कास्टीझम
त्यादिवशी कॅफेटेरिया मधल्या सगळ्यांचे डोळे टीवी कडे होते.
पटेल रॅली मुळे पेटलेला गुजरात सगळे भेदरलेल्या नजरेने पाहत होते.
"का चालू झालंय हे सगळ पण?" तिने त्यांच्या टेबल वर विषय सुरु केला.
"अरे पटेल कास्ट साठी आरक्षण पाहिजे म्हणे. तो म्हणतोय कि त्यांना द्या किंवा कोणालाच नको" त्याने माहिती पुरवली.
"आणि त्याच्या साठी संपूर्ण गुजरातेत जाळपोळ सुरु झालीये" QA वाला म्हणाला.