येथील माहिती जास्तीत जास्त कॉपीपेस्ट करून शासकीय नितींचा प्रसार करा अस आवाहन होत. आता त्याच संस्थळावर कॉपीराईटची नोटीस आहे. संस्थळांना डुप्लिकेट फेकसाईट तयार होऊ नयेत म्हणून कॉपीराईटची नोटीसची गरज असतेच अर्थात त्याची काळजी घेण्या करता कंटेट यूज पॉलीसी पूर्ण माघारी नेण्याची गरज नव्हती पण आले आधिकार्‍यांच्या मना तिथे कुणाचे चालेना.

केतकरांचा ज्ञानकोशाचा कॉपीराईट संपूनही ३० वर्षे झाली. एक चांगल्या उपक्रमा अंतर्गत तो आता आंतरजालावर उपलब्धही झाला आहे. वेबसाईटच्या रचनेवर कॉपीराईट असू शकतो पण केतकरांच्या लेखनावर कसा असू शकेल? पण सरसकट कॉपीराईट संपलेल्या लेखनावरही कॉपीराईटेड ठेवण्याचे प्रयत्न विस्मीत करतात पण त्यांनी या लेखनातील स्पेस किंवा पंक्च्यूएशन मध्ये सुधारना केल्या म्हटले तरी कॉपीराईटचा आधिकार चालू राहू शकतो. असाच काहीसा प्रकार करून खाप्रे डॉट ऑर्गने जुने बरेच साहित्य उपलब्ध केले आहे पण त्यावर विशेष प्रक्रीया केल्याचा दावा करून कॉपी राईट स्वतःकडे ठेवले आहे.

दुसर्‍या बाजूला जुनी ग्रंथ डिजीटायज करतो आहोत म्हणून विवीध संस्थांचे पदाधिकारी वृत्तपत्रीय छायाचित्रात झळकताना दिसतात. कॉपीराईटेड तर कॉपीराईटेड आंतरजालावर उपलब्ध तर करा तर तेही नाही. भारतातले जुने डॉक्यूमेंट पहाण्या करता दुसर्‍या देशातील पेड साईटला सर्वीसेसचे पैसे मोजायचे ?

कॉपीराइटवरील मर्यादा व अपवाद नावाचा एक लेख किमान स्वरूपाची माहिती मराठी विकिपीडियावर उपलब्ध रहावी म्हणून आणला होता. त्याचा इंग्रजीतून अनुवाद करणे अजून जमले नाही. कुणी मराठी विकिपीडियन गूगलवरून शोध घेत येतील कॉपीराईट विषयक लेखात कधी मधी दोनचार शब्द लिहितील हि आशा. आशा सोडायची नसते हे खरे पण इतर लोक का वाट पहातील ? योगायोग असा की कॉपीराईटडेच्या दिवशी एका उत्साही मराठी विकिपीडिया सदस्याने कॉपीराइटवरील मर्यादा व अपवाद लेखाचा मराठीत अद्याप अनुवाद केला गेला नाही म्हणून पानकाढा विनंती लावली (अर्थात मराठी लोकांसाठी स्ट्रॅटेजीकली महत्वाचा म्हणून ती विनंती मी काढली हा भाग वेगळा.)

या विषयावर लिहिण्यासारखे बरेच काही आहे पण हायकाय नायकाय ने एकुण ग्रस्त आहे.

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

23 Apr 2014 - 9:38 pm | आदूबाळ

उत्तम लेख!

सॅटेलाईट वरून प्रक्षेपीत होणारे टिव्ही सिग्नल महाशयांच्या पोस्ट तिकीटा एवढ्या आकाराच्या इंस्ट्रूमेंटने पकडता येतात म्हणे. आमेरीकेतील टिव्ही कंपन्यांनी या शोधाला त्यांच्या कॉपीराईटच उल्लंघन होत म्हणून आक्षेप घेतला आहे.

हे रोचक आहे...

आत्मशून्य's picture

23 Apr 2014 - 10:17 pm | आत्मशून्य

माहितगार काही विदा देता का ?

माहितगार's picture

23 Apr 2014 - 10:21 pm | माहितगार

मी गूगल न्यूजवर कॉपीराईट शब्दावर सर्च देत होतो या बातम्यांवर पोहोचलो . Aereo अथवा Chet Kanojia नावाने गूगल न्यूजला सर्च दिला तरी चालेल, वर टाइम्स ऑफ इंडीया वृत्ताचा दुवा आहेच

आदूबाळ's picture

23 Apr 2014 - 10:53 pm | आदूबाळ

लय भारी!!

हा कनोजिया माणूस ती सुप्रीम कोर्टातली केस जिंकणार असं मला वाटतंय.

मुदलात तो जे काही करू पहातोय ते कॉपीराईट कायद्याचं उल्लंघनच नाही. पुण्याच्या रस्त्यांवर पूर्वी टांगे धावायचे. कालांतराने तंत्रज्ञान सुधारलं आणि रिक्षा आल्या. यावर टांगेवाले "रिक्षा ही आमच्या एकाधिकारावर (पक्षी: कॉपीराईट किंवा तत्सम मालमत्तेवर) आणलेली टाच आहे" असं म्हणू शकत नाहीत.

तर ते रिसीव केल्या नंतर त्याचे पुन्हा ब्रॉडकास्टींग होतय (नेटवर) ते सुध्दा मुळ प्रक्षेपक यंत्रणेच्या (चॅनेल)पुर्व परवानगी शिवाय, अथवा त्यांना कोणतीही फि न देता थोडक्यात हा डीवाइस तयार करणे गुन्हा नाही तर तो वितरीत करणे अथवा वापरायला प्रोत्साहन देणे सकृत दर्शनी कॉपीराइट कायद्याचा भंग आहे.

लहानपणी मी स्वतः घरात फुकट केबल बघत होतो, कारण ती माझ्या टीवी अँटेना जवळुन जात होती. पण आता माझ्याकडे अशी केबल फुकट बघायची सोय (कायदेशीर कचाट्यात न सापडता) आहे म्हणुन त्याचा वापर करुन मी असे हार्डवेअर तयार करुन डीस्ट्रीब्युट केले जे माझ्या घरात फुकट दिसणार्‍या केबलचे (फुकट अथवा) दिड-दमडीच्या भावात वितरण करायची संधी देइल व त्यावर मी व्यवसाय करेन तर तो नक्किच कॉपीराइटचाट्मी वर उल्लेखलेल्या मुद्यानुसार ( असा डिवाइअस वितरीत करणे अथवा वापरायला प्रोत्साहन ) भंगच आहे.

आदूबाळ's picture

24 Apr 2014 - 12:16 am | आदूबाळ

असं कसं भौ??

स्मिथ अँड वेसन कंपनीने तयार केलेलं पिस्तूल घेऊन अन्याने गन्याचा खून केला. स्मिथ अँड वेसन कशी काय दोषी? हां तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पिस्तुलाचं अवैध वितरण करणारा नक्कीच दोषी.

कनौजिया बाबा हुशार आहे. तो हार्डवेअर आम्रिकेत विकेल (जे वैध आहे/ठरू शकेल) आणि सॉफ्टवेअर / सर्विस आम्रिकेबाहेरून देईल (जिथे आम्रिकन कायद्याचे हात पोहोचू शकत नाहीत).

गैरलागु आहेच....

पण इथे मुळात कनौजिया हा लक्ष वेधुन घ्यायला धडपडतोय, केस जिंकायला वाटत नाही. यातुन एकच होइल की कनौजिया सोबत करार केला जाइल अथवा ती स्टार्टप विकत घेतल्या जाइल (हे दोन्ही ओप्शन लूजर स्टेट्मधे वापरले जातील जी फार लाअंबची गोश्ट वाटते). हार्ड वेअर मॅनुफॅक्चर गुन्हा नाही. पण त्याचे वितरण जे बेकायदेशीर प्रसारण बघायला प्रवृत्त करते अथवा प्रोत्साहन देते हा मोठा गुन्हा ठरतो.

पण या प्रकरणातील मेख एव्हडीच आहे की हे हार्ड वेअर फक्त तेच काम करायला उपयोगी नाहीये अन्यथा एव्हाना कंपनी बंदही झाली असती. जसे रेडीओवर आपण पोलीसांचे संदेश ऐकु शकतो म्हणून तो बॅण करता येत नाही करण त्यावर फक्त तेच काम न्हवे तर प्रत्यक्ष रेडीओ स्टेशनही ऐकता येते तसेच यावर इतर अधिकृत ब्रॉड्कास्टही रिसीव करता येतात म्हणून हार्डवेअर बॅन होत नाही. पण मुळात त्याची कंपनी अधिकृत जाहीरातच कॉपिराइट मटेरीअल मोफत अथवा अत्यल्प दरात बघा अशीच करत असल्याने हा गुन्हा आहे. व यामुळे त्यांचे अधिकृत ब्रॉडकास्टींग नक्किच बंद पडेल, व सबस्क्रायबरच्या खिषाला मुळातच मोठी चाट न पडल्याने त्याला फरक पडणार नाही.

पुन्हा एखादा सबस्क्रायबरही त्याला ब्रॉकास्टींगचे अधिक्रुत अधिकार आहेत काय यावरुन कोर्टात खेचु शकतो. कारण त्याने अत्यल्प असले तरी या सेवेला पैसे मोजले आहेत, व ग्राहक म्हणून त्याची फसवणुक अथवा हक्कची पायमल्लि करता येणार नाही. आणी जर एकानेही केस जिंकली तर उरलेले सगळे सबस्क्रायबर मागे लागतील. (अर्थात हे त्याने सबस्क्रायबरला सेवा देताना काय कबुल करुन घेतले आहे यावरही अवलंबुन आहे )

आदूबाळ's picture

24 Apr 2014 - 1:12 am | आदूबाळ

१००% मान्य.

टाईम्सच्या दुव्यातच असा उल्लेख आहे की कनौजिया ब्रॉडकास्टर्सकडे गेला होता त्याचं तंत्रज्ञान विकायला (म्हणजे माझं तंत्रज्ञान विकत घ्या नाहीतर तुमचा बाजार उठवतो). त्यांनी त्याला फाट्यावर मारला म्हणून हे सव्यापसव्य चालू आहे...

आदूबाळ आणि आत्मशून्य चर्चेत उत्साही सहभागा करीता धन्यवाद.

सार्थबोध's picture

25 Apr 2014 - 10:31 am | सार्थबोध

नेहमीप्रमाणे छान ...

एक विनंती ...वैयक्तिक लिखाणासाठी कोपीराईट घेण्यासंबंधी कुणी माहिती देऊ शकेल का ?