मुक्तक

सुखाची परिभाषा - डेसिडेराटा (मॅक्स एह्र्मान)

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
24 Mar 2015 - 5:47 am

काही दिवसांपूर्वी The Real Shine या सुखाचं एक रुप सांगणार्‍या मुक्तकाचं मराठी रुपांतर इथे केलं होतं. आज मॅक्स एह्र्मान याच्या Desiderata (desired things) या भक्तिकाव्यावर आधारित सुखाची दुसरी एक व्याख्या सांगणारं तसंच एक मुक्तक इथे देतो आहे. मूळ गद्य-काव्य इथे मिळेल.

कोलाहल अन् गर्दी-घाईत
सोडू नकोस संथपणा
विसरू नकोस तुझं हित
शांतता शब्दाविणा

मुक्तकआस्वाद

रसज्ञ नरभक्षक

देवदत्त परुळेकर's picture
देवदत्त परुळेकर in जे न देखे रवी...
20 Mar 2015 - 10:06 am

कां उगीच घाबरतोय आम्ही?
कां उगीच गळा काढून रडतोय?
कां उगीच त्यांचा वारसा सांगतोय?

तो नरभक्षक चटावलाय
आपला क्रुस
आपल्याच खांद्यावरून वाहणार्‍या
महात्म्यांच्या रक्ताला

तो क्रुस खांद्यावरून वाहण्यासाठी
खांदे मजबूत लागतात
ख्रिस्तासारखे
गांधीबाबासारखे
दाभोलकरांसारखे
पानसरेंसारखे

आजन्म व्रतस्थ जनसेवेतून
बहूमताच्याही विरोधात सत्यच सांगेन
अशा निर्धारी आचारातून
ऋशींनाही लाजवेल
अशा निर्मोही चारित्र्यातून
मजबूत होतात असे खांदे

कवितामुक्तकसमाज

स्मशान शांततेची शिकवण

देवदत्त परुळेकर's picture
देवदत्त परुळेकर in जे न देखे रवी...
20 Mar 2015 - 9:54 am

अरे, वर्गात कितीरेही गडबड
सगळे शांत बसा बघू
प्रश्न विचारु नका
उत्तरे शोधू नका
चर्चा करु नका
सगळे पास होणार आहात तुम्ही
आपो‌आप परिक्षेशिवाय
पुढच्या वर्गात जाणार आहात

काय म्हणता?
विचार स्वातंत्र्य
उच्चार स्वातंत्र्य
ढोल ताशे
किती गोंगाट करताय तुम्ही
एका गोळीने बंद करता येतात
सारे शब्द
हो, आणि आजकाल पिस्तुलांनाही बसवले असतात सायलेन्सर
एका सेकंदात सारे खल्लास
सगळी भाषणे बंद
मोर्चे बंद
सभा बंद
चर्चा बंद
संघटन बंद
शूऽऽऽ शांतता
चौकशी चालू आहे

सांत्वनाकवितामुक्तकसमाज

आमच्या विवाहाची कहाणी - ३

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
18 Mar 2015 - 1:24 pm

आमच्या विवाहाची कहाणी १ - http://www.misalpav.com/node/30588
आमच्या विवाहाची कहाणी - २- http://www.misalpav.com/node/30631

मुक्तकप्रकटन

First Things First

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
17 Mar 2015 - 12:06 pm

A Real Shine हे आंतर्जालावर खूप वर्षांपूर्वी वाचलेलं मुक्तक आज पुन्हा एकदा सापडलं, आणि त्याचं मराठी मुक्त-रुपांतर करावंसं वाटलं:

दिवस उजाडला की घड्याळ-काटा धावतांना दिसतो
असं वाटतं, की वेळ कधीच पुरेसा का नसतो
काम असतं खूप! पण खरंच का वेळ नसतो?

आज निघालो कामावर, पॉलीश नव्हतं बुटांना
घेतली डबी, म्हंटलं लावावं पॉलीश त्यांना
एवढ्यात लेक लागली रडू, म्हणे "कडे घ्याना"!

मुक्तकआस्वाद

काठी

शिवोऽहम्'s picture
शिवोऽहम् in जनातलं, मनातलं
16 Mar 2015 - 2:11 pm

त्या दिवशी दिवेलागणीच्या वेळी शीळ घालत अंगणात रिंगणं घालत बसलो होतो. आधी काठीनं टायर पळवत नेत होतो तेव्हा कान धरून अनीलदादानी घरी आणलं. पण एका जागी किती वेळ बसणार? म्हणुन ही रिंगणं. पण त्यातही खुस्पटं काढेलच कोणीतरी! काय तर म्हणे संध्याकाळी शिट्ट्या मारू नका. का? तर ती राक्षसांची वेळ! जणु काही माझी शिट्टी ऐकली की येतात ते लगोलग. काहीही करा, आहेच काहीतरी उपदेश. कडी वाजवु नको-भांडणं होतात, पायावर पाय टाकुन झोपु नको-आईबापाला त्रास होईल, पालथी मांडी घालु नको-काय माहित काय होईल. हे सगळं कसं लक्षात ठेवायचं कुणास ठाउक. वर आजी म्हणते की भांडणं व्हायला कारण स्वभाव आहेत, दुसरं काही नाही.

मुक्तकप्रकटन

अवताराची गोष्ट....

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
14 Mar 2015 - 10:12 am

पिढीजात चालत आलेली गावची देशमुखी सांभाळणारा संपतराव तसा भला माणुस..सगळ्या गावचा कारभार पहात होता..
त्याच्या बद्दल कुणी वाईट-वक्कट बोलायच नाही..संपतराव सगळ्याच्या मदतीला धावायचा.
तरी त्याला स्वतःला पोर नसल्याच दुखः होत.लग्नाला पाच वर्ष होऊन गेलती..सगळे देव,तिर्थ्,डॉक्टर पालथे घालुन झाले..
देशमुखाला आपला वारसा कोण चालवणार याची काळजी लागुन राहीली..

मुक्तकविरंगुळा

संघर्ष

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
10 Mar 2015 - 1:01 pm

नुकतीच अमिताभ बच्चन यांची एक सुंदर मुलाखत पाहण्यात आली. चक्क अर्णब गोस्वामीने अमिताभना या मुलाखतीत बोलू दिलं. :D

या मुलाखतीत अमिताभ यांनी त्यांचे वडील (महान साहित्यिक) हरिवंशराय बच्चन यांचा एक किस्सा सांगितला. एकदा अमिताभ काही समस्यांमुळे त्रस्त होऊन वडिलांकडे गेले. आणि त्यांना तक्रारीच्या सुरात म्हणाले, "बाबूजी, जीवनमे बडा संघर्ष है"

त्यावर हरिवंशराय यांनी उत्तर दिले "जब तक जीवन है, तब तक संघर्ष है".

अगदी सहज त्यांनी एवढं समर्पक उत्तर दिलं. संघर्ष हा जीवनातला एक त्रासदायक टप्पा नसून आयुष्यभर असणार याची जाणीव करून दिली.

मुक्तकविचार

तुकाराम होणे

देवदत्त परुळेकर's picture
देवदत्त परुळेकर in जे न देखे रवी...
7 Mar 2015 - 6:45 am

आज तुकाराम बीज. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी
विनम्र अभिवादन.
तुकाराम होणे

विठ्ठल होणे सोपे आहे
कठीण तुकाराम होणे
मंबाजीची काठी खाणे
त्याचे हात कुरवाळणे

कठीण दुष्काळ सोसणे
रोखे इंद्रायणी बुडविणे
गोदाम जनात लुटविणे
आपुले दिवाळे काढणे

कठीण भंडारी एकांत
सोयरे वनचरा होणे
अंगी वृक्षवल्ली हो‌ऊन
डो‌ई पाखरू बसणे

कठीण दैवासी हासणे
आ‌ई बाप गमावणे
पत्नी पुत्रा अग्नी देणे
विठो चरणी विसावणे

भावकविताविठ्ठलशांतरससंस्कृतीधर्मइतिहासकवितामुक्तक

आमच्या विवाहाची कहाणी - २

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
6 Mar 2015 - 8:08 pm

दहा जुलै ला घरी यायचे होते त्या अगोदर दोन आठवडे एक मध्यम वयीन सदगृहस्थ संध्याकाळी माझा पत्ता शोधत आमच्या मेस मध्ये आले. ते सांगली जवळच्या एका शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांच्या शाळेतील एक शिक्षिका त्यांचे यजमान दारू च्या आहारी गेल्यामुळे विभक्त झाल्या होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी लग्नाची होती. रोहिणी या मासिकातील जाहिरात वाचून त्या बाईंच्या विनंती वरून ते आले होते. मुलगी उत्तम शैक्षणिक करीयरची आणि सांगलीहून डॉक्टर झालेली होती. आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे या कारणास्तव मुलीला नंतर नकार देतात आणि तिची परिस्थिती वाईट होते या कारणास्तव ते अगोदर त्याची चाचपणी करण्यासाठी आले होते.

मुक्तकप्रकटन