झोपलेले नशिब
आटपाटनगरात एक कोळी रहायचा. रोज सकाळी उठुन मासे पागायला जायचा. जे काय मासे मिळायचे ते बायकोच्या ताब्यात देउन दुपारी आराम करायचा, पोराशी खेळायचा. बायको काही मासे घरासाठी ठेवुन उरलेले विकायची, घरी येतांना टोपल्यात बाजार भरुन आणायची.
आटपाटनगरात एक कोळी रहायचा. रोज सकाळी उठुन मासे पागायला जायचा. जे काय मासे मिळायचे ते बायकोच्या ताब्यात देउन दुपारी आराम करायचा, पोराशी खेळायचा. बायको काही मासे घरासाठी ठेवुन उरलेले विकायची, घरी येतांना टोपल्यात बाजार भरुन आणायची.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)
लहानाचा झालो मोठा, पंखात आले बळ,
बुडलो ज्या रंगात तो माझाच रंगच होई,
होती स्वप्न डोळ्यात, होते बळ पंखात,
मागे न बघता, स्वप्नात जगत राही,
सरले सगळे दूर, ठेविले सगळे मागे,
आठवणींना सुद्धा आसवात बुडवित राही,
झोकून देई स्वतःला, गुलाबी या चिखलात,
शोधितो असे काय, न मिळून कशात राही,
उघडून पाहतो मुठ, हात रिते दिसतात,
रेषांची जाळी मात्र, सामोरी भुलवत राही,
काही करू तरीही, तहान ही शमेना,
वासनेच्या दलदलीत, अडकत मी राही,
मृगजळामागे भ्रमाच्या, नेहमी धावत आहे,
थकून जातो जेव्हा, घेरून निराशा राही,
संध्या होता मिलनाची खाट सजवली सख्यांनी …
दारी दुग्धकेशर घेऊनी बावरते सौभाग्यकांक्षिणी…
श्वासही तापले काया झंकारीली भानही हिरावले मग त्या कामीनी…
जाणवावी कवेत तिच्या तनुतील शिरशीरी हरलाजऱ्या चुंबनी….
अश्व दौडवता यौवनाचे अनुभवावी गुलाबी श्वासांची जोडी बिलगूनी…
पहाटजाग येई अलगद पिचलेला चुडा कुस्कारला गजरा ओलांडुनी…
फितुरी विस्कटलेलं कुंकू, अन मोकळे केस ओरडून संगती सर्वा कहानी …
गीत असे माधुरी सहसखी मोहिनी तुझ्यासवे गात रहावे हरदिनी हरदिनी….
स्थळः- जेवणचे टेबल,
वेळः- सन्ध्याकाळ किन्वा रात्र.....
बाबा म्ह्णतात, चिरन्जीव....कोणती बीअर घेता ????
मुलगा पार हवेत... क क कोणती बीअर... बाबा तुम्ही काय म्हण्ताय ते मला नाहि कळत...(मुल्गा बापाचि नजर चुकविण्याचा फुकट प्रयत्न कर्तो)
बाबा खूप गम्भीर चेहरा...
बेटा... मी तुझा बाय द वे नाही आउल द वे बाप आहे...
खाणार कानाखाली सान्गणार सगळ..
इतक्यात आई येते...
काय हो... काय सान्गणार आहे सोन्या आपला..??? (सोन्या......?????)--बाबा...
तुझा सोन्या आता जरा जास्तच शहाणा झालाय..
बीअर घेतात चिरन्जीव आप्ले...
आज सकाळी बाईक पार्क करत होतो.अविदादा अचानक गेला त्याची बाईक अजूनही पार्क केलेली आहे.पार्किंग वाला म्हणाला,' देखो आजकल गाडी पार्क करके जानेवाला शाम को वापस आयेगा उसका भरोसा नही रहा ...पार्किंग के लिये रोज वही जगह नही मिली तो लोग खामखा झगडा करके जाते है '
प्रस्तावना: हि अप्रतिम कविता प्राजक्त देशमुख यांची ५ वर्षांपूर्वी लिहीलेली आहे. आजही ती तितकीच टवटवीत आहे. मुळात शेक्सपिअर हा फार कठीण विषय. पण प्राजक्तचे वाचन या कवितेत अगदी ठिकठिकाणी जाणवते. मला या कवितेचे रसग्रहण करणे काही जमले नाही, पण हि कविता तुमच्यासमोर आणण्यावाचूनही राहवले नाही. अर्थात हे करण्यापूर्वी कविची परवानगी घेतलेली आहेच.
टु शेक्सपिअर विथ लव
तू होतास तेव्हा आम्ही नव्हतो
तू गेलास तेव्हाही आम्ही नव्हतो,
पांढ-या टोकपिसाने...
तुला लिहतांना कधी पाहिलं नाही
अगणित अत्याचार सोसलेस तू आई
आई, तुझ्या अंगावरचे मौल्यवान दागिने
लुटले आमच्या चैनीसाठी आम्ही
तू क्षमा केलीस
आई, तुझ्या हृदयावर चालवले आम्ही
असंख्य नांगरांचे फाळ
तू क्षमा केलीस
आई, तुझे दुधाने भरलेले स्तन
बुलडोझरने कापून टाकले आम्ही
तू क्षमा केलीस
आई, तुझ्या दुधात हलाहल
जहरिले वीष कालवले आम्ही
तू क्षमा केलीस
आई, आज पर्यंत आमचा प्रत्येक अपराध
तू पोटात घातलास
कृतघ्न उपजलो आम्ही
उन्मत्त झालो आम्ही
निव्वळ स्वार्थी, भ्रष्ट, नतद्रष्ट झालो आम्ही
आतातर निर्लज्ज, हलकट झालोय आम्ही
स्वप्नं बघण्याचं वेड प्रत्येकालाच असतं. माणसामधलं हे वेड त्याने हेरलं होतं आणि ठरवलं होतं, आपण स्वप्नं विकायची. छोटी , मोठी , लोभस , गोंडस , कधी अतर्क्य तर कधी आवाक्यातली अशी सगळी स्वप्नं विकायची. स्वप्नं पाहणं खरंतर सोप्पं असतं. कधी झोपेत तर कधी जागेपणी आपण स्वप्नं पाहिलेली असतातच. पण आपल्याला पडलेलं प्रत्येक स्वप्न आपल्या आवाक्यातल असेलच असं नाही. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार स्वप्नं दाखवणं आणि विकणं तसं जिकिरिचच काम, पण ते त्याला जमायचं.
महमूद दरवेश या पालेस्तिनी लेखकाच्या
'If Only the Young Were Trees!' या ललितलेखाचा मुक्त अनुवाद.
झाड झाडांचे सहोदर. झाड झाडांचे शेजारी.
मोठी झाडं छोट्या झाडांची काळजी घेतात.
न बोलता, हळूवार त्यांच्यावर सावली धरतात.
एखाद्या छोट्या झाडाला रात्री भीती वाटू नये , म्हणून आपल्या खांद्यावरचा इवला पक्षी त्याच्या खांद्यावर अलगद ठेवतात.
एक झाड दुसऱ्या झाडाच्या फळावर हल्लाबोल करीत नाही.
वांझोट्या झाडाला घेरून, त्याची कुचेष्टा करीत नाहीत.
एक झाड दुसऱ्या झाडावर घाव घालत नाही.
झाडं चुकूनही लाकुडतोड्याचे अनुकरण करीत नाहीत.