पाऊस (शतशब्दकथा)
त्या पावसाचं कवतिक तुमा लोकांनला!
पावसावर गानी लिवता, मोट्या मोट्या गाड्यांमदी भिजायला जाता तिकडं डोंगरात.
आमाला काय त्याचं ? दर वर्साला येतोय आन जिनं हराम करतोय बगा.
आत्ता, दर वरसाला झोपड्याचं पलास्टिक बदलायला पैका कुटं हाय ?
औंदा पन असाच आला माज्या दादल्यासारका आन लई झोंबून ग्येलाय कुटं तरी उंडारायला!
सगली बरबादी क्येली बगा माज्या संसाराची.
आता नसला तरी पान्याची बोंब व्हनार. कुटं उलथलाय कोनास टाऊक!
येईल आता दुसर्या आखाडाच्या टायमाला
आन येकद्म पडून सूड उगवंल मागील जलमाचा.
मागल्या मैन्याला माजी दोन टोपली वाह्यली.