आय पी एल २०१४

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in काथ्याकूट
29 May 2014 - 8:37 pm
गाभा: 

मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच!

असो मी आत्ता IPL -२०१४ वर नवीन धागा सुरु करतेय IPL संपत आली असताना :-)

ह्या IPL मध्ये कोण जिंकेल असे वाटते?

पंजाबचा फॉर्म बघता तेच जास्त योग्य वाटत आहेत
पण डार्क हॉर्स कोलकाता ने अनपेक्षितपणे फायनल पर्यंत धडक मारली आहे
कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल
निम्मे श्रेय सिद्धूच्या कॉमेंट्रीला :-)

जाता जाता : सचिन तेंडूलकर नसल्यामुळे मुंबई ने काही खास कामगिरी केली नाहीये आणि त्याला असे मैदानावर न बघून थोडे वाईट वाटत होते

प्रतिक्रिया

पैसा's picture

29 May 2014 - 9:48 pm | पैसा

चेन्नैवाले नेहमी काय तरी गडबड करून जिंकतात. मी खरं सांगायचं तर एकही मॅच बघितली नाहीये. इतकं बरंच काय काय चालू आहे ना!

तुमचा अभिषेक's picture

29 May 2014 - 9:53 pm | तुमचा अभिषेक

सचिन तेंडूलकर नसल्यामुळे मुंबई ने काही खास कामगिरी केली नाहीये

शेवटच्या चेंडूला सीमापार धाडत १४.४ षटकांत १९५ धावांचे लक्ष्य गाठून अंतिम फेरीत धडक मारण्याचा ऐतिहासिक सामना याचि देही याचि डोळा बघायचे भाग्य मुंबईमुळेच लाभले की.. :)

असो, एक मुंबईकर आणि अर्थातच सचिनप्रेमी म्हणून पहिला सपोर्ट नेहमी मुंबईलाच होता.

पण आता ते बाद झाल्यावर एक शाहरुखप्रेमी म्हणून कोरबो लोरबो जितबो रे......

जर ते शक्य नाहीच झाले तर सेहवाग खेळावा आणि पंजाब जिंकावी, पण ती चेन्नई नको पुन्हा, बोरमारी होते.. तेच खेळाडू मग पुन्हा भारतीय संघातही बघावे लागतात..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2014 - 12:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंबईचा सुरुवातीपासून फ्यान राहीलो. खेळापेक्षा नशीबावर मुंबैचा जास्त भरवसा चेन्नईने जागा दाखवली. दोन विकेटा गेल्या होत्या आणि हानामारीच्या षटकात बाकींनी माना टाकल्या तेव्हाच मी सामना सोडून दिला. बोगस मुंबै. :(

बाकी, पंजाब वि चेन्नई या सामन्यात मी पंजाबच्या बाजूने आहे. पण, जिंकेल चेन्नई असे वाटते.

-दिलीप बिरुटे

मंदार कात्रे's picture

30 May 2014 - 6:10 pm | मंदार कात्रे

पंजाब जिंकावी, पण ती चेन्नई नको पुन्हा १००% सहमत !

पगला गजोधर's picture

30 May 2014 - 9:20 am | पगला गजोधर

"कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल", हे मात्र बरुबर अभिषेक, किंबहुना डेली सोप्स ला आणखी ऐक ऑप्शन म्हणूनच IPL आणलं असावं कदाचित ;)

पगला गजोधर's picture

30 May 2014 - 9:28 am | पगला गजोधर

गलतीसे मिस्टेक हो गाय, लेखकाचे नाव चुकून अभिषेक समजून टंकलो,

"कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल", हे मात्र बरुबर प्राजक्ता, किंबहुना डेली सोप्स ला आणखी ऐक ऑप्शन म्हणूनच IPL आणलं असावं कदाचित.

तुमचा अभिषेक's picture

30 May 2014 - 10:11 am | तुमचा अभिषेक

चालतं, हे नाव प्रसिद्ध होत असल्याचे लक्षण आहे ;)

योगी९००'s picture

30 May 2014 - 11:46 am | योगी९००

कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल
माझ्यामते IPL पेक्षा शतपटीने मनोरंजन निवडणूका, रागा, केजरी, सुसूं (NCP) चे बंधूराज, मनसे-शिवसेना आणि नमो यांनी केले आहे.

बाकी IPL आणि क्रिकेटमधील interest संपला असल्याने आमचा पास....

मुक्त विहारि's picture

30 May 2014 - 11:57 am | मुक्त विहारि

+ १

आत्मशून्य's picture

30 May 2014 - 1:53 pm | आत्मशून्य

पण समजा त्यांना जाणवले की यु आर नॉट XxXxX अ‍ॅज यु प्रिटंड टुबी, आन पॉप्युलर टु काँट्रारी ओपीनीओन तुम्ही उलट विरुध्द जाणवले व त्यांना तुमच्याशी जुळवुन घ्यायचे नाहीये अशा वेळी तुमच्या लेखी ते गहनविचारी ठरतील का ? आय मीन तुमचे त्यांचे जुळणार यात शंकाच नाही कारण तुम्ही युनो ...? अनिवे. पण त्यांना तुमच्याशी जुळवुन घ्यायचे नसेल तर मात्र ते लगेच अयोग्य का ?

जेपी's picture

30 May 2014 - 6:55 pm | जेपी

+413512
क्रिकेट कदी आवडलच नाय . आजपत्तुर एक बी मॅच पाहिली नाय.

हे. . हे. . हे. . , आणि हे रावडा-चिवडा ट्राय केल्याचं सुद्धा लक्क्षन हाय ;)

तुमचा अभिषेक's picture

30 May 2014 - 12:50 pm | तुमचा अभिषेक

क्रिकेटचा देव मराठी असताना मिसळपाव नामक हॉटेलात या खेळाबद्दल उदासीनता हे कसले लक्षण आहे?
खास करून आता तो देव केवळ आयपीएलमध्येच काय ते दर्शन देतो असे असताना खरे तर या सोहळ्याला एखाद्या धार्मिक सणाचे स्वरुप आले पाहि़जे.
याचा अर्थ असा घ्यायचा का की निवृत्तीनंतर देवाचेही मार्केट डाऊन होते, जोपर्यंत चमत्कार दिसतात तोपर्यंतच नमस्कार होतात...

प्रचेतस's picture

30 May 2014 - 12:54 pm | प्रचेतस

निवृत्तीच्या आधीच देवाचे मार्केट डाऊन झाले होते. देव कसा बसा खेळत असताना अगदी बघवत नव्हते हो.

किसना व यदुवंश नष्ट झाला देव जाहला म्हणोनि काय झाले प्रारब्ध्द भोग भोगावेच लागतात यातून देवाची पण सुटका नाही यातच इश्वरत्व अजुन उज्ळ्ले वाटत नाही का ? ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Jun 2014 - 11:43 am | llपुण्याचे पेशवेll

देव सोत्ताला मराठी मानायचा का? बाकी चालूद्या.

श्रीगुरुजी's picture

30 May 2014 - 1:09 pm | श्रीगुरुजी

>>> मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच!

मी एप्रिलमध्येच आयपीएल २०१४ साठी धागा सुरू करणार होतो. पण मिपावर क्रिकेटप्रेमींची संख्या फारशी नाही. आणि एका दुसर्‍या धाग्यावर आयपीएलवर काही जणांनी खूपच टीकेचा भडीमार केला. त्यामुळे मी विचार सोडला.

असो. मी पहिल्यापासूनच मुम्बई इंडियन्सचा समर्थक होतो (सचिनचा संघ असल्यामुळे). यावर्षी मुम्बईने बराच चुकीचा संघ निवडला. एकतर सचिन निवृत्त झाला. त्याच्या बरोबरीने मुम्बईने ड्वेन स्मिथ, मिचेल जॉन्सन, मॅक्सवेल असे महत्त्वाचे खेळाडू गमावले. मलिंगा सर्व सामने खेळला नाही. सलामीची जोडी ही पहिल्या आयपीएलपासूनच मुम्बईची समस्या आहे. यावेळीही तीच समस्या उभी राहिली. पहिल्या ४ सामन्यात हसीला व पर्यायाने सलामीच्या जोडीला सूर सापडला नाही. हसी नंतर ७-८ सामन्यानंतर धावा करायला लागला. सिमन्सला सुद्धा खूप उशीरा संधी मिळाली. नेमका त्याच वेळी मलिंगा बाहेर पडला. त्यामुळे मुम्बईची भट्टी यावेळी नीट जमली नाही.

असो. आता पंजाब जिंकावे अशी इच्छा आहे. यापूर्वीच्या प्रत्येक वर्षी फिक्सिंग करून अंतिम फेरीत पोहोचणार चेन्नई, माजोरड्या शाखरूख व मल्ल्याचे कलकत्ता व बेंगलोरचे संघ व सनरायझर्स हे ४ संघ मला अजिबात आवडत नाहीत. दिल्ली, राजस्थान, मुम्बई व पंजाब हे अंतिम ४ संघात हवे होते. त्यापैकी पंजाब हा एकमेव संघ उरला आहे. तोच आता जिंकावा हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना.

मै तो पियेगा's picture

30 May 2014 - 3:33 pm | मै तो पियेगा

हल्ली cricket मधला interest फारसा राहिला नाही. पण सिद्धुची commentry म्हणजे डोक्याला shot. मी फक्त तो किती वेळा "कहि न कहि" म्हणतो ते मोजत असतो. मजा येते.

श्रीगुरुजी's picture

30 May 2014 - 5:54 pm | श्रीगुरुजी

सिद्धूची कॉमेंटरी भिकार व दर्जाहीन असते. सिद्धूच्या कॉमेन्ट्स अत्यंत चीप व उथळ स्वरूपाच्या असतात.

दादा कोंडके's picture

31 May 2014 - 10:41 am | दादा कोंडके

तोकडे कपडे घालून नाचणार्‍या चिअर लिडर्स, केवळ लोकांच्या करमणुकीसाठी नविन तयार केलेले नियम, म्याच फिक्सींगमध्ये अडकलेले खेळाडू, विकले जाणारे खेळाडू, पैश्यासाठी इतर मागास देशातल्या खेळाडूंची आयपिएल मध्ये येण्याची धडपड, श्ट्यामिनासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय कसोटी सामना न खेळता आयपियल मध्ये खेळणारा क्रिकेटचा 'देव' हे सर्व बघून सिद्धूच काय पण आयपिएल क्रिकेट आणि ते बघणारी लोकसुद्धा भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेली चीप आणि उथळ आहेत असं म्हणून मी माझं भाषण संपवत. जै हिंद.

तुमचा अभिषेक's picture

31 May 2014 - 1:55 pm | तुमचा अभिषेक

अख्ख्या पोस्टसाठी

अगदी आयपीएलच्या पहिल्या सीजनपासून हा ओरडा चालू आहे. कित्येकांना वाटलेले की फार तर फार ३-४ वर्षांत या सर्कशीचा बाजार उठेल. मात्र तसे होताना दिसत नाहीये. काही दर्दी क्रिकेटरसिक यात दुखावलेत, मात्र दरवर्षी नवीन प्रेक्षकवर्ग लाभतोय. आणि तो लाभावा म्हणून कल्पकतेला उत आलाय. यात गुंतला जाणारा पैसा वाढतोय. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारत क्रिकेटमधील एक महासत्ता बनली आहे.

अवांतर - आयपीएल म्हटले की लोकांना (टिकाकारांना) पैला चीअरगर्ल आठवतात. पण हल्ली कोणाला त्यात फारसे काही विशेष किंवा नावीण्यपुर्ण वाटत नाही. म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगायचे झाल्यास मी स्वता घरी असतानाचे सारे सामने बघितलेत, पण चीअरगर्ल वर खास अशी नजर जात किंवा अडकत नाही. अन्यथा पहिल्या-दुसर्‍या वर्षी कोणत्या संघाच्या चीअरगर्ल्स कश्या आहेत याची भारी उत्सुकता होती ;)

श्रीगुरुजी's picture

31 May 2014 - 2:31 pm | श्रीगुरुजी

>>> आयपिएल क्रिकेट आणि ते बघणारी लोकसुद्धा भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेली चीप आणि उथळ आहेत असं म्हणून मी माझं भाषण संपवत.

अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

आयपीएल सारख्या अत्यंत भिकार व दर्जाहीन अभिरुची असलेल्या प्रकारावर चर्चा करणार्‍या या धाग्यावर चुकून फिरकलात. निदान भविष्यात तरी इथे यायची चूक करू नका. उगाचच भिकार, दर्जाहीन अभिरूची असलेले अत्यंत उथळ प्रतिसाद वाचायचे तुम्हाला कष्ट पडतील.

क्रिकेटच्या जाणकार लोकांना भिकार वाटते पण सामान्य क्रिकेट रसिकांचे चांगलेच मनोरंजन होते त्याचे काय?
त्याच्या कहिन न कही ची पण मजा येते आत्ता बाकीचे commentators पण त्याच्या सारखीच कोमेंट्री करायला लागले आहेत :-)

बाकी काही काही matches ह्या fix असल्यासारख्याच वाटत होत्या हे खरे :-(
आजच्या match मध्ये पंजाब जिंकणार असे वाटत आहे आत्ताचा खेळ बघून १५७/२ १४ ओवर्स मध्ये

पैसा's picture

30 May 2014 - 9:53 pm | पैसा

चेन्नै जर फायनलला गेले नाहीत तर आपण नक्की इथे गप्पा मारू! मग मी पण फायनल बघेन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2014 - 11:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चेन्नईची नाजुक कन्डीशन झाली आहे. आता मदार धोनी वर आहे 161/6 15.3 ओवर 27 मधे 66 पाहिजेत.

मित्रहो's picture

30 May 2014 - 11:40 pm | मित्रहो

कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल

हे मनोरंजन रैना,किंवा मैक्सवेल किंवा सेहवागच्या चौके किंवा छक्कातून नाही एवढेच काय तर त्या चीअर लीडरच्या नाचातून सुद्दा नाही तर ते आहे
- सिद्धूची कॉमेंट्री
- प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरुख यांचा वावर
- या लोकांच्या प्रतिक्रीया. टेडवर एक हर्षा भाोगलेचा विडीओ आहे त्यात तो म्हणतो आयपीएल मधे सिक्स मारला तर बक्षीस म्हणून कोणी स्टार मिठी मारण्याची शक्यता आहे.

आयपीएलचा सर्वात मोठा फायदा कुठला असेल तर सामान्य माणसाला कुठल्याही ओळखीविणा टिकिट मिळते.

मित्रहो
www.mitraho.wordpress.com

माझे मिपावरील लिखाण
http://www.misalpav.com/node/27892

तुमचा अभिषेक's picture

31 May 2014 - 12:23 am | तुमचा अभिषेक

आयला इथे सामन्याची चर्चा कमी आणि अवांतर बाजारगप्पाच जास्त
मी आता इथे मस्त आजच्या सामन्याची चिरफाड करणारी पोस्ट टाकणार होतो तर इथे चर्चा सिद्धूपाजी आणि नाचणार्‍या बायकांची..
चलो, हरकत नाही, आता आलोच आहे तर परवाच्या अंतिम सामन्यासाठी माझ्या फेवरेट कोलकत्याला सपोर्ट नोंदवून जातो..

कोरबो लोरबो जितबो रे...
अब की बार , के के आर !!

श्रीगुरुजी's picture

31 May 2014 - 2:32 pm | श्रीगुरुजी

अंतिम सामन्यात पंजाब जिंकावे व कलकत्ता हरावे अशी मनापासून इच्छा आहे. पंजाबला शुभेच्छा!

आत्मशून्य's picture

31 May 2014 - 2:41 pm | आत्मशून्य

मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे
नवलच!

मिपा वर ही परंपरा नाही कारण मिपा हे मनोरंजन आणि धमाल या बाबतीत बहरात असतानाही IPL ला पुरून उरत असे. हां विषयच फार रुक्ष वाटत असे. आता....

चेन्नई चांगली सुरवात करून हारली म्हणून वाईट वाटले
सुरेश रैनाने केलेली धडाकेबाज सुरवात वाया गेली :-(
फायनल ला दोन्ही संघांना समान संधी आहे
पंजाब ची हि IPL मधली सर्वोच्च कामगिरी आहे आत्तापर्यंत (फायनल पर्यंत)

श्रीगुरुजी's picture

31 May 2014 - 8:26 pm | श्रीगुरुजी

रैना जबरदस्त खेळला. २५ चेंडूत ८७ धावा. त्यातल्या ८४ धावा चौकार व षटकारांच्या. फक्त ३ धावा पळून.

सेहवाग सुद्धा जबरदस्त खेळला. २०१५ च्या विश्वचषकासाठी तो संघात पाहिजेच.

सुधीर जी's picture

2 Jun 2014 - 6:26 pm | सुधीर जी

प्रिती झिंटा रडली कारण..

पियुष चावला 

मित्रहो's picture

2 Jun 2014 - 7:18 pm | मित्रहो

पंजाब हरला वाइट वाटले. फायनल मधे टिमला दोनशे चेस करु देने म्हणजे बॉलींगची पूर्ण नाचक्की. काहीनी आता क्रिकेट खेळने सोडावे. फक्त पटेल अपवाद ठरला.

मित्रहो
www.mitraho.wordpress.com
माझे मिपावरील लिखाण
http://www.misalpav.com/node/27892

पैसा's picture

2 Jun 2014 - 7:20 pm | पैसा

चेन्नै फायनलमधे नसल्याने मी म्याच पूर्ण बघितली. बर्‍यापैकी मजा आली. फिक्स्ड वाटली नाही.

आत्मशून्य's picture

2 Jun 2014 - 11:34 pm | आत्मशून्य

हेच तर खरे फिक्सिंग आहे ;)

टवाळ कार्टा's picture

3 Jun 2014 - 5:00 pm | टवाळ कार्टा

तर काय

Prajakta२१'s picture

2 Jun 2014 - 10:53 pm | Prajakta२१

मी कोलकाताची इंनिंग सलग पहिली
पंजाबची एवढी सलग नाही पहिली
पण चांगली झाली match
मनीष पाण्डेने खेचून आणली
कोलकात्याच्या इनिन्गच्या वेळी त्यांचा कर्णधार गौतम गंभीर अगदी गम्भिर होऊन बसला होता
शेवटी हसला असेल एकदाचा KKR जिंकले म्हणून