भागो जनता भागो
हल्ली म्हणजे गेले ५-६ महिने मला "मॅरॅथॉन" चं वेड लागले आहे...अर्थात हे वेड चांगलेच आहे म्हणा.. तसा मी जॉगिन्ग ला अनेक वर्ष जातो पण प्रत्यक्ष मॅरॅथॉन मधे भाग घ्यायचा योग आला नव्ह्ता. किंबहुना मी सेरियसली त्याकडे बघितलेच नव्हते. मुम्बई मधे स्टॅन्डर्ड चार्टर्ड मॅरॅथॉन गेले कही वर्ष होत आहे. तसेच इतरही दर महिन्यात कुठे ना कुठे तरी मॅरॅथॉन आयोजित केली जाते.
धावण्यात फार आनंद आहे. स्वत:शीच स्पर्धा लावण्यात मजा येते. गेल्या वेळचा रेकोर्ड पुढिल वेळी मोड्णे हेच एक ध्येय घेऊन धावायचे. अनेक ५०-६०+ वयोगटातील लोकही हिरिरीने या शर्यतीत भाग घेत असतात. त्यांना धावताना बघून थक्क व्हायला होते. त्यांच्या फिटनेस ला सलाम व असा फिटनेस मलाही लाभो अशी देवाकडे प्रार्थना.
बरं, माझी खात्री आहे मिपा वरही असे हौशी धावक नक्कीच असतील. कुणी माझ्यासारखाच धावण्याचा वेडा असेल तर जाणून घ्यायला आवडेल. शिवाय, पुढील मॅरेथॉन ला एकत्र धावता आलं तर बातच और होईल !
आहे का कुणी इच्छुक? :)
जाता जाता: “If you want to run, then run a mile. If you want to experience another life, run a marathon.” – Emil Zatopek
प्रतिक्रिया
पुढील लक्ष्य - ठाणे महापौर
होय !
भागो जनता भागो च्या ऐवजी चुकून ….
अरे व्वा!!!
मस्तच ...
धन्यवाद!!!
अरे क्लासच! मस्त. कीप इट अप.
मॅरेथॉनची कहाणी डिट्टेलमध्ये
अरे वा!
तरी बरं...
हे अजुन एक निरर्थक अत्मरंजन =
निरर्थक?
१८ जुलै
PuneRunning
Standard chartered mumbai marathon
अभिनंदन!
अभिनंदन!
हार्ट चा प्रोब्लेम
वाह ! अनिल मोरे साहेब अभिनंदन