ये रे माझ्या मागल्या........
"माझं ऐक - बोलिंग घे..... ओव्हरकास्ट आहे". २७५ शनिवार पेठ पुणे ह्या ठिकाणी बिल्डिंगच्या मध्ये असललेल्या साधारण ५० X १५० फुटी फर्शीच्या मैदानवर पिवळ्या स्मायलीच्या बॉलनी खेळताना ते ढोपरायेवढं कार्टं आपल्या गुडघ्यायेवढ्या कॅप्टनला सूचना करत होतं. आता त्या शेंबड्या पोराच्या ह्या आगावपणामध्ये त्याच्या (मुद्दामच उल्लेख केलेल्या) राहत्या ठिकाणाने दिलेल्या जन्मसिद्ध अधिकाराइतकाच वाटा होता आजकाल सगळीकडूनच मिळणार्या क्रिकेटच्या ज्ञानाचा! लहान असताना रबरी चेंडू प्यांटवर आम्हीदेखील घासला होताच... पण ह्यांचे म्हणजे नेणत्याचे घासणे | "वन लेग स्टंप" गार्ड काय घेतील.....