विल्यम शेक्सपियर, कॉपीराईट आणि भारत
विल्यम शेक्सपियर यांची आज पुण्यतिथी २३ एप्रिल, इ.स. १६१६ ला ते सहित्यिकांच्या स्वर्गात वास करण्यास गेले. त्यांची पुण्यतिथी जगभर जागतीक पुस्तकदिवस आणि कॉपीराईट दिवस म्हणून साजरी केली जाते.
विल्यम शेक्सपियर यांची आज पुण्यतिथी २३ एप्रिल, इ.स. १६१६ ला ते सहित्यिकांच्या स्वर्गात वास करण्यास गेले. त्यांची पुण्यतिथी जगभर जागतीक पुस्तकदिवस आणि कॉपीराईट दिवस म्हणून साजरी केली जाते.
मराठी विकिप्रकल्पात मराठी विकिबुक्स नामे एक प्रकल्प आहे. या प्रकल्पात कुणा गीताईप्रेमीने विनोबा भावेंच्या गीताईचे काही वर्षांपुर्वी युनिकोडात टंकन केले. युनिकोडात टंकन करताना गीताई हा ग्रंथ कॉपीराईटेड आहे आणि आपली ही मेहनत वगळली जाऊ शकते हे सदगृहस्थांनी लक्षात घेतले नसावे. त्यांनी टंकन केले त्या काळात मूळस्वरूपातील ग्रंथ जतन करावयाचा विकिस्रोत प्रकल्प नव्हता. युनिकोडात टंकनाच्या मेहनतीचा आदर म्हणून मी तो मराठी विकिबुक्स मध्ये वगळण्या एवजी मराठी विकिस्रोतात (प्रताधिकार मुक्त असतात तर मजकुर विकिस्रोत प्रकल्पात राहीला असता) तात्पुरता निर्यात करून लगेच वगळणार आहे.
अर्थमंथन आणि अंतर्नाद या दोन मासिकांची वार्षिक वर्गणी भरून नियमित अंक घ्यायचे आहेत. त्यासाठी संपर्क पत्ते व दूरध्वनी क्रमांक हवे आहेत. कुणास माहित असल्यास सांगावेत.
तसा अंतर्नाद साठीचा संपर्क पत्ता जालावर एके ठिकाणी मिळाला, पण तो सध्याचा पत्ता आहे किंवा नाही हे माहित नाही. -
अंतर्नाद
सी-२, गार्डन इस्टेट जवळ
वायरलेस कॉलनी जवळ
औंध, पुणे.. ४११००७
राघव
नाम्या आज निवांत बसला होता.
मराठी माणूस हिन्दी बोलायला गेला तर काय मज्जा येते त्याच एक ज्वलण्त उदहरणः
नुक्ताच पुण्याला आलो होतो. त्यामुळे, नविन रूम वगैरे शोध्ण्यापेक्शा एका सिनीयर सोबत तात्पुर्ता थांबलो होतो कोथरूडला, तेव्हाचा प्रसंगः
ऊन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे, एक दिवस ऊसाचा रस प्यायला निघालो ४-५ मंडळी...
त्यात स्वप्निल नावाच्या सिनीयर ला, नवीनच प्रेमिका सापडली असल्यामुळे, हा गडी २४ तास मोबाईला चीट्कून...सगळे वैतागले होते त्याच्यावर. पण आज आमच्यासोबत च गप्प्पा मारायच्या अस दाटून सांगीतल...
ऑनलाईन मराठी शिकवण्याच्या यशस्वी आणि लोकप्रिय उपक्रमानंतर काल गुढीपाडव्याच्या - मराठी नवीन वर्षाच्या - शुभमुहूर्तावर मराठी भाषा विषयक नवीन उपक्रम सुरू केला आहे. जो आहे - "नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द".
चला, नवीन मराठी शब्द घडवूया; असा शब्द सुचला की जास्तित जास्त जणांपर्यंत तो पोचवूया; एकापेक्षा जास्त पर्याय असतील तर कुठला जास्त चांगला वाटतो ते ठरवूया; आणि असे नवीन शब्द मराठी भाषेत रुळवुया. इतका साधा सोपा उपक्रम आहे हा !!.
लोकशाहीचा सांगावा
आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा ।
पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥
लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर ।
जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥
होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई ।
करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥
धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तृत्व गहाण ।
नको स्वत्वाचा व्यापार । राखा आत्म्याचा सन्मान ॥
नशापाणी फुकटाची । आणि खानावळी शाही ।
होते अशा करणीने । कलंकित लोकशाही ॥
धर्म-पंथ-जाती-पाती । यांना देऊ नये थारा ।
मतदान करताना । फक्त विवेकाला स्मरा ॥
सूर्य थकला आहे
पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे
वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे
कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे)
मारिया ऍना शिकेलग्रुबर. ऑस्ट्रीयामधील वाल्डफीअर्टेल Waldviertel विभागातल्या (जन्म १५-०४-१७९५) स्ट्रोन्स या छोट्याशा खेड्यात श्री. योहान शिकेलग्रुबर आणि श्रीमती थेरेसा फेईसिंगर या दांपत्याच्या पोटी १५-०४-१८४७ रोजी जन्माला आली. या दांपत्याला एकूण ११ अपत्ये झाली पण त्यातली केवळ ६च जगली. मारिया २६ वर्षांची असतांना तिची आई वारली. नंतर ४० वर्षांची होईपर्यंत ती काय करीत होती याचा कुठे काही पुरावा सापडत नाही.