“ये है बंबई मेरी जान.”
काही दिवसांपुर्वी मुंबईला आलो होतो. गोरेगावच्या एका रस्त्यावरून जाताना सहजच बाजूला असलेल्या बस स्टॉपकडे दृष्टी गेली आणि सर्व प्रथम नजरेत भरला तो एका जाहिरातीतला अक्षय कुमार, त्याच्या सुंदर निळ्या शर्टासहित. चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणि नजरेत चमक. आणि दुसर्याच क्षणी दिसला तो त्याच्या छत्र छायेत गाढ निजलेला मनुष्य. त्या बस स्टॉपच्या अरुंद बेंचवर, वरील स्टीलच्या बारला धरून शांतपणे झोपला होता. पण शांतपणे तरी कसं म्हणता येईल ?