फुटबॉल विश्वचषक :२०१४ (उपउपांत्य ते अंतिम सामना)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
28 Jun 2014 - 9:41 am
गाभा: 

नमस्कार मंडळी, फुटबॉल फिवरने आता चांगलाच जोर धरलाय हौसे नवशे सर्वच आता फुटबॉलची चर्चा करु लागले आहेत. आपणही मिपावर पहिल्या फेरीतील सामन्यांचा आनंद घेतला आहे. आता बाद फेरीतील सामने सुरु होत आहेत जो जिंकेल तो पुढे जाईल. पहिल्या फेरीत भले भले बाहेर पडले. पोर्तुगाल, स्पेन,इटली,इंलंड,यांनी चांगला खेळ करुनही ते बाहेर पडलेत. पोर्तुगाल केवळ एकट्या रोनोल्डोच्या भरवशावर राहीले आणि सरासरी आवश्यक असतांनाही घानाचा पराभव करुनही परतीच्या मार्गावर लागावं लागलं. बाकीच्या खेळाडुंनी चांगला खेळ करायला पाहिजे होता. या विश्वचषकात लक्षात राहील तो उरुग्वेचा सुआरेझ ज्याने इटलीचा खेळाडू जॉर्जिओ ला चावा घेतला आणि त्याच्यावर फिफ़ाला नऊ सामन्यांची बंदी घालावी लागली. बाकी, अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या धडाकेबाज खेळीमुळे अर्जेंटीना फॉर्मात आहे. मेस्सीने केलेले गोल अनेक दिवस स्मरणात राहतील. फुटबॉलप्रेमी नायजेरियाचा धडाकेबाज स्ट्रायकर अहमद मुसा याला विसरणार नाहीत, माध्यमांनी त्याला फारसे उचलले नाही पण अर्जेंटीनाच्या विरोधातला त्याचा खेळ लाजवाब होता. लिलया पासेस देणे, खेळाडुला चकवून त्याने गेलेले गोल, अहाहा, क्या कहने.

राहीला आमच्या ब्राझीलचा प्रश्न. जर्मनी, अर्जेंटीना,ब्राझील,फ्रान्स,नेदरलँड, असा कोणी जिंकण्याचा अनुक्रम लावणार असेल तर लावू द्या. आमच्या ब्राझीलचे सर्वच खेळाडु उत्तम खेळत आहेत. नेयमार, हुल्क, फ्रेड आणि गोलाडवा ज्युलियो सेसर, यांच्या भरवशावर आम्ही विश्वचषक जिंकण्याची स्वप्न पाहात आहोत. आज चिलीचा त्रास आमच्या संघाला होऊ नये. ब्राझील जिंकेल पण चिली नाकात दम आणेल यात काही वाद नाही. बाकी आपण पहिल्या धाग्यात चांगला प्रतिसाद दिला दुस-या बाद फेरीच्या सामन्यांचा आनंद घेऊच तेव्हा आपापले संघाचे झेंडे घेऊन तयार राहा.

 
उपउपांत्य फेरी.(क्वार्टर फायनल) 
 

४ जुलै 
फ्रान्स वि.जर्मनी
रात्री ९:३०

४ जुलै 
ब्राझील वि. कोलंबिया
पहाटे १:३०

५ जुलै
अर्जेंटीना वि. बेल्जियम.
रात्री ९:३०

५ जुलै
नेदरलँड वि.कोस्टारिका
पहाटे  १:३०

उपांत्य फेरी (सेमी फायनल्स)

८ जुलै
 ब्राझील वि. जर्मनी
पहाटे १:३०

९ जुलै
 अर्जेंटीना वि. नेदरलँड
पहाटे १:३०

 तिसर्‍या स्थानासाठी

१२ जुलै
 ब्राझील वि. नेदरलँड
पहाटे  १:३०

 
       अंतिम सामना
 

१३ जुलै
   जर्मनी वि. अर्जेंटीना
रात्री १२:३०

Germany                                                                         
Germany

Argentina
Argentina

1
NEUER

(GK)

1
ROMERO

(GK)

2
GROßKREUTZ

2
GARAY

3
GINTER

3
CAMPAGNARO

4
HÖWEDES

4
ZABALETA

5
HUMMELS

5
GAGO

6
KHEDIRA

6
BIGLIA

7
SCHWEINSTEIGER

7
DI MARIA

8
ÖZIL

8
PEREZ

9
SCHÜRRLE

9
HIGUAIN

10
PODOLSKI

10
MESSI

11
KLOSE

11
M. RODRIGUEZ

12
ZIELER

(GK)

12
ORION

(GK)

13
MÜLLER

13
A. FERNANDEZ

14
DRAXLER

14
MASCHERANO

15
DURM

15
DEMICHELIS

16
LAHM

16
ROJO

17
MERTESACKER

17
F. FERNANDEZ

18
KROOS

18
PALACIO

19
GÖTZE

19
ALVAREZ

20
BOATENG

20
AGUERO

21
MUSTAFI

21
ANDUJAR

(GK)

22
WEIDENFELLER

(GK)

22
LAVEZZI

23
KRAMER

23
BASANTA

Coach                                   Coach

Joachim LOEW (GER)
                                           Alejandro SABELLA (ARG)

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

28 Jun 2014 - 9:56 am | खटपट्या

माझे अंदाज खालीलप्रमाणे

ब्राझील वि चिली - ब्राझील (ब्राझील जिंकावा असे वाटतेय. जबरी सामना होणार आहे)
कोलंबिया वि उरुग्वे - कोलंबिया (उरुग्वे जिंकावे असे वाटतेय)
नेदरलँड वि. मेक्सिको - मेक्सिको
कोस्टारिका वि. ग्रीस - कोस्टारिका जिंकावा असे वाटतेय
फ्रान्स वि. नायजेरिया - नायजेरिया जिंकावा असे वाटतेय. पण सामना जबरी होणार
जर्मनी वि अल्जेरिया - जर्मनी
अर्जेंटीना वि. स्वित्झर्लंड - हा अजून एक सामना मस्त होणार आहे. मेसिमुळे आर्जेन्टिना विजयी होईलही

त्यातल्या त्यात फक्त जर्मनीची खात्री देता येतेय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2014 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>ब्राझील वि चिली - ब्राझील (ब्राझील जिंकावा असे वाटतेय. जबरी सामना होणार आहे)

+१. आजचा सामना लैच जबरी होणार आहे. ब्राझील जिंकेलच. च्यायला, या ब्राझीलने माझं नाक ठेवलं पाहिजे.
नै तर आम्हाला झेंडा बदलनं आलं. ;)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

28 Jun 2014 - 11:05 am | प्रचेतस

ब्राझिल जिंकेलच आज.

बाकी स्पेन, इटली, पोर्तुगाल, इंग्लंड आदि संघ बाहेर पडल्यामुळे तशी निराशाच झालीय.

कपिलमुनी's picture

29 Jun 2014 - 1:58 am | कपिलमुनी

नेदरलँड वि. मेक्सिको -- नेदरलँड

मोहन's picture

28 Jun 2014 - 11:18 am | मोहन

कोनताss झेंडा घेउ हाssती ?

जे.पी.मॉर्गन's picture

28 Jun 2014 - 11:38 am | जे.पी.मॉर्गन

ब्राझील, उरुग्वे, नेदरलँड्स, कोस्टारिका, फ्रान्स, जर्मनी, आर्जेन्टिना, बेल्जियम

आपला झेंडा नेदरलँड्सचा!

जे.पी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2014 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राष्ट्रगीत संपलेत आणि सामना आता सुरु होतोय. ब्राझील जिंकणार. :)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2014 - 9:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेयमारने दिलेल्या कॉर्नवर डेव्हीडने पहिला गोल १९व्या मिनिटाला नोंदवला. १-० झ़़्कास सामना सुरु आहे, सुंदर चाली आणि ब्राझीलचे सुरेख आक्रमण. नेयमार तर मैदानभर खेळतोय. मजा येतेय.

-दिलीप बिरुटे

गौरव जमदाडे's picture

28 Jun 2014 - 10:01 pm | गौरव जमदाडे

ब्राझीलची आघाडी

पैसा's picture

28 Jun 2014 - 10:03 pm | पैसा

सगळे ग्राउंड पिवळ्या रंगत रंगलंय!

गौरव जमदाडे's picture

28 Jun 2014 - 10:05 pm | गौरव जमदाडे

बरोबरी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2014 - 10:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिलीच्या सँचेझ ने केला बॉ एक गोल. ब्राझीलच्या गोलकीपरला फार अवघड असा हा स्ट्रोक नव्हता. :(

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2014 - 11:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हुल्क,फ्रेड,नेयमार यांनी आक्रमणं केली परंतु चिलीच्या बचावापुढे ब्राझीलची दाळ काही शिजेना. सेकंड हाफ मधेही निकाल लागला नाही, आता अतिरिक्त वेळेत काय होतं ते बघुया.

-दिलीप बिरुटे
(ब्राझीलवर नाराज झालेला)

खटपट्या's picture

28 Jun 2014 - 11:50 pm | खटपट्या

ब्राझीलच्या डैन ला फुकटचे पिवळे कार्ड दिले राव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2014 - 11:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुस-या अतिरिक्त वेळेत केला तर ब्राझीलच गोल करेल असे त्यांचे आक्रमण पाहता वाटते नै तर पेनाल्टी शुट वर जातोच आहे सामना. आणि तिथे ब्राझील बाजी मारेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

गौरव जमदाडे's picture

29 Jun 2014 - 12:06 am | गौरव जमदाडे

+१

खटपट्या's picture

29 Jun 2014 - 12:10 am | खटपट्या

पिंनाला चा गोल होता होता वाचला
ब्राझिल बाहेर जाता जाता वाचला

खटपट्या's picture

29 Jun 2014 - 12:11 am | खटपट्या

कम ओन ब्राझिल

अतिशय रोमांचकारी सामना आता पेनॉल्टी शुटवर पोहचलाय. ब्राझीलची सर्व मदार आता गोलकिपर ज्युलियो सेसर वर आहे, तो किती गोल वाचवतो आणि ब्राझील स्टार खेळाडू किती गोल करतात, चिली किती करतील एकदम भारी सामना. निकाल आता काही क्षणावर येऊन पोहचलाय.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2014 - 12:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिला गोल डेव्हीडचा....१-० शुन्य. ज्युलियो सेसर ने वाचवला गोल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2014 - 12:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्युलियो सेसर ने दुसराही गोल वाचवला सिंपली ग्रेट. ब्राझीलला मात्र दुसरा गोल करता आला नाही.
तिस-या शॉटवर ब्राझील २-०.
चिलीने गोल केला. २-१. ब्राझीलला चौथा शॉटचे रुपांतर गोल मधे करता आले नाही.
चिलीने दुसरा गोल नोंदवला. २-२. नेयमारचा फटका आहे आता. गोल. ३-२
चिलीचा शेवटचा फटका बारला लागून गेला....

ब्राझील विजयी.... ३-२.... सुप्प्पर म्याच.... :)

-दिलीप बिरुटे

खटपट्या's picture

29 Jun 2014 - 12:27 am | खटपट्या

बिचारी चिलि
सोरी चीली

प्रचेतस's picture

29 Jun 2014 - 12:32 am | प्रचेतस

मायला, दिवसभर भटकून आता घरी आलो. नशिबाने पेनल्टी शूटाऔट बघता आले.
बिरुटे सरांना दुसर्या संघाचा झेंडा हाती घ्यायची वेळ आली नाही हे नशिब. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2014 - 4:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता आम्ही फायनलपर्यंत मागे वळून पाहणार नाही. :)
काल ब्राझीलचे खेळाडु दमले आणि मीही दमलो.
-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

29 Jun 2014 - 4:20 pm | प्रचेतस

आज सकाळी हायलाईट्स पाहताना ब्राझीलचा खेळ बराच अवसानाघातकी वाटला. गोल करण्याच्या संधी दवडणे, ढिसाळ बचाव, मध्यरक्षक आणि बचावपटूंचे इकडेतिकडे बागडणे.
एकंदरित लुइज फिलिप स्कोलरींना विद्यार्थ्यांवर लै मेहनत करावी लागणार आहे असे दिसते कारण पुढचे पेपर अधिकाधिक अवघड होत जातील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2014 - 4:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोल करण्याच्या काही सोपे चान्सेस गेले याच्याशी सहमत काही फटके आणि काही पासेस ऐनवेळी फसले आणि गोल करण्याची संधी गेली याच्याशी सहमत आहे. आक्रमण केले परंतु वाया गेले. आपण म्हणता त्या प्रमाणे फिलिप सेठ विद्यार्थ्यांवर मेहनत घेतील. काल मैदानावर हातवारे करु करु आणि खेळाडुंना सांगू सांगू थकुन गेलेले दिसले. :)

-दिलीप बिरुटे

ब्राझिल जिंकले एकदाचे! पण काय म्याच झाली! अनलकी चिली..!

खटपट्या's picture

29 Jun 2014 - 2:05 am | खटपट्या

कोलंबियाच्या जेम्स चा गोल, गोल ऑफ द टुर्नामेण्ट ठरावा
कोलंबिया १ - उरुग्वे ०

शिक्षाच ती खेळणाऱ्यांना आणि बघणाऱ्यांना .

स्पेनला ज्यांनी पळता भुई थोडी अशी ज्यांची अवस्था केली अशा नेदरलँडचा सामना आज मेक्सिकोशी रंगणार आहे. नेदरलँडचे वॅन पर्सी आणि रॉबेन पूर्ण जोशात आहेत. नेदरलँडने बी गृपमधे सर्व सामने जिंकले आहेत. तीन सामन्यात दहा गोल नोंदवले आहेत. मेक्सिकोच्या तुलनेत नेदरलँड आजच्या विजयाचा दावेदार आहे असे मला वाटते. मेक्सिकोचा गोलरक्षक गुलेर्मो ओचोआ हाही फार्मात आहे, तीन सामन्यात फक्त एक गोल स्वीकारला आहे. एकूणच दोन्ही संघातला आजचा सामना रंगतदार होणार आहे, पटावर नेदरलँड जिंकेल असे वाटत असले तरी मेक्सिकोही काही चमत्कार करु शकतो.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

29 Jun 2014 - 4:16 pm | प्रचेतस

नारिंगी सेनाच हां सामना जिंकणार असे वाटत आहे. मेक्सिको बचावात जरी मजबूत असले तरी आक्रमणाची धार त्यांच्यात नाही.
एकंदरीत डचांचे आक्रमण विरुद्ध मेक्सिकनांचा बचाव. सामना रंगतदार होईल असे वाटते.

कोस्टारिकाचा अनपेक्षित गोल
कोस्टा रिका १ - ० ग्रीस
अजून एक विचित्र गोष्ट बघायला मिळाली कोस्टारिकाचा एक खेळाडू मैदानाबाहेर खुर्चीत आराम करत होता त्यालाही पिवळे कार्ड दाखवले

खटपट्या's picture

30 Jun 2014 - 3:23 am | खटपट्या

ग्रिस ची ९१ व्या मिचीटाला बरोबरी

खटपट्या's picture

30 Jun 2014 - 4:08 am | खटपट्या

कोस्टारिकाच्या गोलकीपर ने जबरदस्त बचाव केला.
कोस्टारिका चा आघाडीपटू काम्प्बेल ला जखडून ठेवले गेले आणि जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याचे गोलात रुपांतर करता आले नाही

खटपट्या's picture

30 Jun 2014 - 4:30 am | खटपट्या

शेवटी शूट आउट मध्ये कोस्टारिका विजयी

कोट्या धीश's picture

30 Jun 2014 - 2:25 pm | कोट्या धीश

आजच्या सामन्यांचे निकाल काय लागतिल ??
फ्रांस & जर्मनी जिंकावे असे वाटते पण एखादा अनपेक्षित निकाल लागू शकतो का ??

कोट्या धीश's picture

30 Jun 2014 - 2:29 pm | कोट्या धीश

हापिसात सामन्यांचे highlights बघण्यासाठी एखादी website सुचवा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2014 - 7:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेटावर थेट पाहण्यासाठी इथे तर क्षणचित्रांसाठी इथे पाहा.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

30 Jun 2014 - 5:40 pm | प्रचेतस

काल डच आणि मेक्सिकनांमधला सामना जबरदस्त झाला. मेक्सिकन गोलरक्षक ओचोओने जबरदस्त गोल सेव्हज केले. डच गोलरक्षकाने पण बरेच गोल वाचवले.
वेस्ले श्न्यायडरने ८८ व्या मिनिटाला आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत मारलेल्या तूफानी गोलमुळे डचांना बरोबरी करता आली. इंज्युरी टाईम मध्ये रॉबेनने मात्र पडल्याचे नाटकीय प्रदर्शन करत रेफ्रींकडून पेनल्टी किक ढापली आणि डचांना विजयी केले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2014 - 7:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेक्सिकोला शेवटची काही मिनिटे सांभाळता आली नाहीत आणि ते विजयी होता होता राहीले. मेक्सिकोचा गोलरक्षक ओचोओनो किमान तीन गोल वाचवलेत तोच म्यान ऑफ दी म्याचचा हक्कदार होता. श्वायडरचा फटका केलवळ लाजवाब ओचोओ त्या फटक्याकडे केवळ पाहात राहीला. आपण म्हणता तसं रॉबेनचे पडण्याचे नाटक योग्य वेळी कामाला आले आणि नेदरलँडला दुसरा गोल करता आला. नेदरलँड जरी आठमधे पोहचले आणि त्यांचा खेळ असाच राहीला तर मला नै वाटत की ग्रीस किंवा कोस्टारिका पुढे त्यांचा शनिवारी काही निभाव लागेल. कालचा नेदरलँडचा खेळ तेवढा मला भावला नाही.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2014 - 7:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फ्रान्स वि. नायजेरियाचा सामना थोड्या वेळाने सुरु होईल. जर्मनी आणि अल्जेरियाचा रात्री दीड वाजता सामना आहे, हा सामना पाहणं काही शक्य नाही. फ्रान्स वि. नायजेरियात कोण जिंकेल काय सांगता येत नाय, हा सामना नक्की पाहु.

जर्मनी अल्जेरियाचा सामना थेट इंजॉय करणा-या मिपाकरांनी जर्मनी आणि अल्जेरियाच्या सामन्याचा थेट वृत्तांत लिहावा. :)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

30 Jun 2014 - 8:12 pm | प्रचेतस

फ्रान्स जिंकेल असं वाटतंय. एकतर गटसाखळीत त्यांनी सुरेख प्रदर्शन केलंय आणि त्यांच्या स्ट्रायकर करीम बेन्झेमा पूर्ण भरात आहे.
बाकी तसं पाहता फ्रान्सला तगडी प्रतिस्पर्धी अजून भेटलाच नाही. नायाजेरियाही तसा कमजोरच असल्याने हा पेपर फ्रेंचांना सोपा जावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2014 - 10:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असं लिहायला आलो आणि फ्रांस ने सत्तराव्या मिनिटाला गोलचा सोपा चान्स घालवला.
0-0
दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2014 - 11:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फ्रांसच्या पोग्बाच्या हेडरने 79 व्या मिनिटाला पहिला गोल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2014 - 11:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दूसरा गोल काय सेल्फ झाला की फ्रांस ने केला काय समजले नाही 2-0 खेळ संपला
फ्रांस विजयी. रटाळ खेळ वाटला.

दिलीप बिरुटे

शिद's picture

1 Jul 2014 - 3:58 am | शिद

France Goal

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2014 - 8:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोलरक्षकाने हाताने बॉल अजून दूर ढकलला असता तर हा गोल झाला नसता.
फ्रांसच्या खेळाडुंच्या चांगल्या उड्या वाया गेल्या आणि
पोग्बोला चांगला चान्स मिळाला आणि बॉल गोलपोष्टमधे रवाना झाला.

चित्रफित आवडली. नेहमीच संग्रही ठेवावी अशी. धन्स.

-दिलीप बिरुटे

काल नेमका लवकर झोपल्यामुळे हा सामना पाहता आला नाही. :(

पैसा's picture

30 Jun 2014 - 11:10 pm | पैसा

झाला एकदाचा!

अल्जेरिया जर्मनीला तगडी स्पर्धा देत आहे. ९० मी. पुर्ण होऊन सुद्धा दोन्ही देशांचा एकही गोल नाही.

Thomas Müller ने केलेल्या पासवर André Schürrle ने ९२ मी. बॅकप्लिप करत सुरेख गोल डागला आहे.

आता शेवटच्या ८ मी. जर अल्जेरिया कडून गोल झाला नाही तर जर्मनी विजयी.

शिद's picture

1 Jul 2014 - 3:54 am | शिद

Germany Goal

Mesut Özil चा अल्जेरियन गोली व २ डिफेंडरना भेदून १०९ मी. जबरा गोल.

आणि अश्या रीतीने जर्मनीचा विजय व अल्जेरियाचे तगडे आव्हान संपुष्टात.

शिद's picture

1 Jul 2014 - 4:25 am | शिद

Abdelmoumene Djabou ने १२१ मी. गोल करुन अल्जेरियाचा थोडा का होईना पण मान राखला.

अल्जेरियाने जर्मनीला तशी कडवी झुंज दिली व शेवटच्या ९० मी. पर्यंत एकही गोल होऊ दिला नाही हे महत्वाचं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2014 - 8:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रफिती चांगल्या डकवल्यात. कसं काय आणायच्या आणि कोठून ? म्हणजे पुढच्या सामन्याच्या वेळी काही क्षण आवडलेले वगैरे टाकायला ! :)

-दिलीप बिरुटे

शिद's picture

1 Jul 2014 - 3:03 pm | शिद

हि घ्या http://ftw.usatoday.com/

कोट्या धीश's picture

1 Jul 2014 - 10:11 am | कोट्या धीश

जर्मनीने जरी match जिंकली तरी अल्जेरियाने मने जिंकली
काय जबरी खेळत होते लेकाचे, जर्मनी सारख्या तगड्या team सोबत खेळत असल्याचे काहीही tension नव्हते
चिली नंतर कुठल्या team ने इतके impress केले असेल तर ते अल्गेरिया.... hats off to their spirit
& फ्रांस ला आता पर्यंत तुलनेत कमी ताकदवान संघासोबत खेळावे लागले होते , so कदाचित याचा फटका त्यांना जर्मनी सोबत खेळताना बसू शकतो

कंजूस's picture

1 Jul 2014 - 11:45 am | कंजूस

fox life( fox traveller) वरची 'this is brazil' मालिका छान वाटते आहे .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Jul 2014 - 5:46 pm | निनाद मुक्काम प...

दरवेळी प्रत्येक विश्वचषक सामन्यात एखादी आफ्रिकन टीम आपला जलवा दाखवते अर्थात पुढच्या स्पर्धेत ते कुठे असतात हे पाहण्यासारखे असते,
जो जीता वही सिकंदर
१९६२ साली चीन जिंकला पण भारताने मन जिंकले असे ,मानण्यात काय हशील त्यापेक्षा १९७१ कधीही जास्त स्फूर्तिदायक आहे .
काल रस्त्यावर लोक धमाल करत होते,
एकटा अल्जेरियन चाहता आपला झेंडा खांद्यावर घेऊन ताठ मानेने त्या गर्दीतून वाट काढत जात होता ,
कोणीही त्याची हुर्या उडवली नाही ,
माझ्या परिचयाचे अनेक तुर्की हे जर्मनीला पाठिंबा देत होते .
हे विशेष
धर्मा पेक्ष्या देश मोठा ज्या देशात आपले भवितव्य आहे हा व्यावहारिक दृष्टीकोन तुर्की समाजात रुजावा ही जर्मनीच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2014 - 9:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्जेंटीना वि. स्वित्झर्लंड सामना सुरु आहे खेळाची अकरा मिनिटे संपत आलीय. अजून दोघंही एकमेकांना आजमावित आहे, असे वाटते. मेस्सीवरच लक्ष केंद्रीत आहे सध्या. आणि अर्जेंटीनाच जिंकेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

अर्जेंटीनाच जिंकेल पण स्विस सहजासहजी हार मानणार नाहित.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2014 - 9:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेस्सीच्या बुटाला चिकटून चाललेल्या चेंडुची नजाकत खासच पण. सामना सत्तावीसव्या मिनिटाला पोहोचतोय पण अजुनही कोणत्याच संघाला गोल करता आला नाही. स्वित्झर्लंडचा एक चांगला प्रयत्न पण गोलरक्षकामुळे तो प्रयत्न विफल झाला.

-दिलीप बिरुटे

मेस्सी छानच खेळतोय. पण स्विस स्ट्रायकर शकिरी जबरदस्तच खेळतोय.

प्रचेतस's picture

2 Jul 2014 - 12:01 am | प्रचेतस

मेस्सीच्या सुरेख पासवर मारियाचा गोल. ११८ व्या मिनिटाला कोंडी फोडली.

शिद's picture

2 Jul 2014 - 1:28 am | शिद

मेस्सीने स्विट्झर्लंडच्या मधल्या व बचाव फळीला झुलवत खरचं सुंदर पास केला. त्याबदल्यात तो आजच्या मॅचचा सामनावीर ठरला.
Argentina Goal

स्विट्झर्लंडने जबरदस्त कडवी झुंज दिली पण त्यांना शेवट पर्यंत काही गोल करता आला नाही. स्विट्झर्लंडला १२१ मी. ला बरोबरी करण्याची एक संधी मिळाली होती Blerim Dzemaili च्या हेडरच्या प्रयत्नाने पण दुर्दैवाने बॉल पोलवर लागून री-बाऊंड झाला.

बेल्जिअम वि. अमेरिका सामन्याचा हाल्फ टाईम झालाय पण हवी तशी मजा येत नाही.

थोडाफार रटाळ खेळ चालू आहे दोन्ही बाजूंनी.

बघू आता पुढच्या हाल्फमध्ये काय होतं ते.

सिद्धेश महाजन's picture

3 Jul 2014 - 5:25 pm | सिद्धेश महाजन

जर्मनी/घाना सामना बघयचा आहे. काहि लिन्क मिळेल का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 8:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंडळी, आजचे दोनही सामने अतिशय रंगतदार होणार आहेत. फ्रान्स वि. जर्मनी या सामन्यात जर्मनी भक्कम वाटत आहेत. जर्मनीची मधली फळी भक्कम आहे, लिलया पास देऊन खोलवर उभे असलेल्या खेळाडूकडे दिलेल्या पासेसचे गोलमधे रुपांतर झाल्याचे आपल्याला दिसते. कर्णधार लेहाम आणि मध्यफळीतील ओझीलवर जर्मनीची खरी भिस्त आहे. जर्मनीच्या संघाचा फॉर्म हा समोरच्या संघाच्या तोडीवर बराच अवलंबून असतो म्हणजे त्यांचा फॉर्म उंचावतो. संघातील उत्कृष्ट आणि समतोल संघ म्हणुन ज्याचा उल्लेख होतोय तो फ्रांस जर्मनीला कदाचित भारी पडू शकेल. मध्यरक्षक,बचावफळी आणि स्ट्रायकर यांचा पूर्ण भरलेला असलेला हा संघ पण जर्मनीविरुद्ध खेळतोय त्यामुळे त्यांचा खेळ तितकाच उंचावला तर ते जिंकू शकतील असे वाटाते.

दुस-या ब्राझील वि. कोलंबिया सामन्यातही मजा येणार आहे. यजमान संघावर पूर्णपणे दबाव असणार आहे. संपूर्ण स्पर्धेत नेयमारच्या भरवशावर ब्राझील दिसत आहे. नेयमारनेही अतिशय कौशल्यपूर्ण खेळ केलाय. पण काही सामन्यात त्याला प्रतिस्पर्धी संघाने गुंडाळून टाकलंय, प्रचंड कोंडी केलीय आणि त्या घेरावातून त्याला बाहेर पडता आले नाही. गेल्या सामन्यात तर त्याला गोलही करता आला नाही. डॅनियल अल्वेस, मार्सेलो आणि ऑस्कर, हुल्क,फ्रेड यांनी जर खेळ चांगला केला प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण केलं आणि खोलवर उभ्या असलेल्या नेयमारला उत्तम पासेस मिळाले तर ब्राझील जिंकेल. फुटबॉलचा सुपरस्टार मॅराडोना लेखात एका लेखात म्हणतो की, 'ब्राझीलकडे मिडफील्डमधून पास देणारा उत्तम खेळाडू नाही, ऑस्कर वगळता' या आणि काही उणिवा ब्राझीलच्या आहेत. मॅराडोनाच्या भाषेत म्हणायचं तर, ''विश्वविजेता म्हणुन दिसावेत असे कोणतेही गुण ब्राझीलमधे दिसत नाही'' :(

कोणी काही म्हणत असले तरी ब्राझीलच जिंकेल असं माझं मत आहे, आपणही या रंगतदार सामन्यांचे साक्षीदार व्हाल, असे मला वाटते. तर भेटूच फ्रान्स वि. जर्मनीच्या सामन्यावेळी रात्री साडे नऊ वाजता. काय काम असतील ती साडेनऊच्या आत होऊ द्या. :)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

4 Jul 2014 - 8:41 am | प्रचेतस

बाकी फ्रान्स विरुद्ध जर्मनी हा सामना भलताच रंगतदार होईल. आतापर्यंत फ्रान्सच्या गटातले संघ तुलनेने बरेच दुबळे होते आणि बादफेरीतल्या पहिल्या सामन्यातही दुबळ्या संघाबरोबरच लढत झाली त्यामुळे फ्रान्सचा खर्‍या अर्थाने कस अजून लागलाच नाही. त्याउलट जर्मनी पहिल्या मोठ्या विजयानंतर जरा ढेपाळलेले दिसतात अर्थात त्यांनी नंतर जे काय विजय मिळवले ते विलक्षण शिस्तबद्धतेमुळेच.

नेमारच्या कोंडीबद्दल सहमत. पण इथेच मेस्सी आणि नेमारमधला फरक अधोरेखीत होतो. मेस्सीने कोंडीतून मार्ग काढत काढतच अफलातून खेळ केलाय आणि गोल करण्याबरोबरच देखणे पासेस देऊन विजयचा मार्ग सुकर केला.
बाकी पुढच्या फेर्‍यांत मजा टिकून राहावी म्हणूनच दुसर्‍या सामन्यांत ब्राझील जिंकावा असे वाटतेय.

   ब्राझील स्पेशल स्क्वॅड
       
     नेयमार.                  ऑस्कर             फ्रेड                  मार्सिलो            हुल्क.

तुषार काळभोर's picture

4 Jul 2014 - 12:39 pm | तुषार काळभोर

लेट देम फॉलो ब्राझिल...
लेट देम वरशिप मेस्सी....
यू हॅव बीन माय फेवरीट, क्लोज!!
klose1

klose2

klose3

श्रीगुरुजी's picture

4 Jul 2014 - 12:52 pm | श्रीगुरुजी

अमेरिकन भूमीवर युरोपिअन संघ कधीही विश्वविजेते ठरलेले नाहीत. युरोपच्या भूमीवर मात्र अमेरिकन संघाने विश्वविजेतेपद मिळविले आहे. हा इतिहास अमेरिकन संघांच्या बाजूने आहे. याच भरवश्यावर ब्राझील, अर्जेंटिना, कोलंबिया व कोस्टा रिका असतील. परंतु उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेले ८ संघ बघता, ब्राझील, अर्जेंटिना, नेदरलँड्स व जर्मनी हे उपांत्य फेरीत पोहोचतील असं वाटतंय. कोलंबिया व फ्रान्स आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धक्का देऊ शकतील. तेवढी क्षमता त्यांच्यात आहे. पण बेल्जिअम व कोस्टा रिकाला फारशी संधी नाही. अंतिम फेरीत जर्मनी व नेदरलँड्स यापैकी एकजण नक्की असणार.

sagarpdy's picture

4 Jul 2014 - 3:51 pm | sagarpdy

नेदरलँड्स साखळी सामन्यातच गारद होणार असं बऱ्याच लोकांना वाटलं होतं. मागच्या स्पर्धेवेळी जशी जर्मनीची तरुण टीम होती तशी नेदरलँड्स ची या वेळची आहे (अर्थात तेवढी तांत्रिकदृष्ट्या चांगली वाटत नसली तरी). पठ्ठ्यानी कठीण सामन्यात विजयश्री या ना त्या मार्गे मिळवलीच (१००% रेकॉर्ड आहे स्पर्धेत). स्वतःच्या तांत्रिक कमतरतांवर अधिक शारीरिक खेळ व 'टोटल फुटबॉल' चे तत्त्व यांनी मात करत आहेत.स्वित्झर्लंड प्रमाणेच बेल्जियम देखील आर्जेन्टिनाला कडवी झुंज देऊ शकतो. जर हा सामनाही १२० मिनिटापर्यंत लांबला तर अर्जेन्तिनाला थकव्यामुळे नेदरलँड्स ला सामोरे जाणे सोपे राहणार नाही.

माझ्या मते अंतिम सामना ब्राझील वि. नेदरलँड्स असा अंतिम सामना पण बघायला मिळू शकेल.

sagarpdy's picture

4 Jul 2014 - 4:15 pm | sagarpdy

नेदरलँड्स साखळी सामन्यातच गारद होणार असं बऱ्याच लोकांना वाटलं होतं. मागच्या स्पर्धेवेळी जशी जर्मनीची तरुण टीम होती तशी नेदरलँड्स ची या वेळची आहे (अर्थात तेवढी तांत्रिकदृष्ट्या चांगली वाटत नसली तरी). पठ्ठ्यानी कठीण सामन्यात विजयश्री या ना त्या मार्गे मिळवलीच (१००% रेकॉर्ड आहे स्पर्धेत). स्वतःच्या तांत्रिक कमतरतांवर अधिक शारीरिक खेळ व 'टोटल फुटबॉल' चे तत्त्व यांनी मात करत आहेत.स्वित्झर्लंड प्रमाणेच बेल्जियम देखील आर्जेन्टिनाला कडवी झुंज देऊ शकतो. जर हा सामनाही १२० मिनिटापर्यंत लांबला तर अर्जेन्तिनाला थकव्यामुळे नेदरलँड्स ला सामोरे जाणे सोपे राहणार नाही.

माझ्या मते अंतिम सामना ब्राझील वि. नेदरलँड्स असा होईल

कपिलमुनी's picture

4 Jul 2014 - 9:09 pm | कपिलमुनी

ही बातमी वाचा !

७ खेळाडूंना ताप !
आज दमट आणि उष्ण हवामानात फिटनेस महत्वाचा आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 9:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फ्रांस चं आक्रमण सुरु झालंय.

प्रचेतस's picture

4 Jul 2014 - 9:47 pm | प्रचेतस

क्रूसच्या फ्री किकवर ह्युमेल्सचा हेडर.
आमची जर्मनी आघाडीवर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 9:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमची जर्मली भारी खेळतेय. :)

प्रचेतस's picture

4 Jul 2014 - 10:09 pm | प्रचेतस

आता फ्रान्सनं पण जोरदार आक्रमण केलं पण जर्मन गोलरक्षक भलताच सतर्क आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 10:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तो फार पुढे येऊन ball पकडू पाहतो धोका होऊ शकतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 9:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जर्मनीच्या खेलाडू चा उत्तम हेडर जर्मनी 1- फ्रांस 0

शिद's picture

5 Jul 2014 - 12:51 am | शिद

Germany Goal

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 10:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेन्झिमनला चांगला चांस होता घालवला बेट्याने :(

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

4 Jul 2014 - 10:24 pm | प्रचेतस

अगदी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 11:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फ्रान्स ला निरोप द्यायची वेळ येत आहे असे वाटते. 78 मिनिटांचा खेळ संपत येतोय. सर्व क्षेत्रात संपन्न सक्षम अशा खेळाडूचा भरणा असलेल्या फ्रान्सला अजुन गोल नोंदवता आलेला नाही. असेच राहिले तर शेवटी काही चमत्कार करतील ते असे काही वाटत नाही.

आमचा संघ फ्रेंचान्ची डाळ काही शिजू देत नाहिये. बेंझेमा पण निष्प्रभ ठरलाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 11:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेन्झिमा ला शेवटच्या काही क्षणात संधी आली होती पण जमले नाही. जर्मनी 1-0ने विजयी. चांगला सामना झाला.

आता ब्राझिलचा सामना पाहण आहे पण झोप येतेय. हजर होतो एक डुलकी मारून.

दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

4 Jul 2014 - 11:31 pm | प्रचेतस

मी तर आता झोपतो ब्वा. उद्या सकाळी हापिस आहे. :(
तसाही आमचा झेंडा पुढे सरकलाय आता. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 11:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटची चार मिनिटे फ्रांससाठी नाही तर 2018 ची वाट पाहावी लागेल :)

शेवटचे ३० सेकंद बाकी असताना बेन्झेमाचा जोरकस प्रयत्न जर्मन गोलरक्षक न्यूमरने विफल केला.
जर्मनी उपांत्य फेरीत.

सामना चालू होतो न होतो तोच नेमारने दिलेल्या कॉर्नर-किकच्या पास वर कॅप्टन सिल्वाचा ७ व्या मी. बाझिलचा पहीला गोल.

शिद's picture

5 Jul 2014 - 2:41 am | शिद
खटपट्या's picture

5 Jul 2014 - 2:25 am | खटपट्या

हाफ टाईम ला ब्राझील १ - कोलंबिया ०

हाफ टाईम मध्ये दोन्ही टिमकडून जबरदस्त झटापटीचा सामना झाला. आता बघू पुढच्या हाफ मध्ये काय होतं ते.

फ्रि-किक मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेवून लुईजकडून ६९ मी. ब्राझिलचा दुसरा गोल.

शिद's picture

5 Jul 2014 - 3:31 am | शिद
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2014 - 10:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लुईजने ब-याच दुरुन किक मारुन गोल केला.
सुप्पर गोल.

-दिलीप बिरुटे

ब्राझिलचा गोलकिपर सिजरच्या चुकीमुळे त्याला पिवळं कार्ड मिळालं पण त्याचबरोबर कोलंबियाला पेनल्टी किकचे बक्षीस.

मिळालेल्या संधीचा फायदा घेत जेम्स रॉड्रिग्जने कोलंबियासाठी ८० व्या मी. पहीला गोल केला.

जेम्स रॉड्रिग्जचा ह्या वर्ल्डकप मधील ६ वा गोल. गोल्डन बुटाकडे वाटचाल.

कोलंबियन गोलकिपरला गोलपोस्ट वरुन किक मारताना अडथळा आणल्यामुळे ब्राझिलचा कॅप्टन सिल्वाला पंचातर्फे पिवळं कार्ड.

Silva

ब्राझिल जर जिंकून सेमी-फायनलला पोहोचली तर सिल्वा केलेल्या चुकीमुळे त्या मॅचला मुकणार.

ब्राझिलचा कोलंबियावर २-१ असा विजय. डेविड लुईझ सामनावीर.

आता पहिली सेमिफायनल ८ जुलैला ब्राझिल वि. जर्मनी.

बिरुटे सरांसाठी आणि एकंदरीतच सर्व फूटबॉल शौकिनांसाठी लै धक्कादायक.

नेमार विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर.

एकंदरीत ब्राझीलच्या पुढच्या वाटचालीला हा प्रचंड धक्का आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2014 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, आमचा भरवसा नेयमारवर त्याच्या आक्रमणामुळे प्रतिस्पर्धी संघावर दडपण यायचं.
आता आमचं काय खरं नाय दिसत. जर्मनी जाते वाटतं अंतिम सामन्यात. :(

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

5 Jul 2014 - 9:11 pm | प्रचेतस

चला,सज्ज व्हा अर्जेंटीना - बेल्जियम सामना पाहायला.
जादुगार मेस्सीमुळे हां सामना अर्जेंटीना जिंकेल असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2014 - 9:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्जेंटीना वि. बेल्जियम आणि नेदरलँड वि.कोस्टारिका असे दोन्ही सामने आज रात्री होत आहेत. पैकी एक चांगला सामना आज अर्जेंटीना वि. बेल्जियम यांच्यात  बघायला मिळणार आहे. अर्जेंटीनाचा फॉर्म मधे असलेला कर्णधार मेस्सीवर सर्व सामन्याची दारोमदार आहे.
अर्जेंटीनाचा देव लिओनेल मेस्सीमेस्सीला संघातील खेळाडु कसे साथ देतात त्यावरही अर्जेंटीनाचा विजय अवलंबुन असेल. दुसरीकडे बेल्जियमचे ब्रुईन, ई.हजार्ड,  डी. ऑरीजी, यांच्यावर बेल्जियमची खरी भिस्त आहे. एक चांगला सामना थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे. दुसरया सामन्यात नेदरलँड वि. कोष्टारिका या सामन्या नेदरलँड (नारंगी सेना) बाजी मारेल असे वाटते. नेदरलँडने या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. कर्णधार रॉबीन व्हॅन पर्सी आणि रॉबेन ही जोडी सध्या फॉर्मात आहे.

कोस्टारिका नेदरलँडच्या तुलनेत कमी अनुभवी असले तरी चमत्कार करु शकतात. परंतु सर्वाधिक विजयाची शक्यता नेदरलँडचीच वाटते.

फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा एक सरस टीम असतांना केवळ एक गोल दोन गोलांवर विजय मिळत आहेत, हे पाहतांना बरे वाटत नाही. धडाकेबाज खेळात तीन चार गोल व्हावेत अर्थात असे होत नाही कारण दोनही संघ सक्षम असतात बचावाच्या बाबतीत तरीही असं सामन्यात दिसत नाही.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

5 Jul 2014 - 9:47 pm | प्रचेतस

हिग्युएनचा सुरेख गोल.
त्याआधी मेस्सिने स्वत:भोवतीच गिरक्या घेत बेल्जियनांना नाचवलं ते केवळ लाजवाब.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2014 - 10:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रंगतदार सामना उत्तोरोत्तर रंगतदार होतोय. अर्जेंटीना 1-बेल्जियम 0

दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

5 Jul 2014 - 10:23 pm | प्रचेतस

बेल्जियन लै धसमुसळा खेळ करताहेत. जाम पाडापाडी करायलेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2014 - 11:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेल्जियमचा शेवटचा मिनिट आणि ते बाहेर जाणार काही प्रयत्न उत्तम होते.
अर्जेंटीना सेमीफायनल मधे पोहोचले 1-0

दिलीप बिरुटे

फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा एक सरस टीम असतांना केवळ एक गोल दोन गोलांवर विजय मिळत आहेत, हे पाहतांना बरे वाटत नाही. धडाकेबाज खेळात तीन चार गोल व्हावेत अर्थात असे होत नाही कारण दोनही संघ सक्षम असतात बचावाच्या बाबतीत तरीही असं सामन्यात दिसत नाही.

बिरुटे सर, जर्मनीने तुमचं म्हणणं लईच मनावर घेतलं बघा. ब्राझीलवर तब्बल ७ (सात) गोल केलेत !! आता यात एक दोन विश्व-चषक निघतील ब्राझीलवाल्यांचे.. :)

फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा एक सरस टीम असतांना केवळ एक गोल दोन गोलांवर विजय मिळत आहेत, हे पाहतांना बरे वाटत नाही. धडाकेबाज खेळात तीन चार गोल व्हावेत अर्थात असे होत नाही कारण दोनही संघ सक्षम असतात बचावाच्या बाबतीत तरीही असं सामन्यात दिसत नाही.

बिरुटे सर, जर्मनीने तुमचं म्हणणं लईच मनावर घेतलं बघा. ब्राझीलवर तब्बल ७ (सात) गोल केलेत !! आता यात एक दोन विश्व-चषक निघतील ब्राझीलवाल्यांचे.. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jul 2014 - 5:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, काल ब्राझील जे हरलं त्याच्यामुळे मला करमू नै राह्यलं सालं इतका बोगस खेळ झाला की दर मिनिटाला हळहळत होतो. काल जर्मनी इतकी सुरेख खेळली की १०-० झाले असते तरी मला वाईट वाट्लं नसतं. अजिबात खेळ करता आला नाही ब्राझीलला. दुस-या हाफ मधे ब्राझीलने आक्रमण केलं परंतु तेव्हा खूप उशीर झालेला होता. संपूर्ण जर्मनी संघ गोल करायच्या मुड मधे होता आणि ब्राझील कुठे कुठे झाकू असं चाललेलं होतं. एक ऑसकरचा गोल सोडला आणि काही आक्रमणात गोल करण्याची संधी मिळाली परंतु गोल करता आला नाही. पण सामना केवळ सुप्पर झाला. जर्मनी निर्विवाद विजयी होते. त्यांनी ब्राझीलवासियांनाही आपल्या खेळाने वेड लावलं.

असो, ब्राझील काय अन जर्मनी काय खेळेल त्याच्या बाजूने आपण नैका. आमचा झेंडा आता जर्मनीचा. :)

आज अर्जेंटीना आणि नेदरलँड यांच्यात नेदरलँड जिंकेल असे वाटते. एकटा मेस्सी काही करु शकत नाही. बाकी, खेळ पाहू कालच्या सामन्यासारखा मजा यावी. म्हणजे झोपेचं केलेल्या बलिदानाचं काही वाटत नाही.

-दिलीप बिरुटे

हाडक्या's picture

9 Jul 2014 - 7:26 pm | हाडक्या

ब्राझील कुठे कुठे झाकू असं चाललेलं होतं

हा हा हा ..!! आमचा या वेळचा ब्राझील-विरोध (आणि नेहमीचे युरोपीय फुटबॉल समर्थन) काल कामी आले. सगळे ब्राझील समर्थक मित्र फोन बंद करून बसले होते. आज 'सिल्वा नव्हता रे' (नेमार नव्हे!), नायतर सिल्वाने दोन तीन तरी वाचवले असते म्हणे.. :D

खटपट्या's picture

5 Jul 2014 - 11:26 pm | खटपट्या

आर्जेन्टिना १-० ने विजयी
आर्जेन्टीना चे आणखी दोन गोल सहज झाले असते. शेवटच्या मिनिटाला तर मेसिला सुवर्ण संधी होती

हॉलंड विरुद्ध नेदरलैंड अतिशय रटाळ खेळ चालू आहे.
दोन्ही संघ गोल करण्याचा प्रयत्नही करत नाहीयेत

हॉलंडचा पेनल्टी शुटआऊट मध्ये ४-३ ने कोस्टारीकावर विजय.

आता हॉलंड ९ जुलैला सेमी-फायनल मध्ये भिडणार अर्जेंटीना बरोबर.

वेल्लाभट's picture

6 Jul 2014 - 8:58 am | वेल्लाभट

नेदरलँड जिंकले !!!!!!
पण कोस्टा रिका ने मनं जिंकली राव.... लई चिवट. जबराट !आवडले लोक.

सेमी फायनल मधे कुणाला सपोर्ट करू कळत नाहीये. पण नाही; नेदरलँड च.
सही खेळ करताय्त. लुई वॅन हाल.... नेदरलँड मॅनेजर... भावी युनायटेड मॅनेजर आहे ही सुखद बाब आहे.

sagarpdy's picture

7 Jul 2014 - 11:40 am | sagarpdy

ऐन वेळी गोलकीपर बदलण्याची चाल केवळ अफलातून.

पेनल्टि शूट आउट बघणे आज तरी शिर्षी मा लिख मा लिख मा लिख मेस्सी .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2014 - 10:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज ब्राझील आणि नेदरलँड यांच्यात तिसर्‍या स्थानासाठी सामना होत आहे, ब्राझील आपली आबरु वाचवतो का एवढाच तो प्रश्न. बाकी उद्या अर्जेंटीना वि. जर्मनी या सामन्यात जर्मनीची बाजू वरचढ दिसते आहे. अर्जेंटीनाकडे मेस्सी सोडला तर दुसरा खेळाडूचे नाव दिसत नाही. मेस्सीपेक्षा जर्मनांकडे भरपुर आक्रमण आहे, उत्तम पासेस आहेत आणि गोल करण्याची क्षमता त्यांच्या प्रत्येक खेळाडू दिसते. हा सामना मला जर्मनी वि. मेस्सी असा वाटतो. (छायाचित्र फिफावरुन)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jul 2014 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विश्वचषकात अतिशय सुरेख खेळ करणारे आणि स्पर्धेत ब्राझीलचा पराभव करुन विजय मिळवणारे नेदरलँडचे हिरो.

रॉबिन व्हॅन पर्सी                      जॉर्जिनो विनाल्ड                  डॅले ब्लिंड
 
मंडळी, कालचा ब्राझीलसाठी प्रतिष्ठेचा असलेला सामनाही ब्राझीलला ३-० ने गमवावा लागला. जर्मनीकडून झालेल्या मानहानिकारक पराभवातून ब्राझील सावरलेच नाहीत. नेदरलँडने या विश्वचषकात रसिकांची मनं जिंकली असे मी म्हणेन. रॉबिन व्हॅन पर्सी, डॅले ब्लिंडने आणि शेवटी  जॉर्जिनो विनाल्डमने गोल करुन थाटात विजयी समारोप या स्पर्धेचा केला. आज जर्मनी आणि अर्जेंटीनाचा सामना रात्री साडेबारा वाजता होतोय. बघायला विसरु नका. जर्मनीचीच विजयाची शक्यता आहे.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

13 Jul 2014 - 6:17 pm | प्रचेतस

बघणार

स्वाती दिनेश's picture

13 Jul 2014 - 7:51 pm | स्वाती दिनेश

म्याच साठी जर्मनी बिअरचे क्यान घेऊन स्टेडियम्स,स्पोर्ट्बार,ब्रांडॅनबुर्ग टोअर अशा पब्लिक व्ह्यूइंग प्लेसेस मध्ये तय्यार आहे...

प्रचेतस's picture

14 Jul 2014 - 12:41 am | प्रचेतस

चला, सामना सुरु झाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2014 - 12:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्चावाचे धोरण दोन्ही संघाचे !

आर्जेन्टीना ने एक चांगली संधी गमावली

प्रचेतस's picture

14 Jul 2014 - 12:56 am | प्रचेतस

जर्मनीच्या क्रूसचा हा चुकलेला पास जर्मनीला भलताच महागात पडला असता

खटपट्या's picture

14 Jul 2014 - 1:01 am | खटपट्या

ओफ्फ साईड

हिग्युएनने गोल केला पण ऑफसाईड असल्याने पंचांनी दिला नाही. जर्मनी परत बचावले
तत्पुर्वी मध्यरक्षक श्वाईनस्टायगरला पिवळे कार्ड मिळाले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2014 - 1:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेस्सी आणि त्याची टीम चांगले आक्रमण करते आहे, जर्मनीला आपल्या फॉर्म मधे येणे गरजेचे.

प्रचेतस's picture

14 Jul 2014 - 1:19 am | प्रचेतस

हाफ टाइम ०-०
जर्मनांचा हेडर अर्जेण्टीनाच्या गोलपोस्टच्या क्रॉस बारला धडकून माघारी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2014 - 1:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खेळत राहिले तर पेनाल्टी शूटला जाईल सामना..

प्रचेतस's picture

14 Jul 2014 - 2:09 am | प्रचेतस

अगदी.
दोन्ही संघांचा बचाव भक्कम आहे.

खटपट्या's picture

14 Jul 2014 - 2:19 am | खटपट्या

अल्विदा क्लोस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2014 - 2:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्ही संघाच्या बचावाच्या धोरणामुळे सामना अधिकच्या वेळात पोहच्लाय. राहिलेल्या तीस मिनिटात कोण गोल करतंय ते पाहू या....नाही तर आहेच पेनाल्टी शूट.

आता शेवटची १५ मिनिटे,नाहीतर पेनल्टी शूट आऊट.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2014 - 2:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोयेत्जचा चांगला गोल सामना संपत येतोय.

जर्मनीच्या गोएट्झेचा अफलातून गोल.छातीने चेंडू अडवून टप्पा पडू न देताच जोरदार किक.

च्यान्सेलर मर्केलबै खुश.

प्रचेतस's picture

14 Jul 2014 - 3:08 am | प्रचेतस

विश्वकरंडक जर्मनीकडे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2014 - 3:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख गोल ! आणि उत्तम सांगता.

दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

14 Jul 2014 - 3:18 am | प्रचेतस

पेनल्टी शूट आउट दोन्ही संघांसाठी विलक्षण वेदनादायी आणि अन्यायकारक असते.
सामना अतिरिक्त वेळेत संपला हे चांगले झाले.

प्रचेतस's picture

14 Jul 2014 - 3:29 am | प्रचेतस

गोल्डन ग्लव्स- नेऊर

गोल्डन बॉल - मेस्सी

गोल्डन बूट - जेम्स रोड्रीगेझ.

स्वाती दिनेश's picture

14 Jul 2014 - 10:00 am | स्वाती दिनेश

काल जर्मनी वि अर्जेंटिना.... मेर्केलबाई वचन दिल्याप्रमाणे म्याच बघायला जातीने हजर राहिल्या होत्या.. म्याचची सुरुवात झाल्यापासून दोघेही संघ सावध खेळत होते. नंतर थोडा धसमुसळेपणा वाढला पण बचाव भक्कम होता..
क्लोजला शेवटच्या ५ मि.त बदलून ग्योट्झंला आणला योगीने आणि त्याने गोल केला.. लगेच इकडे रस्त्यावर गाड्यांचे हॉर्न्स्,पिपाण्या वाजवणे चालू झाले..
स्वाती

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2014 - 12:52 pm | श्रीगुरुजी

मस्त सामना झाला. अपेक्षेप्रमाणेच जर्मनीच जिंकले. हरल्यानंतर मेस्सीच्या चेहर्‍यावरील पराभवाच्या वेदना बघवत नव्हत्या. श्वाईनस्टायगरची कमाल आहे. कालच्या सामन्यात त्याला किमान ७-८ वेळा पाडले गेले (किंवा तो पडला). शेवटी तर उजव्या भुवईखालून रक्त पण आले. पण पट्ठ्या डगमगला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने सामना सोडला नाही. इतक्या दुखापतीनंतरसुद्धा खेळत राहण्याचा त्याचा निर्धार कौतुकास्पद होता. तशा दोन्ही संघांनी बर्‍याच संधी गमाविल्या. पण गोट्झेने केलेला गोल अप्रतिम होता आणि दोन्ही संघातला तोच मुख्य फरक ठरला.

शुल्लर ,मुल्लर ,मेस्सी नाही क्लोस .शेवटी हिरो ठरला ग्योटझ .

शिद's picture

14 Jul 2014 - 5:18 pm | शिद

1

2

3

मुक्त विहारि's picture

15 Jul 2014 - 12:02 am | मुक्त विहारि

जर्मनी

आताच टीमचा स्वागत समारंभ पाहिला ।अगदी शिस्तीत झाला .कोणीही स्वत:कडे श्रेय घेतले नाही .

हाडक्या's picture

15 Jul 2014 - 9:03 pm | हाडक्या

पण हे झाले (आपल्या) साहेबांच्या धोरणांमुळे..!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2014 - 9:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे