घोडा का अड(क)ला?
लेवॉन अरोनिअन आणि आनंद यांच्यातल्या डावांचं स्टॅटिस्टिक्स अरोनिअनच्या बाजूने आहे (६-२) पण आनंदने त्याला हरवलेले जे डाव आहेत ते दोन्ही अफलातून आहेत.
२०१३ सालच्या विक अॅन झी स्पर्धेतल्या डावाबद्दल मी उंटांची चालच तिरकी! हे रसग्रहण लिहिले होते. तो डाव भन्नाटच होता म्हणजे त्यातली काँबिनेशन्स अशी काही तुफान जमवली होती आनंदने की काही विचारता सोय नाही. मॅग्नुस कार्लसन सुद्धा अवाक झाला होता तो डाव बघून!