मराठी अनुवादः सबसे खतरनाक होता है - कवी 'पाश'
अवतार सिंह संधू बर्याच कारणांनी गाजलेले कवी. वयाच्या फक्त अडतिसाव्या वर्षी खलिस्तानी अतिरेक्यांनी ह्या माणसाला उडवलं. ह्याचा गुन्हाही साधा सुधा नाही. हा माणूस डाव्या विचारधारेतला. धारदार कविता करणारा. नक्षलवादी चळवळीतला, राजकारणात पुढे आलेला, नक्षलवाद्यांचा कवी म्हणवला जाणारा पण शिख उग्रवाद्यांच्या हिंसाचाराचा विरोध करणारा. त्याच्या कवितांमधून त्याचे डावे विचार स्पष्ट दिसतात. पण आहेत विचार करायला लावणार्या. अशीच एक कविता मला खूप आवडलेली. माझ्या अल्पबुद्धीने केलेला अनुवाद सादर करतो.