अष्टवृक्षासौभाग्यवती

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
21 Apr 2015 - 8:24 pm

महमूद दरवेश या पालेस्तिनी लेखकाच्या
'If Only the Young Were Trees!' या ललितलेखाचा मुक्त अनुवाद.

झाड झाडांचे सहोदर. झाड झाडांचे शेजारी.
मोठी झाडं छोट्या झाडांची काळजी घेतात.
न बोलता, हळूवार त्यांच्यावर सावली धरतात.
एखाद्या छोट्या झाडाला रात्री भीती वाटू नये , म्हणून आपल्या खांद्यावरचा इवला पक्षी त्याच्या खांद्यावर अलगद ठेवतात.

एक झाड दुसऱ्या झाडाच्या फळावर हल्लाबोल करीत नाही.
वांझोट्या झाडाला घेरून, त्याची कुचेष्टा करीत नाहीत.
एक झाड दुसऱ्या झाडावर घाव घालत नाही.
झाडं चुकूनही लाकुडतोड्याचे अनुकरण करीत नाहीत.

झाडाची नाव होते, अन झाड आपसूक पोहायला शिकते.
झाडाचा दरवाजा होतो, अन झाड सगळी गुपितं मुळापर्यंत शोषून घेते.
झाडाची खुर्ची होते, तेव्हा एकेकाळच्या आपल्या माथ्यावरील असीम आकाशाला ते क्षणभरही विसरत नाही.
झाडाचा टेबल होतो, तेव्हा लिहिणार्याला जीव तोडून सांगते, माझ्याबरोबर कधीही लाकुडतोड्या सारखा वागू नकोस.

झाडं म्हणजे क्षमा. झाडं म्हणजे जागृति.
झाडं बेगुमानपणे झोपत नाहीत. झाडं दिवास्वप्नात रमत नाहीत.
माणसांच्या द्रष्टेपणाची ठेव म्हणजे झाडं.

झाडं म्हणजे साक्षात तपश्चर्या. झाडं म्हणजे ऊर्ध्वगामी प्रार्थना.
वादळवाऱ्यात लवतातही झाडं समृद्धपणे!
एरवी उभी असतात झाडं, निष्कलंक योग्याप्रमाणे.

'अष्टपुत्रासौभाग्यवती' ऐवजी 'अष्टवृक्षासौभाग्यवती' असा आशीर्वाद देण्याचे किंचित औदार्य आपल्या पूर्वजांनी दाखवले असते तर........ !

मुक्तकजीवनमानभूगोलप्रकटनविचारलेखभाषांतर

प्रतिक्रिया

सुंदर! हे मूळ भाषेत वाचायला किती छान वाटेल..

इथे सापडलं.
http://bloggingfairtradelebanon.blogspot.in/2010/02/if-only-young-were-t...

ह्या भाषांतरीत पुस्तकातला उतारा -

http://www.amazon.in/River-Dies-Thirst-Mahmoud-Darwish/dp/0981955711

शिव कन्या's picture

21 Apr 2015 - 8:33 pm | शिव कन्या

हे छान झालं यशोधरा. मूळचे सुंदर आहेच. तो धागा दिलास. धन्यवाद.

पैसा's picture

21 Apr 2015 - 8:46 pm | पैसा

असे रूपांतर करताना मूळ लिखाणाचा उल्लेख करा! ज्याचे श्रेय त्याला दिले पाहिजेच!

शिव कन्या's picture

21 Apr 2015 - 9:02 pm | शिव कन्या

पैसा, अगदी सुरुवातीलाच केला आहे उल्लेख ! कृपया, परत पहा.

पैसा's picture

21 Apr 2015 - 9:04 pm | पैसा

ओह सॉरी! धन्यवाद!

आनन्दिता's picture

21 Apr 2015 - 9:09 pm | आनन्दिता

प्रचंड सुंदर
परत परत वाचलं !

एस's picture

21 Apr 2015 - 11:04 pm | एस

+१

सविता००१'s picture

21 Apr 2015 - 11:36 pm | सविता००१

फार सुरेख

रेवती's picture

21 Apr 2015 - 11:41 pm | रेवती

आवडलं.

रुपी's picture

21 Apr 2015 - 11:48 pm | रुपी

यावरुन आधी वाचलेलं हे आठवलं.

श्रीरंग_जोशी's picture

22 Apr 2015 - 12:02 am | श्रीरंग_जोशी

रुपके आवडली. नववीमध्ये मराठी कुमारभारतीमध्ये असलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांमध्ये यासारखी रुपके होती.

तुम्ही दिलेल्या दुव्यातील माहितीही आवडली. त्या लेखाच्या लेखिका काही दिवसांपूर्वीच हे जग सोडून गेल्या :-( .

रुपी's picture

22 Apr 2015 - 10:54 pm | रुपी

ओह! अरेरे..

सौन्दर्य's picture

22 Apr 2015 - 12:40 am | सौन्दर्य

फार सुंदर अनुवाद, अगदी हृदयाला भिडला. आम्ही घरी कोणाचाही वाढदिवस असला की त्याच्या हस्ते एखादं रोप लावतो. कधी फुलझाड तर कधी फळझाड ! शतवृक्षा भाग्यवान भव !!

शिव कन्या's picture

22 Apr 2015 - 7:51 am | शिव कन्या

धन्यवाद . तुमचा हा उपक्रम ताडमाड वाढो. शुभेच्छा .

शिव कन्या's picture

22 Apr 2015 - 7:52 am | शिव कन्या

धन्यवाद . तुमचा हा उपक्रम ताडमाड वाढो. शुभेच्छा .

शिव कन्या's picture

22 Apr 2015 - 7:55 am | शिव कन्या

रुपी.. दुवा आवडला.धन्यवाद .

शिव कन्या's picture

22 Apr 2015 - 7:59 am | शिव कन्या

श्रीरंग जोशी ... सहमत . वाचत असल्याबद्दल धन्यवाद .

चुकलामाकला's picture

22 Apr 2015 - 8:26 am | चुकलामाकला

अतिशय तरल!!!!

उमा @ मिपा's picture

22 Apr 2015 - 8:55 am | उमा @ मिपा

सुंदर! विचार आणि अनुवाद दोन्हीही.

मितान's picture

22 Apr 2015 - 9:01 am | मितान

किती सुंदर !!!!

मृत्युन्जय's picture

22 Apr 2015 - 10:51 am | मृत्युन्जय

स्वैरानुवाद वाचला. आवडला. मग मूळ लेख / कविता वाचला(ली) आणि स्वैरानुवाद परत वाचला. याखेपी जास्त आवडला :)

अतिशय आवडला अनुवाद.मनाला भिडला.

नाखु's picture

22 Apr 2015 - 4:33 pm | नाखु

"झाडांवर प्रेम करा झाडाखाली नाही."
=
एक विशेष सूचना.

पुणेकर भामटा's picture

23 Apr 2015 - 10:39 am | पुणेकर भामटा

आमच्या बायकोला झाडावर चढता येत नाहि .... काय करावे ?

बॅटमॅन's picture

23 Apr 2015 - 6:12 pm | बॅटमॅन

काही अतिरोचक शक्यता मनात रुंजी घालू लागल्या, तरी कृपया कल्पनाशक्तीस अती उत्तेजन देऊ नये.

पुणेकर भामटा's picture

23 Apr 2015 - 10:22 pm | पुणेकर भामटा

हा प्रमाद माझा नव्हेच.... मिसळ पाव चि चटक लागल्यावर कल्पना शक्तिस उत्तेजना द्यावि लागत नाहि...

भामटा...

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2015 - 11:18 pm | टवाळ कार्टा

इथे झाड हे रुपक आहे कै?

शिव कन्या's picture

26 Apr 2015 - 9:40 pm | शिव कन्या

टवाळ कार्टा ..... नाही रूपक नाही.

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 10:39 pm | टवाळ कार्टा

ते मी http://www.misalpav.com/comment/688735#comment-688735 यासाठी विचारलेले :)