✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फुटबॉल विश्वचषक :२०१४ (उपउपांत्य ते अंतिम सामना)

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Sat, 06/28/2014 - 09:41  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, फुटबॉल फिवरने आता चांगलाच जोर धरलाय हौसे नवशे सर्वच आता फुटबॉलची चर्चा करु लागले आहेत. आपणही मिपावर पहिल्या फेरीतील सामन्यांचा आनंद घेतला आहे. आता बाद फेरीतील सामने सुरु होत आहेत जो जिंकेल तो पुढे जाईल. पहिल्या फेरीत भले भले बाहेर पडले. पोर्तुगाल, स्पेन,इटली,इंलंड,यांनी चांगला खेळ करुनही ते बाहेर पडलेत. पोर्तुगाल केवळ एकट्या रोनोल्डोच्या भरवशावर राहीले आणि सरासरी आवश्यक असतांनाही घानाचा पराभव करुनही परतीच्या मार्गावर लागावं लागलं. बाकीच्या खेळाडुंनी चांगला खेळ करायला पाहिजे होता. या विश्वचषकात लक्षात राहील तो उरुग्वेचा सुआरेझ ज्याने इटलीचा खेळाडू जॉर्जिओ ला चावा घेतला आणि त्याच्यावर फिफ़ाला नऊ सामन्यांची बंदी घालावी लागली. बाकी, अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या धडाकेबाज खेळीमुळे अर्जेंटीना फॉर्मात आहे. मेस्सीने केलेले गोल अनेक दिवस स्मरणात राहतील. फुटबॉलप्रेमी नायजेरियाचा धडाकेबाज स्ट्रायकर अहमद मुसा याला विसरणार नाहीत, माध्यमांनी त्याला फारसे उचलले नाही पण अर्जेंटीनाच्या विरोधातला त्याचा खेळ लाजवाब होता. लिलया पासेस देणे, खेळाडुला चकवून त्याने गेलेले गोल, अहाहा, क्या कहने. राहीला आमच्या ब्राझीलचा प्रश्न. जर्मनी, अर्जेंटीना,ब्राझील,फ्रान्स,नेदरलँड, असा कोणी जिंकण्याचा अनुक्रम लावणार असेल तर लावू द्या. आमच्या ब्राझीलचे सर्वच खेळाडु उत्तम खेळत आहेत. नेयमार, हुल्क, फ्रेड आणि गोलाडवा ज्युलियो सेसर, यांच्या भरवशावर आम्ही विश्वचषक जिंकण्याची स्वप्न पाहात आहोत. आज चिलीचा त्रास आमच्या संघाला होऊ नये. ब्राझील जिंकेल पण चिली नाकात दम आणेल यात काही वाद नाही. बाकी आपण पहिल्या धाग्यात चांगला प्रतिसाद दिला दुस-या बाद फेरीच्या सामन्यांचा आनंद घेऊच तेव्हा आपापले संघाचे झेंडे घेऊन तयार राहा.


  उपउपांत्य फेरी.(क्वार्टर फायनल)   
४ जुलै  फ्रान्स वि.जर्मनी रात्री ९:३०
४ जुलै  ब्राझील वि. कोलंबिया
पहाटे १:३०
५ जुलै
अर्जेंटीना वि. बेल्जियम.
रात्री ९:३०
५ जुलै नेदरलँड वि.कोस्टारिका
पहाटे  १:३०

उपांत्य फेरी (सेमी फायनल्स)
८ जुलै  ब्राझील वि. जर्मनी
पहाटे १:३०
९ जुलै  अर्जेंटीना वि. नेदरलँड
पहाटे १:३०

 तिसर्‍या स्थानासाठी

१२ जुलै  ब्राझील वि. नेदरलँड
पहाटे  १:३०
         अंतिम सामना  
१३ जुलै    जर्मनी वि. अर्जेंटीना
रात्री १२:३०

Germany                                                                         
Germany
Argentina
Argentina
1
NEUER
(GK)
1
ROMERO
(GK)
2
GROßKREUTZ
2
GARAY
3
GINTER
3
CAMPAGNARO
4
HÖWEDES
4
ZABALETA
5
HUMMELS
5
GAGO
6
KHEDIRA
6
BIGLIA
7
SCHWEINSTEIGER
7
DI MARIA
8
ÖZIL
8
PEREZ
9
SCHÜRRLE
9
HIGUAIN
10
PODOLSKI
10
MESSI
11
KLOSE
11
M. RODRIGUEZ
12
ZIELER
(GK)
12
ORION
(GK)
13
MÜLLER
13
A. FERNANDEZ
14
DRAXLER
14
MASCHERANO
15
DURM
15
DEMICHELIS
16
LAHM
16
ROJO
17
MERTESACKER
17
F. FERNANDEZ
18
KROOS
18
PALACIO
19
GÖTZE
19
ALVAREZ
20
BOATENG
20
AGUERO
21
MUSTAFI
21
ANDUJAR
(GK)
22
WEIDENFELLER
(GK)
22
LAVEZZI
23
KRAMER
23
BASANTA
Coach                                   Coach
Joachim LOEW (GER)                                            Alejandro SABELLA (ARG)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51026 वाचन

💬 प्रतिसाद (151)

प्रतिक्रिया

माझे अंदाज खालीलप्रमाणे

खटपट्या
Sat, 06/28/2014 - 09:56 नवीन
माझे अंदाज खालीलप्रमाणे ब्राझील वि चिली - ब्राझील (ब्राझील जिंकावा असे वाटतेय. जबरी सामना होणार आहे) कोलंबिया वि उरुग्वे - कोलंबिया (उरुग्वे जिंकावे असे वाटतेय) नेदरलँड वि. मेक्सिको - मेक्सिको कोस्टारिका वि. ग्रीस - कोस्टारिका जिंकावा असे वाटतेय फ्रान्स वि. नायजेरिया - नायजेरिया जिंकावा असे वाटतेय. पण सामना जबरी होणार जर्मनी वि अल्जेरिया - जर्मनी अर्जेंटीना वि. स्वित्झर्लंड - हा अजून एक सामना मस्त होणार आहे. मेसिमुळे आर्जेन्टिना विजयी होईलही त्यातल्या त्यात फक्त जर्मनीची खात्री देता येतेय.
  • Log in or register to post comments

सहमत +१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/28/2014 - 10:01 नवीन
>>>ब्राझील वि चिली - ब्राझील (ब्राझील जिंकावा असे वाटतेय. जबरी सामना होणार आहे) +१. आजचा सामना लैच जबरी होणार आहे. ब्राझील जिंकेलच. च्यायला, या ब्राझीलने माझं नाक ठेवलं पाहिजे. नै तर आम्हाला झेंडा बदलनं आलं. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ब्राझिल जिंकेलच आज.

प्रचेतस
Sat, 06/28/2014 - 11:05 नवीन
ब्राझिल जिंकेलच आज. बाकी स्पेन, इटली, पोर्तुगाल, इंग्लंड आदि संघ बाहेर पडल्यामुळे तशी निराशाच झालीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेदरलँड

कपिलमुनी
Sun, 06/29/2014 - 01:58 नवीन
नेदरलँड वि. मेक्सिको -- नेदरलँड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ईट्टलाsss

मोहन
Sat, 06/28/2014 - 11:18 नवीन
कोनताss झेंडा घेउ हाssती ?
  • Log in or register to post comments

माझे अंदाज

जे.पी.मॉर्गन
Sat, 06/28/2014 - 11:38 नवीन
ब्राझील, उरुग्वे, नेदरलँड्स, कोस्टारिका, फ्रान्स, जर्मनी, आर्जेन्टिना, बेल्जियम आपला झेंडा नेदरलँड्सचा! जे.पी.
  • Log in or register to post comments

मला अतिशय उत्सुकता असलेला सामना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/28/2014 - 21:30 नवीन
राष्ट्रगीत संपलेत आणि सामना आता सुरु होतोय. ब्राझील जिंकणार. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

नेयमारने दिलेल्या कॉर्नवर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/28/2014 - 21:52 नवीन
नेयमारने दिलेल्या कॉर्नवर डेव्हीडने पहिला गोल १९व्या मिनिटाला नोंदवला. १-० झ़़्कास सामना सुरु आहे, सुंदर चाली आणि ब्राझीलचे सुरेख आक्रमण. नेयमार तर मैदानभर खेळतोय. मजा येतेय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त सुरूवात

गौरव जमदाडे
Sat, 06/28/2014 - 22:01 नवीन
ब्राझीलची आघाडी
  • Log in or register to post comments

बघते आहे

पैसा
Sat, 06/28/2014 - 22:03 नवीन
सगळे ग्राउंड पिवळ्या रंगत रंगलंय!
  • Log in or register to post comments

बरोबरी

गौरव जमदाडे
Sat, 06/28/2014 - 22:05 नवीन
बरोबरी
  • Log in or register to post comments

१-१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/28/2014 - 22:07 नवीन
चिलीच्या सँचेझ ने केला बॉ एक गोल. ब्राझीलच्या गोलकीपरला फार अवघड असा हा स्ट्रोक नव्हता. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

१-१ बरोबरी. अतिरिक्त वेळेत बघू काय होतं ते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/28/2014 - 23:27 नवीन
हुल्क,फ्रेड,नेयमार यांनी आक्रमणं केली परंतु चिलीच्या बचावापुढे ब्राझीलची दाळ काही शिजेना. सेकंड हाफ मधेही निकाल लागला नाही, आता अतिरिक्त वेळेत काय होतं ते बघुया. -दिलीप बिरुटे (ब्राझीलवर नाराज झालेला)
  • Log in or register to post comments

ब्राझीलच्या डैन ला फुकटचे

खटपट्या
Sat, 06/28/2014 - 23:50 नवीन
ब्राझीलच्या डैन ला फुकटचे पिवळे कार्ड दिले राव
  • Log in or register to post comments

आज लै पिवळे कार्ड वाटू राह्यले. :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/28/2014 - 23:55 नवीन
दुस-या अतिरिक्त वेळेत केला तर ब्राझीलच गोल करेल असे त्यांचे आक्रमण पाहता वाटते नै तर पेनाल्टी शुट वर जातोच आहे सामना. आणि तिथे ब्राझील बाजी मारेल असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

+१

गौरव जमदाडे
Sun, 06/29/2014 - 00:06 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पिंनाला चा गोल होता होता

खटपट्या
Sun, 06/29/2014 - 00:10 नवीन
पिंनाला चा गोल होता होता वाचला ब्राझिल बाहेर जाता जाता वाचला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कम ओन ब्राझिल

खटपट्या
Sun, 06/29/2014 - 00:11 नवीन
कम ओन ब्राझिल
  • Log in or register to post comments

फ्रेंड्स म्याच इज गो नाऊ पेनॉल्टी शुट- कम ऑन ब्राझील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/29/2014 - 00:15 नवीन
अतिशय रोमांचकारी सामना आता पेनॉल्टी शुटवर पोहचलाय. ब्राझीलची सर्व मदार आता गोलकिपर ज्युलियो सेसर वर आहे, तो किती गोल वाचवतो आणि ब्राझील स्टार खेळाडू किती गोल करतात, चिली किती करतील एकदम भारी सामना. निकाल आता काही क्षणावर येऊन पोहचलाय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वॉव...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/29/2014 - 00:19 नवीन
पहिला गोल डेव्हीडचा....१-० शुन्य. ज्युलियो सेसर ने वाचवला गोल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वॉव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/29/2014 - 00:21 नवीन
ज्युलियो सेसर ने दुसराही गोल वाचवला सिंपली ग्रेट. ब्राझीलला मात्र दुसरा गोल करता आला नाही. तिस-या शॉटवर ब्राझील २-०. चिलीने गोल केला. २-१. ब्राझीलला चौथा शॉटचे रुपांतर गोल मधे करता आले नाही. चिलीने दुसरा गोल नोंदवला. २-२. नेयमारचा फटका आहे आता. गोल. ३-२ चिलीचा शेवटचा फटका बारला लागून गेला.... ब्राझील विजयी.... ३-२.... सुप्प्पर म्याच.... :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिचारी चिलि सोरी चीली

खटपट्या
Sun, 06/29/2014 - 00:27 नवीन
बिचारी चिलि सोरी चीली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मायला, दिवसभर भटकून आता घरी

प्रचेतस
Sun, 06/29/2014 - 00:32 नवीन
मायला, दिवसभर भटकून आता घरी आलो. नशिबाने पेनल्टी शूटाऔट बघता आले. बिरुटे सरांना दुसर्या संघाचा झेंडा हाती घ्यायची वेळ आली नाही हे नशिब. :)
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/29/2014 - 16:01 नवीन
आता आम्ही फायनलपर्यंत मागे वळून पाहणार नाही. :) काल ब्राझीलचे खेळाडु दमले आणि मीही दमलो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आज सकाळी हायलाईट्स पाहताना

प्रचेतस
Sun, 06/29/2014 - 16:20 नवीन
आज सकाळी हायलाईट्स पाहताना ब्राझीलचा खेळ बराच अवसानाघातकी वाटला. गोल करण्याच्या संधी दवडणे, ढिसाळ बचाव, मध्यरक्षक आणि बचावपटूंचे इकडेतिकडे बागडणे. एकंदरित लुइज फिलिप स्कोलरींना विद्यार्थ्यांवर लै मेहनत करावी लागणार आहे असे दिसते कारण पुढचे पेपर अधिकाधिक अवघड होत जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संधी गेल्या याच्याशी सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/29/2014 - 16:38 नवीन
गोल करण्याच्या काही सोपे चान्सेस गेले याच्याशी सहमत काही फटके आणि काही पासेस ऐनवेळी फसले आणि गोल करण्याची संधी गेली याच्याशी सहमत आहे. आक्रमण केले परंतु वाया गेले. आपण म्हणता त्या प्रमाणे फिलिप सेठ विद्यार्थ्यांवर मेहनत घेतील. काल मैदानावर हातवारे करु करु आणि खेळाडुंना सांगू सांगू थकुन गेलेले दिसले. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ब्राझिल जिंकले एकदाचे! पण काय

एस
Sun, 06/29/2014 - 00:48 नवीन
ब्राझिल जिंकले एकदाचे! पण काय म्याच झाली! अनलकी चिली..!
  • Log in or register to post comments

कोलंबियाच्या जेम्स चा गोल,

खटपट्या
Sun, 06/29/2014 - 02:05 नवीन
कोलंबियाच्या जेम्स चा गोल, गोल ऑफ द टुर्नामेण्ट ठरावा कोलंबिया १ - उरुग्वे ०
  • Log in or register to post comments

शिक्षाच ती खेळणाऱ्यांना आणि

कंजूस
Sun, 06/29/2014 - 04:41 नवीन
शिक्षाच ती खेळणाऱ्यांना आणि बघणाऱ्यांना .
  • Log in or register to post comments

अजून एक रंगतदार सामना. नेदरलँड वि. मेक्सिको. रात्री ९:३० ला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/29/2014 - 16:00 नवीन
स्पेनला ज्यांनी पळता भुई थोडी अशी ज्यांची अवस्था केली अशा नेदरलँडचा सामना आज मेक्सिकोशी रंगणार आहे. नेदरलँडचे वॅन पर्सी आणि रॉबेन पूर्ण जोशात आहेत. नेदरलँडने बी गृपमधे सर्व सामने जिंकले आहेत. तीन सामन्यात दहा गोल नोंदवले आहेत. मेक्सिकोच्या तुलनेत नेदरलँड आजच्या विजयाचा दावेदार आहे असे मला वाटते. मेक्सिकोचा गोलरक्षक गुलेर्मो ओचोआ हाही फार्मात आहे, तीन सामन्यात फक्त एक गोल स्वीकारला आहे. एकूणच दोन्ही संघातला आजचा सामना रंगतदार होणार आहे, पटावर नेदरलँड जिंकेल असे वाटत असले तरी मेक्सिकोही काही चमत्कार करु शकतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

नारिंगी सेनाच हां सामना

प्रचेतस
Sun, 06/29/2014 - 16:16 नवीन
नारिंगी सेनाच हां सामना जिंकणार असे वाटत आहे. मेक्सिको बचावात जरी मजबूत असले तरी आक्रमणाची धार त्यांच्यात नाही. एकंदरीत डचांचे आक्रमण विरुद्ध मेक्सिकनांचा बचाव. सामना रंगतदार होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोस्टारिकाचा अनपेक्षित गोल

खटपट्या
Mon, 06/30/2014 - 02:54 नवीन
कोस्टारिकाचा अनपेक्षित गोल कोस्टा रिका १ - ० ग्रीस अजून एक विचित्र गोष्ट बघायला मिळाली कोस्टारिकाचा एक खेळाडू मैदानाबाहेर खुर्चीत आराम करत होता त्यालाही पिवळे कार्ड दाखवले
  • Log in or register to post comments

ग्रिस ची ९१ व्या मिचीटाला

खटपट्या
Mon, 06/30/2014 - 03:23 नवीन
ग्रिस ची ९१ व्या मिचीटाला बरोबरी
  • Log in or register to post comments

कोस्टारिकाच्या गोलकीपर ने

खटपट्या
Mon, 06/30/2014 - 04:08 नवीन
कोस्टारिकाच्या गोलकीपर ने जबरदस्त बचाव केला. कोस्टारिका चा आघाडीपटू काम्प्बेल ला जखडून ठेवले गेले आणि जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याचे गोलात रुपांतर करता आले नाही
  • Log in or register to post comments

शेवटी शूट आउट मध्ये

खटपट्या
Mon, 06/30/2014 - 04:30 नवीन
शेवटी शूट आउट मध्ये कोस्टारिका विजयी
  • Log in or register to post comments

आजच्या सामन्यांचे निकाल

कोट्या धीश
Mon, 06/30/2014 - 14:25 नवीन
आजच्या सामन्यांचे निकाल काय लागतिल ?? फ्रांस & जर्मनी जिंकावे असे वाटते पण एखादा अनपेक्षित निकाल लागू शकतो का ??
  • Log in or register to post comments

हापिसात सामन्यांचे highlights

कोट्या धीश
Mon, 06/30/2014 - 14:29 नवीन
हापिसात सामन्यांचे highlights बघण्यासाठी एखादी website सुचवा
  • Log in or register to post comments

घ्या दुवे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/30/2014 - 19:56 नवीन
नेटावर थेट पाहण्यासाठी इथे तर क्षणचित्रांसाठी इथे पाहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोट्या धीश

काल डच आणि मेक्सिकनांमधला

प्रचेतस
Mon, 06/30/2014 - 17:40 नवीन
काल डच आणि मेक्सिकनांमधला सामना जबरदस्त झाला. मेक्सिकन गोलरक्षक ओचोओने जबरदस्त गोल सेव्हज केले. डच गोलरक्षकाने पण बरेच गोल वाचवले. वेस्ले श्न्यायडरने ८८ व्या मिनिटाला आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत मारलेल्या तूफानी गोलमुळे डचांना बरोबरी करता आली. इंज्युरी टाईम मध्ये रॉबेनने मात्र पडल्याचे नाटकीय प्रदर्शन करत रेफ्रींकडून पेनल्टी किक ढापली आणि डचांना विजयी केले.
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/30/2014 - 19:42 नवीन
मेक्सिकोला शेवटची काही मिनिटे सांभाळता आली नाहीत आणि ते विजयी होता होता राहीले. मेक्सिकोचा गोलरक्षक ओचोओनो किमान तीन गोल वाचवलेत तोच म्यान ऑफ दी म्याचचा हक्कदार होता. श्वायडरचा फटका केलवळ लाजवाब ओचोओ त्या फटक्याकडे केवळ पाहात राहीला. आपण म्हणता तसं रॉबेनचे पडण्याचे नाटक योग्य वेळी कामाला आले आणि नेदरलँडला दुसरा गोल करता आला. नेदरलँड जरी आठमधे पोहचले आणि त्यांचा खेळ असाच राहीला तर मला नै वाटत की ग्रीस किंवा कोस्टारिका पुढे त्यांचा शनिवारी काही निभाव लागेल. कालचा नेदरलँडचा खेळ तेवढा मला भावला नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आजचे सामने

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/30/2014 - 19:48 नवीन
फ्रान्स वि. नायजेरियाचा सामना थोड्या वेळाने सुरु होईल. जर्मनी आणि अल्जेरियाचा रात्री दीड वाजता सामना आहे, हा सामना पाहणं काही शक्य नाही. फ्रान्स वि. नायजेरियात कोण जिंकेल काय सांगता येत नाय, हा सामना नक्की पाहु. जर्मनी अल्जेरियाचा सामना थेट इंजॉय करणा-या मिपाकरांनी जर्मनी आणि अल्जेरियाच्या सामन्याचा थेट वृत्तांत लिहावा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

फ्रान्स जिंकेल असं वाटतंय.

प्रचेतस
Mon, 06/30/2014 - 20:12 नवीन
फ्रान्स जिंकेल असं वाटतंय. एकतर गटसाखळीत त्यांनी सुरेख प्रदर्शन केलंय आणि त्यांच्या स्ट्रायकर करीम बेन्झेमा पूर्ण भरात आहे. बाकी तसं पाहता फ्रान्सला तगडी प्रतिस्पर्धी अजून भेटलाच नाही. नायाजेरियाही तसा कमजोरच असल्याने हा पेपर फ्रेंचांना सोपा जावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रटाळ म्याच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/30/2014 - 22:59 नवीन
असं लिहायला आलो आणि फ्रांस ने सत्तराव्या मिनिटाला गोलचा सोपा चान्स घालवला. 0-0 दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

1-0

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/30/2014 - 23:10 नवीन
फ्रांसच्या पोग्बाच्या हेडरने 79 व्या मिनिटाला पहिला गोल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

2-0

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/30/2014 - 23:24 नवीन
दूसरा गोल काय सेल्फ झाला की फ्रांस ने केला काय समजले नाही 2-0 खेळ संपला फ्रांस विजयी. रटाळ खेळ वाटला. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

(No subject)

शिद
Tue, 07/01/2014 - 03:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त हेडर..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/01/2014 - 08:30 नवीन
गोलरक्षकाने हाताने बॉल अजून दूर ढकलला असता तर हा गोल झाला नसता. फ्रांसच्या खेळाडुंच्या चांगल्या उड्या वाया गेल्या आणि पोग्बोला चांगला चान्स मिळाला आणि बॉल गोलपोष्टमधे रवाना झाला. चित्रफित आवडली. नेहमीच संग्रही ठेवावी अशी. धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

काल नेमका लवकर झोपल्यामुळे हा

प्रचेतस
Tue, 07/01/2014 - 10:14 नवीन
काल नेमका लवकर झोपल्यामुळे हा सामना पाहता आला नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झाला एकदाचा

पैसा
Mon, 06/30/2014 - 23:10 नवीन
झाला एकदाचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अल्जेरिया जर्मनीला तगडी

शिद
Tue, 07/01/2014 - 03:53 नवीन
अल्जेरिया जर्मनीला तगडी स्पर्धा देत आहे. ९० मी. पुर्ण होऊन सुद्धा दोन्ही देशांचा एकही गोल नाही. Thomas Müller ने केलेल्या पासवर André Schürrle ने ९२ मी. बॅकप्लिप करत सुरेख गोल डागला आहे. आता शेवटच्या ८ मी. जर अल्जेरिया कडून गोल झाला नाही तर जर्मनी विजयी.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा