शब्दांची ताकद
मनाच्या खोल गाभाऱ्यात काय घडतंय त्याचा उपसा करून इतरांसमोर ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. कितीतरी
अक्षरांचे निरर्थक तुकडे गोळा केले, की शब्दाची निर्मिती होते. पण समर्पक अर्थाचे भार वाहणारे, पेलणारे आणि तोलणारे शब्द
किती वापरावे लागतात .शब्द धीर देतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी जखमीही करतात. धारदार हत्यारांनी केलेल्या वारापेक्षाही
शब्दांनी झालेली जखम अतिशय खोल आणि सतत भळभळून वाहणारी असते.शब्दांनी मने उभी राहतात. मनामुळे माणूस
उभा राहतो. माणसामुळे समाज, समाजामुळे एखादं गाव, गावांपासून
राज्य,असा अनंत प्रवास छोट्याशा शब्दांपासून सुरू होतो.कौतुकाच्या