फुटबॉल विश्वचषक :२०१४ (उपउपांत्य ते अंतिम सामना)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
28 Jun 2014 - 9:41 am
गाभा: 

नमस्कार मंडळी, फुटबॉल फिवरने आता चांगलाच जोर धरलाय हौसे नवशे सर्वच आता फुटबॉलची चर्चा करु लागले आहेत. आपणही मिपावर पहिल्या फेरीतील सामन्यांचा आनंद घेतला आहे. आता बाद फेरीतील सामने सुरु होत आहेत जो जिंकेल तो पुढे जाईल. पहिल्या फेरीत भले भले बाहेर पडले. पोर्तुगाल, स्पेन,इटली,इंलंड,यांनी चांगला खेळ करुनही ते बाहेर पडलेत. पोर्तुगाल केवळ एकट्या रोनोल्डोच्या भरवशावर राहीले आणि सरासरी आवश्यक असतांनाही घानाचा पराभव करुनही परतीच्या मार्गावर लागावं लागलं. बाकीच्या खेळाडुंनी चांगला खेळ करायला पाहिजे होता. या विश्वचषकात लक्षात राहील तो उरुग्वेचा सुआरेझ ज्याने इटलीचा खेळाडू जॉर्जिओ ला चावा घेतला आणि त्याच्यावर फिफ़ाला नऊ सामन्यांची बंदी घालावी लागली. बाकी, अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या धडाकेबाज खेळीमुळे अर्जेंटीना फॉर्मात आहे. मेस्सीने केलेले गोल अनेक दिवस स्मरणात राहतील. फुटबॉलप्रेमी नायजेरियाचा धडाकेबाज स्ट्रायकर अहमद मुसा याला विसरणार नाहीत, माध्यमांनी त्याला फारसे उचलले नाही पण अर्जेंटीनाच्या विरोधातला त्याचा खेळ लाजवाब होता. लिलया पासेस देणे, खेळाडुला चकवून त्याने गेलेले गोल, अहाहा, क्या कहने.

राहीला आमच्या ब्राझीलचा प्रश्न. जर्मनी, अर्जेंटीना,ब्राझील,फ्रान्स,नेदरलँड, असा कोणी जिंकण्याचा अनुक्रम लावणार असेल तर लावू द्या. आमच्या ब्राझीलचे सर्वच खेळाडु उत्तम खेळत आहेत. नेयमार, हुल्क, फ्रेड आणि गोलाडवा ज्युलियो सेसर, यांच्या भरवशावर आम्ही विश्वचषक जिंकण्याची स्वप्न पाहात आहोत. आज चिलीचा त्रास आमच्या संघाला होऊ नये. ब्राझील जिंकेल पण चिली नाकात दम आणेल यात काही वाद नाही. बाकी आपण पहिल्या धाग्यात चांगला प्रतिसाद दिला दुस-या बाद फेरीच्या सामन्यांचा आनंद घेऊच तेव्हा आपापले संघाचे झेंडे घेऊन तयार राहा.

 
उपउपांत्य फेरी.(क्वार्टर फायनल) 
 

४ जुलै 
फ्रान्स वि.जर्मनी
रात्री ९:३०

४ जुलै 
ब्राझील वि. कोलंबिया
पहाटे १:३०

५ जुलै
अर्जेंटीना वि. बेल्जियम.
रात्री ९:३०

५ जुलै
नेदरलँड वि.कोस्टारिका
पहाटे  १:३०

उपांत्य फेरी (सेमी फायनल्स)

८ जुलै
 ब्राझील वि. जर्मनी
पहाटे १:३०

९ जुलै
 अर्जेंटीना वि. नेदरलँड
पहाटे १:३०

 तिसर्‍या स्थानासाठी

१२ जुलै
 ब्राझील वि. नेदरलँड
पहाटे  १:३०

 
       अंतिम सामना
 

१३ जुलै
   जर्मनी वि. अर्जेंटीना
रात्री १२:३०

Germany                                                                         
Germany

Argentina
Argentina

1
NEUER

(GK)

1
ROMERO

(GK)

2
GROßKREUTZ

2
GARAY

3
GINTER

3
CAMPAGNARO

4
HÖWEDES

4
ZABALETA

5
HUMMELS

5
GAGO

6
KHEDIRA

6
BIGLIA

7
SCHWEINSTEIGER

7
DI MARIA

8
ÖZIL

8
PEREZ

9
SCHÜRRLE

9
HIGUAIN

10
PODOLSKI

10
MESSI

11
KLOSE

11
M. RODRIGUEZ

12
ZIELER

(GK)

12
ORION

(GK)

13
MÜLLER

13
A. FERNANDEZ

14
DRAXLER

14
MASCHERANO

15
DURM

15
DEMICHELIS

16
LAHM

16
ROJO

17
MERTESACKER

17
F. FERNANDEZ

18
KROOS

18
PALACIO

19
GÖTZE

19
ALVAREZ

20
BOATENG

20
AGUERO

21
MUSTAFI

21
ANDUJAR

(GK)

22
WEIDENFELLER

(GK)

22
LAVEZZI

23
KRAMER

23
BASANTA

Coach                                   Coach

Joachim LOEW (GER)
                                           Alejandro SABELLA (ARG)

प्रतिक्रिया

बऱ्याच लोकांच्या मते (यात माराडोना आणि मी देखील समाविष्ट) मेस्सी ला मिळालेला गोल्डन बॉल केवळ फिफा आणि अएदिदस यांची केवळ मार्केटिंग टेक्निक आहे. माझ्या मते मास्चेरान्हो (आर्जेन्टिना) हा पुरस्कारासाठी सर्वात प्रबळ दावेदार होता. रोद्रिगेझ, मुल्लर, रोब्बेन, नेय्मार (तो गेल्याबरोबर ब्राझील चे हाल बघा) यांचा खेळ देखील उत्तम होता. मेस्सी नक्कीच या सर्वांपेक्षा अधिक गुणवान खेळाडू आहे, पण बाद फेरीपासून त्याला फारसा प्रभाव पाडता नाही आला. आणि जर्मनी, कोलंबिया, होल्लेंड एवढा आर्जेन्टिना चा गट देखील कठीण नव्हता.