आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ५
दुसर्या विश्रांती सत्रानंतर आज पाचवा डाव खेळला जाईल.
आनंदला जर सामना जिंकायचा असेल तर आजचा डाव अनेक कारणांनी अतिशय महत्त्वाचा आहे.
एकतर गुणसंख्या २-२ अशी समान आहे आणि आनंदची आज पांढरी मोहोरी आहेत.
शिवाय उद्याचा डाव सहावा आहे तिथे सामना निम्मा संपतो. नियमानुसार पुढचा निम्मा सामना सुरु होताना मोहोर्याच्या रंगांची आदलाबदल होते त्यामुळे पुन्हा सातव्या डावातही आनंदची मोहोरी काळीच असणार आहेत!
त्यामुळे आजचा डाव जिंकणे त्यानंतर ६ आणि ७ हे दोन्ही डाव बरोबरीत सोडवणे हे आनंदसाठी अतिशय चांगले ठरेल.
कारण त्यापुढच्या पाच डावात आनंदकडे ३ वेळा पांढरी मोहोरी असणार आहेत.