पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की
नका हसु....करु हेटाळणी त्या वृद्ध म्हाता~याची
थरथरणा~या हाताने तो उद्याच्या बालकां साठी स्वप्न बिजे पेरत आहे....
कालातंराने त्याचा हिरवा गर्द विशाल वृक्ष होणार आहे..
त्याच्या सावलित बसताना व फळे चाखताना तुम्हाला त्याची आठवण येणार नाहि.
कारण बिजे रोवताना बिजा समवेत आपले नाव पेरण्याची गरज त्याला भासली नाहि
असे अनेक अनामिक स्वप्न बिजे पेरत असतात
आज दुपारपासून धो धो पाऊस पडतोय
अगदी कोकणातल्या पावसासारखा
तसा मी इथे आहेच कुठे
मी आता कोकणातच पोहचलो आहे,
त्या हिरव्यागार डोंगर टेकडयांवर,
दुथडी भरुन वाहणार्या ओढयांकाठी
सर सर तीरासारखे पाणी कापत जाणारे तुम्ही
अन तुमच्या पाठोपाठ मी
किती छान होतं ना आपलं आयुष्य
फक्त आपणच होतो आपल्या आयुष्यात
फक्त तुम्ही आणि मी
गाव सोडलं आणि त्याबरोबर मी तुम्हालाही सोडलं
आज तुमच्या आठवणींनी मन व्याकुळ झालंय
डोळे भरून आलेत तुमच्या आठवणींनी
आजुबाजूला कुणी नाही म्हणून बरं आहे
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल.
तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५
वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता
स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा
कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे
फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम.
कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का?
(संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको)
माझं गाव कोकणात. तसं गोव्यापासूनही जवळ. म्हणजे आमच्या घरापासून साधारण अर्धा तास चालत जायच्या अंतरावर तेरेखोलची खाडी आणि तिच्या पल्याड गोवा. सहज पोहत जाण्याजोगं अंतर. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही गावी गेलो की बाबा पेडण्याच्या बाजाराला चालत जायचे. आमचे वाडीतले इतर कार्यक्रम ठरलेले असायचे, त्यामुळे त्यांच्यासोबत बाजारात जायचं फार अप्रुप नव्हतं. पण बाजारातून आणलेल्या कांदा भज्यांचं आकर्षण होतं. त्याचबरोबर मोठ्या बांगड्यांसारख्या गोल आकाराचे पाव मिळायचे. बांगड्या म्हणजे काकणं, म्हणून पावाच्या त्या प्रकाराचं नाव 'काकना'.
मुंबईच्या ट्रेन मध्ये लेडीज डब्यात दुनियाभरच्या लेडीज ना आवश्यक अशा गोष्टी विकायला येतात. अगदी पायाच्या नखांपासून डोक्याला लावायच्या क्लिप्स पर्यत. मी सतत नेलपेंट्स / कानातले/अंगठ्या / रुमाल्स / केसांनच्या क्लिप्स अशा गोष्टी नेहमीच लेडीज डब्यातूंनच खरेदी केल्या आहेत . त्यात विशेष अस काही नाही.
साधरणपणे १० वर्षापुर्वी पर्यंत आपल्यातील बहुतेक जण व काही ठिकाणी आतासुध्दा काही जण सार्वजनिक शौचालय वापरत आहेत.
तेंव्हा त्या शौचालयात काही कलाकृती व गावातील,आळीतील भानगडी,वाद एकतर्फी प्रेमाची जाहिरात वाचायला मिळत असे.
एवढेच नाही त्या बातम्या अपडेट करणारे व त्या चविने वाचणारे,पाहणारे आज बहुसंख्येने व्हाट्स अप वर व उरले सूरलेले ईतर सोशल नेटवर्कवर आजही आहेत.
खरेच या महाभागांमुळे आपण किती डिजिटल झालो आहोत हे समजते आहे.
असेच गप्पा टप्पा करायला चौकातल्या मित्रांमध्ये बसलो विषय असेच नेहमीचे दिल्ली पासून गल्ली पर्यंतचे होते.
असेच बोलता बोलता वादग्रस्त विषय आला विषय तसा भरपूर बोलण्याचा असल्याने गरमागरम चर्चा सुरु झाली बोलता बोलता नेहमी प्रमाणे डावे, उजवे व तटस्थ असे गृप पडले. विषय वाढता वाढता वाद होतील असे वाटल्यावर आम्ही दोघा तिघांनी तेथून कल्टी मारली.
चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबलो असता एखादा विषय कसा वेगळे वळण घेतो यावर आम्ही बोलत होतो.त्यावर अशा गोष्टी कशा वेगळे वळण घेतात यावर उदाहरण म्हणून एक मित्र बोलला...
असेच काही क्षण जगणे शिकवणारे....
नेहमी प्रमाणे भेटल्यावर नमस्कार करुन " अण्णा ५० रुपये दे रे " असे हक्काने चौधरी बोलला म्हणजे आज चौधरी एकदम जोरात आहे १० - १२ दिवस एकदम शांत असणारा चौधरी सकाळ पासूनच देशी लावून आहे हे लगेच समजून आले.