भागो जनता भागो
हल्ली म्हणजे गेले ५-६ महिने मला "मॅरॅथॉन" चं वेड लागले आहे...अर्थात हे वेड चांगलेच आहे म्हणा.. तसा मी जॉगिन्ग ला अनेक वर्ष जातो पण प्रत्यक्ष मॅरॅथॉन मधे भाग घ्यायचा योग आला नव्ह्ता. किंबहुना मी सेरियसली त्याकडे बघितलेच नव्हते. मुम्बई मधे स्टॅन्डर्ड चार्टर्ड मॅरॅथॉन गेले कही वर्ष होत आहे. तसेच इतरही दर महिन्यात कुठे ना कुठे तरी मॅरॅथॉन आयोजित केली जाते.