असेच गप्पा टप्पा करायला चौकातल्या मित्रांमध्ये बसलो विषय असेच नेहमीचे दिल्ली पासून गल्ली पर्यंतचे होते.
असेच बोलता बोलता वादग्रस्त विषय आला विषय तसा भरपूर बोलण्याचा असल्याने गरमागरम चर्चा सुरु झाली बोलता बोलता नेहमी प्रमाणे डावे, उजवे व तटस्थ असे गृप पडले. विषय वाढता वाढता वाद होतील असे वाटल्यावर आम्ही दोघा तिघांनी तेथून कल्टी मारली.
चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबलो असता एखादा विषय कसा वेगळे वळण घेतो यावर आम्ही बोलत होतो.त्यावर अशा गोष्टी कशा वेगळे वळण घेतात यावर उदाहरण म्हणून एक मित्र बोलला...
" सोशल मिडियावर एखादा त्या दिवशीच्या एखाद्या घटनेवर एक पोस्ट करतो आणि इतर त्यावर कमेंट्स करतात.
काही कालावधी नंतर एखादा नविन मित्र ती पोस्ट वाचतो आणि त्यावर कमेंट करतो.मग होते काय कि ती पोस्ट परत एकदा चर्चेत येते आता त्या पोस्टवर असलेल्या विषयाचा त्यावेळाचा संदर्भ जूना झालेला असतो किंवा विषय तेंव्हाच संपलेला असतो तरीही काही नविन,जुने उत्साही सदस्य पोस्टची तारीख न पाहता आपआपल्या पध्दतीने भूतकाळातील किंवा सद्य घटनेशी तिचा अर्थ जोडून वेगवेगळ्या कमेंट्स करतात. हळूहळू ती पोस्ट मूळ विषय सोडून भरकटत जाते.
त्या पोस्टवर समर्थक आणि विरोधक तयार होतात सुरु होते शब्दांचे हल्ले जे हळू हळू जात धर्मावर जातात मग इकडचे नाराज तिकडे तिकडेच नाराज इकडे असा प्रकार होउन या वादांमध्ये सोशल मिडियावर ब्लॉक करण्यापासून खऱ्या आयुष्यात मैत्री तोडण्यापर्यंत हा वाद जातो.
म्हणजे
एक छोटीशी पोस्ट डोंगरा एवढी मोठी होते कि ती संबंध तोडण्याइतकी महत्वाची होते.
आणि आपण मात रक्त पिपासु ढेकणा इतके लहान होतो.
प्रतिक्रिया
29 Sep 2015 - 12:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पटलं. शुभेच्छा. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे