अस्तित्व?
अस्तित्व :
अस्तित्व :
रुतलेला मी
खोल चक्रव्यूहात
"मी" पणाच्याच
खेचणारं आकर्षण
चक्रव्यूहाच्या केंद्रात
केलेली प्रत्येक कृती
उचललेलं प्रत्येक पाऊल
परिघात चक्रव्यूहाच्याच
सभोवती रिंगण नात्यांचं
हा, ही, हे, तो, ती, ते,
तेही जोडलेले एकमेकांशी
Covalent बॉन्डने
"मी" पणाच्याच
आहेत ही नाती निरर्थक
की तेच सत्य?
घडू पाहतो स्फोट
पण घडत नाही
कारण कवच घट्ट
"मी" पणाचंच
एक कळ तीव्र
छातीत, डाव्या हातात
समोर आहेस का तूच?
आहेस तू absolute?
म्हणतात तसा?
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा.
अंतर्यामी ओरीगामी
गर्दीत त्याला पाहून मी जवळ जवळ त्याचा हात खेचीतच बाजूला घेऊन गेलो.
"तू इथे प्रदर्शनात कशाला आलास ?" मी रागाने
"तू म्हणालास ना सगळे येणार आहेत म्हणून" तो बिफीकीरीने
"मला नाही माहीत कोण कोण आलेय ते" मी खांदे उडवून म्हटलो नेहमीसारखा.
तो खटपणे म्हणाला " मला माहीत्येय कोण कोण आलेय ते !!!"
" कोण कोण ते सांग चटकन अन मोकळं कर मला " मी अधीरपणे .
"हो हो किंचीत पुरोगामी,किंचीत प्रतीगामी आणि बरेचशे ओरिगामी"
"क्का$$$$$य" मी शक्य तितक्या मह्तप्रतसायाने खालच्या आवाजात
ऐक चिडू नको..
एक कविता मनाची
एक कविता जनाची
मना वाटते, राजा मी व्हावे
जन म्हणती, तू रंकचि रहावे-
एक कविता स्वप्नाची
एक कविता सत्याची
स्वप्न म्हणे, गगनात विहरावे
सत्य म्हणे, कदर्मी तू कुजावे -
एक कविता नात्याची
एक कविता जातीची
नाते म्हणे, आमचाच हां स्वकीय
जात म्हणे, कोण हां परकीय-
एक कविता प्रश्नाची
एक कविता क्षणाची
प्रश्न म्हणे,मी कधी संपणार नाही
क्षण म्हणे, मी कधी थांबणार नाही-
ही कविता जीवनाची
ही कविता मरणाची
जीवन म्हणे, ना मी कुणाची मालमत्ता
मरण म्हणे, इथे तर आहे माझीच सत्ता -
एक हात कठड्यावर ठेऊन,
अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन,
मी उभा आहे गॅलरीत!
तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर
मन रमून गेले फार!
इथेच बसून नाही का लावत
तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला!
नाही.....वेडा नव्हतोच कधी
समंजस होतो खूप म्हणून
गॅलरी नाही ओलांडत
आजही!
मला नाही जमत लिहायला,
तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला!
इतकं जग पाहूनही
प्रेमबीम पण नाही कळत मला!
मी न कवी, न लिहणे माझा पेशा
जीवनी कधी रमता, कधी उदास होता
छंद म्हणोनी खेळतो खेळ हा शब्दांचा
छंदातुनी जन्म या कवितांजलीचा .
शुभ्र उमदा मी एक अश्व
करीत पादाक्रांत हे विश्व
करावयाचा आहे शोध
घ्यावयाचा आहे बोध
.....................मृत्यूचा!
बाळगुन मनाशी जिद्द
चपल तनुत एक उमेद
नजरेत एकाच ध्येय
धावणार मी असाच आहे
......................सुसाट!
माझिया जन्मानेच मला
जीवन्मंत्र आहे दिला
येणार ना मरण तुला
.....................कधीही
पण,मनी ती एक आस
भेटावयाचे मरणास
संपणार कधी हा प्रवास
एकचि ध्यास तो खास
....................अंतरात
आणि अशाच एका दिनी
यश प्राप्तिले प्रयत्नानी
पाहिले मरणाचे रूप
आर्किटेक्ट बाप साईटवर कामात गुंग आहे. पदवीधर होऊन नुकतीच इंटर्नशिप संपलेल्या मोठ्या मुलीचा फोन येतो.
"बाबा, तुम्हाला आठवतंय का मी पुण्याच्या त्या मल्टीनॅशनल कंपनीत अॅप्लाय केलं होतं?"
"हो, हो," गवंड्याच्या हातातल्या ओळंब्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवत बाबा, "त्याचं काय झालं?"
"बाबा, त्यांचं कॉल लेटर आलंय इंटरव्ह्यूसाठी, उघडून पाहिलं तर इंटरव्ह्यू उद्याच सकाळी आहे!"
"अरे वा! काँग्रॅट्स! पण बेटा आज तर मी दिवसभर साईटवर अडकलेलो असेन आणि आई तर उद्या रात्रीपर्यंत परत येणार नाहीये नागपूरहून! आज रात्री उशीरा निघुयात आपण दोघे?"