हल्ली म्हणजे गेले ५-६ महिने मला "मॅरॅथॉन" चं वेड लागले आहे...अर्थात हे वेड चांगलेच आहे म्हणा.. तसा मी जॉगिन्ग ला अनेक वर्ष जातो पण प्रत्यक्ष मॅरॅथॉन मधे भाग घ्यायचा योग आला नव्ह्ता. किंबहुना मी सेरियसली त्याकडे बघितलेच नव्हते. मुम्बई मधे स्टॅन्डर्ड चार्टर्ड मॅरॅथॉन गेले कही वर्ष होत आहे. तसेच इतरही दर महिन्यात कुठे ना कुठे तरी मॅरॅथॉन आयोजित केली जाते.
धावण्यात फार आनंद आहे. स्वत:शीच स्पर्धा लावण्यात मजा येते. गेल्या वेळचा रेकोर्ड पुढिल वेळी मोड्णे हेच एक ध्येय घेऊन धावायचे. अनेक ५०-६०+ वयोगटातील लोकही हिरिरीने या शर्यतीत भाग घेत असतात. त्यांना धावताना बघून थक्क व्हायला होते. त्यांच्या फिटनेस ला सलाम व असा फिटनेस मलाही लाभो अशी देवाकडे प्रार्थना.
बरं, माझी खात्री आहे मिपा वरही असे हौशी धावक नक्कीच असतील. कुणी माझ्यासारखाच धावण्याचा वेडा असेल तर जाणून घ्यायला आवडेल. शिवाय, पुढील मॅरेथॉन ला एकत्र धावता आलं तर बातच और होईल !
आहे का कुणी इच्छुक? :)
जाता जाता: “If you want to run, then run a mile. If you want to experience another life, run a marathon.” – Emil Zatopek
प्रतिक्रिया
26 May 2015 - 2:18 pm | वेल्लाभट
पुढील लक्ष्य - ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन .....
भेटूच तिथे आपण.
27 May 2015 - 12:02 pm | अनुप७१८१
होय !
26 May 2015 - 4:25 pm | पगला गजोधर
आधी भागो जनता पकडेगी, असे वाचले...
27 May 2015 - 8:44 am | अनिल मोरे
27 May 2015 - 12:01 pm | अनुप७१८१
मस्तच ... मित्रा....खुप छान वेळेत पुर्ण केली आहेस
27 May 2015 - 2:35 pm | अनिल मोरे
धन्यवाद!!!
28 May 2015 - 2:20 pm | वेल्लाभट
अरे क्लासच!
मस्त. कीप इट अप.
28 May 2015 - 4:17 pm | मोदक
मॅरेथॉनची कहाणी डिट्टेलमध्ये लिहा.
धावण्याला सुरूवात करावी असे का वाटले?
किती अंतराने सुरूवात केली?
अंतर वाढवत नेले त्यावेळी काय पद्धत वापरली?
धावण्यासाठी कोणत्या प्रकारचे शूज आणि कपडे वापरले?
एखादी दुखापत झाली का? त्यातून बाहेर पडण्यासाठी काय केले?
दुखापत होवू नये म्हणून काय केले?
27 May 2015 - 2:20 pm | पैसा
आपल्याकडे अॅथेलेटिक्स हा सगळ्यात दुर्लक्षित प्रकार आहे. खरे तर धावायला काय लागतं? फक्त २ पाय. बूट नसले तरी चालेल. पण तेवढेही आपण करायला बघत नाही. सगळे काय ते आयपीएल च्या मागे!
27 May 2015 - 4:51 pm | वेल्लाभट
आता कबड्डी, बॅडमिंटन सारखे खेळ ग्लॅमर आल्यामुळे लोकप्रिय होऊ लागलेत. रनिंगचंही तसंच आहे. स्टॅ.चॅ. मॅरेथॉन मधे सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे आजकाल हेही 'फॅड' होऊ लागलंय. असो. ज्यांना त्यात खरी मजा येते त्यांनी ती घ्यावी. ज्यांचा सेल्फी काढून वॉल वर चिकटवण्यापुरता स्वार्थ साधला जातो त्यांनी तसं करावं. ज्यांना निरर्थक वाटतं त्यांनी दुर्लक्ष करावं. पण रनिंग इज गुड !
27 May 2015 - 2:35 pm | प्रसाद गोडबोले
हे अजुन एक निरर्थक अत्मरंजन =))
27 May 2015 - 4:46 pm | वेल्लाभट
म्हणजे कसा अर्थ घ्यायचा याचा?
28 May 2015 - 8:07 am | अनिल मोरे
http://bnpgreenrunners.org/
28 May 2015 - 5:12 pm | झकास
PuneRunning हा group join करा. FB वर आहे. निखील शाह ह्यांनी सुरू केलाय. पुण्याच्या विविध भागात त्यांचे सभासद run करतात रोज. नवीन runners साठी 'Leap of Faith' असं training program करतात. एखादा seasoned runner स्वतः volunteer करून guide करतो.
http://www.punerunning.com/
17 Jan 2016 - 5:25 pm | अनिल मोरे
Dear ANIL MORE. , Congratulations! you have finished your HALF MARATHON run in 02:28:56 . For more information logon to www.procamrunning.in
17 Jan 2016 - 5:41 pm | पैसा
यासाठी काय तयारी केलीत ते पण लिहा!
18 Jan 2016 - 12:20 pm | एस
अभिनंदन!
17 Jan 2016 - 10:53 pm | पीके
हार्ट चा प्रोब्लेम असणार्यांसाठि वेगळि लाइन ठेवा हो...
18 Jan 2016 - 12:17 pm | वेल्लाभट
वाह ! अनिल मोरे साहेब अभिनंदन ! सहीच!
२:२८ इज अ ग्रेट टाईम यू हॅव अचीव्ह्ड.
लगे रहो! भागते रहो !
आणिक दोन मिपाकरांनी हाफ म्यारेथॉन पूर्ण केलेली आहे पण त्यांनी स्वतःच प्रतिसाद द्यावा व माहिती सांगावी याची वाट बघतो.