मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे

पुस्तकमित्र's picture
पुस्तकमित्र in जनातलं, मनातलं
15 Oct 2014 - 1:46 pm

http://www.misalpav.com/node/28198
http://www.misalpav.com/node/28241
http://www.misalpav.com/node/29133

-------------------------------------------------------------------------------

या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल.

चरित्रे/आत्मचरित्रे न आवडण्याची कारणे काही अशी सांगता येतील की त्या पुस्तकात सत्याचा विपर्यास झालेला कधी कधी दिसतो. तर कधी आत्मप्रौढीचा वास येतो. कधी कधी लेखकाच्या रटाळ भाषेमुळे ही पुस्तके कंटाळवाणी वाटू शकतात. लिहूया तर तुम्हाला एखादे चरित्र्/आत्मचरित्र का आवडले नाही याबद्दल!

वाङ्मयभाषासाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामतप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

विलासराव's picture

16 Oct 2014 - 1:56 am | विलासराव

मी पयला.

माझे आत्मचरीत्र जे भविष्यात येणार आहे.

विजया मेहतांचं आत्मचरित्र. त्यात सुरुवातीला स्वता:चा त्रयस्थ उल्लेख लय डोक्यात गेला. बेबीने हे केलं आन बेबीने पाणी प्यायलं आन बेबीने साडी नेसली. वैतागलो.

पिंपातला उंदीर's picture

16 Oct 2014 - 9:58 am | पिंपातला उंदीर

लैच सहमत

बोका-ए-आझम's picture

16 Oct 2014 - 7:45 am | बोका-ए-आझम

आत्मचरित्र हाच प्रकार मुळात आवडत नाही. एकतर ते नि:पक्षपाती असणं अशक्य. दुसरं म्हणजे आपल्याकडे लोक उपदेश आणि स्वत:चं उदात्तीकरण फार करतात आत्मचरित्रं लिहिणारे. एखादंच हंसा वाडकरांच्या ' सांगत्ये ऐका ' सारखं साधंसरळ आत्मचरित्र सापडतं. चरित्रांमध्ये पण ती जर जवळच्या एखाद्या व्यक्तीने लिहिली असतील, उदाहरणार्थ. 'चीपर बाय द डझन' हे मुलांनी लिहिलेलं आईवडिलांचं चरित्र आहे, तरच वाचनीय असतात.

एका मराठी लेखकाचे. नाव आठवत नाही पण लेखकाने दोन लग्न केली. आणी पहिल्या पत्नीला कसा खर्च देत होतो याचे वर्णन आहे. आजिबात आवदले नाही.

आदूबाळ's picture

16 Oct 2014 - 1:28 pm | आदूबाळ

ना सी फडके?

जेपी's picture

16 Oct 2014 - 3:12 pm | जेपी

हं बरोबर आहे आदुदादु.
आणखीन एक ' मी आणी माझा बाप' याचा पण लेखक आठवत नाही.

आदूबाळ's picture

16 Oct 2014 - 4:39 pm | आदूबाळ

नरेंद्र जाधव?

यावेळेसपण राईट्ट आदुदादु.हे बहुतेक पुणे विद्यापीठाचे कुलगुरु पण होते.
आणखीन एक पुस्तक आहे त्याचे नाव ,लेखक, किंवा मजकुर पण आठवत नाय *wink*

पिवळा डांबिस's picture

16 Oct 2014 - 11:06 pm | पिवळा डांबिस

'मी आणि माझा बाप' मधली श्री. नरेन्द्र आणि इतर ज्युनियर जाधवांचं लिखाण पुष्कळसं आत्मस्तुतीपर वाटतं. ते तसं असणं सहाजिक असावं जर त्यांनी मिळवलेल्या लौकिक यशाचा विचार केला तर. ते पटलं नाही तरी समजण्यासारखं आहे.

पण तो सगळा फापटपसारा वगळून जर फक्त त्यांच्या वडिलांनी आत्मचरित्रपर लिहिलेली काही पानं वाचली तर खूप ती प्रभावित करणारी वाटली. एका वेगळ्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थीतीत जीवन घालवलेल्या व्यक्तिचे अनुभवाचे बोल, विचार वाचायला खूप आनंद वाटला.

दशानन's picture

16 Oct 2014 - 11:18 pm | दशानन

ज्या परिस्थितीतून ते आले आहेत, आणि त्यांनी ज्या ज्या परिस्थिती आपले आयुष्य निर्माण होण्यासाठी वेचले आहे, ते पाहता थोडाफार दोष आपण नजरेआड करणे देखील मानवतेला धरून आहे.

प्यारे१'s picture

17 Oct 2014 - 3:09 am | प्यारे१

डॉ. नरेन्द्र जाधवांच्या पुस्तकाचं नाव 'आमचा बाप आणि आम्ही' असं आहे असं नम्रपणं नमूद करु इच्छितो.

पिवळा डांबिस's picture

17 Oct 2014 - 9:38 am | पिवळा डांबिस

होय, चेक करून बघतां तुम्ही म्हणताय ते टायटल आहे हे खरं.
पण त्यामुळे विशेष काय फरक पडावा ते समजलं नाही!
पुस्तक वाचलं असल्याशी कारण!
तुमचं पुस्तकाबद्दलचं मत अधिक वाचनीय असेल, ते मांडा ना...

प्रसाद१९७१'s picture

17 Oct 2014 - 5:11 pm | प्रसाद१९७१

त्यांनी मिळवलेल्या लौकिक यशाचा

न.जा चे सो कॉल्ड यश हे मोठे प्रश्न चिन्ह आहे पण ते का मिळाले आहे ह्याचे उत्तर सोप्पे आहे. त्यांचे कतृत्व काय आहे हा तर मोठा गहन प्रश्न आहे.
पदव्या मिळवळे हे जर कतृत्व असेल तर मग बोलायलाच नको.

विजुभाऊ's picture

18 Oct 2014 - 1:31 pm | विजुभाऊ

"आम्ही आणि आमचा बाप " या पुस्तकाचे वैषिष्ठ्य म्हणजे तीनही पात्रांची भाषा.
खरोखरच शिक्षणामुळे भाषेवर पडणारा फरक अनुभवण्याजोगा आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Oct 2014 - 10:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

असत्याचे प्रयोग.

स्नेहल महेश's picture

16 Oct 2014 - 12:50 pm | स्नेहल महेश

खूप छान आत्मचरीत्र आहे
१९५०-६० च्या शतकात हॉर्स रेसिंग सारखं क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होऊन दाखवणे,
कठीण काळात आलेले अनुभव खूप छान प्रकारे लिहिले आहेत
नि:पक्षपाती लिखान

स्वामी संकेतानंद's picture

16 Oct 2014 - 1:31 pm | स्वामी संकेतानंद

"न" आवडणारे नाव सुचवायचे आहे. :)

स्नेहल महेश's picture

16 Oct 2014 - 1:50 pm | स्नेहल महेश

SORRY

कपिलमुनी's picture

16 Oct 2014 - 4:56 pm | कपिलमुनी

अजिबात आवडला नव्हता ..
फुल्ल बकवास

स्वामी संकेतानंद's picture

16 Oct 2014 - 1:32 pm | स्वामी संकेतानंद

आचार्य अत्र्यांचे कर्‍हेचे पाणी..

मित्रानी तारीफ केली म्हणून वाचायला घेतले होते. पण कंटाळलो. कर्हेचे पाणी संपता संपत नाही.

पैसा's picture

16 Oct 2014 - 5:16 pm | पैसा

ते पुस्तक तू टिपिकल अत्रे म्हणून वाचायला गेला असशील.

स्वामी संकेतानंद's picture

17 Oct 2014 - 5:36 pm | स्वामी संकेतानंद

आत्मचरित्रच म्हणून वाचायला गेलो होतो. पण काही झेपलं नाही.

संचित's picture

16 Oct 2014 - 5:17 pm | संचित

किशोर बियाणी यांचे "it happened in india". कंटाळलो.

खोटं सांगेन. ऊर्मिला देशपांडे.
अगदीच कंटाळवाणं आणि खोटं वाटलं. नावाला जागलेलं पुस्तक.

खोटं सांगेन बद्दल इनिशी अगदी सहमत...

कर्‍हेचे पाणी बद्दलही सहमत !

लेखिकेने पुस्तक लिहितानाच ठरवले असावे की "खोटेच सांगेन" रेटून पुस्तक वाचले होते.. पण हाती काहीच लागले नाही. तसे ही मी आत्मचरित्रपर पुस्तकांचा धसका घेतला आहे.. !

पैसा's picture

16 Oct 2014 - 10:56 pm | पैसा

फारच थोडी आत्मचरित्रे प्रामाणिक असतात. बरीचशी कादंबरीच्याजवळ जाणारी असतात.

सूर्य पेरलेला माणूस :(

भयानक!

कवितानागेश's picture

16 Oct 2014 - 11:04 pm | कवितानागेश

का वाचलत? ???
हाच प्रश्न ते वाचल्य्यवर मी स्वतलापपण विचारला.

माझा मेंदू त्यावेळी खराब झाला होता, असे स्वत:ला उत्तर देऊन मी गप्प झालो.. तुम्ही काय दिवे लावले, स्वारी.. काय दिवे पेरले :D

अर्धवटराव's picture

17 Oct 2014 - 9:49 pm | अर्धवटराव

बिहैण्ड एव्हरी फॉर्चुन देअर इज अ क्राईम म्हणतात ना... एका दशकात बांधकाम व्यवसायात मिळालेल्या "फॉर्च्युन" कडे डोळेझाक व्हावी म्हणुन एव्हढा बटबटीतपणा आणला असावा काय चरित्राला??

अहो नका हो मला तोंड उघडायला लावू.. धंदा आहे माझा पण तो ;)

अर्धवटराव's picture

17 Oct 2014 - 10:47 pm | अर्धवटराव

तुम्ही देखील चरित्रलेखक आहात ? :P
पण दवणेंची 'ऊंची' तुम्ही गाठु शकाल असं वाटत नाहि ;)

पण दवणेंची 'ऊंची' तुम्ही गाठु शकाल असं वाटत नाहि

अजिबात नाही, ना तशी मनात सुप्त इच्छा देखील नाही. :P

पिवळा डांबिस's picture

16 Oct 2014 - 11:09 pm | पिवळा डांबिस

कुणाचं (कुणाबद्दल) आहे?

पिडा, मी तुमच्या घरापर्यंत हे पुस्तक फ्रीमध्ये पाठवेन, पण आधी तुम्ही शपथ घ्या, माझा जीव घेणार नाहीत म्हणून... =))

पिवळा डांबिस's picture

16 Oct 2014 - 11:25 pm | पिवळा डांबिस

विचार करून सांगतो!!! ;)
(स्वगतः बाकी ह्याचं तंगडं मोडायला इतकी इतर कारणं आहेत की ह्या पुस्तकानेच नेमका काय फरक पडणार आहे?)
:)

आधीच एक तंगडे स्टीलचे आहे, दुसरे काय तोडणार?
सोबत.. अजून एक पुस्तक देखील देतो.. पण त्याबद्दल तुम्ही एकतर माझा पाठलाग... अगदी पुढील जन्मी देखील कराल याची मला खात्री आहे, किंवा तुम्ही मला शेवटी मला गिनिपिग म्हणून वापराला.... =))

काळा पहाड's picture

16 Oct 2014 - 11:33 pm | काळा पहाड

सांगा हो लवकर सांगा कोणतं. मला ही काही जणांवर सूड उगवायचा आहे.

कोणी खास दुश्मन असेल तर बोला... ;)

कवितानागेश's picture

16 Oct 2014 - 11:28 pm | कवितानागेश

मी लहान होते. दवणेन्चे नाव वाचून वाचायला घेतले. कुणीतरी फुकट घरी पाठवले होते. ..
सध्या तरी इतकीच कारणे आठवतायत.

>>>कुणीतरी फुकट घरी पाठवले होते. ..

काय योगायोग... सगळ्यांनाच ते पुस्तक फुकटमध्ये मिळाले होते कि काय ;)

उपक्रमावर इथे चर्चा झाली होती. नंदनचा हा प्रतिसाद वाचनीय आहे :)

>>> नंदनचा हा प्रतिसाद वाचनीय आहे
असणारच. :-/
माणूस कोट्याधीश आहे ना?

गैरसमज होण्याच्या शक्यतेमुळं.... नंदन 'कोट्या'धीश आहे ना!

आदूबाळ's picture

17 Oct 2014 - 12:03 am | आदूबाळ

सूर्य पेरणारा माणूस वरून आठवलं - आमच्या अण्णा झावर्‍यांचं आत्मचरित्र त्याच वाटेने जाणारं आहे. पण अण्णांना स्वतः लेखनाची लय हाऊस असल्याने ते घोस्टरायटरकडे आपलं आयुष्य सोपवायची सुतराम शक्यता नाही.

महादेव शास्त्री जोशींचं अात्मपुराण कंटाळवाणं वाटलेलं आत्मचरित्र.स्नेहांकिता हे जुन्या अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचं अात्मचरित्र वाचताना हे खोटं लिहिलंय बरंच काही झाकुन असं वाटत राहातं.

प्रसाद१९७१'s picture

17 Oct 2014 - 5:14 pm | प्रसाद१९७१

असेच सुधीर फडक्यांचे आत्मचरीत्र पण केविलवाणे आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Oct 2014 - 5:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जगाच्या पाठीवर. खरचं खुप वाईट दिवस काढले त्यांनी.

प्रसाद१९७१'s picture

17 Oct 2014 - 5:49 pm | प्रसाद१९७१

वाईट दिवस काढले हे कबूल आहे पण ते ज्या प्रकारे लिहीले आहे ते त्यांना केविलवाणे करुन टाकतय. मी कसा बापुडा आणि दुसरे माझ्याशी कसे वाईट वागले हेच पुन्हा पुन्हा आहे.